< 2 इतिहास 25 >

1 अमस्या राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. नंतर त्याने यरूशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यहोअदान, ती यरूशलेमची होती.
امصیا بیست و پنج ساله بود که پادشاه شد و بیست و نه سال در اورشلیم پادشاهی کرد و اسم مادرش یهوعدان اورشلیمی بود.۱
2 त्याची वर्तणूक परमेश्वरास पटेल अशी होती पण त्यामध्ये मन: पूर्वकता नव्हती.
و آنچه در نظر خداوند پسند بود، به عمل آورد، اما نه به دل کامل.۲
3 अमस्या शक्तीशाली राजा झाला मग त्याने आपल्या वडलांच्या मारेकऱ्यांची हत्या केली.
و چون سلطنت در دستش مستحکم شد، خادمان خود را که پدرش پادشاه را کشته بودند، به قتل رسانید.۳
4 पण त्यांच्या पुत्रांना त्याने ठार केले नाही कारण याबाबतीत मोशेच्या नियमशास्त्रातली आज्ञा त्याने पाळली. परमेश्वराची आज्ञा अशी आहे, “मुलांच्या अपराधासाठी मातापितांना आणि मातापित्यांच्या अपराधासाठी पुत्रांना मृत्युदंड देऊ नये. ज्याच्या हातून अपराध झाला त्या व्यक्तीलाच देहदंड व्हावा.”
اما پسران ایشان را نکشت به موجب نوشته کتاب تورات موسی که خداوند امر فرموده و گفته بود: «پدران به جهت پسران کشته نشوند و پسران به جهت پدران مقتول نگردند، بلکه هر کس به جهت گناه خود کشته شود.»۴
5 अमस्याने सर्व यहूदा लोकांस एकत्र केले आणि त्यांच्या घराण्यांवर सेनापती आणि सेनानायक यांच्या नेमणुका केल्या. समस्त यहूदा आणि बन्यामीन सैनिकांवर या प्रमुखांचा अंमल होता. युध्दात भाग घेण्यासाठी किमान वीस आणि त्यापुढील वयाचे सैनिक निवडले. भाले आणि ढालींनी सज्ज असे एकंदर तीन लाख सैनिक युध्दाला तयार होते.
و امصیا یهودا را جمع کرده، سرداران هزاره و سرداران صده از ایشان در تمامی یهودا وبنیامین مقرر فرمود و ایشان را از بیست ساله بالاترشمرده، سیصد هزار مرد برگزیده نیزه و سپردار راکه به جنگ بیرون می‌رفتند، یافت.۵
6 यांच्याखेरीज आणखी एक लाख सैन्याची कुमक अमस्याने इस्राएलकडून मागवली. त्यासाठी त्याने शंभर किक्कार चांदी एवढी किंमत मोजली.
و صد هزارمرد شجاع جنگ آزموده به صد وزنه نقره ازاسرائیل اجیر ساخت.۶
7 पण यावेळी देवाचा एक मनुष्य अमस्याकडे येऊन त्यास म्हणाला, “हे राजा, इस्राएलच्या सैन्याला आपल्याबरोबर घेऊ नकोस. एफ्राइमाच्या वंशजांना म्हणजेच इस्राएलच्या लोकांस परमेश्वराची साथ नाही.
اما مرد خدایی نزد وی آمده، گفت: «ای پادشاه، لشکر اسرائیل با تونروند زیرا خداوند با اسرائیل یعنی با تمامی بنی افرایم نیست.۷
8 तू भले कितीही तयारी करून लढाईत उतरलास तरी तुझा जय पराजय होणे देवाच्याच हातात आहे.”
و اگر می‌خواهی بروی برو وبه جهت جنگ قوی شو لیکن خدا تو را پیش دشمنان مغلوب خواهد ساخت زیرا قدرت نصرت دادن و مغلوب ساختن با خدا است.»۸
9 यावर अमस्या त्या देवाच्या मनुष्यास म्हणाला, “पण इस्राएली सैन्याला मी शंभर किक्कार चांदी देऊन बसलो आहे, त्याचे काय?” देवाचा मनुष्य म्हणाला, “परमेश्वराकडे अलोट संपत्ती आहे, तो तुला त्यापेक्षा कितीतरी जास्त देऊ शकेल.”
امصیا به مرد خدا گفت: «برای صد وزنه نقره که به لشکر اسرائیل داده‌ام، چه کنم؟» مرد خداجواب داد: «خداوند قادر است که تو را بیشتر ازاین بدهد.»۹
10 १० तेव्हा अमस्याने इस्राएलच्या सैन्याला एफ्राइमला परत पाठवले, या कृत्यामुळे इस्राएली सैन्य, यहूदाचा राजा आणि यहूदाचे लोक यांच्यावर संतापले आणि रागाने घरी परतले.
پس امصیا لشکری را که از افرایم نزد او آمده بودند، جدا کرد که به‌جای خودبرگردند و از این سبب خشم ایشان بر یهودا به شدت افروخته شد و بسیار غضبناک گردیده، به‌جای خود رفتند.۱۰
11 ११ यानंतर अमस्याने मोठे धाडस करून अदोम देशातील मिठाच्या खोऱ्यावर हल्ला चढवला. अमस्याच्या सैन्याने याठिकाणी सेईर मधील दहा हजार लोकांस ठार केले.
و امصیا خویشتن را تقویت نموده، قوم خود را بیرون برد و به وادی الملح رسیده، ده هزار نفر از بنی سعیر را کشت.۱۱
12 १२ यहूदी लोकांनी दहा हजार जणांना बंदिवान केले. त्यांना धरुन पर्वत माथ्यावर नेले आणि एवढ्या उंचीवरुन त्यांचा कडेलोट केला. खालच्या दगडधोंड्यांवर त्यांचे देह छिन्नविच्छिन्न होऊन पडले.
و بنی یهودا ده هزار نفر دیگر را زنده اسیر کرد، و ایشان را به قله سالع برده، از قله سالع به زیر انداختند که جمیع خرد شدند.۱۲
13 १३ नेमक्या याचवेळी अमस्याने परत पाठवलेल्या इस्राएली सैन्याने यहूदातील काही नगरांवर हल्ला चढवला. त्यांनी बेथ-होरोनपासून सरळ शोमरोनपर्यंत गावे उद्ध्वस्त केली, तीन हजार लोकांस जिवे मारले आणि मौल्यवान चीजवस्तू लुटल्या. अमस्याने आपल्याला लढाईत सामील करून न घेतल्यामुळे हे इस्राएली सैन्य भडकले होते.
و اما مردان آن فوج که امصیا بازفرستده بود تا همراهش به جنگ نروند، برشهرهای یهودا از سامره تا بیت حورون تاختند وسه هزار نفر را کشته، غنیمت بسیار بردند.۱۳
14 १४ अदोम्यांचा पाडाव करून अमस्या आपल्या नगरात परतला. येताना त्याने सेईर येथील लोकांच्या देवाच्या मूर्ती बरोबर आणल्या आणि त्यांची पूजाअर्चा सुरू केली. या दैवतांना वंदन करून तो त्यांच्यापुढे धूप जाळू लागला.
و بعد از مراجعت امصیا از شکست دادن ادومیان، او خدایان بنی سعیر را آورده، آنها راخدایان خود ساخت و آنها را سجده نموده، بخور برای آنها سوزانید.۱۴
15 १५ या कृतीमुळे परमेश्वराचा अमस्यावर कोप झाला. परमेश्वराने संदेष्ट्याला अमस्याकडे पाठवले. संदेष्टा राजाला म्हणाला, “अमस्या, त्या लोकांच्या दैवतांची पूजा तू का करत आहेस? त्या दैवतांना तर स्वत: च्याच लोकांचे तुझ्यापासून रक्षण करता आले नाही.”
پس خشم خداوند برامصیا افروخته شد و نبی نزد وی فرستاد که او رابگوید: «چرا خدایان آن قوم را که قوم خود را ازدست تو نتوانستند رهانید، طلبیدی؟»۱۵
16 १६ अमस्या संदेष्ट्याच्या या बोलण्यावर म्हणाला, “आम्ही तुला राजाचा सल्लागार म्हणून नेमलेले नाही, तेव्हा तू गप्प रहावे हे चांगले नाहीतर जिवाला मुकशील.” संदेष्टा गप्प बसला पण नंतर म्हणाला, “देवाने तुझा नाश करायचे निश्चित केले आहे. कारण तू करु नये त्या गोष्टी केल्यास आणि माझे ऐकले नाहीस.”
و چون این سخن را به وی گفت، او را جواب داد: «آیا تورا مشیر پادشاه ساخته‌اند؟ ساکت شو! چرا تو رابکشند؟» پس نبی ساکت شده، گفت: «می‌دانم که خدا قصد نموده است که تو را هلاک کند، چونکه این کار را کردی و نصیحت مرا نشنیدی.»۱۶
17 १७ यहूदाचा राजा अमस्या याने यावर आपल्या सल्लागारांबरोबर विचार विनिमय केला. मग योवाशाला त्याने निरोप पाठवला की, “आपली एकदा प्रत्यक्ष युध्दात गाठ पडली पाहिजे.” योवाश हा यहोआहाजाला पुत्र आणि यहोआहाज येहूचा, येहू इस्राएलचा राजा होता.
پس امصیا، پادشاه یهودا، مشورت کرده، نزد یوآش بن یهوآحاز بن ییهو پادشاه اسرائیل فرستاده، گفت: «بیا تا با یکدیگر مقابله نماییم.»۱۷
18 १८ इस्राएलचा राजा योवाश याने यहूदाचा राजा अमस्या याच्याकडे आपले उत्तर पाठवले. योवाशाने दृष्टांत दिला तो असा: “लबानोन मधल्या एका काटेरी झुडुपाने लबानोनाच्या एका गंधसरूला निरोप पाठवला की, ‘तुझ्या कन्येचे माझ्या पुत्रांशी लग्न व्हावे.’ पण तेवढ्यात ते झुडुप तिथून जाणाऱ्या एका वन्यपशूच्या पायाखाली तुडवले गेले.
و یوآش پادشاه اسرائیل نزد امصیا پادشاه یهودا فرستاده، گفت: «شترخار لبنان نزد سروآزاد لبنان فرستاده، گفت: دختر خود را به پسر من به زنی بده. اما حیوان وحشی که در لبنان بود گذرکرده، شترخار را پایمال نمود.۱۸
19 १९ मी अदोमचा पराभव केला. असे तू खुशाल म्हण. तू हे प्रौढीने म्हणतो आहेस खरे पण तू आपल्या घरी स्वस्थ बसावेस हे बरे. स्वत: ला उगीच अडचणीत पाडू नकोस! पण तू तसे केलेस तर तू स्वत: च्या आणि त्याबरोबर यहूदाच्या नाशाला कारणीभूत होशील.”
می‌گویی، هان ادوم را شکست دادم و دلت تو را مغرور ساخته است که افتخار نمایی؟ حال به خانه خود برگرد. چرا بلا را برای خود برمی انگیزانی تا خودت ویهودا همراهت بیفتید؟»۱۹
20 २० पण अमस्याने या निरोपाला दाद दिली नाही. यहूदाच्या लोकांनी अदोमी लोकांच्या दैवताचे भजन पूजन सुरु केल्यामुळे इस्राएलकडून यहूदाचा पराभव करायचे परमेश्वराने योजले होते.
اما امصیا گوش نداد زیرا که این امر از جانب خدا بود تا ایشان را به‌دست دشمنان تسلیم نماید، چونکه خدایان ادوم را طلبیدند.۲۰
21 २१ तेव्हा इस्राएलचा राजा योवाश आणि यहूदाचा राजा अमस्या यांची बेथ-शेमेश नगरात समोरासमोर गाठ पडली. बेथ-शेमेश यहूदातच आहे.
پس یوآش پادشاه اسرائیل برآمد و او و امصیا پادشاه یهودا در بیت شمس که در یهودا است، با یکدیگرمقابله نمودند.۲۱
22 २२ इस्राएलने यहूदाचा पराभव केला. झाडून सर्व यहूद्यांनी या लढाईतून पळ काढला.
و یهودا از حضور اسرائیل منهزم شده، هر کس به خیمه خود فرار کرد.۲۲
23 २३ इस्राएलाचा राजा योवाशाने बेथ-शेमेश येथे यहूदाचा राजा अमस्याला पकडले आणि यरूशलेमेला नेले. अमस्याच्या पित्याचे नाव योवाश. योवाशाचे पिता यहोआहाज. योवाशाने एफ्राइम वेशीपासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंतची यरूशलेमेच्या तटबंदीची चारशे हात लांबीची भिंत पार मोडून तोडून टाकली.
ویوآش پادشاه اسرائیل امصیا ابن یوآش بن یهوآحاز پادشاه یهودا را در بیت شمس گرفت و او را به اورشلیم آورده، چهارصد ذراع حصاراورشلیم را از دروازه افرایم تا دروازه زاویه منهدم ساخت.۲۳
24 २४ सर्व सोने व रुपे तसेच मंदिरातील उपकरणे, भांडी देखील त्याने हस्तगत केली. देवाच्या मंदिरातील वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी ओबेद-अदोमची होती. राजमहालातील वस्तूही योवाशाने लुटल्या. काहीजणांना बंदिवान केले. या सगळ्यासह तो शोमरोनला परतला.
و تمامی طلا و نقره و تمامی ظروفی را که در خانه خدا نزد (بنی ) عوبید ادوم ودر خزانه های خانه پادشاه یافت شد و یرغمالان را گرفته، به سامره مراجعت کرد.۲۴
25 २५ यहोआहाजाचा पुत्र इस्राएलाचा राजा योवाश याच्या मृत्यूनंतर अमस्या पंधरा वर्षे जगला. अमस्याचे पिता म्हणजे यहूदाचा राजा योवाश.
و امصیاابن یوآش پادشاه یهودا، بعد از وفات یوآش بن یهوآحاز پادشاه اسرائیل، پانزده سال زندگانی نمود.۲۵
26 २६ यहूदा आणि इस्राएलमधील राजांचा इतिहास या पुस्तकात, अमस्याने बाकी जे जे केले त्याची संपूर्ण हकिकत आली आहे.
و بقیه وقایع اول و آخر امصیا، آیا درتواریخ پادشاهان یهودا و اسرائیل مکتوب نیست؟۲۶
27 २७ अमस्याने परमेश्वराचे आज्ञापालन करायचे थांबवल्यावर यरूशलेमेच्या लोकांनी त्याच्याविरुध्द कट केला. तेव्हा तो लाखीश येथे पळून गेला. पण लोकांनी त्याच्या मागावर माणसे पाठवून त्याचा तेथे वध केला.
و از زمانی که امصیا از پیروی خداوندانحراف ورزید، بعضی در اورشلیم فتنه بر وی انگیختند. پس به لاکیش فرار کرد و از عقبش به لاکیش فرستادند و او را در آنجا کشتند.۲۷
28 २८ अमस्याचा मृतदेह मग लोकांनी घोड्यावर लादला आणि यहूदाच्या नगरात आणून त्यास पूर्वंजाशेजारी पुरले.
و او رابر اسبان آوردند و با پدرانش در شهر یهودا دفن کردند.۲۸

< 2 इतिहास 25 >