< 1 शमुवेल 4 >

1 आणि, शमुवेलाचा शब्द सर्व इस्राएलांकडे आला. आता इस्राएल पलिष्ट्यांशी लढायला गेले आणि त्यांनी एबन-एजराजवळ तळ दिला व पलिष्ट्यांनी अफेक येथे तळ दिला.
در آن زمان بین اسرائیلی‌ها و فلسطینی‌ها جنگ درگرفته بود. لشکر اسرائیلی‌ها نزدیک ابن‌عزر و لشکر فلسطینی‌ها در افیق اردو زده بودند.
2 पलिष्ट्यांनी इस्राएलाविरूद्ध लढाई केली; आणि लढाई पसरल्यावर इस्राएल पलिष्ट्यापुढे पराजित झाले; आणि त्यांनी रणांगणात सुमारे चार हजार पुरूष मारले.
فلسطینی‌ها، اسرائیلی‌ها را شکست داده، چهار هزار نفر از آنها را کشتند.
3 मग लोक छावणीत आल्यावर, इस्राएलांचे वडील म्हणाले, “आज परमेश्वराने आम्हांस पलिष्ट्यांच्यापुढे पराजित का केले? आपण परमेश्वराचा साक्षपटाचा कोश शिलोहून आपल्याकडे आणू, अशासाठी की त्याने येथे आम्हाबरोबर येऊन आमच्या शत्रूच्या सामर्थ्यापासून आम्हास सुरक्षित ठेवावे.”
وقتی اسرائیلی‌ها به اردوگاه خود بازمی‌گشتند، رهبران آنها از یکدیگر می‌پرسیدند که چرا خداوند اجازه داده است فلسطینی‌ها آنها را شکست دهند. سپس گفتند: «بیایید صندوق عهد را از شیلوه به اینجا بیاوریم. اگر آن را با خود به میدان جنگ ببریم، خداوند در میان ما خواهد بود و ما را از چنگ دشمنان نجات خواهد داد.»
4 मग लोकांनी शिलोकडे माणसे पाठवली, आणि करुबाच्या वर राहणारा सैन्यांचा परमेश्वर याच्या साक्षपटाचा कोश तेथून आणला आणि तेथे एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराच्या कराराच्या कोशाबरोबर होते.
پس آنها افرادی به شیلوه فرستادند تا صندوق عهد خداوند لشکرهای آسمان را که میان کروبیان جلوس کرده است، بیاورند. حفنی و فینحاس، پسران عیلی آنجا با صندوق عهد خدا بودند.
5 परमेश्वराच्या कराराचा कोश छावणीत आला, तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी असा मोठा जल्लोश केला की, भूमिही दणाणली.
اسرائیلی‌ها وقتی صندوق عهد را در میان خود دیدند، چنان فریاد بلندی برآوردند که زمین زیر پایشان لرزید!
6 तेव्हा पलिष्टी या मोठ्या ओरडण्याचा आवाज ऐकून म्हणाले, “इब्र्यांच्या छावणीत हा मोठा पुकारा कशाचा असेल?” मग त्यांना कळले की, परमेश्वराचा कोश छावणीत आला आहे.
فلسطینی‌ها گفتند: «در اردوی عبرانی‌ها چه خبر است که چنین فریاد می‌زنند؟» وقتی فهمیدند که اسرائیلی‌ها صندوق عهد خداوند را به اردوگاه آورده‌اند،
7 तेव्हा पलिष्टी घाबरले, कारण ते म्हणाले, “परमेश्वर छावणीत आला आहे आम्हास हायहाय! कारण असे कधी पूर्वी घडले नाही.
بسیار ترسیدند و گفتند: «خدا به اردوگاه آنها آمده است. وای بر ما! تا به حال چنین اتفاقی نیفتاده است.
8 आम्हास हायहाय! या समर्थ देवांच्या पराक्रमी हातातून आम्हास कोण सोडवील? ज्यांने मिसऱ्यांना रानांत सर्व वेगळ्याप्रकारच्या पीडांनी मारले तो परमेश्वर हाच आहे.
کیست که بتواند ما را از دست این خدایان قدرتمند برهاند؟ آنها همان خدایانی هستند که مصری‌ها را در بیابان با بلایا نابود کردند.
9 अहो पलिष्ट्यांनो धैर्य धरा, व शूर व्हा; जसे इब्री तुमचे दास झाले तसे तुम्ही त्यांचे दास होऊ नये म्हणून शूर होऊन लढा.”
ای فلسطینی‌ها با تمام نیرو بجنگید و گرنه اسیر این عبرانی‌ها خواهیم شد، همان‌گونه که آنها اسیر ما بودند.»
10 १० पलिष्टी लढले, आणि तेव्हा इस्राएलांचा पराभव झाला. ते प्रत्येकजण आपापल्या घराकडे पळून गेले व फार खूप मोठी हानी झाली कारण इस्राएलांचे तीस हजार पायदळ सैन्य मारले गेले.
پس فلسطینی‌ها جنگیدند و اسرائیل بار دیگر شکست خورد. در آن روز، سی هزار نفر از مردان اسرائیلی کشته شدند و بقیه به خیمه‌های خود گریختند.
11 ११ आणि त्यांनी देवाचा कोश घेतला आणि एलीचे दोन मुले हफनी व फिनहास हे मरण पावले.
صندوق عهد خدا به دست فلسطینی‌ها افتاد و حفنی و فینحاس، پسران عیلی نیز کشته شدند.
12 १२ त्यादिवशी एक बन्यामिनी पुरुष आपली वस्त्रे फाडून आपल्या मस्तकावर धूळ घालून सैन्यांतून शिलो येथे धावत आला.
همان روز، مردی از قبیلهٔ بنیامین از میدان جنگ گریخت و در حالی که لباس خود را پاره نموده و خاک بر سرش ریخته بود، به شیلوه آمد.
13 १३ आणि तो आला तेव्हा पाहा एली रस्त्याच्या बाजूला आपल्या आसनावर बसून वाट पाहत होता कारण देवाच्या कोशाकरिता काळजीने त्याचे मन कांपत होते; आणि त्या मनुष्याने नगरात येऊन ते वर्तमान सांगितले तेव्हा सर्व नगर मोठ्याने ओरडू लागले.
عیلی کنار راه نشسته و منتظر شنیدن خبر جنگ بود، زیرا برای صندوق عهد خدا نگران بود. چون قاصد، خبر جنگ را آورد و گفت که چه اتفاقی افتاده است ناگهان صدای شیون و زاری در شهر بلند شد.
14 १४ आणि एलीने ओरडण्याचा आवाज ऐकून म्हटले, “हा गोंगाटाचा शब्द काय आहे?” मग त्या मनुष्याने उतावळीने येऊन एलीला सांगितले.
وقتی عیلی صدای شیون را شنید، گفت: «چه خبر است؟» قاصد به طرف عیلی شتافت و آنچه را که اتفاق افتاده بود برایش تعریف کرد.
15 १५ तेव्हा एली अठ्ठ्याण्णव वर्षाचा होता आणि त्याचे डोळे मंद झाल्याने त्यास दिसत नव्हते?
(در این وقت، عیلی ۹۸ ساله و کور بود.)
16 १६ आणि तो पुरुष एलीला म्हणाला, “मी सैन्यातून पळून आलो.” मग हा म्हणाला, “माझ्या मुला काय झाले आहे?”
او به عیلی گفت: «من امروز از میدان جنگ فرار کرده، به اینجا آمده‌ام.» عیلی پرسید: «پسرم، چه اتفاقی افتاده است؟»
17 १७ तेव्हा ज्याने वर्तमान आणले होते, त्याने उत्तर देऊन म्हटले, “इस्राएल पलिष्ट्यापुढून पळाले व लोकांचा मोठा वध झाला आणि तुझे दोघे पुत्र हफनी व फिनहास हे मरण पावले आणि देवाचा कोश शत्रूने पळवून नेलेला आहे.”
او گفت: «اسرائیلی‌ها از فلسطینی‌ها شکست خورده‌اند و هزاران نفر از مردان جنگی ما کشته شده‌اند. دو پسر تو، حفنی و فینحاس مرده‌اند و صندوق عهد خدا نیز به دست فلسطینی‌ها افتاده است.»
18 १८ आणि असे झाले की, त्याने देवाच्या कोशाचा उल्लेख केला, इतक्यात हा आपल्या आसनावरून दाराच्या बाजूला मागे पडला. तो म्हातारा व जाड पुरुष असल्याने त्याची मान मोडून तो मेला. त्याने चाळीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला होता.
عیلی وقتی شنید که صندوق عهد به دست فلسطینی‌ها افتاده، از روی صندلی خود که در کنار دروازه بود، به پشت افتاد و چون پیر و چاق بود گردنش شکست و مرد. او چهل سال رهبر اسرائیل بود.
19 १९ तेव्हा त्याची सून फिनहासाची पत्नी गरोदर होती ती प्रसूत होणार होती; देवाचा कोश नेलेला आहे व आपला सासरा व आपला पती हे मरण पावले आहेत असे वर्तमान ऐकताच ती लवून प्रसूत झाली कारण तिला कळा लागल्या होत्या.
وقتی عروس عیلی، زن فینحاس، که حامله و نزدیک به زاییدن بود، شنید که صندوق عهد خدا گرفته شده و شوهر و پدر شوهرش نیز مرده‌اند، درد زایمانش شروع شد و زایید.
20 २० आणि तिच्या मरणाच्या वेळेस ज्या बाया तिच्याजवळ उभ्या होत्या त्यांनी तिला म्हटले, “भिऊ नको, कारण तू पुत्राला जन्म दिला आहे.” परंतु तिने उत्तर केले नाही व लक्ष दिले नाही.
زنانی که دور او بودند، گفتند: «ناراحت نباش پسر زاییدی.» اما او که در حال مرگ بود هیچ جوابی نداد و اعتنا ننمود.
21 २१ तिने मुलाचे नांव ईखाबोद असे ठेवून म्हटले की, “इस्राएलापासून वैभव निघून गेले आहे!” कारण देवाचा कोश पळवून नेलेला होता, आणि तिचा सासरा व तिचा पती हे मरण पावले होते.
فقط گفت: «نام او را ایخابُد بگذارید، زیرا شکوه و عظمت اسرائیل از بین رفته است.» ایخابد به معنی «بدون جلال» می‌باشد. او این نام را برگزید زیرا صندوق عهد خدا گرفته شده و شوهر و پدر شوهرش مرده بودند.
22 २२ आणि ती म्हणाली, “इस्राएलापासून वैभव गेले आहे, कारण देवाचा कोश नेलेला आहे.”
پس گفت: «جلال از اسرائیل رفت، زیرا صندوق خدا به اسارت رفته است.»

< 1 शमुवेल 4 >