< 1 शमुवेल 4 >
1 १ आणि, शमुवेलाचा शब्द सर्व इस्राएलांकडे आला. आता इस्राएल पलिष्ट्यांशी लढायला गेले आणि त्यांनी एबन-एजराजवळ तळ दिला व पलिष्ट्यांनी अफेक येथे तळ दिला.
Und Israel zog aus, den Philistern entgegen, zum Streit, und lagerte bei Ebeneser; und die Philister lagerten sich in Aphek.
2 २ पलिष्ट्यांनी इस्राएलाविरूद्ध लढाई केली; आणि लढाई पसरल्यावर इस्राएल पलिष्ट्यापुढे पराजित झाले; आणि त्यांनी रणांगणात सुमारे चार हजार पुरूष मारले.
Und die Philister stellten sich auf, und der Streit breitete sich aus, und Israel ward vor den Philistern geschlagen, und sie erschlugen ihrer in der Schlachtreihe auf dem Felde bei viertausend Mann.
3 ३ मग लोक छावणीत आल्यावर, इस्राएलांचे वडील म्हणाले, “आज परमेश्वराने आम्हांस पलिष्ट्यांच्यापुढे पराजित का केले? आपण परमेश्वराचा साक्षपटाचा कोश शिलोहून आपल्याकडे आणू, अशासाठी की त्याने येथे आम्हाबरोबर येऊन आमच्या शत्रूच्या सामर्थ्यापासून आम्हास सुरक्षित ठेवावे.”
Und das Volk kam in das Lager und die Ältesten Israels sprachen: Warum hat uns Jehovah heute vor den Philistern geschlagen? Lasset uns die Bundeslade Jehovahs von Schiloh zu uns holen, daß sie in unsere Mitte komme und uns rette von der Faust unserer Feinde.
4 ४ मग लोकांनी शिलोकडे माणसे पाठवली, आणि करुबाच्या वर राहणारा सैन्यांचा परमेश्वर याच्या साक्षपटाचा कोश तेथून आणला आणि तेथे एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराच्या कराराच्या कोशाबरोबर होते.
Und das Volk sandte gen Schiloh, und sie trugen von da die Bundeslade des Jehovah der Heerscharen her, Der über den Cheruben sitzt; und es waren allda Elis zwei Söhne bei der Bundeslade Gottes, Chophni und Pinechas.
5 ५ परमेश्वराच्या कराराचा कोश छावणीत आला, तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी असा मोठा जल्लोश केला की, भूमिही दणाणली.
Und es geschah, als die Bundeslade Jehovahs in das Lager kam, erhob ganz Israel ein großes Feldgeschrei, so daß die Erde dröhnte.
6 ६ तेव्हा पलिष्टी या मोठ्या ओरडण्याचा आवाज ऐकून म्हणाले, “इब्र्यांच्या छावणीत हा मोठा पुकारा कशाचा असेल?” मग त्यांना कळले की, परमेश्वराचा कोश छावणीत आला आहे.
Und die Philister hörten die Stimme des Feldgeschreis und sprachen: Was soll die Stimme solch großen Feldgeschreis im Lager der Hebräer? Und sie erfuhren, daß die Lade Jehovahs in das Lager gekommen sei.
7 ७ तेव्हा पलिष्टी घाबरले, कारण ते म्हणाले, “परमेश्वर छावणीत आला आहे आम्हास हायहाय! कारण असे कधी पूर्वी घडले नाही.
Und die Philister fürchteten sich, denn sie sprachen: Gott ist zum Lager gekommen, und sie sagten: Wehe uns! So etwas war nicht gestern und ehegestern.
8 ८ आम्हास हायहाय! या समर्थ देवांच्या पराक्रमी हातातून आम्हास कोण सोडवील? ज्यांने मिसऱ्यांना रानांत सर्व वेगळ्याप्रकारच्या पीडांनी मारले तो परमेश्वर हाच आहे.
Wehe uns, wer wird uns erretten von der Hand dieser gewaltigen Götter; das sind die Götter, die Ägypten mit allerlei Plagen in der Wüste geschlagen.
9 ९ अहो पलिष्ट्यांनो धैर्य धरा, व शूर व्हा; जसे इब्री तुमचे दास झाले तसे तुम्ही त्यांचे दास होऊ नये म्हणून शूर होऊन लढा.”
Seid wacker und seid Männer, ihr Philister, daß ihr nicht den Hebräern dient, wie sie euch gedient; seid Männer und streitet.
10 १० पलिष्टी लढले, आणि तेव्हा इस्राएलांचा पराभव झाला. ते प्रत्येकजण आपापल्या घराकडे पळून गेले व फार खूप मोठी हानी झाली कारण इस्राएलांचे तीस हजार पायदळ सैन्य मारले गेले.
Und die Philister stritten, und Israel ward geschlagen und sie flohen, jeder Mann nach seinem Zelt, und es war eine sehr große Schlacht; und von Israel fielen dreißigtausend vom Fußvolk.
11 ११ आणि त्यांनी देवाचा कोश घेतला आणि एलीचे दोन मुले हफनी व फिनहास हे मरण पावले.
Und die Lade Gottes ward genommen, und die zwei Söhne Elis, Chophni und Pinechas, starben.
12 १२ त्यादिवशी एक बन्यामिनी पुरुष आपली वस्त्रे फाडून आपल्या मस्तकावर धूळ घालून सैन्यांतून शिलो येथे धावत आला.
Und ein Mann von Benjamin lief aus der Schlachtreihe und kam an selbigem Tage gen Schiloh, und seine Obergewänder waren zerrissen und Erde auf sein Haupt gestreut.
13 १३ आणि तो आला तेव्हा पाहा एली रस्त्याच्या बाजूला आपल्या आसनावर बसून वाट पाहत होता कारण देवाच्या कोशाकरिता काळजीने त्याचे मन कांपत होते; आणि त्या मनुष्याने नगरात येऊन ते वर्तमान सांगितले तेव्हा सर्व नगर मोठ्याने ओरडू लागले.
Und er kam, und siehe, Eli saß auf dem Stuhle an der Seite des Weges und spähte; denn sein Herz erzitterte ob der Lade Gottes. Und der Mann kam hinein, es in der Stadt anzusagen, und die ganze Stadt schrie.
14 १४ आणि एलीने ओरडण्याचा आवाज ऐकून म्हटले, “हा गोंगाटाचा शब्द काय आहे?” मग त्या मनुष्याने उतावळीने येऊन एलीला सांगितले.
Und Eli hörte die Stimme des Geschreis und er sprach: Was soll die Stimme dieses Getümmels? Und der Mann eilte herzu und kam und sagte es Eli an.
15 १५ तेव्हा एली अठ्ठ्याण्णव वर्षाचा होता आणि त्याचे डोळे मंद झाल्याने त्यास दिसत नव्हते?
Und Eli war ein Mann von achtundneunzig Jahren, und seine Augen waren starr, daß er nicht mehr sehen konnte.
16 १६ आणि तो पुरुष एलीला म्हणाला, “मी सैन्यातून पळून आलो.” मग हा म्हणाला, “माझ्या मुला काय झाले आहे?”
Und der Mann sprach zu Eli: Ich bin aus der Schlachtreihe gekommen, und ich bin heute aus der Schlachtreihe geflohen. Und er sprach: Wie war die Sache, mein Sohn?
17 १७ तेव्हा ज्याने वर्तमान आणले होते, त्याने उत्तर देऊन म्हटले, “इस्राएल पलिष्ट्यापुढून पळाले व लोकांचा मोठा वध झाला आणि तुझे दोघे पुत्र हफनी व फिनहास हे मरण पावले आणि देवाचा कोश शत्रूने पळवून नेलेला आहे.”
Und es antwortete, der die Kunde brachte, und sprach: Israel ist vor den Philistern geflohen, und es war ein großes Schlachten unter dem Volke, und auch deine beiden Söhne, Chophni und Pinechas, sind tot, und die Lade Gottes ist genommen.
18 १८ आणि असे झाले की, त्याने देवाच्या कोशाचा उल्लेख केला, इतक्यात हा आपल्या आसनावरून दाराच्या बाजूला मागे पडला. तो म्हातारा व जाड पुरुष असल्याने त्याची मान मोडून तो मेला. त्याने चाळीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला होता.
Und es geschah, als er die Lade Gottes erwähnte, da fiel er rückwärts vom Stuhle an der Seite des Tores, und brach das Genick und starb; denn der Mann war alt und schwer. Und er hatte Israel vierzig Jahre gerichtet.
19 १९ तेव्हा त्याची सून फिनहासाची पत्नी गरोदर होती ती प्रसूत होणार होती; देवाचा कोश नेलेला आहे व आपला सासरा व आपला पती हे मरण पावले आहेत असे वर्तमान ऐकताच ती लवून प्रसूत झाली कारण तिला कळा लागल्या होत्या.
Und seine Schwiegertochter, des Pinechas Weib, war schwanger und am Gebären, und da sie das Gerücht hörte, daß die Lade Gottes genommen, und ihr Schwäher und ihr Mann tot wären, krümmte sie sich und gebar; denn Wehen hatten sich wider sie gekehrt.
20 २० आणि तिच्या मरणाच्या वेळेस ज्या बाया तिच्याजवळ उभ्या होत्या त्यांनी तिला म्हटले, “भिऊ नको, कारण तू पुत्राला जन्म दिला आहे.” परंतु तिने उत्तर केले नाही व लक्ष दिले नाही.
Und zur Zeit ihres Sterbens sprachen zu ihr, die um sie standen: Fürchte dich nicht, denn du hast einen Sohn geboren. Aber sie antwortete nicht und nahm es sich nicht zu Herzen.
21 २१ तिने मुलाचे नांव ईखाबोद असे ठेवून म्हटले की, “इस्राएलापासून वैभव निघून गेले आहे!” कारण देवाचा कोश पळवून नेलेला होता, आणि तिचा सासरा व तिचा पती हे मरण पावले होते.
Und sie nannte den Jungen I-Chabod und sprach: Die Herrlichkeit ist weggeführt von Israel, weil die Lade Gottes genommen war; und ihres Schwähers und ihres Mannes wegen.
22 २२ आणि ती म्हणाली, “इस्राएलापासून वैभव गेले आहे, कारण देवाचा कोश नेलेला आहे.”
Und sie sprach: Die Herrlichkeit ist von Israel weggeführt; denn die Lade Gottes ist genommen.