< 2 इतिहास 21 >
1 १ पुढे यहोशाफाट मरण पावला. त्यास त्याच्या पूर्वजांजवळ दावीद नगरात दफन केले. यहोशाफाटाच्या जागी त्याचा पुत्र यहोराम त्याच्याजागी राजा झाला.
Un Jehošafats aizmiga pie saviem tēviem un tapa aprakts pie saviem tēviem Dāvida pilī, un viņa dēls Jehorams palika par ķēniņu viņa vietā.
2 २ अजऱ्या, यहीएल, जखऱ्या, अजऱ्या मीखाएल व शफट्या हे यहोरामाचे भाऊ, व यहोशाफाटाचे पुत्र. यहोशाफाट हा इस्राएलाचा राजा होता.
Un tam bija brāļi, Jehošafata dēli, Azarija un Jeīels un Zaharija un Acarija un Mikaēls un Šefatija, šie visi bija Jehošafata, Israēla ķēniņa, dēli.
3 ३ यहोशाफाटाने आपल्या पुत्रांना यहूदातील तटबंदीच्या नगरांखेरीज सोन्यारुप्याच्या आणि अन्य किंमती वस्तू भेटीदाखल दिल्या. यहोराम मात्र ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्यास त्याने राज्य दिले.
Un viņu tēvs tiem deva daudz dāvanas, sudrabu un zeltu un dārgas lietas, arī stipras pilsētas Jūdā, bet valstību viņš deva Jehoramam, tāpēc ka tas bija tas pirmdzimtais.
4 ४ यहोराम आपल्या पित्याच्या जागी गादीवर आला आणि सत्ताधीश बनला. त्याने आपल्या सर्व भावांचा तसेच इस्राएलमधील काही वडिलधाऱ्यांचा तलवारीने वध केला.
Kad nu Jehorams bija nācis pie sava tēva valstības un bija palicis spēcīgs, tad viņš nokāva visus savus brāļus ar zobenu, arī kādus no Israēla lielkungiem.
5 ५ वयाच्या बत्तिसाव्या वर्षी सत्तेवर येऊन यहोरामाने यरूशलेमामध्ये आठ वर्षे राज्य केले.
Trīsdesmit divi gadus Jehorams bija vecs, kad palika par ķēniņu, un valdīja astoņus gadus Jeruzālemē.
6 ६ अहाबाच्या घराण्याप्रमाणे, इस्राएलच्या राजांच्या वर्तनूकी प्रमाणेच याचे वागणे होते. कारण अहाबाच्या कन्येशी यहोरामाने लग्न केले होते. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा गोष्टी त्याने केल्या.
Un viņš staigāja Israēla ķēniņu ceļos, tā kā Ahaba nams darīja; jo viņam Ahaba meita bija par sievu, un viņš darīja, kas Tam Kungam nepatika.
7 ७ पण परमेश्वराने दाविदाला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वर दाविदाच्या घराण्याचे उच्चाटन करु शकत नव्हता. दाविदाच्या वंशाचा दिवा सतत तेवत राहील असा परमेश्वराने दाविदाशी करार केला होता.
Bet Tas Kungs Dāvida namu negribēja izdeldēt tās derības dēļ, ko viņš bija derējis ar Dāvidu, un ka bija sacījis, viņam un viņa dēliem dot gaišumu mūžīgi.
8 ८ यहोरामाच्या कारकीर्दीत अदोमने यहूदाच्या सत्तेविरुध्द बंड पुकारले. अदोमच्या लोकांनी स्वत: आपला राजा निवडला.
Viņa laikā Edomieši atkrita no Jūda valdības un iecēla sev ķēniņu.
9 ९ तेव्हा आपले सर्व सेनापती आणि रथ यांच्यासह यहोराम अदोमवर चाल करून गेला. अदोमी सैन्याने त्यांना वेढा घातला. पण यहोरामाने रात्रीची वेळ साधून त्यांच्यावर प्रतिहल्ला केला.
Tādēļ Jehorams cēlās ar saviem virsniekiem un ar visiem saviem ratiem, un nogāja naktī un kāva Edomiešus, kas viņu bija apstājuši, un tos ratu virsniekus.
10 १० तेव्हापासून आजतागायत अदोमची यहूदाशी बंडखोरी चालू आहे. लिब्ना नगरातील लोकांनीही यहोरामाची सत्ता झुगारली. यहोरामाने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा त्याग केल्यामुळे असे झाले.
Tomēr Edomieši no Jūda valdības atkrita līdz šai dienai. Tai pašā laikā Libna atkrita no viņa valdības; jo viņš To Kungu, savu tēvu Dievu, bija atstājis.
11 ११ यहोरामाने यहूदातील पहाडांवर प्रार्थनेसाठी उच्चस्थाने बांधली आणि यरूशलेमेतील लोकांना व्यभिचारी मतीने चालायला लावले. अशाप्रकारे यहोरामाने यहूदी लोकांस परमेश्वरापासून दूर नेले.
Viņš arī cēla altārus Jūda kalnos un darīja, ka Jeruzālemes iedzīvotāji maukoja, un pievīla Jūdu.
12 १२ एलीया या संदेष्ट्याकडून यहोरामाला असा संदेश आला: तुझे पूर्वज दावीद यांचा परमेश्वर म्हणतो, “यहोरामा, तुझे आचरण आपले पिता यहोशाफाट यांच्या सारखे नाही. यहूदाचा राजा आसा याच्यासारखे तुझे वर्तन नाही.
Tad grāmata pie tā nāca no pravieša Elijas ar šiem vārdiem: tā saka Tas Kungs, tava tēva Dāvida Dievs: tāpēc ka tu neesi staigājis sava tēva Jehošafata un Asas, Jūda ķēniņa, ceļos,
13 १३ उलट तू इस्राएलच्या राजांचा कित्ता गिरवला आहेस. यहूदा आणि यरूशलेममधील लोकांस तू परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागायला लावले आहेस. अहाब आणि त्याचे घराणे यांनी हेच केले. ते परमेश्वराशी एकनिष्ठ राहिले नाहीत. तू स्वत: च्या भावांची हत्या केलीस. ते तुझ्यापेक्षा वर्तणुकीने चांगले होते.
Bet esi staigājis Israēla ķēniņu ceļos un esi darījis, ka Jūda un Jeruzālemes iedzīvotāji maukoja pēc Ahaba nama maukošanas, un arī esi nokāvis savus brāļus no sava tēva nama, kas bija labāki nekā tu, -
14 १४ तेव्हा परमेश्वर आता तुझ्या लोकांस जबर शासन करणार आहे तुझी अपत्ये पत्नी, मालमत्ता यांना परमेश्वर शिक्षा करणार आहे.
Redzi, tad Tas Kungs tevi mocīs ar lielu mocību pie taviem ļaudīm, pie taviem bērniem un pie tavām sievām un pie visas tavas mantas.
15 १५ तुला आतड्यांचा भयंकर आजार होईल आणि तो दिवसेदिवस बळावेल. त्यामध्ये तुझी आतडी बाहेर पडतील.”
Un tev uzies liela slimība, ka tavas iekšas sirgs, tiekams tavas iekšas caur šo sērgu ar laiku pavisam izbeigsies.
16 १६ कूशी लोकांच्या शेजारचे अरब आणि पलिष्टी लोक यांना परमेश्वराने यहोरामाविरुध्द भडकावले.
Un Tas Kungs pamodināja pret Jehoramu Fīlistu un Arābu prātu, kas dzīvo gar Moru zemi.
17 १७ या लोकांनी यहूदावर स्वारी केली आणि त्यांनी राजाच्या महालातली सगळी घनदौलत लुटून नेली. यहोरामाच्या पत्नी-अपत्यानाही त्यांनी पळवून नेले. फक्त यहोआहाज हा सगळ्यात धाकटा पुत्र तेवढा बचावला.
Un tie cēlās pret Jūdu un ielauzās un aizveda visu mantu, kas atradās ķēniņa namā, arī viņa bērnus un viņa sievas, tā kā neviens dēls viņam neatlika, kā vien Joakas (Ahazija), viņa jaunākais dēls.
18 १८ या सगळ्या घडामोडींनंतर परमेश्वराने यहोरामाला आतड्यांच्या असाध्य अशा रोगाने आजारी केले.
Un pēc visa tā Tas Kungs viņu mocīja viņa iekšās ar tādu sērgu, ko nevarēja dziedināt.
19 १९ त्या आजारात दोन वर्षांनी त्यांची आतडी बाहेर आली. असह्य वेदना होऊन तो मरण पावला. लोकांनी त्याच्या वडलांच्या सन्मानार्थ जसा मोठा अग्नी पेटवला होता तसा यहोरामाच्या सन्मानार्थ पेटवला नाही.
Tas notika jo dienas jo vairāk, un kad divu gadu laiks bija pagājis, tad viņa iekšas ar to sērgu izbeidzās, ka tas lielās mokās nomira. Un viņa ļaudis par viņu nededzināja tādu dedzināšanu, kā tie bija darījuši viņa tēviem.
20 २० यहोराम सत्तेवर आला तेव्हा बत्तीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये आठ वर्षे राज्य केले. त्याच्या मृत्यूचे कोणालाही दु: ख झाले नाही. लोकांनी दावीद नगरातच त्याचे दफन केले, पण राजासाठी असलेल्या कबरेत नव्हे.
Viņš bija trīsdesmit divus gadus vecs, kad palika par ķēniņu, un valdīja astoņus gadus Jeruzālemē, un viņš aizgāja, un nevienam viņa nebija žēl, un to apraka Dāvida pilī, bet ne ķēniņu kapos.