< 2 इतिहास 31 >
1 १ अशा तऱ्हेने वल्हांडणाच्या उत्सवाची समाप्ती झाली. यरूशलेमेमध्ये त्यासाठी जमलेले इस्राएल लोक यहूदात आपापल्या गावी परतले. तिथे गेल्यावर त्यांनी दैवतांच्या दगडी मूर्ती फोडून टाकल्या. या परकीय दैवतांची पूजा होत असे. अशेराच्या मुर्तीही त्यांनी उखडून टाकल्या. यहूदा आणि बन्यामीन प्रांतातील सर्व उंचस्थाने आणि वेद्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. एफ्राइम आणि मनश्शे या प्रदेशातील लोकांनीही तेच केले. इतर देवतांच्या प्रार्थनेसाठी बनवण्यात आलेल्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी नाश केला. व तेव्हाच सर्व इस्राएल लोक घरोघरी गेले.
Quand tout cela fut terminé, tous les Israélites qui se trouvaient là s’en allèrent par les villes de Juda; ils brisèrent les statues, abattirent les Achêra, démolirent les hauts lieux et les autels dans tout Juda, Benjamin, Ephraïm et Manassé, jusqu’à complète destruction, et tous les enfants d’Israël s’en retournèrent chacun chez soi, dans leurs villes.
2 २ लेव्याची आणि याजकांची अनेक गटामध्ये विभागणी केलेली होती. त्यापैकी प्रत्येक गटाला आपआपले विशेष कामकाज नेमून दिलेले होते. राजा हिज्कीयाने त्या सर्वांना आपला कारभार हाती घ्यायला सांगितले. होमार्पणे व शांत्यर्पणे वाहणे हे लेवीचे व याजकांचे नेमलेले काम होते. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे म्हणणे व परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे ही त्यांचे काम होते.
Ezéchias établit les classes de prêtres et de Lévites selon leurs divisions, chacun selon son service, prêtres et Lévites, pour les holocaustes et les rémunératoires, pour faire le service, pour chanter des cantiques et des actions de grâces aux portes de la résidence de l’Eternel.
3 ३ यज्ञात अर्पण करण्यासाठी म्हणून हिज्कीयाने आपल्या पशुधनातील काही पशू दिले. सकाळ संध्याकाळच्या होमार्पणा खातर त्यांचा उपयोग करण्यात आला. शब्बाथ, चंद्रदर्शने व इतर उत्सव कार्ये या दिवशीही होमार्पणे होत असत. हे परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहीले आहे.
Le roi fit don d’une part de ses biens pour les holocaustes, les holocaustes du matin et du soir, les holocaustes des sabbats, des néoménies et des fêtes, ainsi qu’il est écrit dans la loi de Moïse.
4 ४ आपल्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा लोकांस लेवी व याजक यांना द्यावा लागत असे, तो त्यांनी द्यावा अशी यरूशलेमेतील लोकांसाठी आज्ञा राजा हिज्कीयाने केली. त्यामुळे नियतकार्य निर्वेधपणे परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार करणे याजकांना व लेवींना शक्य झाले.
Il dit au peuple, aux habitants de Jérusalem, de donner la part des prêtres et des Lévites, afin qu’ils tinssent ferme à la loi de l’Eternel.
5 ५ ही आज्ञा सर्व प्रजेच्या कानी गेली. त्याबरोबर इस्राएल लोकांनी आपले धान्याचे पीक, द्राक्ष, तेल, मध आणि इतर बागायती उत्पन्न या सगळ्याचा एक दशांश भाग आणून दिला.
Et quand la chose fut divulguée, les enfants d’Israël donnèrent en abondance les prémices du blé, du moût, de l’huile, du miel et de toutes les productions des champs et apportèrent en abondance la dîme de tout.
6 ६ यहूदातील नगरवासी इस्राएली व यहूदी लोकांनीही आपली गुरे आणि शेळ्यामेंढ्या यांचा दहावा हिस्सा जमा केला. परमेश्वराकरिता आखून दिलेल्या जागेत धान्याच्याही राशी त्यांनी आणून ओतल्या. त्यांनी या सर्व वस्तूंचे ढीग रचले.
Les enfants d’Israël et de Juda qui demeuraient dans les villes de Juda, eux aussi, apportèrent la dîme du gros et du menu bétail, la dîme des choses saintes consacrées à l’Eternel, leur Dieu, et ils les donnèrent par monceaux.
7 ७ लोकांनी या सर्व वस्तू आणून टाकायला तिसऱ्या महिन्यात सुरुवात केली आणि सातव्या महिन्यात हे काम संपले.
C’Est au troisième mois qu’ils commencèrent à former les monceaux, et au septième mois qu’ils les finirent.
8 ८ राजा हिज्कीया आणि इतर सरदार यांनी जेव्हा या राशी पाहिल्या तेव्हा त्यांनी परमेश्वरास आणि इस्राएलाच्या प्रजेला धन्यवाद दिले.
Ezéchias et les chefs arrivèrent, virent les monceaux et bénirent l’Eternel et son peuple Israël.
9 ९ राजाने मग याजकांना आणि लेवींना या गोळा झालेल्या वस्तूंविषयी विचारले.
Ezéchias interrogea les prêtres et les Lévites au sujet de ces monceaux.
10 १० तेव्हा सादोकाचा घराण्यातला मुख्य याजक अजऱ्या हिज्कीयाला म्हणाला की, “लोक परमेश्वराच्या मंदिरात धान्य व या सगळ्या गोष्टी अर्पण करायला लागल्यापासून आम्हास पोटभर खायला मिळू लागले आहे. अगदी तृप्त होईपर्यंत खाऊनही एवढे उरले आहे. परमेश्वराने आपल्या लोकांस आशीर्वाद दिला आहे, म्हणून तर इतके शिल्लक राहीले आहे.”
Alors Azariahou, le prêtre en chef de la maison de Çadok, lui répondit et dit: "Depuis qu’on a commencé d’apporter l’offrande au temple du Seigneur, on a mangé jusqu’à satiété et il en est resté énormément, car l’Eternel a béni son peuple, et c’est le reste que cette quantité que voici."
11 ११ हिज्कीयाने मग याजकांना परमेश्वराच्या मंदिरात कोठारे तयार ठेवायला सांगितली. त्याची आज्ञा अंमलात आणली गेली.
Ezéchias ordonna de préparer des chambres dans le temple de l’Eternel, et on les prépara.
12 १२ याजकांनी परमेश्वरासाठी अर्पण केलेल्या वस्तू धान्याचा अथवा पशूंचा दहावा हिस्सा, इतर काही वाहिलेल्या गोष्टी आत आणल्या आणि मंदिरातील कोठारात जमा केल्या. कोनन्या लेवी हा या भांडारावरचा प्रमुख अधिकारी होता. शिमी त्याच्या हाताखाली होता. शिमी कोनन्याचा भाऊ होता.
On apporta fidèlement l’offrande, la dîme et les objets sacrés, que l’on confia à la surveillance de Conaniahou, le Lévite, et de Chimeï son frère, comme second.
13 १३ यहीएल, अजज्या, नहथ, असाएल, यरीमोथ, योजाबाद, अलीएल, इस्मख्या, महथ व बनाया यांच्यावर कोनन्या आणि शिमी या दोन भावांची देखरेख होती. राजा हिज्कीया आणि देवाच्या मंदिराचा प्रमुख अधिकारी अजऱ्या यांनी या मनुष्यांची निवड केली.
Yehiël, Azaziahou, Nahat, Assahel, Yerimôt, Yozabad, Eliël, Yismakhiahou, Mahat et Benayahou étaient préposés sous la direction de Conaniahou et de Chimeï, son frère, par ordre du roi Ezéchias et d’Azariahou, l’intendant du temple de Dieu.
14 १४ लोकांनी देवाला स्वखुशीने अर्पण केलेल्या सगळ्या गोष्टींवर कोरेची देखरेख होती. परमेश्वरास वाहिलेल्या या गोष्टींचे वाटप करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. तसेच परमेश्वरास आलेल्या पवित्र भेटवस्तूंची वाटणी करण्याचेही काम त्याचेच होते. कोरे पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराचा द्वारपाल होता. त्याच्या पित्याचे नाव इम्नाना लेवी.
Coré, fils de Yimna, le Lévite, gardien de la porte orientale, était préposé aux offrandes volontaires offertes à Dieu, pour donner l’offrande de l’Eternel et les choses éminemment saintes.
15 १५ एदेन, मिन्यामीन, येशूवा, शमाया, अमऱ्या व शखन्या हे कोरेचे मदतनीस होते. याजक राहत त्या नगरात ते निष्ठेने आपली सेवा रुजू करत. याजकांच्या प्रत्येक गटांमधील आपापल्या भाऊबंदांना त्यांच्या वाटणीचा हिस्सा देत. हे वाटप करताना ते लहान मोठा अशा सर्वांनाच सारखाच भाग देत असत.
Sous ses ordres étaient Eden, Miniamin, Yèchoua, Chemayahou, Amariahou, Chekhaniahou, dans les villes des prêtres pour donner loyalement les portions à leurs frères, suivant leurs divisions, aux grands comme aux petits.
16 १६ लेवी घराण्याच्या इतिहासात ज्यांची नावे नोंदलेली होती असे, तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे जे लेवी पुरुष परमेश्वरच्या मंदिरात नेमून दिलेल्या दैनंदिन कामासाठी जात त्यांना त्यांची वाटणी हे मदतनीस देत. अशा प्रकारे लेवीच्या प्रत्येक गटाला काम नेमून दिलेले होते.
Outre ceux qui étaient inscrits comme mâles depuis trois ans et au-dessus, à tous ceux qui entraient dans le temple de l’Eternel, pour les fonctions quotidiennes, pour leur service, selon leurs classes et selon leurs divisions.
17 १७ याजकांना त्यांच्या वाटणीचा हिस्सा मिळत असे. ज्या लेवीची आपापल्या पितृकुळाप्रमाणे नोंद झाली होती त्यांना आणि किमान वीस वर्षे किंवा त्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लेवींना त्यांची वाटणी मिळत असे. त्यांच्यावरील जबाबदारीचे स्वरूप आणि त्यांचा गट यावर त्याचे प्रमाण ठरत. असे.
L’Inscription des prêtres se faisait d’après leurs familles, et les Lévites étaient comptés depuis vingt ans et au-delà d’après leurs fonctions et leurs classes.
18 १८ ज्या लेवीची वंशावळ्यांमध्ये नोंद झालेली होती त्या सर्वांच्या अपत्यांना, पत्नींना पुत्र व कन्या यांनाही आपापला हिस्सा मिळे. परमेश्वराच्या सेवेसाठी ते नेहमीच पवित्र होऊन तप्तर असत म्हणून त्यांना हे दिले जाई.
Ils devaient enregistrer aussi leurs petits enfants, femmes, fils et filles avec toute l’assemblée, car ils s’occupaient ponctuellement de la distribution des choses saintes.
19 १९ अहरोन वंशातील काही याजकांची लेवी राहत असत त्या गावांमध्ये शेत-शिवारे होती. काही अहरोनाचे वंशज नगरांमध्येही राहत होते. तेव्हा त्या नगरातील मनुष्यांची नावानिशी निवड करून त्यांना आपल्या उत्पन्नातला वाटा या अहरोन वंशजांना द्यायला निवडले होते. वंशावळीत नोंदवलेले सर्वजण आणि पुरुष लेवी यांना हा वाटा मिळे.
En outre, les descendants d’Aaron, les prêtres qui étaient à la campagne formant la banlieue de leurs villes avaient dans chaque ville des hommes désignés nominativement pour distribuer les portions à tous les mâles d’entre les prêtres et à tous ceux qui étaient enregistrés parmi les Lévites.
20 २० राजा हिज्कीयाने अशाप्रकारे यहूदात चांगली कामगिरी केली. परमेश्वर देवाच्या दृष्टीने जे योग्य, बरोबर आणि सत्य ते त्याने केले.
Ezéchias en fit autant dans tout Juda et il fit ce qui est bien, droit et loyal devant l’Eternel, son Dieu.
21 २१ हाती घेतलेल्या प्रत्येक कामात त्यास यश आले, उदाहरणार्थ, देवाच्या मंदिरातील उपासना, नियमशास्त्राचे पालन, परमेश्वरास शरण जाणे. हिज्कीयाने हे सर्व मनापासून केले त्यास यश लाभले.
Dans toutes les œuvres qu’il entreprit pour le culte du temple de Dieu, pour la Loi et les commandements, recherchant son Dieu, il agit de tout cœur et réussit.