< 2 इतिहास 23 >
1 १ यहोयादाने सातव्या वर्षांनंतर आपले सामर्थ्य दाखवले. त्याने यरोहामाचा पुत्र अजऱ्या यहोहानानाचा पुत्र इश्माएल, ओबेदचा पुत्र अजऱ्या, अदायाचा पुत्र मासेया आणि जिख्रीचा पुत्र अलीशाफाट या मुख्य अधिकाऱ्यांशी करार केला.
Anno autem septimo confortatus Ioiada, assumpsit centuriones, Azariam videlicet filium Ieroham, et Ismahel filium Iohanan, Azariam quoque filium Obed, et Maasiam filium Adaiae, et Elisaphat filium Zechri: et iniit cum eis foedus.
2 २ त्यांनी यहूदाभर फिरुन यहूदाच्या नगरात विखुरलेल्या लेवींना आणि इस्राएलच्या कुलप्रमुखांना एकत्र आणले. मग ते सर्व यरूशलेम येथे गेले.
Qui circumeuntes Iudam, congregaverunt Levitas de cunctis urbibus Iuda, et principes familiarum Israel, veneruntque in Ierusalem.
3 ३ तेथे देवाच्या मंदिरात सर्व समुदायाने राजाशी करार केला. यहोयादा या लोकांस म्हणाला, “परमेश्वर दावीदाच्या संततीविषयी जे बोलला आहे त्यास अनुसरुन राजाचा पुत्र गादीवर येईल.
Iniit ergo omnis multitudo pactum in domo Dei cum rege: dixitque ad eos Ioiada: Ecce filius regis regnabit, sicut locutus est Dominus super filios David.
4 ४ आता तुम्ही करायचे ते असे: तुमच्यापैकी जे एक-तृतीआंश याजक आणि लेवी शब्बाथाच्या दिवशी कामाला येतात त्यांनी मंदिरावर पहारा करावा.
Iste est ergo sermo quem facietis:
5 ५ एकतृतीयांश लोकांनी राजमहालावर पहारा करावा, आणि उरलेल्या एकतृतीयांश लोकांनी वेशीपाशी असावे. यांच्याखेरीज बाकी सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दालनात रहावे.
Tertia pars vestrum qui veniunt ad Sabbatum, Sacerdotum, et Levitarum, et ianitorum erit in portis: tertia vero pars ad domum regis: et tertia ad portam, quae appellatur Fundamenti: omne vero reliquum vulgus sit in atriis domus Domini.
6 ६ कोणालाही परमेश्वराच्या मंदिरात येऊ देऊ नये, याजक व सेवा करणारे लेवी यांनीच मात्र आत यावे कारण ते याच कामासाठी नेमलेले आहेत. पण इतरांनी परमेश्वराने नेमून दिलेली आपआपली कामे करायची आहेत.
Nec quispiam alius ingrediatur domum Domini, nisi Sacerdotes, et qui ministrant de Levitis: ipsi tantummodo ingrediantur, quia sanctificati sunt: et omne reliquum vulgus observet custodias Domini.
7 ७ लेवींनी राजाला सर्व बाजूंनी घेराव घालावा. प्रत्येकाजवळ आपली तलवार सज्ज असावी. कोणी मंदिरात घुसायचा प्रयत्न केल्यास त्यास ठार करावे. सर्वांनी राजाची सावलीसारखी सोबत करावी.
Levitae autem circumdent regem, habentes singuli arma sua: (et si quis alius ingressus fuerit templum, interficiatur) sintque cum rege et intrante et egrediente.
8 ८ लेवी आणि यहूदा या सर्व लोकांनी यहोयादा या याजकाने ज्या आज्ञा केल्या त्या सर्वांचे पालन केले. यहोयादाने याजकांपैकी कोणाचीही गय केली नाही. त्यामुळे शब्बाथाच्या दिवशी आळीपाळीने आत येणाऱ्या व कामावरुन बाहेर जाणाऱ्या सर्वाची व्यवस्था केली.”
Fecerunt ergo Levitae, et universus Iuda iuxta omnia, quae praeceperat Ioiada pontifex: et assumpserunt singuli viros qui sub se erant, et veniebant per ordinem sabbati, cum his qui impleverant sabbatum, et egressi erant. siquidem Ioiada pontifex non dimiserat abire turmas, quae sibi per singulas hebdomadas succedere consueverant.
9 ९ दावीद राजाचे भाले, छोट्या आणि मोठ्या ढाली ही शस्त्रे देवाच्या मंदिरामध्ये ठेवलेली होती. यहोयादा याजकाने शंभर सैनिकांच्या तुकड्यांच्या प्रमुखांना त्या दिल्या.
Deditque Ioiada sacerdos centurionibus lanceas, clypeosque et peltas regis David, quas consecraverat in domo Domini.
10 १० आणि त्यांनी कुठे, कसे उभे राहायचे ते सांगितले. प्रत्येकाजवळ आपआपले शस्त्र होते. मंदिराच्या सरळ उजव्या कोपऱ्यापासून डाव्या बाजूपर्यंत ही शस्त्रधारी माणसे उभी राहिली. वेदी, मंदिर आणि राजा यांच्याजवळ ती उभी होतीच.
Constituitque omnem populum tenentium pugiones a parte templi dextra, usque ad partem templi sinistram, coram altari, et templo, per circuitum regis.
11 ११ मग त्यांनी राज पुत्राला बाहेर आणले आणि त्याच्या मस्तकावर मुकुट चढवला. त्याच्या हाती आज्ञापट दिला. योवाशाला त्यांनी राजा केले. यहोयादा आणि त्याचे पुत्र यांनी त्यास अभिषेक केला. “राजा चिरायु होवो” असे ते सर्वजण म्हणाले.
Et eduxerunt filium regis, et imposuerunt ei diadema, et testimonium, dederuntque in manu eius tenendam legem, et constituerunt eum regem: unxit quoque illum Ioiada pontifex, et filii eius: imprecatique sunt ei, atque dixerunt: Vivat rex.
12 १२ लगबगीने जाणाऱ्या लोकांचा गलबला आणि राजाचा जयजयकार अथल्याने ऐकला. तेव्हा ती लोकांकडे परमेश्वराच्या मंदिरात आली.
Quod cum audisset Athalia, vocem scilicet currentium atque laudantium regem, ingressa est ad populum in templum Domini.
13 १३ पाहते तो तिला राजा दिसला. प्रवेशद्वाराशी तो राजस्तंभाजवळ उभा होता. कर्णे वाजवणारे कारभारी आणि लोक राजाजवळ उभे होते. देशभरचे लोक कर्णे वाजवून आनंद व्यक्त करत होते. गाणारे वाद्ये वाजवत होते आणि त्यांनी म्हटलेल्या स्तवनगीतापाठोपाठ लोक गात होते. तेव्हा आपली तीव्र नापसंती दाखविण्यासाठी अथल्याने आपले कपडे फाडले आणि “फितुरी! फितुरी!” असे ती ओरडली.
Cumque vidisset regem stantem super gradum in introitu, et principes, turmasque circa eum, omnemque populum terrae gaudentem, atque clangentem tubis, et diversi generis organis concinentem, vocemque laudantium, scidit vestimenta sua, et ait: Insidiae, insidiae.
14 १४ याजक यहोयादा याने सेनापतींना पुढे आणले. त्यांना तो म्हणाला, “तिला सैन्याच्या रांगांमधून बाहेर काढा. तिच्या मागे जो जाईल त्यास तलवारीने मारुन टाका.” मग याजकाने सैन्याला आज्ञा दिली कि, “परमेश्वराच्या मंदिरात अथल्याचा वध करु नका.”
Egressus autem Ioiada pontifex ad centuriones, et principes exercitus, dixit eis: Educite illam extra septa templi, et interficiatur foris gladio. Praecepitque sacerdos ne occideretur in domo Domini.
15 १५ राजमहालाच्या घोडावेशीजवळ अथल्या पोहोचताच सैनिकांनी तिला पकडले आणि त्याठिकाणी तिला जिवे मारले.
Et imposuerunt cervicibus eius manus: cumque intrasset portam equorum domus regis, interfecerunt eam ibi.
16 १६ यहोयादाने मग सर्व लोक आणि राजा यांच्याबरोबर एक करार केला. आपण सर्व परमेश्वराचे लोक आहोत असा तो करार होता.
Pepigit autem Ioiada foedus inter se, universumque populum, et regem, ut esset populus Domini.
17 १७ मग सर्वजण बआल देवतेच्या मंदिरात गेले आणि त्या मूर्तीची त्यांनी नासधूस केली. तिथल्या इतर मूर्ती आणि वेदीदेखील मोडून तोडून टाकल्या. बआलच्या वेदीपुढेच त्यांनी बआलचा याजक मत्तान याला ठार केले.
Itaque ingressus est omnis populus domum Baal, et destruxerunt eam: et altaria ac simulacra illius confregerunt: Mathan quoque sacerdotem Baal interfecerunt ante aras.
18 १८ यहोयादाने मग परमेश्वराच्या मंदीरातील याजकांची नेमणूक केली. हे याजक लेवी होते आणि दावीदाने त्यांना मंदिराचे मुखत्यारपद दिले होते. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे परमेश्वरास होमबली अर्पण करणे, हे त्यांचे काम होते. दावीदाच्या आज्ञेनुसार आनंदाने गायन करत त्यांनी होमबली अर्पण केले
Constituit autem Ioiada praepositos in domo Domini, sub manibus Sacerdotum, et Levitarum, quos distribuit David in domo Domini: ut offerrent holocausta Domino, sicut scriptum est in lege Moysi, in gaudio et canticis, iuxta dispositionem David.
19 १९ कोणीही अशुद्धतेने मंदिराच्या आत येवू नये, म्हणून यहोयादाने परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशीच द्वारपाल नेमले
Constituit quoque ianitores in portis domus Domini, ut non ingrederetur eam immundus in omni re.
20 २० सर्व सैन्याधिकारी, लोकनायक, सरदार आणि सर्व प्रजा यांना यहोयादाने आपल्याबरोबर घेतले. मग त्याने राजाला परमेश्वराच्या मंदिराबाहेर काढले. तिथून वरच्या वेशीतून ते राजमहालात पोचले. तेथे त्यांनी राजाला सिंहासनावर बसवले.
Assumpsitque centuriones, et fortissimos viros ac principes populi, et omne vulgus terrae, et fecerunt descendere regem de domo Domini, et introire per medium portae superioris in domum regis, et collocaverunt eum in solio regali.
21 २१ अथल्याचा तलवारीने वध झाला त्यानंतर यहूदातील लोकांमध्ये आनंदी आनंद पसरला आणि यरूशलेम नगर शांत झाले.
Laetatusque est omnis populus terrae, et urbs quievit: porro Athalia interfecta est gladio.