< 1 शमुवेल 7 >
1 १ मग किर्याथ-यारीमाची माणसे आली, आणि त्यांनी परमेश्वराचा कोश नेला, आणि तो टेकडीवर अबीनादाबाच्या घरात आणून ठेवला. त्यांनी त्याचा मुलगा एलाजार याला परमेश्वराचा कोश राखायला पवित्र केले.
Entonces los hombres de Quiriat-jearim fueron y subieron el Arca de Yavé a la región montañosa. La pusieron en casa de Abinadab y consagraron a Eleazar, su hijo, para que guardara el Arca de Yavé.
2 २ कोश किर्याथ-यारीमात येऊन राहिला त्या दिवसापासून, बहुत काळ लोटला, म्हणजे वीस वर्षे झाली. इस्राएलाच्या सर्व घराण्याने शोक केला आणि परमेश्वराकडे वळण्याची इच्छा केली.
Desde el día cuando el Arca quedó en Quiriat-jearim pasaron muchos días, 20 años, y toda la casa de Israel lamentaba tras Yavé.
3 ३ शमुवेल इस्राएलाच्या सर्व घराण्याशी बोलला तो म्हणाला, “जर तुम्ही आपल्या सर्व मनाने परमेश्वराकडे परत वळता, तर आपणापासून परके देव आणि अष्टारोथ दूर करा, तुम्ही आपली मने परमेश्वराकडे लावा, आणि केवळ त्याचीच सेवा करा, म्हणजे तो तुम्हास पलिष्ट्यांच्या हातून सोडवील.”
Samuel habló a toda la casa de Israel: Si vuelven a Yavé con todo su corazón, quiten de en medio de ustedes los ʼelohim extraños y a Astarot, preparen su corazón para Yavé y sirvan solo a Él, Él los librará de la mano de los filisteos.
4 ४ मग इस्राएली लोकांनी बआल व अष्टारोथ काढून टाकले, आणि केवळ परमेश्वराचीच आराधना करू लागले.
Los hijos de Israel quitaron los baales y a Astarot, y sirvieron solo a Yavé.
5 ५ आणि शमुवेल म्हणाला, “सर्व इस्राएलांस मिस्पा येथे एकवट करा, म्हणजे मी तुम्हासाठी परमेश्वरास विनंती करीन.”
Luego dijo Samuel: Reúnan a todo Israel en Mizpa, y yo oraré a Yavé por ustedes.
6 ६ मग ते मिस्पात जमले आणि त्यांनी पाणी काढून परमेश्वराच्या समोर ओतले. त्या दिवशी त्यांनी उपास केला आणि म्हटले, “आम्ही परमेश्वराच्या विरूद्ध पाप केले आहे.” तेव्हा शमुवेलाने तेथे इस्राएली लोकांचे वादविवाद मिटवले आणि लोकांचे मार्गदर्शन केले.
Se reunieron en Mizpa. Sacaron agua y la derramaron delante de Yavé. Ayunaron aquel día allí y dijeron: ¡Pecamos contra Yavé! Y Samuel juzgó a los hijos de Israel en Mizpa.
7 ७ आता इस्राएलाची लोक मिस्पांत जमले आहेत असे पलिष्यांनी ऐकले, तेव्हा पलिष्टयांचे अधिकारी इस्राएलावर चढाई करून आले. इस्राएल लोकांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते पलिष्ट्यांना घाबरले.
Cuando los filisteos oyeron que los hijos de Israel se reunieron en Mizpa, los jefes de los filisteos subieron contra Israel. Al oír esto, los hijos de Israel tuvieron temor a los filisteos.
8 ८ नंतर इस्राएली लोक शमुवेलाला म्हणाले, “आमचा देव परमेश्वर याने आम्हास पलिष्ट्यांच्या हातून सोडवावे म्हणून त्याकडे आम्हासाठी धावा करण्याचे थांबवू नका.”
Los hijos de Israel dijeron a Samuel: No ceses de clamar a Yavé nuestro ʼElohim por nosotros para que nos salve de mano de los filisteos.
9 ९ मग शमुवेलाने एक दूध पिणारे कोकरू घेऊन त्याचे संपूर्ण होमार्पण परमेश्वरास केले; आणि शमुवेलाने इस्राएलासाठी परमेश्वराचा धावा केला आणि तेव्हा परमेश्वराने त्यास उत्तर दिले.
Samuel tomó un corderito lechal y lo ofreció entero en holocausto a Yavé. Samuel clamó a Yavé por Israel, y Yavé lo escuchó.
10 १० आणि शमुवेल होमार्पण अर्पण करत होता, तेव्हा पलिष्टी इस्राएलाशी लढायला जवळ आले; परंतु त्यादिवशी परमेश्वराने पलिष्ट्याविरूद्ध मोठ्या आवाजात गडगडाट करून त्यास घाबरे केले व गोंधळात टाकले आणि इस्राएलापुढे त्यांचा पराभव झाला.
Aconteció que mientras Samuel ofrecía el holocausto, los filisteos llegaron para combatir a Israel. Pero Yavé tronó aquel día con grande estruendo sobre los filisteos y los desbarató. Fueron derrotados delante de Israel.
11 ११ तेव्हा इस्राएलाची माणसे मिस्पातून निघून पलिष्ट्यांच्या पाठीस लागली आणि बेथ-कारापर्यंत त्यांना मारीत गेली.
Los hombres de Israel salieron de Mizpa, persiguieron a los filisteos y los mataron hasta más abajo de Bet-car.
12 १२ मग शमुवेलाने एक दगड घेतला आणि मिस्पा व शेन याच्या दरम्यान तो उभा केला आणि त्यास एबन-एजर असे नाव देऊन म्हटले, “येथपर्यंत परमेश्वराने आमचे साहाय्य केले आहे.”
Luego Samuel tomó una piedra y la asentó entre Mizpa y Sen. La llamó Ebenezer y dijo: Hasta aquí nos ayudó Yavé.
13 १३ असे पलिष्टी पराभूत झाले आणि ते इस्राएलाच्या सीमेत आणखी आले नाहीत. शमुवेलाच्या सर्व दिवसात परमेश्वराचा हात पलिष्ट्यांच्या विरूद्ध होता.
Así los filisteos fueron sometidos, y no volvieron a entrar dentro del límite de Israel. La mano de Yavé estuvo contra los filisteos todos los días de Samuel.
14 १४ आणि एक्रोनापासून गथपर्यंत, जी नगरे पलिष्ट्यांनी इस्राएलापासून घेतली होती ती इस्राएलास परत मिळाली; आणि त्यांचा प्रदेश इस्राएलाने पलिष्ट्यांच्या हातातून परत घेतला. त्यानंतर इस्राएल व अमोरी यांच्यामध्ये शांतता होती.
Las ciudades que los filisteos les tomaron fueron restituidas a los hijos de Israel, desde Ecrón hasta Gat. Israel libró su territorio de mano de los filisteos. También hubo paz entre Israel y los amorreos.
15 १५ शमुवेलाने आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात इस्राएलाचा न्याय केला.
Samuel juzgó a Israel todos los días de su vida.
16 १६ तो प्रत्येक वर्षी बेथेलास, गिलगालास, व मिस्पात अनुक्रमाने जाई. आणि त्या सर्व ठिकाणी इस्राएलाचा न्याय करी.
Él acostumbraba ir cada año en un camino por Bet-ʼEl, Gilgal y Mizpa, y juzgaba a Israel en todos esos lugares.
17 १७ आणि रामा येथे तो परत माघारी येत असे, कारण तेथे त्याचे घर होते आणि तेथे सुध्दा त्याने इस्राएलाचे वादविवाद मिटवण्याचे काम केले. तेथे त्याने परमेश्वरास अर्पणे अर्पायला वेदी बांधली.
Después regresaba a Ramá, pues allí estaba su casa. Allí también juzgaba a Israel, y allí edificó un altar a Yavé.