< 2 इतिहास 29 >
1 १ हिज्कीया वयाच्या पंचविसाव्या वर्षी राजा झाला. त्याने यरूशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीया. ती जखऱ्याची कन्या.
Hezekia ne ja-higni piero ariyo gabich kane obedo ruoth kendo norito piny kodak Jerusalem kuom higni piero ariyo gochiko. Min mare ne nyinge Abija nyar Zekaria.
2 २ हिज्कीयाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती. आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच त्याचे वर्तन सुयोग्य असे.
Notimo gima kare e nyim wangʼ Jehova Nyasaye mana kaka kwar mare Daudi notimo.
3 ३ हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि दुरुस्ती करून ते मजबूत केले. राजा झाल्याबरोबर आपल्या कारभाराच्या पहिल्या महिन्यातच त्याने हे केले.
E dwe mokwongo mar hik lochne mokwongo noyawo dhout hekalu mar Jehova Nyasaye moloso.
4 ४ सर्व याजक आणि लेवी यांना त्याने एकत्र बोलावले आणि मंदिराच्या पूर्वेकडील मोकळ्या चौकात त्यांची सभा घेतली.
Noluongo jonabi kod jo-Lawi mondo ochokre e laru ma yo wuok chiengʼ.
5 ५ तो त्यांना म्हणाला, “लेवी हो, ऐका! देवाच्या सेवेसाठी पवित्र व्हा. या पवित्र कार्यासाठी परमेश्वर देवाच्या मंदिराची सिध्दता करा. परमेश्वर हा आपल्या पूर्वजांचा देव आहे. पवित्रस्थानातूनही अशुद्धपणा काढून टाका.
Kendo nowachonegi niya, “Winjauru un jo-Lawi! Koro pwodhreuru kendo chiwreuru ni hekalu mar Jehova Nyasaye ma Nyasach kwereu. Goluru chilo maricho e kama ler mar lemo.
6 ६ आपल्या पूर्वजांनी परमेश्वराची संगत सोडली आणि आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने वाईट ते केले त्याच्या मंदिराकडे पाठ फिरवली.
Kwerewa ne ok jo-ratiro; omiyo negitimo richo e nyim wangʼ Jehova Nyasaye, ma Nyasachwa kane giweye. Ne gingʼanyone hekalu mar Jehova Nyasaye, ma giweyo luwe.
7 ७ त्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले आणि दिवे विझू दिले. इस्राएलाच्या परमेश्वराच्या पवित्र गाभाऱ्यात परमेश्वरासाठी धूप जाळणे, होमार्पणे करणे बंद पडले.
Bende neginego teyni kendo loro dhout agola kendo ne ok giwangʼo ubani mangʼwe ngʼar kata chiwo misango miwangʼo pep e kama ler mar lemo mar Nyasach Israel.
8 ८ म्हणून यहूदा व यरूशलेमेच्या लोकांवर परमेश्वर कोपला. त्याने लोकांस शासन केले. परमेश्वराचा क्रोध पाहून इतर लोक विस्मयचकित झाले आणि घाबरले. यहूदी लोकांबद्दल त्यांना तिरस्कार आणि शरम वाटली. ही वस्तुस्थिती तुम्हास माहीत आहे. तुम्ही ती पाहतच आहात.
Omiyo mirima osemako Jehova Nyasaye gi jo-Juda kod Jerusalem; kendo nomiyo gibedo gima lich; miwuoro kendo mocha mana kaka uneno giwengeu uwegi.
9 ९ म्हणूनच युध्दात आपले पूर्वज मारले गेले. आपल्या स्त्रिया, मुले कैदी झाले.
Mano emomiyo kwerewa noneg gi ligangla kendo yawuotwa gi nyiwa gi mondwa oter e twech.
10 १० म्हणून मी, हिज्कीया, इस्राएलच्या परमेश्वर देवाशी करार करणार आहे. म्हणजे आपल्यावर त्याचा राग राहणार नाही.
Koro adwaro timo singruok gi Jehova Nyasaye, ma Nyasach jo-Israel mondo mi mirimbe mager owuog kuomwa.
11 ११ तेव्हा पुत्रांनो आता, आळसात वेळ घालवू नका. परमेश्वराने त्याच्या सेवेसाठी तुमची निवड केली आहे. मंदिरात त्याची सेवाचाकरी करणे, धूप जाळणे यासाठी तुम्हास त्याने निवडले आहे.”
Un yawuota kik koro ujwangʼe, nikech Jehova Nyasaye oseyierou mondo uchungʼ e nyime kendo utine kuwangʼone ubani.”
12 १२ तेव्हा जे लेवी कामाला लागले ते पुढीलप्रमाणे: कहाथ घराण्यातले अमासयाचा पुत्र महथ आणि अजऱ्याचा पुत्र योएल. मरारी कुळातला अब्दीचा पुत्र कीश आणि यहल्लेलेलाचा पुत्र अजऱ्या, गर्षोनी कुळातला जिम्माचा पुत्र यवाह आणि यवाहाचा पुत्र एदेन,
Eka jo-Lawi mane ochako tich ne gin: koa kuom joka Kohath, Mahath wuod Amasai kod Joel wuod Azaria; koa kuom Merari, Kish wuod Abdi kod Azaria wuod Jehalelel; koa kuom joka Gershon, Joa wuod Zima kod Eden wuod Joa;
13 १३ अलीसाफानच्या घराण्यातील शिम्री आणि ईएल आसाफच्या घराण्यातील जखऱ्या व मत्तन्या.
koa kuom nyikwa Elizafan, Shimri gi Jeyel, koa kuom nyikwa Asaf, Zekaria kod Matania;
14 १४ हेमानच्या कुळातील यहीएल आणि शिमी, यदूथूनच्या कुळातील शमाया आणि उज्जियेल.
koa kuom nyikwa Heman, Jehiel kod Shimei; koa kuom nyikwa Jeduthun, Shemaya kod Uziel.
15 १५ मग या लेवींनी आपल्या भाऊबंदांसह एकत्र येऊन मंदिराच्या शुद्धतेसाठी सर्व तयारी केली. परमेश्वराने राजामार्फत केलेली आज्ञा त्यांनी पाळली. मंदिराच्या स्वच्छतेसाठी ते आत शिरले.
Kane gisechoko owetegi mi gipwodhore eka negidonjo e hekalu mar Jehova Nyasaye mondo gipwodhe kaka ruoth nochiko kaluwore gi wach mar Jehova Nyasaye.
16 १६ परमेश्वराच्या मंदिरात जेवढ्या अशुद्ध आणि तिथल्या वातावरणाशी विसंगत वस्तू त्यांना सापडल्या त्या सगळ्या गोळा करून त्यांनी मंदिराच्या अंगणात आणून ठेवल्या. तेथून त्या उचलून त्यांनी किद्रोन खोऱ्यात नेऊन टाकल्या.
Jodolo nodonjo e kama ler mar lemo mar Jehova Nyasaye mondo gipwodhe kendo negikelo e laru gimoro amora mochido mane ginwangʼo e hekalu mar Jehova Nyasaye, eka jo-Lawi notingʼogi ka terogi oko nyaka e Holo mar Kidron.
17 १७ पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेला लेवींनी पवित्रीकरणाच्या कामाला सुरुवात केली. आठव्या दिवशी ते परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत आले. परमेश्वराच्या मंदिराची सर्व तऱ्हेची शुद्धता होऊन ते पवित्र व्हायला आणखी आठ दिवस लागले. पहिल्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी त्यांचे काम पूर्ण झाले.
Negichako tich pwodho hekalu chiengʼ mokwongo mar dwe mokwongo to chiengʼ mar aboro mar dweno negichopo e agola mar Jehova Nyasaye. To kuom ndalo aboro mamoko ne gipwodho hekaluno mar Jehova Nyasaye kendo ne gitieke chiengʼ mar apar gauchiel mar dweno.
18 १८ त्यानंतर ते राजा हिज्कीया याच्याकडे गेले. राजाला ते म्हणाले, “परमेश्वराचे मंदिर, होमार्पणाची वेदी आणि त्यावरील सर्व भांडे आम्ही शुद्ध केले आहेत. समर्पित भाकरीचे मेज आणि त्याची सर्व उपकरणेही शुद्ध केली आहेत.
Bangʼe negidhi ir ruoth Hezekia kagiwachone niya, “Wasepwodho hekalu mar Jehova Nyasaye duto kaachiel gi kendo mar misango miwangʼo pep gi gik moko duto mitiyogo e kendono kod mesa makati mopwodhi kod gigene duto.
19 १९ राजा आहाजने आपल्या कारकिर्दीत गैरवर्तनातून जी उपकरणे फेकून दिली होती त्यांचीही शुद्धी करून आम्ही ती मांडली आहेत. ती आता परमेश्वराच्या वेदीसमोरच आहेत.”
Waseloso kendo pwodho gik moko duto mane ruoth Ahaz ne ogolo oko nikech noweyo luwo Nyasaye kane en ruoth, kendo oseketgi e nyim kendo mar misango miwangʼo mar Jehova Nyasaye.”
20 २० दुसऱ्या दिवशी सकाळी, नगरातील सर्व सरदारांना बरोबर घेऊन राजा हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला.
Kinyne gokinyi ruoth Hezekia nochoko jodongo mag dala maduongʼ kaachiel kendo negidhi e hekalu mar Jehova Nyasaye.
21 २१ त्यांनी सात बैल, सात मेंढे, सात कोकरे आणि सात बोकड पापार्पणासाठी आणले. यहूदाचे राज्य, परमेश्वराचे पवित्रस्थान आणि यहूदा यांच्या शुद्धीप्रीत्यर्थ हे प्राणी होते. अहरोनाचे वंशज असलेल्या याजकांना हिज्कीयाने ते प्राणी परमेश्वराच्या वेदीवर अर्पण करायची आज्ञा केली.
Negikelo rwedhi abiriyo, gi imbe abiriyo gi nyirombe abiriyo kod nywogi abiriyo mondo gichiw kaka misango mar golo richo mar pinyruoth, gi mar kama ler mar lemo kod Juda. Ruoth nochiko jodolo ma nyikwa Harun mondo gichiw gigo e kendo mar misango mar Jehova Nyasaye.
22 २२ त्याप्रमाणे याजकांनी बैल कापले आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग मेंढे कापून त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग त्यांनी कोकरे कापली आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले.
Omiyo noyangʼ rwedhigo mi jodolo nokawo remo mokiro e kendo mar misango, bangʼe ne giyangʼo imbe mine gikawo remo ma gikiro e kendo mar misango.
23 २३ यानंतर याजकांनी राजा व समुदाय यांच्यापुढे बोकडांना आणले. हे बोकड पापार्पणासाठी होते. याजकांनी बोकडांवर हात ठेवून त्यांना मारले.
Eka nokel nywogi mag misango mar golo richo e nyim ruoth kod joma nochokore mine giyieyo lwetgi kuomgi.
24 २४ बोकडांचे रक्त वेदीवर शिंपडून याजकांनी पापार्पण केले. इस्राएलाबद्दल प्रायश्चित होण्यासाठी म्हणून हे विधी याजकांनी केले. समस्त इस्राएल लोकांसाठी होमार्पण आणि पापार्पण करावे अशी राजाची आज्ञा होती.
Bangʼe jodolo noyangʼogi mi gichiwo rembgi e kendo mar misango kaka misango mar golo richo mondo ochulgo richo mar jo-Israel duto nikech ruoth nochiko mondo ochiw misango miwangʼo pep kod misango mar golo richo ne jo-Israel duto.
25 २५ दावीद, राजाचा द्रष्टा गाद आणि संदेष्टा नाथान यांच्या आज्ञेप्रमाणे राजा हिज्कीयाने झांजा, सतारी व वीणा वाजवण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरात लेवीची नेमणूक केली. परमेश्वराने संदेष्ट्यांमार्फत तशी आज्ञा केली होती.
Noketo jo-Lawi e hekalu mar Jehova Nyasaye momiyogi ongengʼo, gi nyatiti kod orutu kaluwore gi chik Daudi gi mar Gad janen mar ruoth kod mar Nathan janabi. Chikni nogol kod jonabi kowuok kuom Jehova Nyasaye.
26 २६ त्याप्रमाणे दावीदाची वाद्ये घेऊन लेवी आणि कर्णे घेऊन याजक उभे राहिले
Omiyo jo-Lawi nochungʼ koikore gi thumbe mag Daudi to jodolo noikore kod turumbete.
27 २७ मग हिज्कीयाने वेदीवर होमार्पण करण्याची आज्ञा केली. त्यास सुरुवात होताच परमेश्वराचे भजन स्तवनही सुरु झाले. कर्णे आणि इस्राएलचा राजा दावीद याची वाद्ये यांचा गजर सुरु झाला.
Hezekia nochiko mondo otim misango miwangʼo pep e kendo mar misango. Kane chiwo misango ochakore, wer ne Jehova Nyasaye bende nochakore ka gigoyo turumbete kod thumbe mag Daudi ruodh Israel.
28 २८ होमार्पण चालू असेपर्यंत समुदाय अभिवादन करत होता. गायक गात होते आणि कर्णे वाजवणे चालू होते.
Joma nochokore duto nokulore piny ka gilemo ka jower wer to jogo turumbete goyo turumbete. Mano nodhi nyime nyaka notiek chiwo misango miwangʼo pep.
29 २९ होमार्पणाचे विधी झाल्यावर राजा हिज्कीयासह सर्व लोकांनी मस्तके लववून परमेश्वराची आराधना केली.
Kane otiek chiwo misango ruoth kod jogo duto mane ni kode nogoyo chonggi piny ka gimiye duongʼ.
30 ३० हिज्कीया आणि सरदार यांनी लेव्यांना परमेश्वराची स्तोत्रे गाण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी दावीद आणि द्रष्टा आसाफ यांनी रचलेली स्तोत्रे म्हटली. या स्तवनांनी ते आनंदीत झाले. सर्वांनी लवून नमस्कार करून देवाची आराधना केली.
Ruoth Hezekia gi jodonge nochiko jo-Lawi mondo opak Jehova Nyasaye gi wende mag Daudi kod Asaf janen. Omiyo ne giwero wende pak ka gimor kendo ka gimiye duongʼ.
31 ३१ हिज्कीया म्हणाला, “यहूदातील लोकहो, तुम्ही आता स्वत: ला परमेश्वराच्या हवाली केले आहे. तेव्हा जवळ येऊन यज्ञाची आणि उपकारस्मरणाची अर्पणे आणा.” तेव्हा लोकांनी ती अर्पणे आणली. ज्यांना हवी होती त्यांनी मनोभावे होमार्पणेही आणली.
Eka Hezekia nowacho niya, “Koro usechiworu ne Jehova Nyasaye, biuru mondo ukel misengni kod chiwo mag erokamano e hekalu mar Jehova Nyasaye.” Omiyo joma nochokore nokelo misengini kod chiwo mag goyo erokamano kendo jogo duto ma chunygi ne oyie nokelo misango miwangʼo pep.
32 ३२ मंदिरात एकंदर होमार्पणे आणली गेली त्याची मोजदाद पुढीलप्रमाणे: सत्तर बैल, शंभर मेंढे, दोनशे नर कोकरे. त्यांचे परमेश्वरास होमार्पण करण्यात आले.
Kar romb misengini miwangʼo pep mane joma ochokore nokelo ne gin rwedhi piero abiriyo, kod imbe mia achiel gi nyiimbe mia ariyo magi duto nochiw kaka misango miwangʼo pep ni Jehova Nyasaye.
33 ३३ सहाशे बैल आणि तीन हजार शेरडेमेंढरे हे परमेश्वरास वाहिलेले पशू.
To jamni mane owal mondo otimgo misengini ni ruoth ne gin rwedhi mia auchiel kod rombe gi diek alufu adek.
34 ३४ होमबलीसाठी आणलेल्या एवढ्या पशूंची कातडी काढणे, कापणे हे तेवढ्या याजकांच्या आवाक्याबाहेरचे होते. तेव्हा त्यांच्या बांधवांनी लेवींनी त्यांना या कामात मदत केली आणि इतर याजक पुढच्या सेवेसाठी पवित्र होण्याच्या तयारीला लागले. पवित्र होण्याच्या बाबतीत याजकांपेक्षा लेवी अधिक काटेकोर होते.
Kata kamano jodolo ne nok ahinya mane ok nyal yangʼo chiayo mar misango miwangʼo pep; omiyo jowetegi ma jo-Lawi nokonyogi nyaka negitieko tich kendo nyaka jodolo moko notieko pwodhore, nimar jo-Lawi ne jokinda kuom pwodhruokgi moloyo jodolo.
35 ३५ होमबली पुष्कळ होते. शांत्यर्पणांच्या पशूंची चरबी आणि पेयार्पणेही विपुल होती. याप्रकारे परमेश्वराच्या मंदिरातील उपासना क्रमवार स्थापित झाली.
Misengini miwangʼo pep ne ngʼeny moloyo kaachiel gi boche miwangʼo mar lalruok kod misango miolo piny mane ochiw kaachiel gi misango miwangʼo pep. Kamano e kaka lemo mar hekalu mar Jehova Nyasaye nodwok kare.
36 ३६ परमेश्वराने आपल्या प्रजेसाठी हे जे सर्व घडवून आणले त्यामुळे हिज्कीया आणि सगळे लोक आनंदीत झाले. हे सर्व इतक्या जलद घडून आले म्हणून त्यांना विशेषच आनंद झाला.
Hezekia kod ji duto nobedo mamor kod gima Nyasaye notimone joge, nikech notimo mapiyo.