< 2 इतिहास 3 >
1 १ यरूशलेम येथील मोरिया डोंगरावर शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधायला सुरुवात केली. शलमोनाचे पिता दावीद यांना परमेश्वराने याच मोरिया डोंगरावर दर्शन दिले होते. दावीदाने योजनापुर्वक तयार करून ठेवलेल्या जागेवर शलमोनाने मंदिर बांधले. ही जागा म्हणजे अर्णान यबूसीचे खळे होय!
I poèe Solomun zidati dom Gospodnji u Jerusalimu na brdu Moriji, koje bi pokazano Davidu ocu njegovu na mjestu koje bješe pripravio David, na gumnu Ornana Jevusejina.
2 २ आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षातल्या दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी शलमोनाने कामाला सुरुवात केली.
A poèe zidati drugoga dana drugoga mjeseca èetvrte godine carovanja svojega.
3 ३ शलमोनाने बांधायला घेतलेल्या परमेश्वराच्या मंदिराच्या पायाची मोजमापे अशी: हा पाया साठ हात लांब आणि वीस हात रुंद होता. तेव्हा प्रचलित असलेले जुने क्युबिट परिमाण त्याने वापरले होते.
A ovako zasnova Solomun da zida dom Božji: u dužinu šezdeset lakata po staroj mjeri, a u širinu dvadeset lakata.
4 ४ मंदिराच्या समोरील द्वारमंडपाची लांबी वीस हाथ असून ह्याच्या रूंदीशी जुळणारी होती. त्याची उंची देखील विस हाथ होती. त्याची आतील बाजू शलमोनाने शुद्ध सोन्याने मढवली होती.
A trijem koji bijaše pred dužinom uz širinu doma imaše dvadeset lakata, a u visinu sto i dvadeset; i obloži ga iznutra èistijem zlatom.
5 ५ मंदिरातील मुख्य दालनाच्या छतास त्याने देवदारुच्या फळ्या बसवल्या. त्यावर शलमोनाने सोन्याचा पत्रा चढवला आणि त्यावर खजुरीची झाडे व साखळ्या कोरुन काढल्या
A dom veliki obloži drvetom jelovijem, potom ga obloži èistijem zlatom, i ozgo naèini palme i lance.
6 ६ मौल्यवान रत्ने जडवून त्याने मंदिराच्या सौंदर्यात भर घातली यामध्ये उपयोगात आणलेले सोने पर्वाइमचे होते.
I obloži dom kamenjem dragim da je nakiæen, a zlato bijaše Parvajimsko.
7 ७ मंदीराच्या तुळया, दाराचे खांब, भिंती, दरवाजे हे मंदिराचे आतले भागही शलमोनाने सोन्याने मढवले. भिंतींवर त्याने करुब कोरले.
Obloži zlatom dom, grede, pragove i zidove i vrata, i izreza heruvime po zidovima.
8 ८ यानंतर शलमोनाने मंदिरातला अत्यंत पवित्र गाभारा बांधला. हे अत्यंत पवित्रस्थान वीस हात लांब आणि वीस हात रुंद होते. मंदिराइतकीच त्याची रुंदी होती. गाभाऱ्याच्या भिंतीही शलमोनाने सोन्याने मढवल्या. हे एकंदर सहाशे किक्कार सोने होते.
I naèini dom za svetinju nad svetinjama, dug uz širinu doma dvadeset lakata i širok dvadeset lakata, i obloži ga èistijem zlatom, kojega otide do šest stotina talanata.
9 ९ सोन्याच्या खिळ्यांचे वजन पन्नास शेकेल एवढे होते. वरच्या मजल्यावरची दालने ही शलमोनाने सोन्याने मढवली.
A na kline dade pedeset sikala zlata; i klijeti obloži zlatom.
10 १० अत्यंत पवित्र गाभाऱ्यात बसवण्यासाठी शलमोनाने दोन करुब घडवले. हे करुबही कारागिरांनी सोन्याने मढवले.
I naèini u domu svetinje nad svetinjama dva heruvima, naprave umjetnièke, i obloži ih zlatom.
11 ११ करुबांच्या एकेका पंखाची लांबी पाच हात होती. त्यांची एकंदर लांबी वीस हात एवढी होती. पाहिल्या करुबाचा पाच हात लांबीचा एक पंख दालनाच्या एका बाजूच्या भिंतीला स्पर्श करत होता तर दुसरा पाच हात लांबीचा पंख दुसऱ्या करुबाच्या एका पंखाला.
I krila tijeh heruvima imahu u dužinu dvadeset lakata: jedno krilo bijaše od pet lakata, i ticaše u zid od doma, i drugo krilo bijaše od pet lakata, i ticaše u krilo drugoga heruvima;
12 १२ आणि दुसऱ्या करुबाचा दुसरा पाच हात लांबीचा पंख दालनाच्या दुसऱ्या भिंतीला स्पर्श करत होता.
Tako i drugoga heruvima krilo bijaše od pet lakata, i ticaše u zid od doma, i drugo mu krilo bijaše od pet lakata i sastavljaše se s krilom drugoga heruvima.
13 १३ अशाप्रकारे करुबांच्या पंखानी वीस हात एवढे अंतर व्यापलेले होते. हे करुब पवित्र गाभाऱ्याकडे तोंड करून उभे होते.
Krila tijem heruvimima bijahu raširena na dvadeset lakata, a oni stajahu na nogama svojim, licem okrenutim u dom.
14 १४ निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या लोकरीचा व तलम सुताचा पडदा करून घेऊन शलमोनाने त्यावरही करुब करवून घेतले.
I naèini zavjes od porfire, od skerleta, od crvca i od tankoga platna, i po njemu naèini heruvime.
15 १५ मंदिरासमोर शलमोनाने दोन स्तंभ उभारले. प्रत्येक स्तंभ पस्तीस हात उंच होते. त्यांच्यावरचे कळस प्रत्येकी पाच हात उंचीचे होते.
I naèini pred domom dva stupa, u visinu od trideset i pet lakata, i oglavlja ozgo na svakom od pet lakata.
16 १६ शलमोनाने साखळ्या करून त्या कळसांवर ठेवल्या. या साखळ्यांना त्याने कलाकुसर म्हणून शंभर सुशोभित डाळिंबे लावली.
I naèini lance kao u svetinji, i metnu ih na vrh stupova, i naèini sto šipaka, i metnu ih meðu lance.
17 १७ हे स्तंभ मंदिरासमोर डाव्याउजव्या हाताला उभे केले. उजव्या बाजूच्या खांबाला शलमोनाने याखीम (संस्थापक) आणि डावीकडच्या खांबाला बवाज (सामर्थ्यवान) अशी नावे दिली.
I postavi stupove pred crkvom, jedan s desne strane a drugi s lijeve, i desni nazva Jahin a lijevi Voas.