< 1 शमुवेल 31 >

1 पलिष्टी इस्राएलाशी लढले तेव्हा इस्राएल पलिष्ट्यांच्या पुढून पळून गिलबोवा डोंगरात मारून पडले.
ペリシテ人イスラエルと戰ふイスラエルの人々ペリシテ人のまへより逃げ負傷者ギルボア山に斃れたり
2 पलिष्टी शौलाच्या व त्याच्या मुलांच्या पाठीस लागले; आणि पलिष्टयांनी शौलाचे पुत्र योनाथान व अबीनादाब व मलकीशुवा यांना जिवे मारले.
ペリシテ人サウルと其子等に攻よりペリシテ人サウルの子ヨナタン、アビナダブおよびマルキシユアを殺したり
3 शौलावर लढाई भारी पडली व धनुर्धाऱ्यांनी त्यास गाठले. आणि धनुर्धाऱ्यांमुळे तो फार संकटात पडला.
戰はげしくサウルにせまりて射手の者サウルを射とめければ彼痛く射手の者のために苦しめり
4 तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तू आपली तलवार उपसून तिने मला आरपार भोसक नाही तर हे बेसुंती येऊन मला भोसकून माझी विटंबना करतील.” परंतु त्याचा शस्त्रवाहक मान्य होईना, कारण तो फार भ्याला. म्हणून शौल आपली तलवार घेऊन तिच्यावर पडला.
サウル武器を執る者にいひけるは爾の劍を抜き其をもて我を刺とほせ恐らくは是等の割禮なき者きたりて我を刺し我をはづかしめんと然ども武器をとるもの痛くおそれて肯ぜざればサウル劍をとりて其上に伏したり
5 शौल मेला हे पाहून त्याचा शस्त्रवाहकही त्याच्याप्रमाणेच आपल्या तलवारीवर पडून मेला.
武器を執るものサウルの死たるを見ておのれも劍の上にふしてかれとともに死り
6 असे त्या दिवशी शौल, त्याचे तिघे पुत्र, व त्याचा शस्त्रवाहक आणि त्याचे सर्व लोक एकदम मरण पावले.
かくサウルと其三人の子およびサウルの武器をとるもの並に其從者みな此日倶に死り
7 इस्राएलांची माणसे पळाली आणि शौल व त्याचे पुत्र मरण पावले, हे इस्राएलाची माणसे खोऱ्याच्या पलीकडे व यार्देनेच्या पलीकडे होती त्यांनी पाहिले; तेव्हा ती आपली नगरे सोडून पळाली; मग पलिष्टी येऊन त्यामध्ये राहिले.
イスラエルの人々の谷の對向にをるもの及びヨルダンの對面にをるものイスラエルの人々の逃るを見サウルと其子等の死るをみて諸邑を棄て逃ければペリシテ人きたりて其中にをる
8 दुसऱ्या दिवशी असे झाले की, पलिष्टी मेलेल्यांची वस्त्रे लुटायला आले तेव्हा त्यांना शौल व त्याचे तिघे पुत्र गिलबोवा डोंगरात पडलेले सापडले.
明日ペリシテ人戰沒せる者を剥んとてきたりサウルと其三人の子のギルボア山にたふれをるを見たり
9 तेव्हा त्यांनी त्यांचे शिर छेदून त्याची शस्त्रे काढली आणि पलिष्ट्यांच्या देशात चहूकडे त्यांच्या मूर्तीच्या देवळात व लोकांस हे वर्तमान कळवायला त्यांनी माणसे पाठवली.
彼等すなはちサウルの首を斬り其鎧甲をはぎとりペリシテ人の地の四方につかはして此好報を其偶像の家および民の中につげしむ
10 १० त्यांनी त्याची शस्त्रे अष्टारोथाच्या मंदिरात ठेवली आणि त्यांनी त्यांचे प्रेत बेथ-शानाच्या भिंतीस टांगले.
またかれら其鎧甲をアシタロテの家におき其體をベテシヤンの城垣に釘けたり
11 ११ पलिष्ट्यांनी शौलाला जे केले त्याविषयी जेव्हा याबेश-गिलादाच्या रहिवाश्यांनी ऐकले;
ヤベシギレアデの人々ペリシテ人のサウルになしたる事を聞きしかば
12 १२ तेव्हा सर्व शूर पुरुष उठून रात्रभर चालत गेले आणि त्यांनी शौलाचे प्रेत व त्याच्या मुलांची प्रेते बेथ-शानाच्या भिंतीवरून काढून याबेशाला आणले व तेथे ती जाळली.
勇士みなおこり終夜ゆきてサウルの體と其子等の體をベテシヤンの城垣よりとりおろしヤベシにいたりて之を其處に焚き
13 १३ मग त्यांनी त्यांची हाडे घेऊन याबेशात चिचेंच्या झाडाखाली पुरली आणि सात दिवस उपास केला.
其骨をとりてヤベシの柳樹の下にはうむり七日のあひだ斷食せり

< 1 शमुवेल 31 >