< 2 इतिहास 27 >
1 १ योथाम राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर सोळा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यरुशा ती सादोकाची कन्या.
De vinte e cinco anos era Jotão quando começou a reinar, e dezesseis anos reinou em Jerusalém. O nome de sua mãe foi Jerusa, filha de Zadoque.
2 २ योथाम परमेश्वराच्या दृष्टीने उचित तेच करीत असे. आपले पिता उज्जीया यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या आज्ञेत राहिला. पण त्याचे पिता जसे परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळायला गेले तसे मात्र त्याने केले नाही. लोकांचे वाईट मार्गाने जाणे चालूच होते.
E fez o que era correto em olhos do SENHOR, conforme a todas as coisas que havia feito Uzias seu pai, salvo que não entrou no templo do SENHOR. E o povo corrompia-se ainda.
3 ३ परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा योथामाने पुन्हा करवला. ओफेलच्या कोटावर त्याने बरेच बांधकाम केले.
Edificou ele a porta maior da casa do SENHOR, e no muro da fortaleza edificou muito.
4 ४ यहूदाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे वसवली. जंगलात किल्ले आणि बुरुज बांधले.
Ademais edificou cidades nas montanhas de Judá, e preparou palácios e torres nos bosques.
5 ५ अम्मोन्याचा राजा आणि त्यांचे सैन्य यांच्यावर योथामाने चढाई केली आणि त्यांचा पराभव केला. त्यामुळे पुढील तीन वर्षे अम्मोनी योथामाला शंभर किक्कार चांदी, दहा हजार कोर गहू आणि तेवढेच जव दरवर्षी देत असत.
Também teve ele guerra com o rei dos filhos de Amom, aos quais venceu; e deram-lhe os filhos de Amom naquele ano cem talentos de prata, e dez mil coros de trigo, e dez mil de cevada. Isto lhe deram os filhos de Amom, e o mesmo no segundo ano, e no terceiro.
6 ६ परमेश्वर देवाने सांगितल्याप्रमाणे मन: पूर्वक आचरण केल्यामुळे योथामचे सामर्थ्य वाढले.
Assim que Jotão foi fortificado, porque preparou seus caminhos diante do SENHOR seu Deus.
7 ७ त्याने केलेल्या इतर गोष्टी आणि लढाया यांची हकीकत इस्राएल व यहूदा राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे.
Os demais dos feitos de Jotão, e todas suas guerras, e seus caminhos, eis que estão escrito no livro dos reis de Israel e de Judá.
8 ८ योथाम गादीवर आला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये सोळा वर्षे राज्य केले.
Quando começou a reinar era de vinte e cinco anos, e dezesseis reinou em Jerusalém.
9 ९ पुढे योथाम मरण पावला आणि त्याचे त्याच्या पूर्वंजाशेजारी दफन केले गेले. दावीद नगरांत लोकांनी त्यास पुरले. योथामाच्या जागी आहाज हा त्याचा पुत्र राज्य करु लागला.
E descansou Jotão com seus pais, e sepultaram-no na cidade de Davi; e reinou em seu lugar Acaz seu filho.