< 1 शमुवेल 30 >

1 असे झाले की, दावीद व त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलागास आली तेव्हा अमालेकी यांनी दक्षिण प्रदेशावर व सिकलागावर घाला घातला होता आणि त्यांनी सिकलागचा पाडाव करून ते अग्नीने जाळले होते.
And when David and his men had arrived at Ziklag on the third day, the Amalekites had made an attack on the south side against Ziklag. And they had struck Ziklag, and burned it with fire.
2 त्यातल्या स्त्रिया व त्यामध्ये जे लहान मोठे होते त्या सर्वांना त्यांनी धरून नेले होते; त्यांनी कोणालाही जिवे मारले नव्हते, पण त्यांना घेऊन आपल्या वाटेने गेले.
And they had led the women in it away as captives, from the small to the great. And they had not killed anyone, but they led them away with them. And then they traveled on their journey.
3 तर दावीद व त्याची माणसे नगराजवळ आली तेव्हा पाहा ते अग्नीने जाळलेले आहे आणि त्यांच्या स्त्रिया आणि त्यांचे पुत्र व त्यांच्या मुली धरून नेलेल्या आहेत असे त्यांनी पाहिले.
Therefore, when David and his men had arrived at the city, and had found it burned with fire, and that their wives and their sons and daughters had been led away as captives,
4 तेव्हा दावीद व त्याच्याजवळचे लोक हेल काढून इतके रडले की आणखी रडायला त्यांना शक्ती राहिली नाही.
David and the people who were with him lifted up their voices. And they mourned until the tears in them failed.
5 दावीदाच्या दोघी स्त्रिया अहीनवाम इज्रेलीण व पूर्वी नाबाल कर्मेली याची पत्नी होती ती अबीगईल या धरून नेलेल्या होत्या.
For indeed, the two wives of David also had been led away as captives: Ahinoam, the Jezreelite, and Abigail, the wife of Nabal of Carmel.
6 तेव्हा दावीद मोठ्या संकटात पडला कारण त्यास धोंडमार करावा असे लोक बोलू लागले; कारण सर्व मनुष्यांचे जीव आपल्या मुलांसाठी व आपल्या मुलींसाठी दु: खित झाले होते; परंतु दावीदाने आपला देव परमेश्वर याच्याकडून आपणाला सशक्त केले.
And David was greatly saddened. And the people were willing to stone him, because the soul of every man was bitter over his sons and daughters. But David was strengthened by the Lord his God.
7 मग दावीद अहीमलेखाचा मुलगा अब्याथार याजक याला म्हणाला, एफोद माझ्याकडे आण. मग अब्याथाराने एफोद दावीदाकडे आणले.
And he said to the priest Abiathar, the son of Ahimelech, “Bring the ephod to me.” And Abiathar brought the ephod to David.
8 दावीदाने परमेश्वरास विचारले, तो म्हणाला, “जर मी या सैन्याच्या पाठीस लागलो तर मी त्यांना गाठेन काय?” त्याने त्यास उत्तर दिले की, “पाठीस लाग कारण खचित तू त्यांना गाठशील व सर्वांना सोडवून घेशील.”
And David consulted the Lord, saying, “Shall I pursue these robbers, and will I overtake them, or not?” And the Lord said to him: “Pursue. For without doubt, you will overtake them and find the prey.”
9 मग दावीद त्याच्याकडील सहाशे पुरुष घेऊन बसोर नदीजवळ पोहचला. जे मागे ठेवले होते ते तेथे राहिले.
Therefore, David went away, he and the six hundred men who were with him, and they arrived as far as the torrent Besor. And certain ones, being weary, stayed there.
10 १० तेव्हा दावीद व चारशे माणसे शत्रूच्या पाठीस लागली. कारण दोनशे माणसे तेथे थांबली; ती इतकी थकली होती की त्यांच्याने बसोर नदीच्या पलीकडे जाववेना.
But David pursued, he and four hundred men. For two hundred stayed, who, being weary, were not able to cross the torrent Besor.
11 ११ रानांत एक मिसरी त्यांना आढळला. तेव्हा त्यांनी त्यास दावीदाकडे आणले. मग त्यांनी त्यास भाकर दिली आणि ती त्याने खाल्ली व त्यांनी त्यास पाणी पाजले.
And they found an Egyptian man in the field, and they led him to David. And they gave him bread, so that he might eat, and water, so that he might drink,
12 १२ मग त्यांनी अंजिराच्या ढेपेचा तुकडा व द्राक्षाचे दोन घड त्यास दिले मग त्याने खाल्ल्यावर त्याच्या जिवात जीव आला कारण तीन दिवस व तीन रात्री त्याने भाकर खाल्ली नव्हती पाणीही तो प्याला नव्हता.
and also a section of a mass of dried figs, and two clusters of dried grapes. And when he had eaten, his spirit returned, and he was refreshed. For he had not eaten bread, nor drank water, for three days and three nights.
13 १३ तेव्हा दावीद त्यास म्हणाला, “तू कोणाचा? कोठला आहेस?” त्याने म्हटले, “मी मिसरी तरुण एका अमालेकी मनुष्याचा चाकर आहे: तीन दिवसामागे मी दुखण्यात पडलो म्हणून माझ्या धन्याने मला सोडले.
And so David said to him: “To whom do you belong? Or where are you from? And where are you going?” And he said: “I am a young man of Egypt, the servant of an Amalekite man. But my lord abandoned me, because I began to be sick the day before yesterday.
14 १४ आम्ही करेथी यांच्या दक्षिण प्रदेशावर व यहूदाच्या प्रांतावर व कालेबाच्या दक्षिण प्रदेशावर घाला घातला आणि सिकलाग आम्ही अग्नीने जाळले.”
For indeed, we broke forth to the southern side of Cherethi, and against Judah, and to the south of Caleb, and we burned Ziklag with fire.”
15 १५ मग दावीद त्यास म्हणाला, “तू मला या टोळीकडे खाली नेशील काय?” त्याने म्हटले, “तुम्ही मला जिवे मारणार नाही व माझ्या धन्याच्या हाती मला देणार नाही अशी देवाची शपथ माझ्याशी वाहा म्हणजे मी तुम्हास या टोळीकडे खाली नेईन.”
And David said to him, “Are you able to lead me to this battle line?” And he said, “Swear to me by God that you will not kill me, and that you will not deliver me into the hands of my lord, and I will lead you to this battle line.” And David swore to him.
16 १६ त्याने त्यांना खाली नेले, तेव्हा पाहा ते लोक अवघ्या भूमीवर पसरून खात व पीत व नाचत होते कारण त्यांनी पलिष्ट्यांच्या देशातून व यहूद्याच्या देशातून पुष्कळ लूट घेतली होती.
And when he had led him, behold, they were stretched out on the face of the land everywhere, eating and drinking and celebrating, as if it were a feast day, because of all the prey and spoils that they had taken from the land of the Philistines, and from the land of Judah.
17 १७ दावीद पहाटेपासून दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत त्यांना मारीत गेला; त्यांच्यातील चारशे तरुण माणसे उंटावर बसून पळाली. त्यांच्याशिवाय त्यांच्यातला कोणीएक सुटला नाही.
And David struck them down from evening until the evening of the next day. And no one among them escaped, except four hundred youths, who had climbed on camels and fled.
18 १८ जे सर्व अमालेक्यांनी नेले होते ते दावीदाने सोडवले व आपल्या दोघी स्त्रिया सोडवल्या.
Therefore, David rescued all that the Amalekites had taken, and he rescued his two wives.
19 १९ लहान किंवा मोठा, मुले किंवा मुली व लूट किंवा जे सर्व त्यांनी नेले होते त्यातले काहीच त्यांनी गमावले नाही; दावीदाने सर्व माघारी आणले.
And nothing was missing, from small even to great, among the sons and daughters, and among the spoils, and among everything whatsoever that they had seized. David returned it all.
20 २० अवघी मेंढरे व गुरे दावीदाने घेतली; ती त्यांनी इतर सामानापुढे हाकून म्हटले, “ही दावीदाची लूट आहे.”
And he took all the flocks and the herds, and he drove them before his face. And they said, “This is the prey of David.”
21 २१ मग जी दोनशे माणसे थकल्यामुळे दावीदाच्या मागे गेली नाहीत, ज्यांना त्याने बसोर नदीपाशी ठेवले होते, त्यांच्याकडे दावीद आला तेव्हा ती दावीदाला भेटायला व त्यांच्याबरोबरच्या लोकांस भेटायला सामोरी आली आणि दावीदाने त्या मनुष्यांजवळ येऊन त्यांना त्यांचे कुशल विचारले.
Then David arrived at the two hundred men, who, being weary, had stayed, for they had not been able to follow David, and he had ordered them to remain at the torrent Besor. And they went out to meet David, and the people who were with him. Then David, drawing near to the people, greeted them peacefully.
22 २२ तेव्हा जी माणसे दावीदाबरोबर गेली होती त्यांच्यापैकी जी वाईट व दुष्ट होती. ती सर्व असे म्हणू लागली की, “ही माणसे आम्हाबरोबर आली नाहीत म्हणून जी लूट आम्ही सोडवली तिच्यातले काही आम्ही त्यांना देणार नाही; फक्त प्रत्येकाला ज्याची त्याची बायकापोरे मात्र देऊ. मग त्यांनी ती घेऊन निघून जावे.”
And all the wicked and iniquitous men, out of the men who had gone with David, responding, said: “Since they did not go with us, we will not give to them anything from the prey that we have rescued. But let his wife and children be enough for each of them; when they have accepted this, they may go back.”
23 २३ तेव्हा दावीद म्हणाला, “माझ्या भावांनो जे परमेश्वराने आम्हांला दिले आहे त्याचे असे करू नका. कारण त्याने आम्हास संभाळले व जी टोळी आम्हावर आली ती आमच्या हाती दिली.
But David said: “You shall not do this, my brothers, with these things that the Lord has delivered to us, for he has preserved us, and he has given into our hands the robbers who broke out among us.
24 २४ या गोष्टीविषयी तुमचे कोण ऐकेल? जो लढाईत गेला त्याचा जसा वाटा तसा जो सामानाजवळ राहतो त्याचा वाटा होईल; त्यांना सारखाच वाटा मिळेल.”
And so, let no one heed you over these words. But equal shall be the portion of him who descended to the battle, and of him who remained with the supplies, and they will divide it alike.”
25 २५ त्या दिवसापासून पुढे तोच नियम झाला; त्याने तसा नियम व रीत इस्राएलात आजपर्यंत करून ठेवली.
And this has been done from that day and thereafter. And it was established as a statute, and as if a law, in Israel even to this day.
26 २६ दावीद सिकलागास आला तेव्हा त्याने यहूदाच्या वडिलांकडे आपल्या मित्रांकडे लुटीतले काही पाठवून सांगितले की, “पाहा परमेश्वराच्या शत्रूंच्या लुटीतून तुम्हास ही भेट आहे.”
Then David went to Ziklag, and he sent gifts from the prey to the elders of Judah, his neighbors, saying, “Receive a blessing from the prey of the enemies of the Lord,”
27 २७ जे बेथेलात होते त्यांना जे दक्षिण प्रदेशातील रामोथात होते त्यांना, व जे यत्तीरात होते त्यांना;
to those who were in Bethel, and who were in Ramoth toward the south, and who were in Jattir,
28 २८ जे अरोएरात होते त्यांना, व जे सिफमोथात होते त्यांना, व जे एष्टमोत होते त्यांना,
and who were in Aroer, and who were in Siphmoth, and who were in Eshtemoa,
29 २९ जे राखासांत होते त्यांना, व जे येरहमेली यांच्या नगरांत होते त्यांना, व जे केनी यांच्या नगरांत होते त्यांना,
and who were in Racal, and who were in the cities of Jerahmeel, and who were in the cities of Keni,
30 ३० जे हर्मात होते त्यांना, व जे कोराशानात होते त्यांना, व जे अथाखात होते त्यांना,
and who were in Hormah, and who were at the lake of Ashan, and who were in Athach,
31 ३१ आणि जे हेब्रोनात होते त्यांना, जेथे दावीद व त्याची माणसे फिरत असत त्या सर्व ठिकाणाकडे त्याने लुटीतले काही पाठवले.
and who were in Hebron, and to the remainder who were in those places where David had stayed, he and his men.

< 1 शमुवेल 30 >