< १ थेस्स. 4 >
1 १ बंधूनो, शेवटी आम्ही तुम्हास विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की, कोणत्या वागणूकीने देवाला संतोषवावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहा, त्यामध्ये तुमची अधिकाधिक वाढ व्हावी.
Tad nu vēl, brāļi, jūs lūdzam un paskubinājam iekš Tā Kunga Jēzus, kā jūs no mums jau esat dzirdējuši, kā jums būs staigāt Dievam par patikšanu, lai jūs jo dienas jo vairāk pieņematies.
2 २ कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हास दिल्या त्या तुम्हास ठाऊक आहेत.
Jo jūs zināt, kādas pavēles mēs jums esam devuši caur To Kungu Jēzu.
3 ३ कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून दूर रहावे
Jo šis ir Dieva prāts, ka jūs topat svēti, ka jums būs atrauties no maucības,
4 ४ आणि तुमच्यातील प्रत्येकाला समजावे की, ज्याने त्याने आपल्या देहाला पवित्रतेने व आदरबुद्धीने आपल्या स्वाधीन कसे करून घ्यावे.
Ka ikvienam būs zināt, sev draugu mantot iekš svētīšanas un goda,
5 ५ देवाला न ओळखऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे वासनेच्या लोभाने करू नये.
Ne kārības sērgā, kā arī tie pagāni, kas Dievu nepazīst;
6 ६ कोणी या गोष्टींचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये कारण प्रभू या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे; हे आम्ही तुम्हास आधीच सांगितले होते व बजावलेही होते.
Ka neviens savam brālim pāri nedara, nedz mantas dēļ to piekrāpj kādā darīšanā, jo Tas Kungs ir atriebējs par visu to, tā kā mēs jums arī jau esam sacījuši un apliecinājuši.
7 ७ कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रेतेसाठी पाचारण केले आहे.
Jo Dievs mūs nav aicinājis uz nešķīstību, bet ka topam svēti.
8 ८ म्हणून जो कोणी नाकार करतो तो मनुष्याचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव याचा नाकार करतो.
Tad nu, kas ir nicinātājs, tas nenicina kādu cilvēku, bet Dievu, kas arī Savu Svēto Garu jums ir devis.
9 ९ बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हास लिहावे याची तुम्हास गरज नाही; कारण एकमेकांवर प्रीती करावी, असे तुम्हास देवानेच शिकविले आहे;
Bet jums nevajag, ka es par to brāļu mīlestību rakstu; jo jūs paši esat Dieva mācīti, cits citu mīlēt,
10 १० आणि अखिल मासेदोनियांतील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करीतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, ती अधिकाधिक करावी.
Un jūs to arī darāt visiem brāļiem, kas ir pa visu Maķedoniju; bet mēs jūs paskubinājam, brāļi, jo dienas jo vairāk pieņemties
11 ११ आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे शांतीने राहा. आपआपला व्यवसाय करणे आणि आपल्या हातांनी काम करणे याची आवड तुम्हास असावी.
Un turēt par godu, klusi dzīvot un savus darbus darīt un savām rokām strādāt, tā kā mēs jums esam pavēlējuši;
12 १२ बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये.
Ka jūs godīgi staigājat priekš tiem, kas ir ārā, un ka jums cita nevajag.
13 १३ पण बंधूंनो, मी इच्छीत नाही की, जे मरण पावलेत त्यांच्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे, म्हणजे ज्यांना आशा नाही अशा इतरांप्रमाणे तुम्ही दुःख करू नये.
Bet, brāļi, es jums negribu slēpt par tiem, kas ir aizmiguši, ka jūs nenoskumstat tā kā tie citi, kam nav cerības.
14 १४ कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपण विश्वास ठेवतो, तर येशूमध्ये जे मरतात त्यांनाही देव त्याच्याबरोबर आणील.
Jo ja mēs ticam, ka Jēzus ir miris un augšāmcēlies, tāpat arī Dievs tos aizmigušos caur Jēzu atvedīs līdz ar Viņu.
15 १५ कारण प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हास हे सांगतो की, आपण जे जिवंत आहोत व जे प्रभूच्या येण्यापर्यंत मागे राहू, ते आपण तोपर्यंत मरण पावलेल्यांच्या पुढे जाणार नाही.
Jo to mēs jums sakām caur Tā Kunga vārdu, ka mēs, kas dzīvojam un atliekam uz Tā Kunga atnākšanu, tiem aizmigušiem nenāksim priekšā.
16 १६ कारण आज्ञा करणाऱ्या गर्जणेने, आद्यदेवदूतांची वाणी आणि देवाच्या कर्ण्याचा आवाज येईल, तेव्हा प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तात मरण पावलेले प्रथम उठतील.
Jo pats Tas Kungs nāks zemē no debesīm ar kliegšanu, ar liela eņģeļa balsi un ar Dieva bazūni, un tie iekš Kristus mirušie uzcelsies papriekš,
17 १७ मग आपण जे जिवंत आहोत व मागे राहू, ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी ढगात उचलले जाऊ आणि सर्वकाळ प्रभूबरोबर राहू.
Pēc tam mēs, kas dzīvojam un esam atlikuši, tapsim aizrauti līdz ar tiem iekš padebešiem Tam Kungam pretī gaisā; un tā mēs būsim arvien pie Tā Kunga.
18 १८ म्हणून तुम्ही या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.
Tad nu iepriecinājaties savā starpā ar šiem vārdiem.