< १ तीम. 3 >
1 १ हे वचन विश्वसनीय आहेः जर कोणी अध्यक्ष सर्वांगीण काळजीवाहक होण्याची इच्छा धरतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो.
ยทิ กศฺจิทฺ อธฺยกฺษปทมฺ อากางฺกฺษเต ตรฺหิ ส อุตฺตมํ กรฺมฺม ลิปฺสต อิติ สตฺยํฯ
2 २ तर अध्यक्ष हा निर्दोष, एका पत्नीचा पती, मिताचारी, सावधान, मर्यादशील, पाहुणचार करणारा, शिकवण्यात निपुण, असा असावा.
อโต'ธฺยกฺเษณานินฺทิเตไนกสฺยา โยษิโต ภรฺตฺรา ปริมิตโภเคน สํยตมนสา สเภฺยนาติถิเสวเกน ศิกฺษเณ นิปุเณน
3 ३ तो मद्य पिणारा किंवा मारका (किंवा घाणेरड्या लाभाची आवड धरणारा) नसावा तर तो सौम्य, न भांडणारा, पैशाचा लोभ न धरणारा.
น มทฺยเปน น ปฺรหารเกณ กินฺตุ มฺฤทุภาเวน นิรฺวฺวิวาเทน นิโรฺลเภน
4 ४ आपल्या स्वतःच्या घरावर चांगल्या प्रकारचा अधिकार चालवणारा, पूर्ण गंभीरपणे आपल्या मुलांना स्वाधीन राखणारा असा तो असावा.
สฺวปริวาราณามฺ อุตฺตมศาสเกน ปูรฺณวินีตตฺวาทฺ วศฺยานำ สนฺตานานำ นิยนฺตฺรา จ ภวิตวฺยํฯ
5 ५ जर एखाद्याला स्वतःच्या कुटुंबाची देखभाल करता येत नसेल तर तो देवाच्या मंडळीची काळजी कशी घेईल?
ยต อาตฺมปริวารานฺ ศาสิตุํ โย น ศกฺโนติ เตเนศฺวรสฺย สมิเตสฺตตฺตฺวาวธารณํ กถํ การิษฺยเต?
6 ६ तो या कार्यात नवशिका नसावा म्हणजे तो गर्वाने फुगून सैतानाच्या दंडात पडू नये.
อปรํ ส ครฺวฺวิโต ภูตฺวา ยตฺ ศยตาน อิว ทณฺฑโยโคฺย น ภเวตฺ ตทรฺถํ เตน นวศิเษฺยณ น ภวิตวฺยํฯ
7 ७ त्याचे बाहेरच्या लोकांमध्ये चांगले नाव असावे. यासाठी की त्याच्यावर टीका होऊ नये व त्याने सैतानाच्या जाळ्यात सापडू नये.
ยจฺจ นินฺทายำ ศยตานสฺย ชาเล จ น ปเตตฺ ตทรฺถํ เตน พหิ: สฺถโลกานามปิ มเธฺย สุขฺยาติยุกฺเตน ภวิตวฺยํฯ
8 ८ त्याचप्रमाणे सेवकही प्रतिष्ठित असावेत, ते दुतोंडी किंवा मद्यपान करणारे नसावेत आणि अनीतिने पैसे मिळवून श्रीमंत होण्याची त्यांना आवड नसावी.
ตทฺวตฺ ปริจารไกรปิ วินีไต รฺทฺวิวิธวากฺยรหิไต รฺพหุมทฺยปาเน 'นาสกฺไต รฺนิโรฺลไภศฺจ ภวิตวฺยํ,
9 ९ देवाने जे आम्हास प्रकट केले आहे ते आमच्या विश्वासाचे सखोल सत्य त्यांनी शुद्ध विवेकाने धरून ठेवावे.
นิรฺมฺมลสํเวเทน จ วิศฺวาสสฺย นิคูฒวากฺยํ ธาติวฺยญฺจฯ
10 १० वडीलांप्रमाणे यांचीसुद्धा प्रथम परीक्षा व्हावी, मग निर्दोष ठरल्यास, त्यांनी सेवकपण करावे.
อเคฺร เตษำ ปรีกฺษา กฺริยตำ ตต: ปรมฺ อนินฺทิตา ภูตฺวา เต ปริจรฺยฺยำ กุรฺวฺวนฺตุฯ
11 ११ त्याचप्रमाणे, स्त्रियांनीही गंभीर असावे, त्या चहाडखोर नसाव्यात. तर सभ्य व प्रत्येक बाबतीत विश्वसनीय असाव्यात.
อปรํ โยษิทฺภิรปิ วินีตาภิรนปวาทิกาภิ: สตรฺกาภิ: สรฺวฺวตฺร วิศฺวาสฺยาภิศฺจ ภวิตวฺยํฯ
12 १२ प्रत्येक सेवक एका पत्नीचा पती असावा आणि त्यांनी त्यांच्या मुलांची व कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी.
ปริจารกา เอไกกโยษิโต ภรฺตฺตาโร ภเวยุ: , นิชสนฺตานานำ ปริชนานาญฺจ สุศาสนํ กุรฺยฺยุศฺจฯ
13 १३ कारण ज्यांनी सेवकपण चांगले केले, ते आपणास चांगली पदवी आणि ख्रिस्त येशूवरील विश्वासांत फार धैर्य मिळवतात.
ยต: สา ปริจรฺยฺยา ไย รฺภทฺรรูเปณ สาธฺยเต เต เศฺรษฺฐปทํ ปฺราปฺนุวนฺติ ขฺรีษฺเฏ ยีเศา วิศฺวาเสน มโหตฺสุกา ภวนฺติ จฯ
14 १४ मी तुझ्याकडे लवकरच येण्याची आशा धरून असलो तरी मी तुला या गोष्टी लिहिल्या आहे.
ตฺวำ ปฺรเตฺยตตฺปตฺรเลขนสมเย ศีฆฺรํ ตฺวตฺสมีปคมนสฺย ปฺรตฺยาศา มม วิทฺยเตฯ
15 १५ तरी मला उशीर लागल्यास, देवाचे घर म्हणजे जिवंत देवाची मंडळी जी सत्याचा खांब व पाया आहे, त्या देवाच्या घरात तुला कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.
ยทิ วา วิลมฺเพย ตรฺหีศฺวรสฺย คฺฤเห 'รฺถต: สตฺยธรฺมฺมสฺย สฺตมฺภภิตฺติมูลสฺวรูปายามฺ อมเรศฺวรสฺย สมิเตา ตฺวยา กีทฺฤศ อาจาร: กรฺตฺตวฺยสฺตตฺ ชฺญาตุํ ศกฺษฺยเตฯ
16 १६ सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे तो देहात प्रकट झाला, आत्म्याने तो नीतिमान ठरवला गेला, तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, राष्ट्रांमध्ये गाजवला गेला, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला.
อปรํ ยสฺย มหตฺตฺวํ สรฺวฺวสฺวีกฺฤตมฺ อีศฺวรภกฺเตสฺตตฺ นิคูฒวากฺยมิทมฺ อีศฺวโร มานวเทเห ปฺรกาศิต อาตฺมนา สปุณฺยีกฺฤโต ทูไต: สนฺทฺฤษฺฏ: สรฺวฺวชาตียานำ นิกเฏ โฆษิโต ชคโต วิศฺวาสปาตฺรีภูตเสฺตช: ปฺราปฺตเย สฺวรฺคํ นีตศฺเจติฯ