< 1 शमुवेल 6 >

1 आता परमेश्वराचा कोश पलिष्ट्यांच्या देशात सात महिने राहिला.
صندوق عهد، مدت هفت ماه در فلسطین ماند.
2 आणि मग, पलिष्ट्यांनी याजकांना व ज्योतिष्यांना बोलावून त्याने म्हटले, “परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे? तो त्याच्या ठिकाणी कसा पाठवावा हे आम्हास सांगा.”
فلسطینی‌ها کاهنان و جادوگران خود را فرا خواندند و از آنها پرسیدند: «با صندوق عهد خداوند چه کنیم؟ بگویید که چگونه آن را به مکان اصلی‌اش برگردانیم؟»
3 ते म्हणाले, “तुम्ही इस्राएलाच्या देवाचा कोश माघारी पाठवाल तर तो अर्पणांच्या भेटींशिवाय पाठवू नका; तर त्याबरोबर दोषार्पण अवश्य पाठवावे. मगच तुम्ही निरोगी व्हाल, आणि त्याचा हात तुम्हावरून अद्यापपर्यंत का दूर होत नाही हे तुम्हास समजेल.”
آنها جواب دادند: «اگر می‌خواهید صندوق عهد خدای اسرائیل را پس بفرستید، آن را دست خالی نفرستید، بلکه هدیۀ جبران نیز همراه آن بفرستید تا او بلا را متوقف کند. اگر شفا یافتید، آنگاه معلوم می‌شود که این بلا از جانب خدا بر شما نازل شده است.»
4 तेव्हा ते म्हणाले, “जे दोषार्पण त्याबरोबर आम्ही पाठवावे ते काय असावे?” त्यांनी उत्तर दिले, “पलिष्ट्यांचा सरदारांच्या संख्येप्रमाणे पाच सोन्याच्या गाठी व पांच सोन्याचे उंदीर; कारण तुम्हा सर्वांवर व तुमच्या अधिकाऱ्यांवर एकच पीडा आली आहे.
مردم پرسیدند: «چه نوع هدیه‌ای بفرستیم؟» آنها گفتند: «به تعداد رهبران فلسطینی‌ها، پنج شیء از طلا به شکل دمل و پنج شیء از طلا به شکل موش که تمام سرزمین ما را ویران کرده‌اند، درست کنید و به احترام خدای اسرائیل، آنها را بفرستید تا شاید بلا را از شما و خدایان و سرزمین شما دور کند.
5 म्हणून तुम्ही तुमच्या गाठीच्या आकाराची व तुमचे जे उंदीर शेताचा नाश करतात त्याच्या प्रतिकृती तयार करा आणि तुम्ही इस्राएलाच्या देवाचा गौरव करा कदाचित तो आपला हात तुम्हावरून, व तुमच्या देवावरून, व तुमच्या भूमीवरून काढेल.
6 मिसरी लोक व फारो यांनी जशी आपली मने कठीण केली तशी तुम्ही आपली मने कशाला कठीण करता? जेव्हा तो त्यांच्याशी कठोरपणे वागला आणि त्याने त्यांना जाऊ देण्याची परवानगी दिली नाही, परंतु नंतर ते निघून गेले नाहीत काय?
مانند فرعون و مصری‌ها سرسختی نکنید. آنها اجازه ندادند اسرائیلی‌ها از مصر خارج شوند، تا اینکه خدا بلاهای هولناکی بر آنها نازل کرد.
7 तर तुम्ही एक नवी गाडी तयार करा आणि ज्यांच्या वर कधी जू ठेवले नाही अशा दोन दुभत्या गायी घेऊन गाडीला जुंपा व त्यांची वासरे त्यांच्यापासून वेगळी करून घरी आणा.
پس الان ارابه‌ای تازه بسازید و دو گاو شیرده که یوغ بر گردن آنها گذاشته نشده باشد بگیرید و آنها را به ارابه ببندید و گوساله‌هایشان را در طویله نگه دارید.
8 मग परमेश्वराचा कोश घेऊन गाडीवर ठेवा. आणि तुम्ही दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या प्रतीकृती डब्यात घालून त्याच्या एकाबाजूला ठेवा. त्यानंतर, ती गाडी परत पाठवून द्या आणि तिच्या मार्गाने तिला जाऊ द्या.
صندوق عهد را بر ارابه قرار دهید و هدایای طلا را که برای عذرخواهی می‌فرستید در صندوقچه‌ای پهلوی آن بگذارید. آنگاه گاوها را رها کنید تا هر جا که می‌خواهند بروند.
9 आणि पाहा, बेथ-शेमेशाकडे त्याच्या मार्गाने तो गेला, तर ज्याने आम्हावर हे मोठे अरिष्ट लावले आहे तो परमेश्वरच आहे हे जाणा; त्याउलट, जर गेला नाही, तर जे आम्हासोबत घडले ती आकस्मित घटना आहे असे आम्ही समजू.”
اگر آنها از مرز ما عبور کرده، به بیت‌شمس رفتند، بدانید خداست که این بلای عظیم را بر سر ما آورده است، اما اگر نرفتند آنگاه خواهیم دانست که این بلاها اتفاقی بوده و دست خدا در آن دخالتی نداشته است.»
10 १० मग त्या मनुष्यांनी तसे केले, म्हणजे, त्यांनी दोन दुभत्या गायी घेऊन गाडीला जुंपल्या आणि त्यांची वासरे घरी बांधून ठेवली.
فلسطینی‌ها چنین کردند. دو گاو شیرده را به ارابه بستند و گوساله‌هایشان را در طویله نگه داشتند.
11 ११ मग त्यांनी परमेश्वराचा कोश आणि त्याच्याबरोबर तो डब्बा सोन्याचे उंदीर व त्यांच्या गाठीच्या प्रतिकृती गाडीत ठेवल्या.
آنگاه صندوق عهد خداوند و صندوقچهٔ محتوی هدایای طلا را بر ارابه گذاشتند.
12 १२ मग त्या गायी नीट वाट धरून बेथ-शेमेशाच्या रस्त्याने गेल्या; मार्गाने जाताना त्या मोठ्याने हंबरत चालल्या उजवीकडे किंवा डावीकडे फिरल्या नाहीत. आणि पलिष्ट्यांचे अधिकारी बेथ-शेमेशाच्या सीमेपर्यंत त्यांच्यामागे गेले.
گاوها یکراست به طرف بیت‌شمس روانه شدند و همان‌طور که می‌رفتند صدا می‌کردند. رهبران فلسطینی تا سرحد بیت‌شمس، به دنبال آنها رفتند.
13 १३ तेव्हा बेथ-शेमेशाचे शेतकरी खोऱ्यात आपल्या गव्हाची कापणी करीत होते; आणि त्यांनी आपली दृष्टी वर करून कोश पाहिला, तेव्हा तो पाहून ते आनंद पावले.
مردم بیت‌شمس در دره مشغول درو گندم بودند. آنها وقتی صندوق عهد خداوند را دیدند، بسیار شاد شدند.
14 १४ मग गाडी यहोशवा बेथ-शेमेशकर याच्या शेतात येऊन जेथे एक मोठा दगड होता तेथे उभी राहिली. मग, त्यांनी गाडीची लाकडे तोडली आणि त्या गायी परमेश्वरास होमार्पण अशा अर्पण केल्या.
ارابه وارد مزرعهٔ شخصی به نام یهوشع شد و در کنار تخته سنگ بزرگی ایستاد. مردم چوب ارابه را شکسته، گاوها را به عنوان قربانی سوختنی به خداوند تقدیم کردند.
15 १५ लेव्यांनी देवाचा कोश, व त्याबरोबर ज्यात सोन्याच्या प्रतिमा होत्या तो डबा, हे उतरवून त्या मोठ्या दगडावर ठेवले. बेथ-शेमेशाच्या मनुष्यांनी त्या दिवशी परमेश्वरास होमार्पणे व यज्ञ अर्पण केले.
چند نفر از مردان قبیلهٔ لاوی، صندوق عهد و صندوقچهٔ محتوی اشیاء طلا را برداشته، روی آن تخته سنگ بزرگ گذاشتند. در آن روز مردان بیت‌شمس قربانی سوختنی و قربانیهای دیگر به حضور خداوند تقدیم نمودند.
16 १६ आणि हे पाहिल्यानंतर पलिष्ट्यांचे पांच सरदार त्याच दिवशी एक्रोनास परत गेले.
آن پنج رهبر فلسطینی وقتی این واقعه را دیدند، در همان روز به عقرون برگشتند.
17 १७ परमेश्वरास पलिष्ट्यांनी ज्या सोन्याच्या गाठी दोषार्पण म्हणून पाठवल्या त्या अशा: अश्दोदकरता एक, गज्जाकरता एक, अष्कलोनाकरता एक, गथकरता एक, एक्रोनाकरता एक.
پنج هدیهٔ طلا به شکل دمل که توسط فلسطینی‌ها جهت عذرخواهی، برای خداوند فرستاده شد، از طرف شهرهای اشدود، غزه، اشقلون، جت و عقرون بود.
18 १८ आणि जो मोठा दगड ज्यावर त्यांनी परमेश्वराचा कोश ठेवला तेथपर्यंत पलिष्ट्यांची जी नगरे, म्हणजे तटबंदीची नगरे व खेडीपाडीही, ज्या पांच सरदांराची होती, त्यांच्या संख्येप्रमाणे ते सोन्याचे उंदीर होते. तो दगड आजपर्यंत यहोशवा बेथ-शेमेशकर यांच्या शेतात आहे.
پنج موش طلا نیز به تعداد رهبران فلسطینی بود که بر شهرهای حصاردار و دهات اطرافشان فرمان می‌راندند. آن تخته سنگ بزرگ که صندوق عهد را روی آن گذاشتند تا به امروز در مزرعهٔ یهوشع واقع در بیت‌شمس باقی است.
19 १९ मग परमेश्वराने काही बेथ-शेमेशकर मनुष्यांना मारले कारण त्यांनी परमेश्वराच्या कोशाच्या आत पाहिले होते. त्याने सत्तर जण मारले. परमेश्वराने लोकांस फार मोठा तडाखा दिला, त्यामुळे लोकांनी शोक केला.
اما خداوند هفتاد نفر از مردان بیت‌شمس را کشت، زیرا به داخل صندوق عهد نگاه کرده بودند. مردم بیت‌شمس به‌سبب این کشتار سوگواری عظیمی کردند.
20 २० तेव्हा बेथ-शेमेशाची माणसे बोलली, “पवित्र परमेश्वर याच्यासमोर कोणाच्याने उभे राहवेल? त्याने आम्हापासून वरती कोणाकडे जावे?”
گفتند: «چه کسی می‌تواند در مقابل خداوند که خدای قدوسی است، بایستد؟ اکنون صندوق عهد را به کجا بفرستیم؟»
21 २१ मग त्यांनी किर्याथ-यारीमाच्या रहिवाशांकडे दूत पाठवून म्हटले, की, “पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश माघारी आणला आहे; तुम्ही खाली येऊन तो आपणाकडे वरती न्या.”
پس قاصدانی را نزد ساکنان قریهٔ یعاریم فرستاده، گفتند: «فلسطینی‌ها صندوق عهد خداوند را برگردانده‌اند. بیایید و آن را ببرید.»

< 1 शमुवेल 6 >