< 1 शमुवेल 5 >

1 आता पलिष्टयांनी देवाचा कोश घेतला होता तो त्यांनी एबन-एजराहून अश्दोदास नेला.
Tedy Filistynowie wzięli skrzynię Bożą, i zanieśli ją z Ebenezer do Azotu.
2 आणि पलिष्टयांनी देवाचा कोश घेतला तो त्यांनी दागोनाच्या देवळात नेऊन दागोनाच्याजवळ ठेवला.
Wziąwszy tedy Filistynowie onę skrzynię Bożą, wprowadzili ją do domu Dagonowego, i postawili ją podle Dagona.
3 जेव्हा अश्दोदकर दुसऱ्या दिवशी पहाटेस उठले, तेव्हा पाहा, परमेश्वराच्या कोशापुढे दागोन भूमीवर पालथा पडला होता. तेव्हा त्यांनी दागोन उचलून घेऊन त्याच्या ठिकाणी परत ठेवला.
A gdy rano wstali Azotczanie nazajutrz, oto, Dagon leżał twarzą swoją na ziemi przed skrzynią Pańską; i ponieśli Dagona, i postawili go na miejscu jego.
4 पण ते दुसऱ्या दिवशी पहाटेस उठल्यावर, पाहा, परमेश्वराच्या कोशापुढे दागोन भूमीवर पालथा पडला आहे आणि दागोनाचे डोके व त्याच्या हाताचे दोन्ही पंजे तुटलेले उंबऱ्यावर पडले आहेत. दागोनाचे धड तेवढे त्यास राहिले होते.
A gdy zaś wstali rano nazajutrz, oto, Dagon leżał twarzą swoją na ziemi przed skrzynią Pańską; a łeb Dagonowy i obie dłonie rąk jego ułamane były na progu, tylko sam pień Dagonowy został podle niej.
5 म्हणून, आजपर्यंत, दागोनाचे याजक व दागोनाच्या घरात येणारे ते अश्दोदकर दागोनाच्या उंबरठ्यावर पाय ठेवत नाहीत.
Przetoż nie wstępują kapłani Dagonowi, i wszyscy, którzy wchodzą do domu Dagonowego, na próg Dagonowy w Azocie, aż do dnia tego.
6 मग अश्दोदकरांवर परमेश्वराचा भारी हात पडला व त्याने त्यांचा नाश केला, म्हणजे अश्दोदाला आणि त्यांच्या प्रदेशातील लोकांस गाठींच्या पीडेने पीडले.
Tedy była ciężka ręka Pańska nad Azotczany, a gubiła je; bo je zarażała wrzodami na zadnicach, w Azocie i w granicach jego.
7 तेव्हा अश्दोदकरांनी जे काही घडत आहे ते ओळखले, ते म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश आम्हामध्ये राहू नये कारण त्याचा हात आम्हांवर व आमच्या दागोन देवाविरूद्ध भारी झाला आहे.”
A widząc mężowie z Azotu, co się działo, rzekli: Niechaj nie zostawa skrzynia Boga Izraelskiego z nami; albowiem sroga jest ręka jego przeciwko nam, i przeciwko Dagonowi, bogu naszemu.
8 मग त्यांनी माणसे पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना आपणाकडे एकवट करून म्हटले, “इस्राएलाच्या परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे?” ते बोलले, “इस्राएलाच्या देवाचा कोश गथाला न्यावा.” मग त्यांनी इस्राएलाच्या देवाचा कोश तेथे नेला.
A tak obesłali i zebrali wszystkie książęta Filistyńskie do siebie, i mówili: Cóż uczynimy z skrzynią Boga Izraelskiego? I odpowiedzieli: Do Gad niech będzie doprowadzona skrzynia Boga Izraelskiego; i odprowadzono tam skrzynię Boga Izraelskiego.
9 परंतु असे झाले की त्यांनी तो तेथे नेल्यावर, परमेश्वराचा हात त्याच्यावर पडून त्या नगरात मोठा गोंधळ उडाला. त्याने नगरातली लहान आणि मोठी माणसे यांना पीडले. आणि त्यांच्या अंगावर गाठी उठल्या.
A gdy ją odprowadzili, powstała ręka Pańska przeciw miastu trpieniem bardzo wielkiem, i zarażała męże miasta od małego aż do wielkiego, i naczyniło się im wrzodów na skrytych miejscach.
10 १० मग त्यांनी देवाचा कोश एक्रोनाला पाठवला; परंतु, असे झाले की, “देवाचा कोश एक्रोन येथे येताच एक्रोनकर ओरडून म्हणाले आम्हांला व आमच्या लोकांस मारायला इस्राएलाच्या देवाचा कोश त्यांनी आमच्याकडे आणला आहे.”
Odesłali tedy skrzynię Bożą do Akkaronu; a gdy przyszła skrzynia Boża do Akkaronu, krzyczeli Akkarończycy, mówiąc: Przyprowadzono do nas skrzynię Boga Izraelskiego, aby nas wymordowano z ludem naszym.
11 ११ मग त्यांनी माणसे पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना एकत्र केले; ते त्यांना म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश त्याच्याजागी परत पाठवून द्या, यासाठी की, त्याने आम्हास व आमच्या लोकांस मारू नये.” कारण तेथे सर्व नगरात मरणाचे भयंकर भय पसरले होते; देवाचा जबरदस्त हात त्यांच्यावर पडला होता.
Przetoż posławszy zgromadzili wszystkie książęta Filistyńskie, i rzekli: Odeślijcie skrzynię Boga Izraelskiego, a niech się wróci na miejsce swoje, i niech nas nie zabija i ludu naszego; bo był strach śmierci po wszystkiem mieście, a była tam bardzo ciężka ręka Boża.
12 १२ जी माणसे मरण पावली नाहीत त्यास त्यांना गाठीने पीडले, आणि नगराचा आक्रोश वर आकाशापर्यंत गेला.
A mężowie którzy nie pomarli, zarażeni byli wrzodami na zadnicy, tak, iż wstępował krzyk miasta do nieba.

< 1 शमुवेल 5 >