< १ तीम. 1 >
1 १ देव आपला तारणारा आणि ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून:
अस्माकं त्राणकर्त्तुरीश्वरस्यास्माकं प्रत्याशाभूमेः प्रभो र्यीशुख्रीष्टस्य चाज्ञानुसारतो यीशुख्रीष्टस्य प्रेरितः पौलः स्वकीयं सत्यं धर्म्मपुत्रं तीमथियं प्रति पत्रं लिखति।
2 २ विश्वासातील माझे खरे मूल तीमथ्य यास आपला देव जो पिता आणि आपला ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्याकडून कृपा, दया आणि शांती असो.
अस्माकं तात ईश्वरोऽस्माकं प्रभु र्यीशुख्रीष्टश्च त्वयि अनुग्रहं दयां शान्तिञ्च कुर्य्यास्तां।
3 ३ मासेदोनियास जातांना जशी मी तुला कळकळीने विनंती केली होती तशी आताही करतो की, तू इफिसात रहावे, जेणेकरून तू कित्येकास निक्षून सांगावे की, त्यांनी अन्य शिकवण शिकवू नये.
माकिदनियादेशे मम गमनकाले त्वम् इफिषनगरे तिष्ठन् इतरशिक्षा न ग्रहीतव्या, अनन्तेषूपाख्यानेषु वंशावलिषु च युष्माभि र्मनो न निवेशितव्यम्
4 ४ आणि जी दैवी व्यवस्था विश्वासाच्याद्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणाऱ्या पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका. तेच मी आतांही सांगतो.
इति कांश्चित् लोकान् यद् उपदिशेरेतत् मयादिष्टोऽभवः, यतः सर्व्वैरेतै र्विश्वासयुक्तेश्वरीयनिष्ठा न जायते किन्तु विवादो जायते।
5 ५ आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीती आहे, जी शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून व निष्कपट विश्वासातील असावी.
उपदेशस्य त्वभिप्रेतं फलं निर्म्मलान्तःकरणेन सत्संवेदेन निष्कपटविश्वासेन च युक्तं प्रेम।
6 ६ या गोष्टी सोडून कित्येकजण व्यर्थ बोलण्याकडे वळले आहेत.
केचित् जनाश्च सर्व्वाण्येतानि विहाय निरर्थककथानाम् अनुगमनेन विपथगामिनोऽभवन्,
7 ७ त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक व्हायचे होते पण ते ज्या गोष्टीविषयी मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात व सांगतात त्या त्यांनाच कळत नाहीत.
यद् भाषन्ते यच्च निश्चिन्वन्ति तन्न बुध्यमाना व्यवस्थोपदेष्टारो भवितुम् इच्छन्ति।
8 ८ परंतु आम्हास हे माहीत आहे की, कोणी नियमशास्त्राचा खरोखरच यथार्थ उपयोग केल्यास ते चांगले आहे.
सा व्यवस्था यदि योग्यरूपेण गृह्यते तर्ह्युत्तमा भवतीति वयं जानीमः।
9 ९ आणि आपल्याला हे ठाऊकच आहे की, नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर आज्ञाभंग करणाऱ्या आणि विद्रोही, पापी, भक्तिहीन, अधर्मी, अशुद्ध, वडिलांना ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यघातक
अपरं सा व्यवस्था धार्म्मिकस्य विरुद्धा न भवति किन्त्वधार्म्मिको ऽवाध्यो दुष्टः पापिष्ठो ऽपवित्रो ऽशुचिः पितृहन्ता मातृहन्ता नरहन्ता
10 १० जारकर्मी, समलैंगीक, मनुष्यांचा व्यापार करणारे, खोटारडे, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी आहे आणि शुद्ध शिकवणीविरुद्ध जर काही दुसरे असेल तर त्यासाठीही आहे.
वेश्यागामी पुंमैथुनी मनुष्यविक्रेता मिथ्यावादी मिथ्याशपथकारी च सर्व्वेषामेतेषां विरुद्धा,
11 ११ गौरवी सुवार्ता जी धन्यवादित देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपवली आहे, तिला हे अनुसरून आहे.
तथा सच्चिदानन्देश्वरस्य यो विभवयुक्तः सुसंवादो मयि समर्पितस्तदनुयायिहितोपदेशस्य विपरीतं यत् किञ्चिद् भवति तद्विरुद्धा सा व्यवस्थेति तद्ग्राहिणा ज्ञातव्यं।
12 १२ ज्याने मला शक्ती दिली त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभूचे मी उपकार मानतो कारण त्याने मला विश्वासू मानून सेवेत ठेवले आहे.
मह्यं शक्तिदाता योऽस्माकं प्रभुः ख्रीष्टयीशुस्तमहं धन्यं वदामि।
13 १३ जरी मी पूर्वी देवनिंदा करणारा, छळणारा आणि हिंसक होतो पण मी ते अजाणता व अविश्वासाने केले म्हणून माझ्यावर दया झाली.
यतः पुरा निन्दक उपद्रावी हिंसकश्च भूत्वाप्यहं तेन विश्वास्यो ऽमन्ये परिचारकत्वे न्ययुज्ये च। तद् अविश्वासाचरणम् अज्ञानेन मया कृतमिति हेतोरहं तेनानुकम्पितोऽभवं।
14 १४ परंतु विश्वास आणि प्रीती जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभूच्या कृपेने ओसंडून वाहिली.
अपरं ख्रीष्टे यीशौ विश्वासप्रेमभ्यां सहितोऽस्मत्प्रभोरनुग्रहो ऽतीव प्रचुरोऽभत्।
15 १५ ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे की, ख्रिस्त येशू पापी लोकांस तारावयला जगात आला आणि त्या पापी लोकांपैकी मी मुख्य पापी आहे.
पापिनः परित्रातुं ख्रीष्टो यीशु र्जगति समवतीर्णोऽभवत्, एषा कथा विश्वासनीया सर्व्वै ग्रहणीया च।
16 १६ परंतु केवळ याच हेतूने माझ्यावर दया दाखविण्यात आली की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्यावर ख्रिस्त येशूने सहनशीलता दाखवली त्या उदाहरणावरून, पुढील काळात जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना सर्वकाळचे जीवन मिळावे. (aiōnios )
तेषां पापिनां मध्येऽहं प्रथम आसं किन्तु ये मानवा अनन्तजीवनप्राप्त्यर्थं तस्मिन् विश्वसिष्यन्ति तेषां दृष्टान्ते मयि प्रथमे यीशुना ख्रीष्टेन स्वकीया कृत्स्ना चिरसहिष्णुता यत् प्रकाश्यते तदर्थमेवाहम् अनुकम्पां प्राप्तवान्। (aiōnios )
17 १७ आता सर्वकाळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला सन्मान आणि गौरव सदासर्वकाळासाठी असो. आमेन. (aiōn )
अनादिरक्षयोऽदृश्यो राजा योऽद्वितीयः सर्व्वज्ञ ईश्वरस्तस्य गौरवं महिमा चानन्तकालं यावद् भूयात्। आमेन्। (aiōn )
18 १८ तीमथ्या, माझ्या मुला, मी तुला तुझ्याविषयी पूर्वीच सांगण्यात आलेल्या संदेशानुसार ही आज्ञा सोपवत आहे. यासाठी की तू त्यांच्याद्वारे चांगली लढाई करावी.
हे पुत्र तीमथिय त्वयि यानि भविष्यद्वाक्यानि पुरा कथितानि तदनुसाराद् अहम् एनमादेशं त्वयि समर्पयामि, तस्याभिप्रायोऽयं यत्त्वं तै र्वाक्यैरुत्तमयुद्धं करोषि
19 १९ आणि विश्वास व चांगला विवेकभाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरुपी तारू फुटले.
विश्वासं सत्संवेदञ्च धारयसि च। अनयोः परित्यागात् केषाञ्चिद् विश्वासतरी भग्नाभवत्।
20 २० त्यामध्ये हूमनाय आणि आलेक्सांद्र आहेत त्यांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे यासाठी की, निंदा न करण्यास शिकावे.
हुमिनायसिकन्दरौ तेषां यौ द्वौ जनौ, तौ यद् धर्म्मनिन्दां पुन र्न कर्त्तुं शिक्षेते तदर्थं मया शयतानस्य करे समर्पितौ।