< 2 इतिहास 16 >
1 १ आसाच्या राज्याच्या छत्तिसाव्या वर्षी इस्राएलाचा राजा बाशाने यहूदावर स्वारी केली. बाशा हा इस्राएलचा राजा रामा हे नगर निवडून त्याने त्याची मजबुती केली. यहूदाचा राजा आसा याच्याकडे कोणालाही येण्याजाण्याला प्रतिबंध व्हावा हा त्याचा त्यामागचा हेतू होता.
アサの治世の三十六年にイスラエルの王バアシヤ、ユダに攻のぼりユダの王アサの所に誰をも往來せざらしめんとてラマを建たり
2 २ तेव्हा आसाने परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारातून व राजमहालातून सोने आणि चांदी काढून घेतली. अरामाचा राजा बेन-हदाद दिमिष्काला राहत होता. आसाने त्याच्याकडे सोने, आणि चांदी पाठवून त्यास निरोप पाठवला,
是においてアサ、ヱホバの家と王の家との府庫より金銀を取いだしダマスコに住るスリアの王ベネハダデに餽りて言けるは
3 ३ “आपण आपसात एक करार करू आपल्या दोघांच्या पित्यामध्येही तसा करार केलेला होता मी माझ्याकडचे सोने व रुपे तुझ्याकडे पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याबरोबरचा तुझा करार मोड म्हणजे तो माझ्याकडे पाठ फिरवेल आणि मला त्रस्त करणार नाही.”
我父と汝の父の間の如く我と汝の間に約を立ん視よ我今汝に金銀を餽れり往て汝とイスラエルの王バアシヤとの約を破り彼をして我を離れて去しめよ
4 ४ बेन-हदाद आसाच्या गोष्टीशी सहमत झाला. त्याने इस्राएली नगरांवर आपले सैन्याचे सरदार पाठवले. त्या सरदारांनी ईयोन, दान आबेल-मईम या नगरांवर हल्ला केला कोठारे असलेल्या नफतालीच्या नगरांवरही त्यांनी चढाई केली.
ベネハダデすなはちアサ王に聽き自己の軍勢の長等をイスラエルの邑々に攻遣ければ彼等イヨン、ダン、アベルマイムおよびナフタリの一切の府庫の邑々を撃たり
5 ५ या चढायांचे वृत्त बाशाच्या कानावर गेले. तेव्हा त्याने रामा शहराच्या मजबुतीचे काम अर्धवट सोडून दिले.
バアシヤ聞てラマを建ることを罷めその工事を廢せり
6 ६ राजा आसाने मग सर्व यहूदी लोकांना बोलावले. बाशा ने रामा नगर बांधण्यासाठी वापरलेले दगड, लाकूड ही सामग्री हस्तगत केली. त्यांनी ती गिबा आणि मिस्पा या नगरांच्या बांधकामासाठी वापरली.
是においてアサ王ユダ全國の人を率ゐバアシヤがラマを建るに用ひたる石と材木を運びきたらしめ之をもてゲバとミズパを建たり
7 ७ यावेळी हनानी नावाचा द्रष्टा यहूदाचा राजा आसा याच्याकडे आला व त्यास म्हणाला, “आसा तू मदतीसाठी तुझ्या परमेश्वर देवावर भरवंसा न ठेवता अरामाच्या राजावर अवलंबून राहिलास. तू परमेश्वराचे साहाय्य घ्यायला हवे होतेस. पण तू परमेश्वराचा धावा केला नाहीस म्हणून अरामाचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे.
その頃先見者ハナニ、ユダの王アサの許にいたりて之に言けるは汝はスリアの王に倚賴みて汝の神ヱホバに倚賴まざりしに因てスリア王の軍勢は汝の手を脱せり
8 ८ कूशी आणि लुबी यांचे सैन्य तर केवढे बलाढ्य होते! त्यांच्याकडे कितीतरी रथ आणि स्वार होते पण तेव्हा तू परमेश्वरावर भरवंसा ठेवलास आणि परमेश्वराने तुला विजय मिळवून दिला.
かのエテオピア人とルビ人は大軍にして戰車および騎兵はなはだ多かりしにあらずや然るも汝ヱホバに倚賴みたればヱホバかれらを汝の手に付したまへり
9 ९ अखिल पृथ्वीवर परमेश्वराचे नेत्र निरीक्षण करीत असतात जे कोणी सरळ मनाने त्याच्याशी वर्ततात अशांना तो आपले पाठबळ देतो. पण तू मात्र मूर्खपणा केला आहेस. तेव्हा यापुढे तुला लढायांना तोंड द्यावे लागेल.”
ヱホバは全世界を徧く見そなはし己にむかひて心を全うする者のために力を顯したまふこの事において汝は愚なる事をなせり故に此後は汝に戰爭あるべしと
10 १० द्रष्ट्याच्या या बोलण्याचा आसास राग आला व क्रोधाच्या भरात त्याने त्यास तुरुंगात डांबले. याच काळात आसा काही लोकांशी फार निर्दयतेने वागला.
然るにアサその先見者を怒りて之を獄舎にいれたり其は烈しくこの事のために彼を怒りたればなりアサまた其頃民を虐げたる事ありき
11 ११ आसाची सर्व कृत्ये इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत.
アサの始終の行爲はユダとイスラエルの列王の書に記さる
12 १२ आपल्या राज्याच्या एकोणचाळीसाव्या वर्षी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला. त्याचा आजार खूप बळावला तरी त्याने दुखण्यात परमेश्वराचा धावा केला नाही. त्याने वैद्यांकरवी इलाज करून घेतला.
アサはその治世の三十九年に足を病みその病患つひに劇しくなりしがその病患の時にもヱホバを求めずして醫師を求めたり
13 १३ आपल्या कारकिर्दीच्या एक्केचाळीसाव्या वर्षी आसा मरण पावला व आपल्या पूर्वजांबरोबर त्याने चिरविश्रांती घेतली.
アサその先祖等と偕に寝りその治世の四十一年に死り
14 १४ दावीद नगरात त्याने आधीच स्वत: साठी करून घेतलेल्या कबरीत लोकांनी त्याचे दफन केले. विविध सुवासिक द्रव्ये आणि मसाले घातलेल्या बिछान्यावर लोकांनी त्यास ठेवले. त्याच्या सन्मानाप्रीत्यर्थ त्यांनी मोठा जाळ केला.
人衆これをその己のためにダビデの邑に堀おける墓に葬り製香の術をもて製したる種々の香物を盈せる床の上に置き之がために夥多しく焚物をなせり