< 1 शमुवेल 30 >
1 १ असे झाले की, दावीद व त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलागास आली तेव्हा अमालेकी यांनी दक्षिण प्रदेशावर व सिकलागावर घाला घातला होता आणि त्यांनी सिकलागचा पाडाव करून ते अग्नीने जाळले होते.
Et comme David et ses gens rentraient à Sécelac, le troisième jour, il était arrivé qu'Amalec, ayant fait une incursion contre le midi de Sécelac, avait pris et incendié cette ville.
2 २ त्यातल्या स्त्रिया व त्यामध्ये जे लहान मोठे होते त्या सर्वांना त्यांनी धरून नेले होते; त्यांनी कोणालाही जिवे मारले नव्हते, पण त्यांना घेऊन आपल्या वाटेने गेले.
Sans y tuer toutefois ni petit, ni grand, ni homme, ni femme, ni rien qui eût vie. Ils emmenaient donc les habitants captifs, et s'en retournaient par le chemin qui conduit chez eux.
3 ३ तर दावीद व त्याची माणसे नगराजवळ आली तेव्हा पाहा ते अग्नीने जाळलेले आहे आणि त्यांच्या स्त्रिया आणि त्यांचे पुत्र व त्यांच्या मुली धरून नेलेल्या आहेत असे त्यांनी पाहिले.
Quand David et ses hommes rentrèrent dans la ville, voilà qu'elle était brûlée, et que leurs femmes, leurs fils et leurs filles, s'en allaient en captivité.
4 ४ तेव्हा दावीद व त्याच्याजवळचे लोक हेल काढून इतके रडले की आणखी रडायला त्यांना शक्ती राहिली नाही.
A cette vue, David et ses gens élevèrent la voix, et ils pleurèrent jusqu'à ce qu'ils n'eussent plus de force pour pleurer.
5 ५ दावीदाच्या दोघी स्त्रिया अहीनवाम इज्रेलीण व पूर्वी नाबाल कर्मेली याची पत्नी होती ती अबीगईल या धरून नेलेल्या होत्या.
Or, les deux femmes de David étaient captives, Achinaam la Jezraélite, et Abigaïl, femme de Nabal du Carmel.
6 ६ तेव्हा दावीद मोठ्या संकटात पडला कारण त्यास धोंडमार करावा असे लोक बोलू लागले; कारण सर्व मनुष्यांचे जीव आपल्या मुलांसाठी व आपल्या मुलींसाठी दु: खित झाले होते; परंतु दावीदाने आपला देव परमेश्वर याच्याकडून आपणाला सशक्त केले.
Et David fut accablé de douleur; car le peuple parlait de le lapider, tant chacun avait de chagrin dans l'âme, à cause de ses fils et de ses filles. Mais David se fortifia en Dieu son Seigneur.
7 ७ मग दावीद अहीमलेखाचा मुलगा अब्याथार याजक याला म्हणाला, एफोद माझ्याकडे आण. मग अब्याथाराने एफोद दावीदाकडे आणले.
Et il dit à Abiathar le prêtre, fils d'Abimélech: Apporte l'éphod.
8 ८ दावीदाने परमेश्वरास विचारले, तो म्हणाला, “जर मी या सैन्याच्या पाठीस लागलो तर मी त्यांना गाठेन काय?” त्याने त्यास उत्तर दिले की, “पाठीस लाग कारण खचित तू त्यांना गाठशील व सर्वांना सोडवून घेशील.”
Et David consulta le Seigneur, disant: Si je poursuis ces gens, les atteindrai-je? Et le Seigneur lui répondit: Poursuis-les, tu les atteindras, et tu les extermineras.
9 ९ मग दावीद त्याच्याकडील सहाशे पुरुष घेऊन बसोर नदीजवळ पोहचला. जे मागे ठेवले होते ते तेथे राहिले.
Ainsi, David partit en personne avec les six cents hommes de sa troupe; ils allèrent jusqu'au torrent de Bosor; là, une partie d'entre eux s'arrêta.
10 १० तेव्हा दावीद व चारशे माणसे शत्रूच्या पाठीस लागली. कारण दोनशे माणसे तेथे थांबली; ती इतकी थकली होती की त्यांच्याने बसोर नदीच्या पलीकडे जाववेना.
Et il continua de s'avancer avec quatre cents hommes, et il en laissa deux cents campés sur la rive du Bosor.
11 ११ रानांत एक मिसरी त्यांना आढळला. तेव्हा त्यांनी त्यास दावीदाकडे आणले. मग त्यांनी त्यास भाकर दिली आणि ती त्याने खाल्ली व त्यांनी त्यास पाणी पाजले.
Et ses hommes trouvèrent dans les champs un Égyptien qu'ils saisirent et lui amenèrent; on lui donna du pain, il mangea, et on lui fit boire de l'eau.
12 १२ मग त्यांनी अंजिराच्या ढेपेचा तुकडा व द्राक्षाचे दोन घड त्यास दिले मग त्याने खाल्ल्यावर त्याच्या जिवात जीव आला कारण तीन दिवस व तीन रात्री त्याने भाकर खाल्ली नव्हती पाणीही तो प्याला नव्हता.
On lui donna en outre un cabas de figues; il en mangea, et ses esprits se ranimèrent; car, depuis trois jours et trois nuits, il n'avait ni bu ni mangé.
13 १३ तेव्हा दावीद त्यास म्हणाला, “तू कोणाचा? कोठला आहेस?” त्याने म्हटले, “मी मिसरी तरुण एका अमालेकी मनुष्याचा चाकर आहे: तीन दिवसामागे मी दुखण्यात पडलो म्हणून माझ्या धन्याने मला सोडले.
Et David lui dit: A qui appartiens-tu? D'où es-tu? Le jeune Égyptien répondit: Je suis serviteur d'un Amalécite; mon maître m'a abandonné, parce que, depuis trois jours, j'étais malade.
14 १४ आम्ही करेथी यांच्या दक्षिण प्रदेशावर व यहूदाच्या प्रांतावर व कालेबाच्या दक्षिण प्रदेशावर घाला घातला आणि सिकलाग आम्ही अग्नीने जाळले.”
Nous avons fait une incursion au midi de Chéléthi, de la Judée, et de Chélab; puis, nous avons incendié Sécelac.
15 १५ मग दावीद त्यास म्हणाला, “तू मला या टोळीकडे खाली नेशील काय?” त्याने म्हटले, “तुम्ही मला जिवे मारणार नाही व माझ्या धन्याच्या हाती मला देणार नाही अशी देवाची शपथ माझ्याशी वाहा म्हणजे मी तुम्हास या टोळीकडे खाली नेईन.”
David lui dit: Pourrais-tu me conduire où sont ces gens? A quoi il répondit: Jure-moi par ton Dieu que tu ne me feras point mourir, et que tu ne me livreras pas à mon maître, aussitôt je te conduirai contre ces gens.
16 १६ त्याने त्यांना खाली नेले, तेव्हा पाहा ते लोक अवघ्या भूमीवर पसरून खात व पीत व नाचत होते कारण त्यांनी पलिष्ट्यांच्या देशातून व यहूद्याच्या देशातून पुष्कळ लूट घेतली होती.
Et le jeune homme l'y conduisit. Or, voilà que les Amalécites étaient dispersés sur la face de toute leur terre, mangeant, buvant, et faisant fête de toutes les grandes dépouilles qu'ils avaient rapportées, tant du territoire des Philistins que de celui de Juda.
17 १७ दावीद पहाटेपासून दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत त्यांना मारीत गेला; त्यांच्यातील चारशे तरुण माणसे उंटावर बसून पळाली. त्यांच्याशिवाय त्यांच्यातला कोणीएक सुटला नाही.
David fondit sur eux, et il les tailla en pièces, depuis le lever de l'aurore jusqu'au crépuscule, et encore le lendemain; pas un seul homme n'échappa, hormis quatre cents jeunes garçons, qui montaient des chamelles, et qui s'enfuirent.
18 १८ जे सर्व अमालेक्यांनी नेले होते ते दावीदाने सोडवले व आपल्या दोघी स्त्रिया सोडवल्या.
David recouvra tout ce qu'avaient pris les Amalécites, et il ramena ses deux femmes.
19 १९ लहान किंवा मोठा, मुले किंवा मुली व लूट किंवा जे सर्व त्यांनी नेले होते त्यातले काहीच त्यांनी गमावले नाही; दावीदाने सर्व माघारी आणले.
Et nulle chose, grande ou petite, ne fut perdue; et les dépouilles, les fils et les filles, et tout ce qui leur avait été enlevé, David le recouvra en entier.
20 २० अवघी मेंढरे व गुरे दावीदाने घेतली; ती त्यांनी इतर सामानापुढे हाकून म्हटले, “ही दावीदाची लूट आहे.”
De plus, il s'empara de toutes les brebis, de tous les bœufs, et il les fit marcher devant les dépouilles qu'ils venaient de reprendre; et, au sujet de ce butin repris, on disait: Voici les dépouilles de David.
21 २१ मग जी दोनशे माणसे थकल्यामुळे दावीदाच्या मागे गेली नाहीत, ज्यांना त्याने बसोर नदीपाशी ठेवले होते, त्यांच्याकडे दावीद आला तेव्हा ती दावीदाला भेटायला व त्यांच्याबरोबरच्या लोकांस भेटायला सामोरी आली आणि दावीदाने त्या मनुष्यांजवळ येऊन त्यांना त्यांचे कुशल विचारले.
Il arriva ainsi vers les deux cents hommes qu'il avait dispensés de le suivre, et qu'il avait postés sur le torrent de Bosor; ils allèrent à la rencontre de David et de sa troupe; lui-même s'avança près d'eux, et ils le saluèrent,
22 २२ तेव्हा जी माणसे दावीदाबरोबर गेली होती त्यांच्यापैकी जी वाईट व दुष्ट होती. ती सर्व असे म्हणू लागली की, “ही माणसे आम्हाबरोबर आली नाहीत म्हणून जी लूट आम्ही सोडवली तिच्यातले काही आम्ही त्यांना देणार नाही; फक्त प्रत्येकाला ज्याची त्याची बायकापोरे मात्र देऊ. मग त्यांनी ती घेऊन निघून जावे.”
Et tous les hommes de pestilence, les méchants, parmi ceux qui venaient de combattre avec David, se récrièrent, et dirent: Parce qu'ils n'ont point avec nous poursuivi l'ennemi, nous ne leur donnerons rien des dépouilles que nous ramenons; qu'ils se contentent de reprendre chacun leur femme et leurs enfants, et qu'ils s'en aillent.
23 २३ तेव्हा दावीद म्हणाला, “माझ्या भावांनो जे परमेश्वराने आम्हांला दिले आहे त्याचे असे करू नका. कारण त्याने आम्हास संभाळले व जी टोळी आम्हावर आली ती आमच्या हाती दिली.
Et David dit: Vous ne ferez point cela, après que le Seigneur nous a pris sous sa garde, et nous a livré l'Amalécite; car le Seigneur nous a livré ces gens qui nous avaient envahis.
24 २४ या गोष्टीविषयी तुमचे कोण ऐकेल? जो लढाईत गेला त्याचा जसा वाटा तसा जो सामानाजवळ राहतो त्याचा वाटा होईल; त्यांना सारखाच वाटा मिळेल.”
Et qui donc écouterait de tels discours? Ceux qui sont restés auprès des bagages ne sont pas moins que vous; ils auront une part égale à celle des combattants; ils partageront également.
25 २५ त्या दिवसापासून पुढे तोच नियम झाला; त्याने तसा नियम व रीत इस्राएलात आजपर्यंत करून ठेवली.
A partir de ce jour-là, on a toujours fait ainsi; c'est devenu chez Israël une loi, une ordonnance, qui s'observe encore aujourd'hui.
26 २६ दावीद सिकलागास आला तेव्हा त्याने यहूदाच्या वडिलांकडे आपल्या मित्रांकडे लुटीतले काही पाठवून सांगितले की, “पाहा परमेश्वराच्या शत्रूंच्या लुटीतून तुम्हास ही भेट आहे.”
David revint à Sécelac, et il envoya une part des dépouilles aux anciens de Juda et à ses voisins les plus proches, disant: Voici des dépouilles des ennemis du Seigneur,
27 २७ जे बेथेलात होते त्यांना जे दक्षिण प्रदेशातील रामोथात होते त्यांना, व जे यत्तीरात होते त्यांना;
Pour ceux de Bethsur, pour ceux du midi de Rhama, pour ceux de Géthor,
28 २८ जे अरोएरात होते त्यांना, व जे सिफमोथात होते त्यांना, व जे एष्टमोत होते त्यांना,
Pour ceux d'Aroer, pour ceux d'Ammadi, pour ceux de Saphi, pour ceux d'Esthié,
29 २९ जे राखासांत होते त्यांना, व जे येरहमेली यांच्या नगरांत होते त्यांना, व जे केनी यांच्या नगरांत होते त्यांना,
Pour ceux de Geth, pour ceux de Cimath, pour ceux de Saphec, pour ceux de Thémath, pour ceux du Carmel, pour ceux des villes de Jérémiel, pour ceux des villes de Cénézi,
30 ३० जे हर्मात होते त्यांना, व जे कोराशानात होते त्यांना, व जे अथाखात होते त्यांना,
Pour ceux de Jérimuth, pour ceux de Bersabée, pour ceux de Nomba,
31 ३१ आणि जे हेब्रोनात होते त्यांना, जेथे दावीद व त्याची माणसे फिरत असत त्या सर्व ठिकाणाकडे त्याने लुटीतले काही पाठवले.
Pour ceux d'Hébron et pour ceux de tous les lieux où David avec ses hommes a passé.