< १ तीम. 4 >

1 देवाचा आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काहीजण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील,
But the Spirit saith explicitly, that in the latter times, some will depart from the faith; and will go after deceptive spirits, and after the doctrine of demons.
2 ज्या मनुष्यांची सद्सदविवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसवीणाऱ्यांकडे लक्ष देतील.
These will seduce, by a false appearance; and will utter a lie, and will be seared in their conscience;
3 ते लोकांस लग्न करण्यास मना करतील व जे अन्न विश्वास ठेवणाऱ्यांनी व खरेपण जाणणाऱ्यांनी उपकारस्तुती करून स्वीकारावी म्हणून देवाने अस्तित्वांत आणली ती वर्ज्य करावी असे सांगतील.
and will forbid to marry; and will require abstinence from meats, which God hath created for use and for thankfulness, by them who believe and know the truth.
4 तर देवाने अस्तित्वात आणलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकारस्तुती करून घेतले असता काहीही वर्ज्य नाही.
Because whatever is created by God is good; and there is nothing which should be rejected if it be received with thankfulness;
5 कारण प्रत्येक वेळी ती देवाच्या शब्दाने आणि प्रार्थनेने पवित्र केली जाते.
for it is sanctified by the word of God and by prayer.
6 जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधूना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.
If thou shalt inculcate these things on thy brethren, thou wilt be a good minister of Jesus the Messiah, being educated in the language of the faith, and in the good doctrine which thou hast been taught.
7 परंतु वृद्ध स्त्रियांच्या आवडत्या अमंगळपणाच्या कथांचा स्वीकार करू नकोस, तू स्वतःला देवाच्या सुभक्तीविषयी तयार कर.
But the silly tales of old women, shun thou; and occupy thyself with righteousness.
8 कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे.
For, exercising the body is profitable a little while; but righteousness is every way profitable and hath promise of the life of the present time and of that to come.
9 हे वचन विश्वसनीय आहे जे सर्वदा स्वीकारावयास योग्य आहे.
This is a faithful saying, and worthy of reception.
10 १० याकरिता आम्ही श्रम व खटपट करतो कारण जो सर्व लोकांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे.
For on this account, we toil and suffer reproach; because we trust in the living God, who is the life-giver of all men, especially of the believers.
11 ११ या गोष्टी आज्ञारूपाने सांग आणि शिकव.
These things teach thou, and inculcate.
12 १२ कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, (आत्म्यात) विश्वासात, शुद्धपणांत, विश्वास ठेवणाऱ्यांचा आदर्श हो.
And let no one despise thy youth; but be thou a pattern for the believers, in speech, and in behavior, and in love, and in faith, and in purity.
13 १३ मी येईपर्यंत वाचणे, बोध करणे व शिकवणे, याकडे लक्ष्य लाव.
Until I come, be diligent in reading, and in prayer, and in teaching.
14 १४ तुझ्यावर वडीलवर्ग हात ठेवण्याचा वेळेस संदेशाच्या द्वारे देण्यात आलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नको.
Despise not the gift that is in thee, which was given thee by prophecy, and by the laying on of the hand of the eldership.
15 १५ या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यामध्ये पूर्ण गढून जा. यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांस दिसून यावी.
On these things meditate; give thyself wholly to them: that it may be obvious to all that thou makest advances.
16 १६ आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे लक्ष दे. त्यामध्ये टिकून राहा कारण असे केल्याने तू स्वतःचे व जे तुझे ऐकतात, त्यांचे चुकीच्या शिक्षणापासून बचाव करशील.
Be attentive to thyself, and to thy teaching; and persevere in them. For in doing this, thou wilt procure life to thyself and to them who hear thee.

< १ तीम. 4 >