< १ थेस्स. 1 >

1 देवपिता व प्रभू येशू ख्रिस्ता याच्यात असलेली थेस्सलनीका शहरातील मंडळी हिला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती असो.
パウロ、シルワノ、テモテ、書を父なる神および主イエス・キリストにあるテサロニケ人の教會に贈る。願はくは恩惠と平安と汝らに在らんことを。
2 आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकारस्तुती करतो.
われら祈のときに汝らを憶えて、常に汝ら衆人のために神に感謝す。
3 आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेली सहनशीलता ह्यांची आम्ही निरंतर आठवण करतो.
これ汝らが信仰のはたらき、愛の勞苦、主イエス・キリストに對する望の忍耐を、我らの父なる神の前に絶えず念ふに因りてなり。
4 बंधूंनो, तुम्ही देवाचे प्रिय आहात, तुमची झालेली निवड आम्हास ठाऊक आहेच;
神に愛せらるる兄弟よ、また汝らの選ばれたることを知るに因りてなり。
5 कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने तुम्हास कळविण्यात आली तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हास ठाऊक आहे.
それ我らの福音の汝らに至りしは、言にのみ由らず、能力と聖 靈と大なる確信とに由れり。且われらが汝らの中にありて汝らの爲に如何なる行爲をなししかは、汝らの知る所なり。
6 तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन अंगीकारुन आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला;
かくて汝らは大なる患難のうちにも、聖 靈による喜悦をもて御言をうけ、我ら及び主に效ふ者となり、
7 अशाने मासेदोनिया व अखया ह्यांतील सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना तुम्ही उदाहरण असे झाला आहात.
而してマケドニヤ及びアカヤに在る凡ての信者の模範となれり。
8 मासेदोनिया व अखया ह्यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे; इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाची बातमीही सर्वत्र पसरली आहे; ह्यामुळे त्याविषयी आम्हास काही सांगायची गरज नाही.
それは主のことば汝 等より出でて、啻にマケドニヤ及びアカヤに響きしのみならず、神に對する汝らの信仰のことは諸方に弘りたるなり。されば之に就きては何をも語るに及ばず。
9 कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले, हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात; तुम्ही मूर्तींपासून देवाकडे कसे वळला आणि जिवंत व खऱ्या देवाची सेवा करण्यास,
人々 親しく我らが汝らの中に入りし状を告げ、また汝らが偶像を棄てて神に歸し、活ける眞の神に事へ、
10 १० आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गांतून येण्याची वाट पाहण्यास, तो पुत्र म्हणजे येशू ज्याला देवाने मरण पावलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे.
神の死人の中より甦へらせ給ひし御子、すなはち我らを來らんとする怒より救ひ出すイエスの、天より降りたまふを待ち望むことを告ぐればなり。

< १ थेस्स. 1 >