< 2 इतिहास 25 >
1 १ अमस्या राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. नंतर त्याने यरूशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यहोअदान, ती यरूशलेमची होती.
V pětmecítma letech kralovati počal Amaziáš, a kraloval dvadceti devět let v Jeruzalémě. Jméno matky jeho Joadan z Jeruzaléma.
2 २ त्याची वर्तणूक परमेश्वरास पटेल अशी होती पण त्यामध्ये मन: पूर्वकता नव्हती.
A činil to, což pravého bylo před očima Hospodinovýma, ale však ne srdcem upřímým.
3 ३ अमस्या शक्तीशाली राजा झाला मग त्याने आपल्या वडलांच्या मारेकऱ्यांची हत्या केली.
I stalo se, když bylo upevněno království jeho, že zmordoval služebníky své, kteříž zabili krále otce jeho.
4 ४ पण त्यांच्या पुत्रांना त्याने ठार केले नाही कारण याबाबतीत मोशेच्या नियमशास्त्रातली आज्ञा त्याने पाळली. परमेश्वराची आज्ञा अशी आहे, “मुलांच्या अपराधासाठी मातापितांना आणि मातापित्यांच्या अपराधासाठी पुत्रांना मृत्युदंड देऊ नये. ज्याच्या हातून अपराध झाला त्या व्यक्तीलाच देहदंड व्हावा.”
A však synů jejich nekázal mordovati, ale učinil tak, jakž psáno jest v zákoně, v knize Mojžíšově, kdež přikázal Hospodin, řka: Nebudou na hrdle trestáni otcové za syny, aniž synové trestáni budou na hrdle za otce, ale jeden každý za svůj hřích umře.
5 ५ अमस्याने सर्व यहूदा लोकांस एकत्र केले आणि त्यांच्या घराण्यांवर सेनापती आणि सेनानायक यांच्या नेमणुका केल्या. समस्त यहूदा आणि बन्यामीन सैनिकांवर या प्रमुखांचा अंमल होता. युध्दात भाग घेण्यासाठी किमान वीस आणि त्यापुढील वयाचे सैनिक निवडले. भाले आणि ढालींनी सज्ज असे एकंदर तीन लाख सैनिक युध्दाला तयार होते.
Zatím shromáždil Amaziáš lid Judský, a ustanovil po domích otcovských čeledí jejich hejtmany a setníky, po všem Judstvu a pokolení Beniaminovu, a sečtl je od dvadcítiletých a výše, a našel jich třikrát sto tisíc vybraných mužů bojovných, kopidlníků a pavézníků.
6 ६ यांच्याखेरीज आणखी एक लाख सैन्याची कुमक अमस्याने इस्राएलकडून मागवली. त्यासाठी त्याने शंभर किक्कार चांदी एवढी किंमत मोजली.
Najal také ze mzdy z Izraele sto tisíc mužů udatných ze sta hřiven stříbra.
7 ७ पण यावेळी देवाचा एक मनुष्य अमस्याकडे येऊन त्यास म्हणाला, “हे राजा, इस्राएलच्या सैन्याला आपल्याबरोबर घेऊ नकोस. एफ्राइमाच्या वंशजांना म्हणजेच इस्राएलच्या लोकांस परमेश्वराची साथ नाही.
Muž pak Boží přišel k němu, řka: Ó králi, nechť netáhne s tebou vojsko Izraelské; nebo Hospodin není s Izraelem, a všechněmi syny Efraimovými.
8 ८ तू भले कितीही तयारी करून लढाईत उतरलास तरी तुझा जय पराजय होणे देवाच्याच हातात आहे.”
Ale táhni ty. Učiniž tak, a posilň se k boji; jinak porazí tě Bůh před nepřátely, neboť může Bůh i pomoci i poraziti.
9 ९ यावर अमस्या त्या देवाच्या मनुष्यास म्हणाला, “पण इस्राएली सैन्याला मी शंभर किक्कार चांदी देऊन बसलो आहे, त्याचे काय?” देवाचा मनुष्य म्हणाला, “परमेश्वराकडे अलोट संपत्ती आहे, तो तुला त्यापेक्षा कितीतरी जास्त देऊ शकेल.”
Tedy řekl Amaziáš muži Božímu: Jakž pak udělám s stem hřiven stříbra, kteréž jsem dal vojsku Izraelskému? Odpověděl muž Boží: Máť Hospodin mnohem více nad to, což by dal tobě.
10 १० तेव्हा अमस्याने इस्राएलच्या सैन्याला एफ्राइमला परत पाठवले, या कृत्यामुळे इस्राएली सैन्य, यहूदाचा राजा आणि यहूदाचे लोक यांच्यावर संतापले आणि रागाने घरी परतले.
A tak oddělil Amaziáš vojsko to, kteréž bylo přitáhlo k němu z Efraim, aby odešli na místo své. Pročež rozhněvali se náramně na Judské a navrátili se k místu svému s velikým hněvem.
11 ११ यानंतर अमस्याने मोठे धाडस करून अदोम देशातील मिठाच्या खोऱ्यावर हल्ला चढवला. अमस्याच्या सैन्याने याठिकाणी सेईर मधील दहा हजार लोकांस ठार केले.
Mezi tím Amaziáš posiliv se, vedl lid svůj, a táhl do údolí solnatého, a porazil synů Seir deset tisíců.
12 १२ यहूदी लोकांनी दहा हजार जणांना बंदिवान केले. त्यांना धरुन पर्वत माथ्यावर नेले आणि एवढ्या उंचीवरुन त्यांचा कडेलोट केला. खालच्या दगडधोंड्यांवर त्यांचे देह छिन्नविच्छिन्न होऊन पडले.
Deset také tisíců živých jali synové Judští, a vedli na vrch skály, a sházeli je s vrchu té skály, tak že se všickni zrozráželi.
13 १३ नेमक्या याचवेळी अमस्याने परत पाठवलेल्या इस्राएली सैन्याने यहूदातील काही नगरांवर हल्ला चढवला. त्यांनी बेथ-होरोनपासून सरळ शोमरोनपर्यंत गावे उद्ध्वस्त केली, तीन हजार लोकांस जिवे मारले आणि मौल्यवान चीजवस्तू लुटल्या. अमस्याने आपल्याला लढाईत सामील करून न घेतल्यामुळे हे इस्राएली सैन्य भडकले होते.
Vojsko pak to, kteréž zase odeslal Amaziáš, aby netáhlo s ním na vojnu, vtrhlo do měst Judských od Samaří až do Betoron, a pobivše z nich tři tisíce, nabrali loupeží mnoho.
14 १४ अदोम्यांचा पाडाव करून अमस्या आपल्या नगरात परतला. येताना त्याने सेईर येथील लोकांच्या देवाच्या मूर्ती बरोबर आणल्या आणि त्यांची पूजाअर्चा सुरू केली. या दैवतांना वंदन करून तो त्यांच्यापुढे धूप जाळू लागला.
I stalo se, když se vracel Amaziáš od porážky Idumejských, že přivezl s sebou bohy synů Seir, a vyzdvihl je sobě za bohy, a skláněl se před nimi, a kadil jim.
15 १५ या कृतीमुळे परमेश्वराचा अमस्यावर कोप झाला. परमेश्वराने संदेष्ट्याला अमस्याकडे पाठवले. संदेष्टा राजाला म्हणाला, “अमस्या, त्या लोकांच्या दैवतांची पूजा तू का करत आहेस? त्या दैवतांना तर स्वत: च्याच लोकांचे तुझ्यापासून रक्षण करता आले नाही.”
A protož rozhněval se náramně Hospodin na Amaziáše, a poslal k němu proroka, kterýž jemu řekl: Proč hledáš bohů lidu toho, kteříž nevytrhli lidu svého z ruky tvé?
16 १६ अमस्या संदेष्ट्याच्या या बोलण्यावर म्हणाला, “आम्ही तुला राजाचा सल्लागार म्हणून नेमलेले नाही, तेव्हा तू गप्प रहावे हे चांगले नाहीतर जिवाला मुकशील.” संदेष्टा गप्प बसला पण नंतर म्हणाला, “देवाने तुझा नाश करायचे निश्चित केले आहे. कारण तू करु नये त्या गोष्टी केल्यास आणि माझे ऐकले नाहीस.”
Stalo se pak, když on k němu mluvil, řekl mu král: Co tě postavili, abys byl rádcím královským? Přestaniž, nechceš-li bit býti. A tak přestal prorok, však řekl: Seznávám, že tě usoudil Bůh zahladiti, poněvadž učiniv to, neuposlechl jsi rady mé.
17 १७ यहूदाचा राजा अमस्या याने यावर आपल्या सल्लागारांबरोबर विचार विनिमय केला. मग योवाशाला त्याने निरोप पाठवला की, “आपली एकदा प्रत्यक्ष युध्दात गाठ पडली पाहिजे.” योवाश हा यहोआहाजाला पुत्र आणि यहोआहाज येहूचा, येहू इस्राएलचा राजा होता.
Tedy poradiv se Amaziáš král Judský, poslal k Joasovi synu Joachaza syna Jéhu, králi Izraelskému, řka: Nuže, pohleďme sobě v oči.
18 १८ इस्राएलचा राजा योवाश याने यहूदाचा राजा अमस्या याच्याकडे आपले उत्तर पाठवले. योवाशाने दृष्टांत दिला तो असा: “लबानोन मधल्या एका काटेरी झुडुपाने लबानोनाच्या एका गंधसरूला निरोप पाठवला की, ‘तुझ्या कन्येचे माझ्या पुत्रांशी लग्न व्हावे.’ पण तेवढ्यात ते झुडुप तिथून जाणाऱ्या एका वन्यपशूच्या पायाखाली तुडवले गेले.
I poslal Joas král Izraelský k Amaziášovi králi Judskému, a řekl: Bodlák, kterýž byl na Libánu, poslal k cedru Libánskému, řka: Dej dceru svou synu mému za manželku. V tom šlo tudy zvíře polní, kteréž bylo na Libánu, a pošlapalo ten bodlák.
19 १९ मी अदोमचा पराभव केला. असे तू खुशाल म्हण. तू हे प्रौढीने म्हणतो आहेस खरे पण तू आपल्या घरी स्वस्थ बसावेस हे बरे. स्वत: ला उगीच अडचणीत पाडू नकोस! पण तू तसे केलेस तर तू स्वत: च्या आणि त्याबरोबर यहूदाच्या नाशाला कारणीभूत होशील.”
Myslil jsi: Aj, porazil jsem Idumejské, protož pozdvihlo tě srdce tvé, tak že se tím honosíš. Medle, zůstaň v domě svém. Proč se máš zapletati v takové zlé, až bys padl i ty i Juda s tebou?
20 २० पण अमस्याने या निरोपाला दाद दिली नाही. यहूदाच्या लोकांनी अदोमी लोकांच्या दैवताचे भजन पूजन सुरु केल्यामुळे इस्राएलकडून यहूदाचा पराभव करायचे परमेश्वराने योजले होते.
Ale neuposlechl Amaziáš; nebo od Boha to bylo, aby je vydal v ruku oněchno, proto že hledali bohů Idumejských.
21 २१ तेव्हा इस्राएलचा राजा योवाश आणि यहूदाचा राजा अमस्या यांची बेथ-शेमेश नगरात समोरासमोर गाठ पडली. बेथ-शेमेश यहूदातच आहे.
Takž vytáhl Joas král Izraelský, a pohleděli sobě v oči s Amaziášem králem Judským v Betsemes, kteréž jest Judovo.
22 २२ इस्राएलने यहूदाचा पराभव केला. झाडून सर्व यहूद्यांनी या लढाईतून पळ काढला.
I poražen jest Juda před Izraelem, a utíkali jeden každý do příbytků svých.
23 २३ इस्राएलाचा राजा योवाशाने बेथ-शेमेश येथे यहूदाचा राजा अमस्याला पकडले आणि यरूशलेमेला नेले. अमस्याच्या पित्याचे नाव योवाश. योवाशाचे पिता यहोआहाज. योवाशाने एफ्राइम वेशीपासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंतची यरूशलेमेच्या तटबंदीची चारशे हात लांबीची भिंत पार मोडून तोडून टाकली.
Amaziáše pak krále Judského, syna Joasova, jenž byl syn Joachazův, jal Joas král Izraelský u Betsemes, a přivedl jej do Jeruzaléma, a zbořil zdi Jeruzalémské odbrány Efraim až k bráně úhlu na čtyři sta loktů.
24 २४ सर्व सोने व रुपे तसेच मंदिरातील उपकरणे, भांडी देखील त्याने हस्तगत केली. देवाच्या मंदिरातील वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी ओबेद-अदोमची होती. राजमहालातील वस्तूही योवाशाने लुटल्या. काहीजणांना बंदिवान केले. या सगळ्यासह तो शोमरोनला परतला.
A pobrav všecko zlato a stříbro i všecko nádobí, kteréž se nalezlo v domě Božím u Obededoma, a v pokladích domu královského, také i ty, kteříž byli v zástavě, navrátil se do Samaří.
25 २५ यहोआहाजाचा पुत्र इस्राएलाचा राजा योवाश याच्या मृत्यूनंतर अमस्या पंधरा वर्षे जगला. अमस्याचे पिता म्हणजे यहूदाचा राजा योवाश.
Byl pak živ Amaziáš syn Joasův, král Judský, po smrti Joasa syna Joachaza, krále Izraelského, patnácte let.
26 २६ यहूदा आणि इस्राएलमधील राजांचा इतिहास या पुस्तकात, अमस्याने बाकी जे जे केले त्याची संपूर्ण हकिकत आली आहे.
Ale o jiných činech Amaziášových, prvních i posledních, vypsáno jest v knize o králích Judských a Izraelských.
27 २७ अमस्याने परमेश्वराचे आज्ञापालन करायचे थांबवल्यावर यरूशलेमेच्या लोकांनी त्याच्याविरुध्द कट केला. तेव्हा तो लाखीश येथे पळून गेला. पण लोकांनी त्याच्या मागावर माणसे पाठवून त्याचा तेथे वध केला.
Od toho zajisté času, jakž se spustil Amaziáš Hospodina, spikli se jedovatě proti němu v Jeruzalémě. A když utekl do Lachis, poslali za ním do Lachis, a zabili jej tam.
28 २८ अमस्याचा मृतदेह मग लोकांनी घोड्यावर लादला आणि यहूदाच्या नगरात आणून त्यास पूर्वंजाशेजारी पुरले.
A přinesše ho na koních, pochovali jej s otci jeho v městě Judově.