< 1 शमुवेल 9 >
1 १ बन्यामीन वंशातील एक पुरुष होता त्याचे नांव कीश; तो अबीएलाचा मुलगा, तो सरोराचा मुलगा, तो बखोराचा मुलगा, तो अफियाचा मुलगा होता. तो बन्यामिनी पुरुष मोठा पराक्रमी होता.
本雅明支派有個人名叫克士,他是阿彼耳的兒子,阿彼耳是責洛爾的兒子,責洛爾是貝苛辣特的兒子,貝苛辣特是阿非亞的兒子;這本雅明人是個英勇的戰士。
2 २ आणि त्याचा शौल नावाचा मुलगा तरुण व सुंदर होता. इस्राएलाच्या संतानामध्ये त्याच्याहून कोणी सुंदर नव्हता. सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता.
他有個兒子名叫撒烏耳,魁梧英俊,在以色列人中沒有比他更俊美的,比所有的人高出一肩。
3 ३ आणि शौलाचा बाप कीश, याची गाढवे हरवली. तेव्हा कीश आपला मुलगा शौल याला म्हणाला, “आता तू ऊठ व चाकरांपैकी एकाला आपणाबरोबर घे; आणि जाऊन गाढवांचा शोध कर.”
撒烏耳的父親克士有幾匹母驢,走迷了路,克士遂對兒子撒烏耳說:「你帶一個僕人,起身去尋找那些驢。」
4 ४ मग तो एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातून जाऊन शलीशा प्रांतातून गेला, परंतु ती सापडली नाहीत. मग ते शालीम प्रातांतून गेले, परंतु येथे ती त्यांना सापडली नाहीत. नंतर ते बन्यामीन्यांच्या प्रांतातून गेले परंतु त्यांना ती सापडली नाहीत.
他們走過了厄弗辣因山地和沙里地方,卻沒有找著;又過了沙阿林地方,也沒有找到;最後經過耶米尼地方,也不見蹤影。
5 ५ ते सूफ प्रांतातून आल्यावर शौल आपल्या बरोबरच्या चाकराला म्हणाला, “चला आपण माघारे जाऊ, नाहीतर माझा बाप गाढवांची काळजी सोडून आमचीच काळजी करायला लागेल.”
當他們來到族弗地方時,撒烏耳對跟隨自己的僕人說:「我們回去罷! 免得我父親不掛念驢,反而掛慮我們。」
6 ६ तेव्हा तो चाकर त्यास म्हणाला, “आता पाहा या नगरात देवाचा पुरुष आहे. तो पुरुष खूपच सन्मान्य आहे; जे तो सांगतो ते सर्व पूर्ण होतेच. तर आता आपण तेथे जाऊ; म्हणजे आपण कोणत्या मार्गाने पुढे जावे हे कदाचित तो आपल्याला सांगेल.”
僕人回答他說:「請看,這城裏有一位天主的人,很受敬重;凡他說的,必定應驗;現在我們往那裏去,或許他會告訴我們應走的路。」
7 ७ मग शौल आपल्या चाकराला म्हणाला, “पण पाहा आपण जर जाऊ तर त्या मनुष्यास आपण काय घेऊन जावे? कारण आपल्या झोळीतल्या भाकरी संपल्या आहेत आणि परमेश्वराच्या मनुष्यास भेट देण्यासाठी काही राहिले नाही. आपल्याजवळ काय आहे?”
撒烏耳回答僕人說:「好! 我們可以去,但是給那人送什麼呢﹖我們袋裏的乾糧已經用盡,沒有禮物可送給天主的人了。我們還有什麼呢﹖」
8 ८ तेव्हा चाकराने शौलाला उत्तर देऊन म्हटले, “पाहा माझ्या हातात पाव शेकेल रुपे आहे; ते मी परमेश्वराच्या मनुष्यास देईन, म्हणजे तो आमची वाट आम्हास सांगेल.”
僕人回答撒烏耳說:「看,我手裏還有四分之一「協刻耳」銀子,你可把它送給天主的人,請他把我們當走的路告訴我們。」
9 ९ (पूर्वी इस्राएलात कोणी परमेश्वराजवळ विचारायला जात असताना असे म्हणत, “चला आपण द्रष्ट्याकडे जाऊ.” कारण ज्याला आता भविष्यवादी म्हणतात त्यास पूर्वी द्रष्टा असे म्हणत.)
撒烏耳對他的僕人說:「你說的對,來,我們去罷! 」他們就往天主的人所住的城裏去了。
10 १० मग शौल चाकराला म्हणाला, “तुझे बोलणे ठीक आहे चल आपण जाऊ.” तेव्हा ज्या नगरात देवाचा पुरुष होता तेथे ते गेले.
當他們上那城的山坡時,遇見一些少女出來打水,就問她們說:「先見者在這裏嗎﹖」──
11 ११ ते टेकडीवर नगराकडल्या चढणीवर जात होते तेव्हा मुली पाणी भरायला बाहेर जाताना त्यांना भेटल्या. ते त्यांना म्हणाले, “द्रष्टा (पाहणारा) येथे आहे काय?”
過去在以色列,如果有人去求問天主,常說:「來,我們到先見者那裏去! 」現今所稱的「先知,」就是從前稱的「先見者。」──
12 १२ त्यांनी त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तो आहे; पाहा तुमच्या पुढेच तो निघाला आहे. लवकर जा. तो नगरात आला आहे कारण आज लोकांस उंचस्थानी यज्ञ करायचा आहे.
她們回答說:「是。看,先見者就在你們前面,剛剛進了城,因為今天百姓要在高丘上舉行祭獻。
13 १३ तुम्ही तो जेवायला उंचस्थानी चढून जाण्याच्या आधी, नगरात जातानाच तुमची आणि त्याची भेट होईल. तो येण्याच्या अगोदर लोक जेवणार नाहीत, कारण तो यज्ञाला आशीर्वाद देतो मग बोलावलेले जेवतात. तर आता तुम्ही वर जा, कारण या वेळेस त्याची भेट होईल.”
你們進了城,在他上到高丘進食以前,一定會遇見他,因為人民在他來以前,不先吃什麼,因他要祝福犧牲,然後賓客纔進食。你們現在上去,立刻會遇見他。」
14 १४ मग ते नगराकडे चढून गेले आणि ते नगरात जाऊन पोहचतात, तो त्यांनी पाहीले की, शमुवेल उंचस्थानी चढून जायला निघताना त्याच्याकडे येत आहे.
他們於是上到那城,剛進城門,看,撒慕爾就朝著他們出來,要上高丘去。
15 १५ शौलाच्या येण्यापूर्वी एक दिवस अगोदर, परमेश्वराने शमुवेलाला प्रकट केले होते की:
在撒烏耳來的前一日,上主曾啟示給撒慕爾說:「
16 १६ “उद्या सुमारे या वेळेस बन्यामिनी प्रांतातून एक पुरुष मी तुझ्याकडे पाठवीन, आणि माझे लोक इस्राएल यांचा राजा होण्यास त्यास तू अभिषेक कर. तो पलिष्ट्यांच्या हातून माझ्या लोकांस सोडवील; कारण मी आपल्या लोकांकडे पाहिले आहे आणि त्यांची आरोळी माझ्याकडे आली आहे.”
明日大約這時,我打發一個本雅明地方的人到你這裏來,你要給他傅油,立他當我民以色列的首領,他要從培肋舍特人手中拯救我的百姓,因我已看到我百姓的痛苦,他們的哀號已上達於我。」
17 १७ शमुवेलाने शौलाला पाहिले, तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, “पाहा ज्या मनुष्याविषयी मी तुला सांगितले तो हाच आहे! हा माझ्या लोकांवर राज्य करील.”
撒慕爾一看見撒烏耳,上主就提醒他說:「看,這就是我曾對你提及的那人,他要統治我的百姓。」
18 १८ मग शौल शमुवेलाजवळ वेशीत येऊन म्हणाला, “मी तुम्हास विनंती करतो द्रष्याचे (पाहणाऱ्याचे) घर कोठे आहे ते मला सांगा.”
撒烏耳走到撒慕爾跟前,在城門洞中問他說:「請你告訴我,先見者的家在那裏﹖」
19 १९ तेव्हा शमुवेलाने शौलाला उत्तर देऊन म्हटले, “द्रष्टा (पाहणारा) मीच आहे. माझ्या पुढे उंचस्थानी वर चला, म्हणजे आज तुम्ही माझ्याबरोबर जेवाल. तुझ्या मनात जे आहे ते सर्व सांगून सकाळी मी तुला जाऊ देईन.
撒慕爾回答撒烏耳說:「我就是先見者;請你在我以前上高丘去;你們今天要同我一起吃飯,明天早晨我打發你去,你心中所懷念的事,我會全告訴你。
20 २० आणि तुझी जी गाढवे तीन दिवसांपूर्वी हरवली होती त्यांची तू काळजी करू नको, कारण ती सांपडली आहेत. आणि इस्राएलाच्या सर्व अभिलाषा कोणाकडे आहेत? तुझ्याकडे व तुझ्या वडिलाच्या सर्व घराण्याकडे की नाही?”
至於三天以前你所失的母驢,不必擔心,都已找著了。此外,以色列所有的至寶是誰的呢﹖豈不是你和你父親全家的嗎! 」
21 २१ तेव्हा शौलाने उत्तर देऊन म्हटले, “मी बन्यामीनी, इस्राएलाच्या वंशामध्ये सर्वाहून धाकट्या वंशातला नाही काय? आणि बन्यामिनाच्या वंशामध्ये सर्व घराण्यांपेक्षां माझे घराणे लहान आहे की नाही? तर तुम्ही माझ्याशी असे कसे बोलता?”
撒烏耳回答說:「我豈不是一個本雅明人,屬於以色列最小的一支派嗎﹖我的家族在本雅明家族中,不也是最小的嗎﹖你怎能向我說出這樣的話﹖」
22 २२ मग शमुवेलाने शौलाला व त्याच्या चाकराला बरोबर घेऊन भोजनशाळेत आणले. आणि आमंत्रितांमध्ये त्यांना मुख्य ठिकाणी बसवले; ते सुमारे तीसजण होते.
以後撒慕爾將撒烏耳和他的僕人領到餐廳內,叫他們坐在賓客的首位上,賓客約有三十人。
23 २३ तेव्हा शमुवेल आचाऱ्याला म्हणाला, “जो वाटा मी तुला दिला होता व ज्याविषयी मी तुला म्हटले होते की, हा तू आपल्याजवळ वेगळा ठेव, तो आण.”
撒慕爾對廚師說:「將我交給你的那份,即對你說:暫且留下的那一份,給我拿來。」
24 २४ तेव्हा स्वयंपाक्याने फरा व त्यावर जे होते ते घेऊन शौलापुढे ठेवले. मग शमुवेल म्हणाला, “पाहा जे राखून ठेवले होते! ते खा, कारण नेमलेल्या वेळेपर्यंत ते तुझ्यासाठी राखून ठेवलेले आहे.” कारण आता तू म्हणू शकतोस की, मी लोकांस बोलावले आहे. अशा रीतीने, त्या दिवशी शौल शमुवेलाबरोबर जेवला.
廚師遂把後腿和肥尾端上來,放在撒烏耳面前。撒慕爾對他說:「看,擺在你面前的,是預先特意保留的一份,請吃罷! 因為特意為你保留下的,叫你好同賓客一起吃。」撒烏耳那天就同撒慕爾一起吃了飯。
25 २५ ते उंचस्थानावरून खाली नगरात आल्यावर त्याने घराच्या धाब्यावर शौलाशी संभाषण केले.
他們從高丘下到城裏,有人在露台上給撒烏耳舖好了臥榻,
26 २६ ते पहाटेस उठले व उजाडण्याच्या वेळेस असे झाले की, शमुवेलाने शौलाला घराच्या धाब्यावर बोलावून म्हटले, “मी तुला पाठवून द्यावे म्हणून ऊठ. तेव्हा शौल ऊठला, मग तो व शमुवेल असे दोघेजण बाहेर गेले.”
撒烏耳就睡在那裏。天一亮,撒慕爾就叫醒在露台上的撒烏耳,對他說:「起來,讓我送你走。」撒烏耳起來,他們二人,即他和撒慕爾,就往城外走;
27 २७ ते खाली नगराच्या शेवटास जात असता, शमुवेल शौलाला म्हणाला, “चाकराला आपल्यापुढे चालायला सांग, परंतु मी तुला देवाचे वचन ऐकावावे म्हणून तू येथे थोडा थांब. आणि चाकर पुढे गेला.”
當他們下到城邊時,撒慕爾對撒烏耳說:「你吩咐僕人,叫他在我們前面先走,你暫且停留一會,我要把天主話告訴你。」