< 2 इतिहास 11 >

1 यरूशलेमेला आल्यावर रहबामाने एक लाख ऐंशी हजार उत्तम योध्दे जमवले. यहूदा आणि बन्यामीन या घराण्यांमधून त्यानेही निवड केली. इस्राएलाशी युध्द करून स्वत: कडे राज्य खेचून आणण्यासाठी त्यानेही जमवाजमव केली.
[上主禁止進攻以色列]勒哈貝罕一回到耶路撒冷,即刻召集猶大和本雅明家族中十八萬善戰的精兵,去攻打以色列,想把王國奪回,再歸屬勒哈貝罕。
2 पण परमेश्वराचा मनुष्य शमाया याच्याकडे परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर त्यास म्हणाला,
但是,上主有話傳於天主的人舍瑪雅說:「
3 “शमाया, यहूदाचा राजा, शलमोन पुत्र रहबाम याच्याशी तू बोल तसेच यहूदा आणि बन्यामीन इथल्या इस्राएल लोकांशीही बोल. त्यांना म्हणावे.
你去告訴撒羅滿的兒子猶大王勒哈貝罕,及所有猶大和本雅明的以色列人說:
4 परमेश्वराचे म्हणणे असे आहे आपल्या बांधवांशी लढू नका. प्रत्येकाने घरी जावे. मीच हे सर्व व्हायला कारणीभूत आहे.” तेव्हा राजा रहबाम आणि त्याचे सैन्य यांनी परमेश्वराचा संदेश मानला आणि ते परत गेले. यराबामावर त्यांनी हल्ला केला नाही.
上主這樣說:你們不可前去攻打你們的弟兄! 你們各人回本家罷! 因為這事是出於我。」他們便聽從上主的話,都回去了,沒有去攻打雅洛貝罕。[勒哈貝罕加強防禦工事]
5 रहबाम यरूशलेमेमध्ये राहिला. हल्ल्यांचा प्रतिकार करायला सज्ज अशी भक्कम नगरे त्याने यहूदात बाधली.
勒哈貝罕住在耶路撒冷,在猶大修築了各成的防禦工事,
6 बेथलेहेम, एटाम, तकोवा,
即修築了白冷、厄坦、特科亞、
7 बेथ-सूर, शोखो, अदुल्लाम,
貝特族爾、索苛、阿杜藍、
8 गथ, मारेशा, जीफ,
加特、瑪勒沙、齊弗、
9 अदोरइम, लाखीश, अजेका,
阿多蘭、拉基士、阿則卡、
10 १० सरा, अयालोन व हेब्रोन या तटबंदी असलेल्या नगरांची डागडुजी केली. यहूदा आणि बन्यामीन मधली ही नगरे चांगली भक्कम करण्यात आली.
祚辣、阿雅隆和赫貝龍:這些都是猶大和本雅明境內設防的城。
11 ११ किल्ले मजबूत झाल्यावर रहबामाने त्यांच्यावर नायक नेमले. अन्नसामग्री, तेल, द्राक्षरस यांचा साठा त्याने तेथे केला.
他加強鞏固這些城,派軍駐守,儲備食糧,酒、油;
12 १२ प्रत्येक नगरात ढाली आणि भाले यांचा पुरवठा करून गावे अधिकच मजबूत केली. यहूदा आणि बन्यामीन मधील ही नगरे आणि तेथील लोक यांना रहबामाने आपल्या नियंत्रणाखाली ठेवले.
各城內又備有干戈,使之極其堅固,為統治猶大和本雅明。[聖職人員來歸]
13 १३ सर्व इस्राएलामधील याजक आणि लेवी रहबामाशी सहमत होते. ते त्यास येऊन मिळाले.
凡以色列所有的司祭和肋未人都由各地歸勒哈貝罕。
14 १४ लेवींनी आपली शेती आणि मालमत्ता सोडली आणि ते यहूदा व यरूशलेम येथे आले. परमेश्वराप्रीत्यर्थ याजकाचे काम करायला यराबाम आणि त्याचे पुत्र यांनी लेवींना हाकलून लावले म्हणून ते आले.
肋未人離開自己的牧場和產業,來到猶大和耶路撒冷,是因為雅洛貝罕和他的兒子們拒絕他們充當司祭,服事上主,
15 १५ यराबामाने बोकड आणि वासरे यांच्या मूर्ती उच्चस्थानी स्थापन केल्या आणि त्यांच्या पूजेसाठी आपले याजक निवडले.
而另為高丘、公山羊像和自己所製的牛犢委派了司祭。
16 १६ इस्राएलच्या सर्व वंशातील जे लोक इस्राएलचा देव परमेश्वर याच्याशी एकनिष्ठ होते ते ही, लेवींनी इस्राएल सोडल्यावर, त्यांच्या पुर्वजांचा देव परमेश्वरास यज्ञार्पणे करण्यासाठी यरूशलेमेला आले.
為此,以色列各支派中,凡專心尋求上主以色列天主的,都隨那些肋未人到了耶路撒冷,向上主他們祖先的天主奉獻犧牲。
17 १७ त्यामुळे यहूदाचे राज्य बळकट झाले. त्यांनी शलमोनाचा पुत्र रहबाम याला तीन वर्षे पाठिंबा दिला. या काळात त्यांनी दावीद आणि शलमोन यांच्यासारखेच आचरण ठेवले.
如此,這般人加強了猶大的國勢,使撒羅滿的兒子勒哈貝罕有了勢力,凡三年之久,因為他們在三年之中,遵循了達味和撒羅滿的道路。[勒哈貝罕的家室]
18 १८ रहबामाने दावीदपुत्र यरीमोथ आणि इशायपुत्र अलीयाब ह्याची कन्या अबीहाईल ह्यांच्यापासून झालेली महलथ हिच्याशी विवाह केला;
勒哈貝罕取了達味之子耶黎摩特的女兒,亦即葉瑟之子厄里雅布的女兒阿彼海耳的女兒瑪哈拉特為妻。
19 १९ महलथापासून रहबामाला यऊश, शमऱ्या आणि जाहम हे पुत्र झाले.
瑪哈拉特給他生的兒子,即耶烏士、舍瑪黎雅和匝罕。
20 २० मग रहबामाने माकाशी विवाह केला. माका ही अबशालोमची कन्या. माकाला रहबामापासून अबीया, अत्थय, जीजा आणि शलोमीथ हे पुत्र झाले.
以後,他又娶了阿貝沙隆的外孫女瑪阿加,她生了阿彼雅,阿泰、齊匝和舍羅米特。
21 २१ रहबामाचे आपल्या इतर पत्नी आणि उपपत्नी यांच्यापेक्षा माकावर अधिक प्रेम होते. माका अबशालोमची नात. रहबामाला अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी होत्या. त्यास अठ्ठावीस पुत्र आणि साठ कन्याहोत्या.
勒哈貝罕共娶了十八個妻子,六十個妾侍,生了二十八個兒子,六十個女兒;但他愛阿貝沙龍的外孫女瑪阿加,超過其他的妻妾。
22 २२ माकाचा पुत्र अबीया याला रहबामाने सर्व भावडांमध्ये अग्रक्रम दिला. कारण त्यास राजा करावे अशी त्याची इच्छा होती.
勒哈貝罕遂將瑪阿加的兒子阿彼雅立為儲君,為眾兄弟之長,有意立他為王。
23 २३ रहबामाने मोठ्या चतुराईने आपल्या सर्व पुत्रांना यहूदा आणि बन्यामीन येथील भक्कम तटबंदी असलेल्या नगरांमध्ये विखरून ठेवले. त्यांना उत्तम रसद पुरवली. त्यांची लग्ने लावून दिली.
勒哈貝罕作事聰明,將他所有的兒子分派在猶大和本雅明全境所有設防的城內,供給他們豐富食糧,並給他們娶了許多妻妾。

< 2 इतिहास 11 >