< १ तीम. 6 >
1 १ जे सर्व दास म्हणून जुवाखाली आहेत तितक्यानी आपापल्या मालकास सर्व सन्मानास योग्य मानावे यासाठी की देवाचे नाव आणि शिकवण यांची निंदा होऊ नये.
Visiem, kas ir kalpi apakš jūga, tiem būs savus kungus visā godā turēt, lai Dieva vārdu un mācību nezaimo.
2 २ आणि ज्यांचे मालक विश्वास ठेवणारे आहेत त्यांना ते बंधू आहेत म्हणून त्यांचा अपमान करू नये तर अधिक आदराने दास्य करावे कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत या गोष्टी शिकवून बोध कर.
Bet tiem, kam ir ticīgi kungi, nebūs viņus nicināt, tāpēc ka šie ir brāļi, bet jo vairāk kalpot, tāpēc ka šie, kas šo labumu dabū, ir ticīgi un mīlēti; to māci un pavēli.
3 ३ जर कोणी काही वेगळे शिकवितो व ख्रिस्त येशू आपला प्रभू याची जी सुवचने आणि देवाच्या सेवेचे शुद्ध शिक्षण मान्य करीत नाही
Ja kas citu mācību māca un nenāk pie mūsu Kunga Jēzus Kristus veselīgiem vārdiem un pie dievbijāšanas mācības,
4 ४ तर तो गर्वाने फुगलेला आहे व त्यास काही समजत नाही. त्याऐवजी तो भांडणे व शब्दकलह यांनी वेडापिसा झालेला आहे. या गोष्टींपासून हेवा, भांडण, निंदा, दुष्ट तर्क ही होतात.
Tas ir uzpūsts un nezin nenieka, bet vārgst iekš jautāšanām un vārdu ķildām, no kā ceļas skaudība, bāršanās, zaimošanas, ļaunas domas,
5 ५ मन बिघडलेल्या व खरेपण विरहित झालेल्या भक्ती ही कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या मनुष्यांची सतत भांडणे होतात, त्यांच्यापासून दूर राहा.
Nelietīgas apjautāšanas tādiem, kam prāti sajaukti, kam patiesība zudusi, kam šķiet, dievbijāšanu esam mantas pelnīšanu: - atkāpies no tādiem!
6 ६ वास्तविक पाहता संतोषाने देवाची सेवा करीत असताना मिळणारे समाधान हा फार मोठा लाभ आहे.
Bet tā ir liela mantošana, ja kas ir dievbijīgs un pieticīgs.
7 ७ कारण आपण जगात काहीही आणले नाही आणि आपल्याच्याने या जगातून काहीही बाहेर घेऊन जाता येत नाही.
Jo mēs nenieka neesam ienesuši pasaulē, tad ir zināms, ka mēs arī nenieka nevaram iznest.
8 ८ जर आपणास अन्न, वस्त्र असल्यास तेवढ्याने आपण संतुष्ट असावे.
Bet kad mums sava barība un apģērbs, tad lai mums pietiek.
9 ९ पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते परीक्षेत आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक अभिलाषांच्या आहारी जाऊन नाश पावतात.
Bet kas grib bagāts tapt, tie krīt kārdināšanā un valgā un daudz bezprātīgās un nelabās kārībās, kas cilvēkus gāž samaitāšanā un pazušanā.
10 १० कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. काही लोक त्याची हाव धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेत त्यामुळे त्यांनी स्वतःलाच पुष्कळ दुःख करून घेतले आहे.
Jo naudas kārība ir visa ļaunuma sakne; pēc tās dzīdamies daži ir nomaldījušies no ticības un paši ar daudz sāpēm sadūrušies.
11 ११ हे देवाच्या मनुष्या, तू या गोष्टींपासून दूर राहा. न्यायीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग.
Bet tu, Dieva cilvēks, bēdz no šīm lietām; dzenies pēc taisnības, dievbijāšanas, ticības, mīlestības, pacietības, laipnības;
12 १२ विश्वासासंबंधी चांगले युद्ध कर, ज्यासाठी तुला बोलावले होते. त्या सार्वकालिक जीवनाला धरून ठेव. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस, (aiōnios )
Cīnies to labo ticības cīnīšanos, sagrāb to mūžīgo dzīvību, uz ko tu arīdzan esi aicināts un esi apliecinājis labu liecību daudz liecinieku priekšā. (aiōnios )
13 १३ जो सर्वांना जीवन देतो त्या देवासमोर आणि पंतय पिलातासमोर ज्याने चांगली साक्ष दिली त्या ख्रिस्त येशूसमोर मी तुला आज्ञा करतो.
Es tev pavēlu Dieva priekšā, kas visu dara dzīvu, un Jēzus Kristus priekšā, kas apakš Poncius Pilatus apliecinājis to labo liecību,
14 १४ आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत निष्कलंक आणि निर्दोष रहावे म्हणून ही आज्ञा पाळ.
Šo bausli turēt neaptraipītu, nenicinātu līdz mūsu Kunga Jēzus Kristus atspīdēšanai,
15 १५ जो धन्यवादीत, एकच सार्वभौम, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू,
Ko savā laikā parādīs tas svētais un vienīgi varenais, tas visu ķēniņu Ķēniņš un visu kungu Kungs,
16 १६ ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो ज्याला कोणा मनुष्याने पाहिले नाही आणि कोणाच्याने पाहवत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाली दाखवील, त्यास सन्मान व सार्वकालिक सामर्थ्य आहे. आमेन. (aiōnios )
Kam vien ir nemirstība, kas dzīvo nepieejamā gaišumā, ko neviens cilvēks nav redzējis, nedz var redzēt. Tam lai ir gods un mūžīga vara! Āmen. (aiōnios )
17 १७ या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवतो त्यावर आशा ठेवावी. (aiōn )
Tiem bagātiem šinī pasaulē pavēli, lai tie augsti neturas, nedz cerē uz to nepastāvīgo bagātību, bet uz To dzīvo Dievu, kas mums visas lietas bagātīgi pasniedz par atspirgšanu; (aiōn )
18 १८ चांगले ते करावे, चांगल्या कृत्यात धनवान, उदार व परोपकारी असावे.
Lai tie labu dara, bagāti top iekš labiem darbiem, labprāt izdala, ir devīgi,
19 १९ जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा.
Lai sev mantas krāj par labu pamatu uz nākamo laiku, ka tie dabū mūžīgo dzīvošanu.
20 २० तीमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे रक्षण कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित “विद्या” म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्परविरोधी मतांपासून दूर जा.
Ak Timotej, glabā to uzticēto mantu, atraudamies no tām nesvētām valodām un tukšām strīdu runām, kas ceļas no tās gudrības, ko par nepatiesu tā sauc;
21 २१ ती विद्या स्वीकारून कित्येक विश्वासापासून बहकून गेले आहेत देवाची कृपा तुम्हाबरोबर असो.
Pie kuras turēdamies daži nomaldījušies no ticības. Žēlastība lai ir ar tevi! Āmen.