< 2 इतिहास 10 >

1 रहबाम शखेम येथे गेला कारण त्यास राजा करण्यासाठी सर्व इस्राएल लोक तेथे गेले होते.
[南北分裂]勒哈貝罕去了舍根,因為全以色列人集合在舍根,要立他為王。
2 यावेळी यराबाम मिसरमध्ये होता कारण त्याने राजा शलमोनापुढून पळ काढला होता. यराबाम हा नबाटाचा पुत्र. रहबाम राजा होणार हे त्याने ऐकले म्हणून तो मिसरहून आला.
乃巴特的兒子雅絡貝罕,─為躲避撒羅滿王,曾逃往埃及,─一聽見這事,便從埃及回來,
3 तेव्हा इस्राएल लोकांनी यराबामालाही आपल्याबरोबर येण्यास सांगितले. अशा तऱ्हेने यराबाम आणि सर्व इस्राएल लोक रहबामाकडे आले. त्यास ते म्हणाले, “रहबामा,
有人派人去請了他來,他便和全以色列人前來對勒哈貝罕說:
4 तुमच्या पित्याने आमचे जू फार भारी केले होते तर आता आपल्या पित्याने लादलेली कठीण सेवा व आम्हावरील भारी जू आता हलके करा म्हणजे आम्ही तुमच्या आज्ञेत राहू.”
「你的父親使我們的負擔繁重,現在請你減輕你父親加給我們的苦役喊重軛,我們縩肯服事你! 」
5 यावर रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही तीन दिवसानी परत या.” तेव्हा लोक निघून गेले.
他回答他們說:「三天以後,你們再來見我。」人民都走了。
6 राजा रहबामाने मग आपला पिता शलमोनाच्या पदरी असणाऱ्या वडीलधाऱ्या मंडळीशी चर्चा केली. रहबाम त्यांना म्हणाला, “मी या लोकांस काय उत्तर द्यावे? याबाबतीत मला तुमचा सल्ला हवा आहे.”
勒哈貝罕王同那些在他父親撒羅滿生時作臣僕的老年人商議,問他們說:「你們有什麼主意,叫我好答覆這些人民﹖」
7 तेव्हा ती वयोवृध्द मंडळी रहबामाला म्हणाली, “तू या लोकांशी प्रेमाने वागलास, त्यांना संतुष्ट केलेस आणि त्यांच्याशी गोड बोललास तर ते चिरकाल तुझी सेवा करतील.”
他們回答說:「如果你今日善待這些百姓,使他們心悅,向他們說好話,他們必會常常服事你。」
8 पण रहबामाने त्यांचा हा सल्ला मानला नाही तो मग आपल्या पदरी असलेल्या आणि आपल्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या तरुण मंडळीशी बोलला.
但是,君王竟拒絕老年人給他出的主意,反去同那些與他一同長大,侍立在他面前的少年人商議,
9 रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही मला काय सल्ला द्याल? आपण लोकांस काय सांगावे? त्यांना आपले ओझे हलके करून हवे आहे. माझ्या पित्यानी त्यांच्या मानेवर ठेवलेले जू आता त्यांना मी हलके करायला हवे आहे.”
問他們說:「這些人民對我說:請你將你父親給我們加給我們的負擔減輕些。你們有什麼主意,好使我答覆他們﹖」
10 १० तेव्हा त्याच्या पिढीची ती युवा मंडळी रहबामाला म्हणाली, “तुमच्याकडे आलेल्या लोकांस तुम्ही असे सांगावे. लोक तुम्हास म्हणाले की, मानेवर जू ठेवल्याप्रमाणे तुमच्या वडिलांनी आम्हास कठोर जिणे जगायला लावले. तुम्ही आता ते हलके करावे असे आम्हास वाटते पण रहबाम, तुम्ही त्यांना असे सांगावे, माझी करंगळी माझ्या पित्याच्या कमरेपेक्षा जाड असेल.
那些與他一同長大的少年人答說:「這些百姓曾對你說:你父親曾加重我們的負擔,請你給我們減輕些。你要這樣回答他們,這樣對他們說:我的小指比我父親的腰還粗;
11 ११ माझ्या पित्याने तुमच्यावर फार ओझे लादले ना! मी तर ते अधिकच भारी करणार आहे; माझ्या पित्याने तुम्हास चाबकांचे फटकारे मारले, मी तर तुम्हास विंचवांनी शासन करीन.”
我父親曾加給你你們重擔,我更要加重你們的負擔;我父親用鞭子責打你們,我卻要用鐵刺鞭責打你們。」
12 १२ “यराबाम आणि सर्व लोक तीन दिवसानी रहबामाकडे आले.” राजा रहबामाने त्यांना तसेच सांगितले होते.
雅洛貝罕和全人民照君王所說「你們第三天再來見我」的話,第三天來見勒哈貝罕王。
13 १३ रहबाम त्यांच्याशी यावेळी उद्धटपणे बोलला. मोठ्यांचा सल्ला त्याने मानला नाही.
嚴厲答覆了人民;勒哈貝罕王拋棄了老年人的意見,
14 १४ तरुणांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला तो लोकांस म्हणाला, “माझ्या पित्याने तुमच्यावर फार ओझे लादले ते मी अधिकच भारी करीन. त्यांनी तुम्हास चाबकाने शासन केले असेल पण मी तर तुम्हास विंचवांनी शासन करीन.”
依照少年人的主張答覆人民說:「我的父親加重了你們的負擔,我更要加重;我父親用鞭子責打你們,我要用鐵刺鞭責打你們。」
15 १५ राजा रहबामाने लोकांचे ऐकून घेतले नाही. तो असे बोलला कारण हा बदल परमेश्वरानेच घडवून आणला होता. अहीया मार्फत परमेश्वर यराबामाशी जे बोलला होता ते प्रत्यक्षात यावे म्हणूनच त्याने अशी वेळ येऊ दिली. अहीया हा शिलोनी लोकांपैकी होता आणि यराबाम नबाटाचा पुत्र होता.
君王始終不肯聽從人民;這種轉變原是出於天主,為實現上主藉史羅人阿希雅論及乃巴特的兒子雅洛貝罕所說的話。
16 १६ राजा रहबामाने आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले हे इस्राएल लोकांच्या लक्षात आले. ते राजाला म्हणाले, “आम्ही काय दावीदाच्या घराण्यातले आहोत का? मुळीच नाही! इशायचा पुत्र आमचा वतन भाग आहे का? नाही! तेव्हा इस्राएल लोकांनो, आपण आपले आपापल्या घरी जाऊ या दावीदाच्या पुत्राला आपल्या घरच्यांवरच राज्य करु द्या.” सर्व इस्राएल लोक मग घरोघर गेले.
全以色列人見王不肯依從他們,便回覆君王說:「我們與達味有什麼分子﹖我們與葉瑟的兒子毫無關係! 以色列! 回到你的帳幕去! 達味現在你只顧你本家罷! 」於是全以色列人都回了自己的帳幕,
17 १७ पण यहूदाच्या नगरांमध्ये राहणारे काही इस्राएल लोक होते. रहबाम त्यांच्यावर राज्य करत राहिला.
只那些住在猶大城內的以色列子民,歸勒哈貝罕統治。
18 १८ हदोराम हा वेठबिगारांवरचा मुकादम होता. रहबामाने त्यास इस्राएल लोकांकडे पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर दगडफेक करून त्यास मरेपर्यंत मारले. इकडे रहबामाने रथाचा आश्रय घेतला आणि त्वरेने पळ काढला. तो यरूशलेमेला पळून गेला.
勒哈貝罕王派遣監管勞役的阿多蘭去見以色列,以色列子民卻用石頭將他砸死;勒哈貝罕王急忙上車,逃回了耶路撒冷。
19 १९ तेव्हापासून आजतागायत इस्राएलाचे दावीदाच्या घराण्याशी बंड केले आहे.
這樣,以色列叛離達味王朝,直到現在。

< 2 इतिहास 10 >