< 1 शमुवेल 31 >
1 १ पलिष्टी इस्राएलाशी लढले तेव्हा इस्राएल पलिष्ट्यांच्या पुढून पळून गिलबोवा डोंगरात मारून पडले.
さてペリシテびとはイスラエルと戦った。イスラエルの人々はペリシテびとの前から逃げ、多くの者は傷ついてギルボア山にたおれた。
2 २ पलिष्टी शौलाच्या व त्याच्या मुलांच्या पाठीस लागले; आणि पलिष्टयांनी शौलाचे पुत्र योनाथान व अबीनादाब व मलकीशुवा यांना जिवे मारले.
ペリシテびとはサウルとその子らに攻め寄り、そしてペリシテびとはサウルの子ヨナタン、アビナダブ、およびマルキシュアを殺した。
3 ३ शौलावर लढाई भारी पडली व धनुर्धाऱ्यांनी त्यास गाठले. आणि धनुर्धाऱ्यांमुळे तो फार संकटात पडला.
戦いは激しくサウルに迫り、弓を射る者どもがサウルを見つけて、彼を射たので、サウルは射る者たちにひどい傷を負わされた。
4 ४ तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तू आपली तलवार उपसून तिने मला आरपार भोसक नाही तर हे बेसुंती येऊन मला भोसकून माझी विटंबना करतील.” परंतु त्याचा शस्त्रवाहक मान्य होईना, कारण तो फार भ्याला. म्हणून शौल आपली तलवार घेऊन तिच्यावर पडला.
そこでサウルはその武器を執る者に言った、「つるぎを抜き、それをもってわたしを刺せ。さもないと、これらの無割礼の者どもがきて、わたしを刺し、わたしをなぶり殺しにするであろう」。しかしその武器を執る者は、ひじょうに恐れて、それに応じなかったので、サウルは、つるぎを執って、その上に伏した。
5 ५ शौल मेला हे पाहून त्याचा शस्त्रवाहकही त्याच्याप्रमाणेच आपल्या तलवारीवर पडून मेला.
武器を執る者はサウルが死んだのを見て、自分もまたつるぎの上に伏して、彼と共に死んだ。
6 ६ असे त्या दिवशी शौल, त्याचे तिघे पुत्र, व त्याचा शस्त्रवाहक आणि त्याचे सर्व लोक एकदम मरण पावले.
こうしてサウルとその三人の子たち、およびサウルの武器を執る者、ならびにその従者たちは皆、この日共に死んだ。
7 ७ इस्राएलांची माणसे पळाली आणि शौल व त्याचे पुत्र मरण पावले, हे इस्राएलाची माणसे खोऱ्याच्या पलीकडे व यार्देनेच्या पलीकडे होती त्यांनी पाहिले; तेव्हा ती आपली नगरे सोडून पळाली; मग पलिष्टी येऊन त्यामध्ये राहिले.
イスラエルの人々で、谷の向こう側、およびヨルダンの向こう側にいる者が、イスラエルの人々の逃げるのを見、またサウルとその子たちの死んだのを見て町々を捨てて逃げたので、ペリシテびとはきてその中に住んだ。
8 ८ दुसऱ्या दिवशी असे झाले की, पलिष्टी मेलेल्यांची वस्त्रे लुटायला आले तेव्हा त्यांना शौल व त्याचे तिघे पुत्र गिलबोवा डोंगरात पडलेले सापडले.
あくる日、ペリシテびとは殺された者から、はぎ取るためにきたが、サウルとその三人の子たちがギルボア山にたおれているのを見つけた。
9 ९ तेव्हा त्यांनी त्यांचे शिर छेदून त्याची शस्त्रे काढली आणि पलिष्ट्यांच्या देशात चहूकडे त्यांच्या मूर्तीच्या देवळात व लोकांस हे वर्तमान कळवायला त्यांनी माणसे पाठवली.
彼らはサウルの首を切り、そのよろいをはぎ取り、ペリシテびとの全地に人をつかわして、この良い知らせを、その偶像と民とに伝えさせた。
10 १० त्यांनी त्याची शस्त्रे अष्टारोथाच्या मंदिरात ठेवली आणि त्यांनी त्यांचे प्रेत बेथ-शानाच्या भिंतीस टांगले.
また彼らは、そのよろいをアシタロテの神殿に置き、彼のからだをベテシャンの城壁にくぎづけにした。
11 ११ पलिष्ट्यांनी शौलाला जे केले त्याविषयी जेव्हा याबेश-गिलादाच्या रहिवाश्यांनी ऐकले;
ヤベシ・ギレアデの住民たちは、ペリシテびとがサウルにした事を聞いて、
12 १२ तेव्हा सर्व शूर पुरुष उठून रात्रभर चालत गेले आणि त्यांनी शौलाचे प्रेत व त्याच्या मुलांची प्रेते बेथ-शानाच्या भिंतीवरून काढून याबेशाला आणले व तेथे ती जाळली.
勇士たちはみな立ち、夜もすがら行って、サウルのからだと、その子たちのからだをベテシャンの城壁から取りおろし、ヤベシにきて、これをそこで焼き、
13 १३ मग त्यांनी त्यांची हाडे घेऊन याबेशात चिचेंच्या झाडाखाली पुरली आणि सात दिवस उपास केला.
その骨を取って、ヤベシのぎょりゅうの木の下に葬り、七日の間、断食した。