< १ थेस्स. 5 >
1 १ बंधूनो, काळ व समय ह्यांविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही.
To,’yan’uwa, game da lokuta da ranaku, ba ma bukata mu rubuta muku,
2 २ कारण तुम्हा स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो.
gama kun sani sarai cewa ranar Ubangiji za tă zo kamar ɓarawo da dare.
3 ३ “शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अचानक वेदना सुरु होतात त्याप्रमाणे त्यांचा अचानक नाश होईल आणि ते निभावणारच नाहीत.
Yayinda mutane suke cewa, “Akwai salama da zaman lafiya,” hallaka za tă auko musu farat ɗaya, kamar yadda naƙuda take kama mace mai ciki, ba za su kuwa tsira ba.
4 ४ बंधुनो, त्या दिवसाने चोरासारखा तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही.
Amma ku,’yan’uwa, ba kwa cikin duhu da wannan rana za tă zo muku ba zato kamar ɓarawo.
5 ५ कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात; आपण रात्रीचे व अंधाराचे नाही.
Dukanku’ya’yan haske ne da kuma’ya’yan rana. Mu ba mutanen dare ko na duhu ba ne.
6 ६ ह्यावरून आपण इतरांप्रमाणे झोप घेवू नये, तर जागे व सावध रहावे.
Saboda haka fa, kada mu zama kamar saura, waɗanda suke barci, sai dai mu zama masu tsaro da masu kamunkai.
7 ७ झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात.
Gama masu barci, da dad dare suke barci, masu sha su bugu kuwa, da dad dare suke buguwa.
8 ८ परत जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्राण घालावे.
Amma da yake mu na rana ne, bari mu zama masu kamunkai, sanye da bangaskiya da ƙauna kamar sulke, begen cetonmu kuma kamar hular kwano.
9 ९ कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे.
Gama Allah bai naɗa mu don mu sha fushi ba, sai dai mu sami ceto ta wurin Ubangijinmu Yesu Kiristi.
10 १० प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी याकरिता मरण पावला की, आपण जरी मागे राहिलो किंवा मरण पावलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत रहावे.
Ya mutu saboda mu domin, ko muna a faɗake ko muna barci, mu kasance tare da shi.
11 ११ म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उभारणी करा; हे तुम्ही करतही आहात.
Saboda haka ku ƙarfafa juna ku kuma gina juna, kamar dai yadda kuke yi.
12 १२ आणि बंधूंनो, आम्ही तुम्हास विनंती करतो की, जे तुमच्यांत परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमच्यांवर आहेत आणि तुम्हास बोध करतात त्यांच्याकडे लक्ष द्या;
To, muna roƙonku,’yan’uwa, ku girmama waɗanda suke aiki sosai a cikinku, waɗanda suke bisanku cikin Ubangiji da kuma waɗanda suke yin muku gargaɗi.
13 १३ आणि त्यांना त्यांच्या कामावरून प्रीतीने फार थोर माना आणि एकमेकांशी शांतीने रहा.
Ku riƙe su da mutunci sosai cikin ƙauna saboda aikinsu. Ku yi zaman lafiya da juna.
14 १४ आता बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, जे अव्यवस्थीत आहेत त्यांना तुम्ही इशारा द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्त आहेत त्यांना आधार द्या; सर्वांबरोबर सहनशील असा.
Muna kuma gargaɗe ku,’yan’uwa, ku gargaɗe waɗanda suke zaman banza, ku ƙarfafa masu raunanar zuciya, ku taimaki marasa ƙarfi, ku yi haƙuri da kowa.
15 १५ आणि तुम्ही हे पाहा की, कोणी कोणाला वाईटाबद्दल वाईट असे भरून देऊ नये; पण तुमच्यात एकमेकांसाठी व सर्वसाठी जे चांगले आहे त्याच्या सतत मागे लागा.
Ku tabbata cewa kada kowa yă rama mugunta da mugunta, sai dai kullum ku yi ƙoƙarin yin wa juna alheri da kuma dukan mutane.
Ku riƙa farin ciki kullum;
17 १७ नित्य प्रार्थना करा.
ku ci gaba da yin addu’a;
18 १८ प्रत्येक गोष्टींत उपकार माना कारण तुमच्यासंबधी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.
ku yi godiya cikin kowane hali, gama wannan shi ne nufin Allah dominku cikin Kiristi Yesu.
19 १९ पवित्र आत्म्याला विझवू नका.
Kada ku danne aikin Ruhu.
20 २० संदेशाचा उपहास करू नका.
Kada ku rena annabci,
21 २१ सर्व गोष्टींची पारख करा. जे चांगले आहे ते मजबूत धरा.
amma ku gwada kome, ku riƙe abin da yake mai kyau,
22 २२ वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर रहा.
ku ƙi kowace mugunta.
23 २३ आणि स्वतः शांतीचा देव तुम्हास पूर्ण पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, जीव आणि शरीर पूर्ण निर्दोष राहो.
Bari Allah da kansa, Allah na salama, yă tsarkake ku sarai. Bari dukan ruhunku, ranku, da kuma jikinku su zama marar aibi a dawowar Ubangijinmu Yesu Kiristi.
24 २४ तुम्हास जो बोलवत आहे तो विश्वासू आहे; तो हे करीलच.
Wannan wanda ya kira ku mai aminci ne zai kuwa aikata.
25 २५ बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.
’Yan’uwa, ku yi mana addu’a.
26 २६ सर्व बंधूंना पवित्र प्रीतीने नमस्कार सांगा.
Ku gaggai da dukan’yan’uwa da sumba mai tsarki.
27 २७ मी तुम्हास प्रभूची आज्ञा म्हणून सांगतो की, हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखवा.
Na gama ku da Ubangiji ku sa a karanta wannan wasiƙa ga dukan’yan’uwa.
28 २८ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.
Alherin Ubangijinmu Yesu Kiristi yă kasance tare da ku.