< 2 इतिहास 26 >
1 १ अमस्याचा पुत्र उज्जीया याला यहूदाच्या लोकांनी अमस्याच्या गादीवर बसवले. उज्जीया तेव्हा सोळा वर्षांचा होता.
Då tog hele Juda folk Ussia, som var sexton åra gammal, och gjorde honom till Konung i hans faders Amazia stad.
2 २ उज्जीयाने एलोथ नगर पुन्हा बांधून काढले आणि यहूदाच्या स्वाधीन केले. अमस्याच्या मृत्यूनंतरची ही घटना.
Han byggde Eloth, och lät det igenkomma till Juda, sedan Konungen afsomnad var med sina fäder.
3 ३ उज्जीया सोळा वर्षांचा असताना राजा झाला पुढे त्याने यरूशलेमेवर बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखिल्या ती यरूशलेमची होती.
Sexton åra gammal var Ussia, då han Konung vardt, och regerade tu och femtio år i Jerusalem; hans moder het Jecholia af Jerusalem.
4 ४ उज्जीयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने योग्य असे होते. आपले पिता अमस्या यांच्याप्रमाणे त्याने देवाचे अनुसरण केले.
Och han gjorde det Herranom väl behagade, såsom hans fader Amazia gjort hade.
5 ५ जखऱ्याच्या हयातीत उज्जीयाने देवाचे अनुसरण केले. आदरपूर्वक परमेश्वरास मानणे त्यास जखऱ्याने शिकवले, उज्जीया असे वागत असे तोपर्यंत परमेश्वर देवाने उज्जीयाचे कल्याण केले.
Och han sökte Gud, så länge Zacharia lefde, den läraren i Guds syner; och så länge han sökte Herren, lät honom Gud väl gå.
6 ६ उज्जीयाने पलिष्ट्यांबरोबर युध्द केले. गथ, यब्ने व अश्दोदचे कोट पाडून टाकले अश्दोद जवळ व पलिष्ट्यांच्या वस्तीत इतरत्र उज्जीयाने नगरे वसवली.
Ty han drog ut, och stridde emot de Philisteer, och bröt neder murarna i Gath, och murarna i Jabne, och murarna i Asdod, och ibland de Philisteer.
7 ७ पलिष्टे, गुरबालमधले अरब आणि मऊनी यांच्याशी झालेल्या लढायांमध्ये परमेश्वराने उज्जीयाला साहाय्य केले.
Ty Gud halp honom emot de Philisteer, emot de Araber, dem i Gurbaal, och emot de Menniter.
8 ८ अम्मोनी लोक उज्जीयाला कर देत असत. उज्जीयाचे सामर्थ्य इतके वाढले की त्याची कीर्ती मिसरच्या सीमेपर्यंत पोहोचली.
Och de Ammoniter gåfvo Ussia skänker, och han vardt namnkunnig allt intill der man kommer in i Egypten; ty han vardt ju starkare och starkare.
9 ९ यरूशलेमामध्ये कोपऱ्यातली वेस, खोऱ्याची वेस आणि कोट वळसा घेतो तेथे उज्जीयाने बुरुज बांधून तटबंदीला बळकटी आणली.
Och Ussia byggde torn i Jerusalem på hörnportenom, och på dalportenom, och på annor hörn, och befäste dem.
10 १० वाळवंटातही त्याने टेहळणी बुरुज बांधले. अनेक विहिरी खणल्या. डोंगराळ भागात आणि सपाटीवर त्याची बरीच गुरेढोरे होती. तसेच तेथील सुपीक भागात शेतकरी होते. द्राक्षबागांच्या देखरेखेसाठी देखील त्याची माणसे होती. उज्जीयाला शेतीची आवड होती.
Han byggde ock slott i öknene, och grof många brunnar; ty han hade mycken boskap, både i dalar och slättmark, desslikes åkermän och vingårdsmän på bergen, och på Carmel; förty han hade lust till åkerverk.
11 ११ उज्जीयाच्या सैन्यात चांगले लढवय्ये होते. ईयेल हा चिटणीस आणि मासेया हा कारभारी हे दोघे त्यांची गटागटात विभागणी करत. हनन्या या एका सेनानायकच्या हाताखाली हे दोघेजण होते. ईयेल आणि मासेया यांनी केलेल्या गणतीप्रमाणे सैन्य टोळी टोळीने लढाईवर जाई.
Och Ussia hade en magt till strid, af krigsmän som i här drogo, i tal räknade under Jegiels skrifvarens hand, och Maaseja befallningsmansens, under Hanania hand, den af Konungens öfverstar var.
12 १२ सैन्यात एकंदर दोन हजार सहाशे प्रमुख लढवय्ये नेतृत्व करीत.
Och talet på de yppersta fäder af de starka örligsmän var tutusend och sexhundrad.
13 १३ शत्रूवर तुटून पडणाऱ्या तीन लाख सात हजार पाचशे वीरांच्या सैन्याचे ते प्रमुख होते. राजाच्या बाजूने ते शत्रूवर चालून जात.
Och under deras hand härsmagten trehundradtusend, och sjutusend och femhundrad, skickelige till strid i härskraft, till att hjelpa Konungenom emot fienderna.
14 १४ या सर्व सेनेला उज्जीयाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, चिलखते, धनुष्य आणि गोफणगुंडे अशी शस्त्रास्त्रे दिली.
Och Ussia fick dem till hela hären sköldar, spjut, hjelmar, pansar, bågar, och slungor till att kasta sten med;
15 १५ काही हुशार कारागिरांनी शोधून काढलेली यंत्रेही उज्जीयाने यरूशलेमामध्ये बनवून घेतली. ती त्याने बुरुजांवर आणि तटाच्या कोपऱ्यावर बसवली. ही यंत्रे बाण व मोठ्या दगडांचा मारा करीत असत. उज्जीया फार प्रसिध्द झाला. उज्जीयाचे नाव त्यामुळे सर्वदूर पसरले. त्याची कुमक वाढली आणि तो बलवान झाला.
Och gjorde i Jerusalem bröstvärn konsteliga, som skulle vara på tornen och hörnen, till att der utskjuta med pil och stora stenar. Och hans rykte kom vidt ut, derföre, att honom besynnerliga hulpet vardt, tilldess han mägtig blef.
16 १६ पण सामर्थ्य वाढल्यावर तो गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश ओढवला. परमेश्वरावर त्याची निष्ठा राहिली नाही. धूप जाळण्यासाठी असलेल्या वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
Och då han var mägtig vorden, hof hans hjerta sig upp till hans förderf; ty han förtog sig på Herranom sinom Gud, och gick in i Herrans tempel, till att röka på rökaltaret.
17 १७ तेव्हा याजक अजऱ्या आणि आणखी परमेश्वराचे ऐंशी धैर्यवान याजक त्याच्यापाठोपाठ तिथे गेले.
Men Asaria Presten gick efter honom, och åttatio Herrans Prester med honom, starke män;
18 १८ त्यांनी उज्जीयाची चूक दाखवून दिली. ते त्यास म्हणाले, “उज्जीया, परमेश्वरास धूप जाळणे हे तुझे काम नव्हे. तू ते करु नकोस. अहरोनाचे वंशज आणि याजक यांचेच ते काम आहे. धूप जाळण्याच्या या पवित्र कामासाठी ते नेमलेले आहेत. तेव्हा या पवित्र गाभाऱ्यातून तू बाहेर ये. परमेश्वराच्या आज्ञेचे तू उल्लंघन केले आहेस. परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही.”
Och stodo emot Konung Ussia, och sade till honom: Det hörer icke dig till, Ussia, att röka för Herranom; utan Prestomen, Aarons barnom, som till att röka helgade äro. Gack härutu helgedomenom; ty du förtager dig, och det kommer dig till ingen äro för Herranom Gud.
19 १९ पण उज्जीयाला या बोलण्याचा राग आला. त्याच्या हाती धूपपात्र होते. याजकांवर तो संतापला असताना पाहता पाहता त्याच्या कपाळावर कोड उठले. परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळण्याच्या वेदीच्या जवळ याजकांसमक्षच हे घडले.
Men Ussia vardt vred, och hade ett rökelsekar i handene; och som han trätte med Presterna, gick spitelska ut i hans änne, för Presterna i Herrans hus, inför rökaltaret.
20 २० मुख्य याजक अजऱ्या आणि इतर याजक उज्जीयाकडे बघतच राहिले. त्याच्या कपाळावरचे कोड त्यांनी पाहिले. त्याबरोबर त्यांनी उज्जीयाला तातडीने मंदिराबाहेर घालवले. परमेश्वराने शासन केल्यामुळे उज्जीयाही लगेचच चालता झाला.
Och Asaria öfverste Presten vände sig till honom, och alle Presterna; och si, då var han spitelsk i hans änne; och de drefvo honom dädan. Skyndade han sig ock sjelf ut; ty hans plåga var af Herranom.
21 २१ राजा उज्जीया कुष्ठरोगी झाला. परमेश्वराच्या मंदिरात त्यास मज्जाव होता. तो एका स्वतंत्र घरात राहू लागला. त्याचा पुत्र योथाम हा राजघराण्याचा कारभारी बनला आणि लोकांचे शासन करु लागला.
Alltså var Konung Ussia spitelsk allt intill sin död, och bodde uti ett fritt hus spitelsk; ty han vardt utdrifven af Herrans hus. Men Jotham hans son stod Konungshuset före, och dömde folket i landena.
22 २२ उज्जीयाची इतर सर्व कृत्ये आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा याने अथपासून इथपर्यंत लिहिलेली आहेत.
Hvad nu mer af Ussia sägande är, både det första och det sista, hafver den Propheten Esaia, Amos son, skrifvit.
23 २३ उज्जीया मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांजवळ त्याचे दफन झाले. राजासाठी असलेल्या दफनभूमीच्या शेजारच्या जागेत त्यास पुरले. कारण तो कुष्ठरोगी होता. उज्जीयाच्या नंतर त्याचा पुत्र योथाम राजा झाला.
Och Ussia afsomnade med sina fäder, och de begrofvo honom med sina fäder i åkrenom när Konungagrafvarna; ty de sade: Han är spitelsk. Och Jotham hans son vardt Konung i hans stad.