< 2 इतिहास 22 >

1 यहोरामाच्या जागी यरूशलेमेच्या लोकांनी यहोरामाचा सर्वांत धाकटा पुत्र अहज्या याला राजा केले. यहोरामाच्या छावणीवर हल्ला करायला आलेल्या अरबी लोकांबरोबर जे लोक आले होते त्यांनी यहोरामाच्या इतर सर्व थोरल्या पुत्रांना मारुन टाकल्यामुळे यहूदात अहज्या राज्य करु लागला.
और येरूशलेम के बाशिंदों ने उसके सबसे छोटे बेटे अख़ज़ियाह को उसकी जगह बादशाह बनाया; क्यूँकि लोगों के उस जत्थे ने जो 'अरबों के साथ छावनी में आया था, सब बड़े बेटों को क़त्ल कर दिया था। इसलिए शाह — ए — यहूदाह यहूराम का बेटा अख़ज़ियाह बादशाह हुआ।
2 त्यावेळी अहज्या बेचाळीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या व ती अम्रीची नात.
अख़ज़ियाह बयालीस' साल का था जब वह हुकूमत करने लगा, और उसने येरूशलेम में एक साल हुकूमत की। उसकी माँ का नाम 'अतलियाह था, जो 'उमरी की बेटी थी।
3 अहज्याची वागणूकही अहाबाच्या घराण्याप्रमाणेच होती. कारण अहज्याच्या आईने त्यास दुराचरण करण्यास प्रवृत्त केले.
वह भी अख़ीअब के ख़ान्दान के रास्ते पर चला, क्यूँकि उसकी माँ उसको बुराई की सलाह देती थी।
4 अहाबाच्या कुटुंबियांनी केले तसेच, परमेश्वरास मान्य नसलेले पापाचरण अहज्याने केले. अहज्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर अहाबाच्या घराण्याने त्यास सल्ला द्यायला सुरुवात केली. त्याचे हे सल्ले अहज्याच्या भल्याचे नव्हते. त्या अयोग्य सल्ल्यामुळेच त्याच्यावर मृत्यू ओढवला.
उसने ख़ुदावन्द की नज़र में बुराई की जैसा अख़ीअब के ख़ान्दान ने किया था, क्यूँकि उसके बाप के मरने के बाद वही उसके सलाहकार थे, जिससे उसकी बर्बादी हुई।
5 अहाब कुटुंबाच्या मसलतीनुसार अहज्या राजा योरामाच्या बरोबर अरामाचा राजा हजाएल याच्याशी लढण्यास रामोथ-गिलाद येथे गेला. योराम हा इस्राएलचा राजा अहाब याचा पुत्र. योराम या लढाईत अराम्याकडून जखमी झाला.
और उसने उनके सलाह पर 'अमल भी किया, और शाह — ए — इस्राईल अख़ीअब के बेटे यहूराम के साथ शाह — ए — अराम हज़ाएल से रामात जिल'आद में लड़ने को गया, और अरामियों ने यहूराम को ज़ख़्मी किया;
6 तो हजाएलाशी रामा येथे लढताना अरामी लोकांच्या हातून जे घाय त्यास झाले होते ते बरे व्हावेत म्हणून तो इज्रेल येथे गेला. अहाबाचा पुत्र यहोराम हा इज्रेल येथे आजारी होऊन पडला होता म्हणून यहूदाचा राजा यहोराम ह्याचा पुत्र अजऱ्या त्याच्या समाचारास गेला.
और वह यज़र'ऐल को उन ज़ख़्मों के 'इलाज के लिए लौटा जो उसे रामा में शाह — ए — अराम हज़ाएल के साथ लड़ते वक़्त उन लोगों के हाथ से लगे थे, और शाह — ए — यहूदाह यहूराम का बेटा 'अज़रियाह, यहूराम बिन अख़ीअब को यज़र'एल में देखने गया क्यूँकि वह बीमार था।
7 अहज्या (किंवा यहोआहाज) योथामाला भेटायला आलेला असतांना परमेश्वराने अहज्याला मृत्युमुखी केले. त्याचे असे झाले की आल्याबरोबर अहज्या योरामाबरोबर निमशीचा पुत्र येहू याला भेटायला गेला. अहाबाच्या घराण्याच्या नाशासाठी परमेश्वराने येहूची योजना केली होती.
अख़ज़ियाह की हलाकत ख़ुदा की तरफ़ से ऐसी हुई कि वह यहूराम के पास गया, क्यूँकि जब वह पहुँचा तो यहूराम के साथ याहू बिन निमसी से लड़ने को गया, जिसे ख़ुदावन्द ने अख़ीअब के ख़ान्दान को काट डालने के लिए मसह किया था।
8 अहाबाच्या घराण्याला शासन करीत असता येहूला यहूदाचे सरदार आणि अहज्याच्या सेवेत असलेले अहज्याचे आप्त आढळले. त्या सरदारांना आणि आप्तांना येहूने ठार केले.
और जब याहू अख़ीअब के ख़ानदान को सज़ा दे रहा था तो उसने यहूदाह के सरदारों और अज़ज़ियाह के भाइयों के बेटों को अख़ज़ियाह की ख़िदमत करते पाया और उनको क़त्ल किया।
9 यानंतर येहूने अहज्याचा शोध घेतला. येहूच्या मनुष्यांनी त्यास तो शोमरोनात लपायच्या प्रयत्नात असताना पकडले. अहज्याला त्यांनी येहूसमोर हजर केले, नंतर त्यांनी त्यास ठार केले आणि त्याचे दफन केले. ते म्हणाले, “अहज्या हा यहोशाफाटाचा वारस. यहोशाफाट जिवाभावाने परमेश्वरास शरण गेला होता.” यहूदाचे राज्य सांभाळण्याइतके अहज्याचे घराणे समर्थ राहिले नव्हते.
और उसने अख़ज़ियाह को ढूंढा यह सामरिया में छिपा था इसलिए वह उसे पकड़ कर याहू के पास लाये और उसे क़त्ल किया और उन्होंने उसे दफ़न किया क्यूँकि वह कहने लगे, “वह यहूसफ़त का बेटा है, जो अपने सारे दिल से ख़ुदावन्द का तालिब रहा।” और अख़ज़ियाह के घराने में हुकूमत संभालने की ताक़त किसी में न रही।
10 १० अथल्या ही अहज्याची आई. तिने आपला पुत्र मरण पावला आहे हे पाहिल्यावर तीने यहूदाच्या सर्व राजवंशाचा संहार केला.
जब अख़ज़ियाह की माँ 'अतलियाह ने देखा कि उसका बेटा मर गया, तो उसने उठ कर यहूदाह के घराने की सारी शाही नसल को मिटा दिया।
11 ११ पण राजाची कन्या यहोशबाथ हिने अहज्याचा पुत्र योवाश याला लपवले. योवाश आणि त्याची दाई यांना तिने आतल्या शयनगृहात ठेवले. यहोशबाथ ही राजा यहोरामाची कन्या आणि यहोयादा या याजकाची पत्नी. अहज्या तिचा भाऊ यहोशबाथाने योवाशाला लपवल्यामुळे अथल्या त्यास मारु शकली नाही.
लेकिन बादशाह की बेटी यहूसब'अत अख़ज़ियाह के बेटे यूआस को बादशाह के बेटों के बीच से जो क़त्ल किए गए, चुरा ले गई और उसे और उसकी दाया को बिस्तरों की कोठरी में रखा। इसलिए यहूराम बादशाह की बेटी यहूयदा' काहिन की बीवी यहूसब'अत ने चूँकि वह अख़ज़ियाह की बहन थी उसे अतलियाह से ऐसा छिपाया कि वह उसे क़त्ल करने न पायी।
12 १२ परमेश्वराच्या मंदिरात त्यास याजकांच्या सहवासात सहा वर्षे लपवून ठेवले होते. या काळात अथल्याने त्या जागेवर राज्य केले.
और वह उनके पास ख़ुदा की हैकल में छ: साल तक छिपा रहा, और 'अतलियाह मुल्क पर हुकूमत करती रही।

< 2 इतिहास 22 >