< १ तीम. 2 >
1 १ तर सर्वांत प्रथम मी हा बोध करतो की, मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभारप्रदर्शन सर्व लोकांसाठी कराव्या.
首先,我想鼓励你为每个人祈祷:请求上帝,代表他们提出要求,表示感谢。
2 २ आणि विशेषतः राजांकरता आणि जे मोठे अधिकारी आहेत त्या सर्वांकरीता प्रार्थना करा, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीत व गंभीरपणात शांतीचे व स्थिरपणाचे असे जीवन जगावे.
为君王和所有类型的领袖也这样祷告,让我们可以过上平静祥和的生活,时刻想着上帝,认真对待生活。
3 ३ कारण हे आपल्या तारणाऱ्या देवाच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे,
我们的救主上帝会认为这是好事情,可让他喜悦。
4 ४ त्याची इच्छा आहे की सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांनी खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोहचावे.
他希望所有人都得救,真正理解真理是什么。
5 ५ कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे.
因为只有一个上帝,在上帝和人类之间只有一个中间人,那就是降生为人的基督耶稣。
6 ६ त्याने सर्वांच्या खंडणीकरिता स्वतःला दिले. याविषयीची साक्ष योग्यवेळी देणे आहे.
他舍弃自己,以使我们都能被赢回,在恰当的时间显示证据。
7 ७ आणि या साक्षीचा प्रसार करण्यासाठी मला घोषणा करणारा आणि प्रेषित मी खरे सांगतो; खोटे सांगत नाही, असा परराष्ट्रीय लोकांमध्ये विश्वास आणि सत्याचा शिक्षक म्हणून नेमलेला आहे.
我受到指派分享这个讯息,成为信使,教授异族人,让他们相信上帝和真理。
8 ८ म्हणून माझी अशी इच्छा आहे की सर्व ठिकाणी पुरुषांनी राग व भांडण सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी.
我真正希望的是所有地方的男人都没有愤怒或争论,能够虔诚地向上帝祈祷。
9 ९ त्याचप्रमाणे, माझी अशी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वतःला केस गुंफणे, सोने किंवा मोती किंवा महाग कपडे यांनी नव्हे तर सभ्य वेशाने विनयाने व मर्यादेने सुशोभित करावे.
照样,女人应该端庄、适度、恰如其分地装扮,她们的美不应来自其发型、佩戴的黄金和珍珠珠宝或昂贵的服装,
10 १० तसेच देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांना जसे शोभते, तसे स्वतःला चांगल्या कृत्यांनी सुशोभित करावे.
却要以善行为美,这才是愿意追随上帝的女性恰当的行为。
11 ११ स्त्रीने शांतपणे व पूर्ण अधीनतेने शिकावे.
女人应该学会保持安静,尊重她们所在的地位。
12 १२ मी स्त्रीला शिकविण्याची परवानगी देत नाही किंवा पुरुषावर अधिकार गाजवण्यास परवानगी देत नाही. त्याऐवजी तिने शांत रहावे.
我不允许女人成为引导者,或去控制男人;她们应该保持安静。
13 १३ कारण प्रथम आदाम निर्माण करण्यात आला त्यानंतर हव्वा.
因为先造了亚当,后造的夏娃;
14 १४ आणि आदाम फसवला गेला नाही तर स्त्री फसवली गेली आणि ती पापात पडली.
并非亚当受到欺骗,而是夏娃被彻底欺骗,在罪中堕落。
15 १५ तथापि मुलांना जन्म देण्याच्या वेळेस तिचे रक्षण होईल, ती मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रपण यांमध्ये राहिल्यास हे होईल.
但女人仍然可以通过做母亲而获得救赎,只要他们始终保持信心、爱心、遵循圣洁而庄重的生活。。