< 2 इतिहास 18 >
1 १ यहोशाफाटाला भरपूर धनदौलत आणि बहुमान मिळाला. राजा अहाबाच्या घराण्याशी सोयरीक जुळवून त्याने त्यांच्याशी सलोखा केला.
[南北聯婚齊戰阿蘭]約沙法特的財產豐富,尊榮很大,且與阿哈布聯婚。
2 २ त्यानंतर काही वर्षांनी यहोशाफाट शोमरोन येथे अहाबाच्या भेटीला गेला. त्याप्रसंगी यहोशाफाट आणि त्याच्याबरोबरचे लोक यांच्याप्रीत्यर्थ अहाबाने बरेच बैल आणि शेळ्यामेंढ्या यांचे बली दिले. अहाबाने यहोशाफाटाला रामोथ-गिलादावर चढाई करण्यास प्रवृत्त केले.
幾年內以後,他到撒瑪黎雅去見阿哈布。阿哈布為他和跟從他的隨員,宰殺了許多牛羊,慫恿他去攻打辣摩特基肋阿得。
3 ३ अहाब त्यास म्हणाला, “रामोथ-गिलादावरील स्वारीत तूही माझ्याबरोबर सहभागी होशील का?” अहाब इस्राएलचा राजा होता आणि यहोशाफाट यहूदाचा. यहोशाफाट त्यास म्हणाला, “तू आणि मी काही वेगळे नाही. माझी माणसे ती तुझीच माणसे. आम्ही अवश्य लढाईत भाग घेऊ.”
以色列王阿哈布對猶大王約沙法特說:「你願意同我一起去攻打辣摩特基肋阿得嗎﹖」約沙法特回答說:「你我原不分彼此,我的人民就是你的人民;我必與你同去作戰。」[假先知預言勝利]
4 ४ यहोशाफाट इस्राएलाच्या राजाला पुढे असेही म्हणाला, “पण त्यापुर्वी परमेश्वराचा आदेशही घेऊ या.”
約沙法特對以色列王說:「請你先求問上主的答話! 」
5 ५ तेव्हा इस्राएलाचा राजा अहाबाने सुमारे चारशे संदेष्ट्यांना बोलावून विचारले, आम्ही रामोथ-गिलादावर स्वारी करावी की नाही? तेव्हा ते संदेष्टे राजा अहाबाला म्हणाले, “जरुर जा. कारण देव राजाला जय देईल.”
以色列王於是召集了先知,共四百人,問他們說:「我們應該上去進攻辣摩特基肋阿得﹖還是不去呢﹖」他們回答說:「上主,天主必將那地交於大王手中。」
6 ६ पण यहोशाफाट म्हणाला, “यांच्याखेरीज परमेश्वराचा संदेष्टा इथे कोणी आहे का? परमेश्वरास त्याच्या संदेष्ट्यामार्फतच आपण विचारायला हवे.”
但是約沙法特說:「這裏就沒有一位上只的先知,我們可以託他求問嗎﹖」
7 ७ तेव्हा इस्राएलाचा राजा यहोशाफाटाला म्हणाला, “इथे तसा एकजण आहे. त्याच्या मार्फत आपण परमेश्वरास विचारु शकतो. पण मला त्याच्याकडून कधीच अनुकूल संदेश मिळत नाही. नेहमी प्रतिकूल संदेशच तो मला देतो, त्यामुळे मला त्याचा द्वेष वाटतो. त्याचे नाव मीखाया. तो इम्लाचा पुत्र.” पण यहोशाफाट म्हणाला, “अहाब, तू असे म्हणू नकोस.”
以色列王回答約沙法特說:「還有一個人,可以託他求問天主,不過我憎恨他,因為他對我說預言,總不說吉祥話,常說兇言;這人就是依默拉的兒子米加雅。」約沙法特對他說:「請大王別這樣說! 」
8 ८ तेव्हा इस्राएलाच्या राजाने आपल्या एका कारभाऱ्याला बोलावून “इम्लाचा पुत्र मीखाया याला लगेच घेऊन यायला सांगितले.”
於是以色列王召來一個宦官,吩咐他說:「快去將依默拉的兒子米加雅召來! 」
9 ९ इस्राएलचा राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट राजवस्त्रे परिधान करून शोमरोन नगराच्या वेशीजवळच्या खळ्यात आपापल्या सिंहासनांवर विराजमान झाले होते. त्यांच्यासमोर ते चारशे संदेष्टे भविष्यकथन करत होते.
當時以色列王和猶大王約沙法特在撒瑪黎雅城門前的廣場上,各穿朝服,坐在寶座上;所有的先知在他們面前說預言。
10 १० कनानचा पुत्र सिदकीया याने लोखंडाची शिंगे करून आणली होती. तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो ‘अरामी लोकांचा या शिंगांच्या सहाय्याने तुम्ही नाश कराल.’”
革納阿納的兒子漆德克雅帶了一些鐵角說:「上主這樣說:你要用這些鐵角刺殺阿蘭人,直到將他們消滅。」
11 ११ इतर सर्व संदेष्ट्यांनीही तेच सांगितले. ते म्हणाले, “रामोथ-गिलाद वर चालून जा. तुम्ही विजयी व्हाल. परमेश्वर तुझ्या हातून म्हणजे राजाच्या हातून अराम्यांचा पराभव करील.”
所有的先知也這樣預言說:「你上辣摩特基肋阿得去必會勝利,上主必將那地交於大王手中! 」[米加雅預言戰敗]
12 १२ मीखायला आणायला गेलेला निरोप्या त्यास म्हणाला, “मीखाया, ऐक सगळ्या संदेष्ट्यांचे म्हणणे एकच आहे. राजाची सरशी होईल असे ते म्हणतात. तेव्हा तूही तसेच म्हणावेस. तू ही चांगले उद्गार काढ.”
那去召米加雅的使者對米加雅說:「看,先知們都異口同聲對君王說吉祥的話,希望你說的話也與他們每人說的話一樣,也是吉祥的話! 」
13 १३ पण मीखाया म्हणाला, “परमेश्वराची शपथ तो जे म्हणेल, तसेच मी बोलणार.”
米加雅回答說:「我指著永生的上主起誓:我的天主吩咐什麼,我就說什麼! 」
14 १४ मीखाया मग अहाब राजाकडे आला. राजा त्यास म्हणाला, “मीखाया, आम्ही रामोथ-गिलादावर स्वारी करावी की नाही?” मीखाया म्हणाला, “खुशाल चढाई करा. व विजयी व्हा तो एक महान विजय असेल.”
米加雅來到王那裏,王就問他說:「米加雅,我們應該上去進攻辣摩特基肋阿得,還是不去呢﹖」他回答說:「上去,必然勝利,他們必落在你們手中。」
15 १५ राजा अहाब मीखायला म्हणाला, “परमेश्वराचे नाव उच्चारुन सत्य तेच सांग असे मी कितीदा तुला शपथ घेऊन सांगितले!”
君王對他說:「我應當多少次叫你宣誓,你纔奉上主的名,對我說實話呢﹖」
16 १६ यावर मीखाया राजाला म्हणाला, “मेंढपाळाविना मेंढरे असावीत तसे मी इस्राएल लोकांस डोंगरांवर विखुरलेले पाहिले. परमेश्वर म्हणाला, यांना कोणी मालक नाही. ही आपापल्या घरी सुखरुप जावोत.”
米加雅答說:「我看見全以色列散在山上,好像沒有牧人的羊群。上主說:這些人既然沒有主人,更好各自平安回家去罷! 」
17 १७ इस्राएलचा राजा अहाब यहोशाफाटाला म्हणाला, “मीखाया मला कधीच परमेश्वराचा शुभसंदेश देत नाही. तो नेहमी प्रतिकूलच बोलतो असे मी तुला म्हणालोच होतो.”
以色列王對約沙法特說:「我不是告訴過你,他對我說預言,總不說吉祥話,只說兇言麼﹖」
18 १८ मीखाया म्हणाला, “तुम्ही सर्वजण परमेश्वराचा संदेश काय आहे तो ऐका परमेश्वरास मी आपल्या सिंहासनावर बसलेले पाहिले, स्वर्गातील सर्व सेना त्याच्या उजव्या व डाव्या हाताला उभी होती.”
米加雅答說:「請你們靜聽上主的話:我見上主坐在寶座上,天上的萬軍侍立在他左右。
19 १९ परमेश्वर म्हणाला, “इस्राएलचा राजा अहाब याला रामोथ-गिलादावर हल्ला करायला कोण बरे युक्तीने प्रवृत्त करील? म्हणजे अहाबाच्या तेथेच शेवट होईल.” आणि एकजण म्हणाला या मार्गाने दुसऱ्याने म्हटले त्या मार्गाने,
上主問說:誰去唆使以色列王阿哈布上去,叫他陣王在辣摩特基肋阿得呢﹖那時有的說這樣,有的說那樣。
20 २० “मग एक आत्मा पुढे आला आणि परमेश्वरासमोर उभा राहून म्हणाला, मी अहाबाला भुलवून टाकतो. परमेश्वराने त्या आत्म्याला विचारले कसे बरे?”
以後有一個神出來,立在上主面前說:我能唆使他。上主的問他說:用什麼方法﹖
21 २१ तेव्हा तो म्हणाला, “अहाबाच्या संदेष्ट्यांच्या तोंडून असत्य वदवणारा आत्मा असे मी रुप घेईन. तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, तू अहाबाला मोहात पाडू शकशील, चल जा आपल्या कामगिरीवर.”
那神答說:我去,在他所有先知們口中做虛言的神。上主回答說:你能唆使,也必會成功的,就去照樣辦罷!
22 २२ “अहाब, आता तूच पाहा. परमेश्वराने तुझ्या संदेष्ट्यांच्या तोंडी असत्य बोलणाऱ्या आत्म्याचा संचार केला आहे. तुझ्यावर अरिष्ट येणार असे परमेश्वराने बोलून दाखवले आहे.”
現在上主將虛言的神放入你這些先知口中,上主已注定你必遭殃。」
23 २३ तेवढ्यात कनानाचा पुत्र सिदकीयाने पुढे होऊन मीखायाच्या थोबाडीत मारले. तो म्हणाला, “मीखाया, मला सोडून परमेश्वराचा आत्मा तुझ्याशी बोलायला गेला तो कोणत्या दिशेने?”
那時,革納阿納的兒子漆德克雅前來,打米加雅的臉說:「上主的神由那條路離開了我,而同你說話呢﹖」
24 २४ मीखाया म्हणाला, “पाहा, घराच्या अगदी आतल्या खोलीत तू लपायला पळ काढशील तेव्हा तुला ते कळेल.”
米加雅答說:「在你進入最嚴密的室內隱藏的那一天,你就會知道了! 」
25 २५ इस्राएलाचा राजा म्हणाला, “मीखायाला नगराचा सुभेदार आमोन आणि राज पुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा
以色列王吩咐說:「將米加雅帶去,交給阿孟市長和約阿布王子,
26 २६ आमोन आणि योवाश यांना म्हणावे, राजाचे म्हणणे असे: मीखायाला कैदेत टाका. मी युध्दावरुन सुखरूप परतेपर्यंत त्यास कैदयांना देण्यात येणारी भाकर व पाणी द्या.”
說君王這樣吩咐:將這人下在監裏,少給他吃的喝的,等我平安回來。」
27 २७ मीखाया म्हणाला, “अहाब तू लढाईनंतर सुखरुप परत आलास तर परमेश्वर माझ्याद्वारे बोललेला नाही असे खुशाल समज. लोकहो, माझे हे शब्द लक्षात ठेवा.”
米加雅說:「你如果能平安回來,那麼,上主就沒藉我說過話。」又說:「眾百姓! 你們要聽清楚啊! 」[阿哈布陣亡]
28 २८ इस्राएलचा राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट यांनी रामोथ-गिलादावर हल्ला चढवला.
以色列王遂與猶大王約沙法特上去進攻辣摩特基肋阿得。
29 २९ इस्राएलाचा राजा यहोशाफाटाला म्हणाला, “मी युध्दात जातांना वेषांतर करतो. तू मात्र राजवस्त्रेच घाल.” आणि त्याप्रमाणे राजा अहाबाने वेषांतर केले आणि दोनही राजे लढाईला भिडले.
以色列王對約沙法特說:「我要改裝上陣,你可仍穿朝服。」於是以色列王改裝上了陣。
30 ३० अरामाच्या राजाने आपल्या रथावरच्या सरदारांना आज्ञा केली होती की, “इस्राएलचा राजा अहाब याच्यावरच फक्त हल्ला करा. बाकी लहानथोर कोणाशीही लढू नका.”
阿蘭王曾吩咐自己的戰車隊長說:「你們不必與大小將士交戰,只攻打以色列王。」
31 ३१ त्या सरदारांनी यहोशाफाटाला पाहिले तेव्हा त्यांना वाटले, “हाच अहाब इस्राएलचा राजा.” म्हणून ते यहोशाफाटाकडे वळले. पण यहोशाफाट मोठ्याने ओरडला आणि परमेश्वर त्याच्या मदतीला आला. त्याने त्या सरदारांना यहोशाफाटापासून दूर वळवले.
戰車隊長一看見約沙法特,便說:「這必是以色列王! 」遂將他包圍,向他進攻;約沙法特連聲叫苦,上主援助了他,天主使敵人遠離了他。
32 ३२ हा इस्राएलचा राजा नाही असे सरदारांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग सोडून दिला.
戰車隊長見他不是以色列王,就不再追擊他。
33 ३३ पण कोणी एका सैनिकाने सहज म्हणून, लक्ष्य निश्चित न करता, धनुष्यातून एक बाण सोडला आणि तो नक्की चिलखताच्या सांध्यातून इस्राएलाच्या राजाच्या शरीरात रुतला. अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मागे वळ आणि मला युध्द भूमीतून बाहेर काढ. मी जखमी झालो आहे.”
有人偶然一箭,正射入以色列王的鎧甲與腰帶中,君王對駕車的人說:「轉回,載我離開陣地,我已受傷。」
34 ३४ त्यादिवशी घनघोर युध्द झाले. अराम्याकडे तोंड करून इस्राएलाचा राजा अहाब आपल्या रथात संध्याकाळपर्यंत टेकून बसला. संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळेस तो मरण पावला.
但那天戰事越來越激烈,以色列王仍立在車上,抵抗阿蘭人,直到晚上;日落的時後,王就死了。