< 1 शमुवेल 8 >
1 १ जेव्हा शमुवेल म्हातारा झाला तेव्हा त्याने आपले पुत्र इस्राएलावर न्यायाधीश नेमले.
Factum est autem cum senuisset Samuel, posuit filios suos iudices Israel.
2 २ त्याच्या प्रथम जन्मलेल्या मुलाचे नाव योएल व दुसऱ्याचे नाव अबीया असे होते; बैर-शेबा येथे ते न्यायाधीश होते.
Fuitque nomen filii eius primogeniti Ioel: et nomen secundi Abia, iudicum in Bersabee.
3 ३ परंतु त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालत नसत, तर ते अप्रामाणिक लाभांच्या पाठीमागे लागले होते. ते लाच घेऊन विपरीत न्याय करीत असत.
Et non ambulaverunt filii illius in viis eius: sed declinaverunt post avaritiam, acceperuntque munera, et perverterunt iudicium.
4 ४ मग इस्राएलाचे सर्व वडील जमून रामा येथे शमुवेलाकडे आले.
Congregati ergo universi maiores natu Israel, venerunt ad Samuelem in Ramatha.
5 ५ आणि ते त्यास म्हणाले, “पाहा तुम्ही वयोवृद्ध झाले आहात आणि तुमचे पुत्र तुमच्या मार्गाने चालत नाहीत. आता सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्याय करायला आम्हावर राजा नेमा.”
Dixeruntque ei: Ecce tu senuisti, et filii tui non ambulant in viis tuis: constitue nobis regem, ut iudicet nos, sicut et universæ habent nationes.
6 ६ परंतु, “आमचा न्याय करायला आम्हांला राजा द्या,” असे जे त्यांनी म्हटले, त्याबद्दल शमुवेलाला वाईट वाटले. म्हणून शमुवेलाने परमेश्वराकडे प्रार्थना केली.
Displicuit sermo in oculis Samuelis, eo quod dixissent: Da nobis regem, ut iudicet nos. Et oravit Samuel ad Dominum.
7 ७ तेव्हा परमेश्वराने शमुवेलास म्हटले, “लोक सांगतात त्या सर्वबाबतीत तू त्यांचा शब्द ऐक; कारण त्यांनी तुला नाकारले नाही, तर मला नाकारले आहे.
Dixit autem Dominus ad Samuelem: Audi vocem populi in omnibus quæ loquuntur tibi. non enim te abiecerunt, sed me, ne regnem super eos.
8 ८ मी त्यांना मिसरातून वर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत जी सर्व कामे त्यांनी केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले आहे, मला सोडून अन्य देवाची सेवा त्यांनी केली, आणि तसेच त्यांनी तुझ्याशी केले आहे.”
Iuxta omnia opera sua, quæ fecerunt a die qua eduxi eos de Ægypto usque ad diem hanc: sicut dereliquerunt me, et servierunt diis alienis, sic faciunt etiam tibi.
9 ९ तर आता त्यांचे ऐक; तथापि तू त्याच्याशी खडसावून बोल आणि जो राजा त्याच्यावर राज्य करील त्याची रीत त्यांना समजावून सांग.
Nunc ergo vocem eorum audi: verumtamen contestare eos, et prædic eis ius regis, qui regnaturus est super eos.
10 १० मग शमुवेलाने, ज्या लोकांनी राजा मागितला होता त्यांना, परमेश्वराची सर्व वचने सांगितली.
Dixit itaque Samuel omnia verba Domini ad populum, qui petierat a se regem,
11 ११ तो त्यांना म्हणाला, “जो राजा तुम्हावर राज्य करील त्याची रीत अशी होईल; तो तुमचे पुत्र घेऊन आपल्या रथांसाठी व आपले घोडेस्वार होण्यासाठी ठेवील आणि त्याच्या रथांपुढे ते धावतील.
et ait: Hoc erit ius regis, qui imperaturus est vobis: filios vestros tollet, et ponet in curribus suis, facietque sibi equites et præcursores quadrigarum suarum,
12 १२ तो त्यांना आपले हजारांचे सरदार नेमून ठेवील. जमीन नांगरायला, आपली पिके कापायला, आणि आपली लढाईची शस्त्रे व आपली रथांची शस्त्रे करायला ठेवील.
et constituet sibi tribunos, et centuriones, et aratores agrorum suorum, et messores segetum, et fabros armorum et curruum suorum.
13 १३ तो तुमच्या मुली सुगंधी द्रव्ये तयार करणाऱ्या, स्वयंपाकिणी, आणि भटारखान्यात काम करणाऱ्या होण्यास घेईल.
Filias quoque vestras faciet sibi unguentarias, et focarias, et panificas.
14 १४ तुमची जी उत्तम ती शेते, तुमचे द्राक्षमळे, आणि तुमचे जैतूनाचे मळे घेऊन, ते तो त्याच्या चाकरांना देईल.
Agros quoque vestros, et vineas, et oliveta optima tollet, et dabit servis suis.
15 १५ तो तुमची पीके व तुमचे द्राक्षमळे यांचा दशमांश घेऊन, तो आपल्या कारभाऱ्यांना देईल.
Sed et segetes vestras, et vinearum reditus addecimabit, ut det eunuchis et famulis suis.
16 १६ तुमचे दास आणि तुमच्या दासी व तुमचे उत्तम तरुण व तुमची गाढवे घेऊन, ते तो आपल्या कामाला लावील.
Servos etiam vestros, et ancillas, et iuvenes optimos, et asinos, auferet, et ponet in opere suo.
17 १७ तुमच्या मेंढरांचा दशमांश तो घेईल व तुम्ही त्याचे दास व्हाल.
Greges quoque vestros addecimabit, vosque eritis ei servi.
18 १८ त्यानंतर तुम्ही आपणासाठी निवडलेल्या राजामुळे ओरडाल; परंतु परमेश्वर त्या दिवसात तुम्हास उत्तर देणार नाही.”
Et clamabitis in die illa a facie regis vestri, quem elegistis vobis: et non exaudiet vos Dominus in die illa, quia petistis vobis regem.
19 १९ पण लोक शमुवेलाचा शब्द ऐकायला नाकारून म्हणाले, “असे नाही! आम्हांवर राजा पाहिजेच
Noluit autem populus audire vocem Samuelis, sed dixerunt: Nequaquam: rex enim erit super nos,
20 २० म्हणजे आम्ही इतर सर्व राष्ट्रांसारखे होऊ, आणि आमचा राजा आमचा न्याय करील व आम्हापुढे चालून आमच्या लढाया लढेल.”
et erimus nos quoque sicut omnes gentes: et iudicabit nos rex noster, et egredietur ante nos, et pugnabit bella nostra pro nobis.
21 २१ शमुवेलाने जेव्हा लोकांनी दिलेल्या उत्तराचे सर्व शब्द ऐकून परमेश्वरास ऐकवले;
Et audivit Samuel omnia verba populi, et locutus est ea in auribus Domini.
22 २२ मग तेव्हा परमेश्वर शमुवेलाशी बोलला, “तू त्यांचा शब्द ऐकून त्याच्यांवर राज्य करायला राजा नेमून ठेव.” तेव्हा शमुवेल इस्राएलाच्या मनुष्यांना म्हणाला, “तुम्ही प्रत्येकजण आपापल्या नगरास परत जा.”
Dixit autem Dominus ad Samuelem: Audi vocem eorum, et constitue super eos regem. Et ait Samuel ad viros Israel: Vadat unusquisque in civitatem suam.