< १ तीम. 5 >
1 १ वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्यास बोध कर.
Старого не докоряй, а умоляй, як батька, молодших, як братів,
2 २ तरुणांना भावासारखे, वृद्ध स्त्रियांना आईसारखे, तरुण स्त्रियांना बहिणीसारखे पूर्ण शुद्ध भावाने वागव.
старих жінок, як матїрок, молодших, як сестер, з усякою чистотою.
3 ३ ज्या विधवा खरोखरीच्या गरजवंत आहेत त्यांचा सन्मान कर.
Удовиць шануй, тих що справді удовицї.
4 ४ पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांशी धार्मिकतेने वागायला व आपल्या वडिलांचे उपकार फेडायला शिकावे कारण हे देवाच्या दृष्टीने चांगले आहे.
Коли ж котора вдовиця дїти або внучата має, нехай вчять ся перше свій дім благочестиво спорядити і віддячувати родителяя; се бо добре і любо перед Богом.
5 ५ तर जी खरोखरी विधवा आहे व तिची काळजी घेण्यासाठी कोणी नाही तिने देवावर आपली आशा ठेवली आहे व ती रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना व विनंत्या करीत राहते.
Тая ж справді вдовиця, котора одинока, (та) вповає на Бога і пробував в молитвах і благаннях день і ніч.
6 ६ पण जी विधवा चैनीत राहते, ती जिवंत असता मरण पावलेली आहे.
Котора ж роскошув, та жива - вмерла.
7 ७ त्यांनी निर्दोष व्हावे म्हणून त्यांना या गोष्टी आज्ञारूपाने लोकांस सांग
І се наказуй, щоб непорочні були.
8 ८ पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे व तो अविश्वासू मनुष्यापेक्षा वाईट आहे.
Коли ж хто про своїх, а найбільш про домашнїх не промишляв, той відцуравсь віри, і гірший од не вірного.
9 ९ जी विधवा साठ वर्षाच्या आत असून एकाच पतीची स्त्री झाली असेल.
Удовицю ж вибирати не меньше лїт шестидесяти; таку щоб була одному мужу жінкою,
10 १० जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांना वाढवले असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, पवित्रजनांचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यात स्वतःला वाहून घेतले असेल, अश्या विधवांचा यादीत समावेश करावा.
в ділах добрих сьвідчена, чи дітей вгодувала, чи людей сторонніх приймала, чи сьвятим ноги вмивала, чи бідолашним помагала, чи до всякого діла доброго щира була.
11 ११ पण तरुण विधवांची यादीत नोंद करण्याचे टाळावे कारण जेव्हा त्या ख्रिस्ताला सोडून अविचारी होतात, तेव्हा त्यांना पुन्हा लग्न करावेसे वाटते.
Молодих же вдовиць не приймай; бо, розбуявшись проти Христа, схочуть заміж;
12 १२ आणि त्या दोषी धरल्या जातील, कारण त्यांनी त्यांचा पहिला विश्वास टाकून दिला.
маючи осуд, що першої віри відцурались.
13 १३ आणखी त्या घरोघरी फिरून आळशी बनतात व एवढेच नाही तर वटवट्या व लुडबुड्या होऊन ज्या गोष्टी बोलू नयेत, त्या गोष्टी बोलतात.
Ще ж без дїла звикають ходити по домах; не тілько ж без дїла, та й довгоязикі і пронозливі, говорять, чого не годить ся.
14 १४ यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण विधवा स्त्रियांनी लग्न करावे. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या विरोधकाला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये.
Тим хочу, щоб молоді вдовицї йшли заміж, дїтей рожали, домом правили і нїякої причини не давали противному до поговору.
15 १५ मी तर असे म्हणतो कारण काही विधवा सैतानामागे जाण्यासाठी वळल्यादेखील आहेत.
Вже бо деякі звернули слїдом за сатаною.
16 १६ जर एखाद्या विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीच्या घरात विधवा असतील तर तिने त्यांची काळजी घ्यावी व मंडळीवर भार टाकू नये. यासाठी की ज्या विधवा खरोखरच गरजवंत आहेत त्यांना ते मदत करू शकतील.
Коли який вірний або вірна має вдовицї, нехай їм помагав, і нехай не, буде тягару для церкви, щоб правдивим удовицям помагати.
17 १७ जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना व वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या विशेष योग्यतेचे समजावे.
Которі ж пресвитери пильнують добре, нехай удостоять ся двійної чести, найбільше ж ті, що трудять ся в слові і науцї.
18 १८ कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे, “धान्याची मळणी करताना बैलाला मुसक्या बांधू नको” आणि “मजुराचा त्याच्या मजुरीवर हक्क आहे.”
Глаголе бо писаннє: Вола молотячого не заоброчуй; і: Достоїн робітник нагороди своєї.
19 १९ दोन किंवा तीन साक्षीदारांनी पाठिंबा दिल्याशिवाय सेवकावरील आरोप दाखल करू नकोस.
На пресвитера обвинувачення не приймай, хиба при двох або трьох сьвідках.
20 २० जे पाप करीत राहतात त्यांचा जाहीरपणे निषेध कर. यासाठी की, इतरांनाही भय वाटावे.
Которі ж згрішять, обличай перед усїма, щоб і инші страх мали.
21 २१ देव, येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी निक्षून आज्ञा करतो की, तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता या गोष्टी पाळ व पक्षपाताने काहीही करू नको.
Заклинаю перед Богом, і Господом Ісус-Христом, і вибраними ангелами, щоб се хоронив без пересуду, нічого не роблячи по привичцї (пристрастї).
22 २२ घाईने कोणावर हात ठेऊ नको आणि इतरांच्या पापांत वाटेकरी होऊ नको. नेहमी स्वतःला शुद्ध राख.
Рук скоро не клади нї на кого, анї приставай до чужих гріхів; себе чистим держи.
23 २३ ह्यापुढे पाणीच पीत राहू नको, तर आपल्या पोटासाठी, म्हणजे आपल्या वारंवार होणाऱ्या आजारामुळे, थोडासा द्राक्षरस घेत जा.
Вже не пий водв, а потроху вина приймай, ради жолудка твого і частих твоїх недугів.
24 २४ कित्येक मनुष्यांची पापे उघड असून ती अगोदर न्यायनिवाड्याकरता जातात आणि कित्येकांची मागून जातात.
В инших людей гріхи явні, попереджують на суд, а за иншими йдуть слїдом.
25 २५ त्याचप्रमाणे, चांगली कामेही स्पष्ट आहेत ती सुद्धा कायमची लपवता येत नाहीत.
Так само й добрі діла наперед явні, тай що инше, утаїтись не може.