< 2 इतिहास 16 >

1 आसाच्या राज्याच्या छत्तिसाव्या वर्षी इस्राएलाचा राजा बाशाने यहूदावर स्वारी केली. बाशा हा इस्राएलचा राजा रामा हे नगर निवडून त्याने त्याची मजबुती केली. यहूदाचा राजा आसा याच्याकडे कोणालाही येण्याजाण्याला प्रतिबंध व्हावा हा त्याचा त्यामागचा हेतू होता.
در سال سی و ششم سلطنت آسا، بعشا پادشاه اسرائیل به یهودا لشکر کشید و شهر رامه را بنا کرد تا نگذارد کسی از خارج وارد اورشلیم شود و نزد آسا، پادشاه یهودا رفت و آمد کند.
2 तेव्हा आसाने परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारातून व राजमहालातून सोने आणि चांदी काढून घेतली. अरामाचा राजा बेन-हदाद दिमिष्काला राहत होता. आसाने त्याच्याकडे सोने, आणि चांदी पाठवून त्यास निरोप पाठवला,
آسا چون وضع را چنین دید، هر چه طلا و نقره در خزانه‌های خانۀ خداوند و کاخ سلطنتی بود، گرفت و با این پیام برای بنهدد پادشاه سوریه به دمشق فرستاد:
3 “आपण आपसात एक करार करू आपल्या दोघांच्या पित्यामध्येही तसा करार केलेला होता मी माझ्याकडचे सोने व रुपे तुझ्याकडे पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याबरोबरचा तुझा करार मोड म्हणजे तो माझ्याकडे पाठ फिरवेल आणि मला त्रस्त करणार नाही.”
«بیا مثل پدرانمان با هم متحد شویم. این طلا و نقره‌ای را که برایت می‌فرستم از من بپذیر. پیمان دوستی خود را با بعشا، پادشاه اسرائیل قطع کن تا او از قلمرو من خارج شود.»
4 बेन-हदाद आसाच्या गोष्टीशी सहमत झाला. त्याने इस्राएली नगरांवर आपले सैन्याचे सरदार पाठवले. त्या सरदारांनी ईयोन, दान आबेल-मईम या नगरांवर हल्ला केला कोठारे असलेल्या नफतालीच्या नगरांवरही त्यांनी चढाई केली.
بنهدد با درخواست آسای پادشاه موافقت کرد و با سپاهیان خود به اسرائیل حمله برد و شهرهای عیون، دان، آبل مایم و تمام مراکز مهمات و آذوقه را در زمین نفتالی تسخیر کرد.
5 या चढायांचे वृत्त बाशाच्या कानावर गेले. तेव्हा त्याने रामा शहराच्या मजबुतीचे काम अर्धवट सोडून दिले.
وقتی بعشای پادشاه این را شنید از بنای رامه دست کشید و از سرزمین یهودا عقب‌نشینی کرد.
6 राजा आसाने मग सर्व यहूदी लोकांना बोलावले. बाशा ने रामा नगर बांधण्यासाठी वापरलेले दगड, लाकूड ही सामग्री हस्तगत केली. त्यांनी ती गिबा आणि मिस्पा या नगरांच्या बांधकामासाठी वापरली.
آسا تمام مردم یهودا را به رامه آورد و آنها سنگها و چوبهایی را که بعشا به کار برده بود، برداشتند و بردند و با آن، شهرهای جبع و مصفه را بنا کردند.
7 यावेळी हनानी नावाचा द्रष्टा यहूदाचा राजा आसा याच्याकडे आला व त्यास म्हणाला, “आसा तू मदतीसाठी तुझ्या परमेश्वर देवावर भरवंसा न ठेवता अरामाच्या राजावर अवलंबून राहिलास. तू परमेश्वराचे साहाय्य घ्यायला हवे होतेस. पण तू परमेश्वराचा धावा केला नाहीस म्हणून अरामाचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे.
در این هنگام حنانی نبی نزد آسای پادشاه آمد و به او گفت: «تو به جای اینکه به خداوند، خدای خود تکیه کنی، به پادشاه سوریه متوسل شدی به همین سبب سوری‌ها از چنگ تو خلاصی یافتند.
8 कूशी आणि लुबी यांचे सैन्य तर केवढे बलाढ्य होते! त्यांच्याकडे कितीतरी रथ आणि स्वार होते पण तेव्हा तू परमेश्वरावर भरवंसा ठेवलास आणि परमेश्वराने तुला विजय मिळवून दिला.
آیا به یاد نداری که بر سر آن سپاه عظیم حبشه و لیبی، با آن همه ارابه‌ها و سوارانی که داشتند، چه آمد؟ در آن زمان چشم امید تو به خداوند بود و او هم آن سپاه عظیم را به دستت تسلیم نمود.
9 अखिल पृथ्वीवर परमेश्वराचे नेत्र निरीक्षण करीत असतात जे कोणी सरळ मनाने त्याच्याशी वर्ततात अशांना तो आपले पाठबळ देतो. पण तू मात्र मूर्खपणा केला आहेस. तेव्हा यापुढे तुला लढायांना तोंड द्यावे लागेल.”
زیرا خداوند به تمام جهان چشم دوخته است تا کسانی را که از دل و جان به او وفادارند، بیابد و به آنان قوت ببخشد. ولی چون تو احمقانه رفتار کردی؛ از این به بعد همیشه گرفتار جنگ خواهی بود.»
10 १० द्रष्ट्याच्या या बोलण्याचा आसास राग आला व क्रोधाच्या भरात त्याने त्यास तुरुंगात डांबले. याच काळात आसा काही लोकांशी फार निर्दयतेने वागला.
آسا از سخنان نبی چنان برآشفت که او را به زندان انداخت. از آن پس رفتار آسا با برخی از مردم نیز ظالمانه شد.
11 ११ आसाची सर्व कृत्ये इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत.
شرح کامل رویدادهای دوران سلطنت آسا در کتاب تاریخ پادشاهان یهودا و اسرائیل نوشته شده است.
12 १२ आपल्या राज्याच्या एकोणचाळीसाव्या वर्षी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला. त्याचा आजार खूप बळावला तरी त्याने दुखण्यात परमेश्वराचा धावा केला नाही. त्याने वैद्यांकरवी इलाज करून घेतला.
در سال سی و نهم سلطنت آسا، مرضی در پاهایش ایجاد شد. گرچه مرضش شدت گرفت، ولی او حتی در بیماری خود نیز از خداوند یاری نخواست بلکه فقط به پزشکان امید بست.
13 १३ आपल्या कारकिर्दीच्या एक्केचाळीसाव्या वर्षी आसा मरण पावला व आपल्या पूर्वजांबरोबर त्याने चिरविश्रांती घेतली.
آسا در سال چهل و یکم سلطنتش درگذشت.
14 १४ दावीद नगरात त्याने आधीच स्वत: साठी करून घेतलेल्या कबरीत लोकांनी त्याचे दफन केले. विविध सुवासिक द्रव्ये आणि मसाले घातलेल्या बिछान्यावर लोकांनी त्यास ठेवले. त्याच्या सन्मानाप्रीत्यर्थ त्यांनी मोठा जाळ केला.
جنازهٔ او را روی تخت روانی گذاشتند و با انواع عطریات معطر ساختند و بعد در مقبره‌ای که برای خود در شهر داوود ساخته بود، دفن نمودند و آتش بزرگی به احترام او روشن کردند.

< 2 इतिहास 16 >