< 1 शमुवेल 3 >
1 १ शमुवेल बाळ एलीच्या हाताखाली देवाची सेवा करीत होता. परमेश्वराचे वचन त्या दिवसात दुर्मिळ झाले होते; वारंवार भविष्यसूचक दृष्टांत होत नव्हते.
Yaron nan Sama’ila ya yi hidima a gaban Ubangiji a ƙarƙashin Eli. A waɗannan kwanaki kuwa jin magana daga wurin Ubangiji ba safai ba, babu kuma wahayi da yawa.
2 २ त्या वेळेस असे झाले की, एली आपल्या ठिकाणी झोपला होता, आणि त्याची दृष्टी मंद झाल्यामुळे त्यास डोळ्यांनी चांगले दिसत नव्हते;
Wata rana da dare Eli da idanunsa sun kusa makancewa har ba ya iya gani sosai yana kwance a inda ya saba.
3 ३ आणि देवाचा दीप अजून विझला नव्हता, आणि देवाचा कोश परमेश्वराच्या मंदिरात होता, तेथे शमुवेल झोपला होता.
Fitilar Allah kuwa tana ci, ba tă mutu ba tukuna, Sama’ila kuma na kwance a haikali na Ubangiji inda akwai akwatin Allah.
4 ४ परमेश्वराने शमुवेलाला हाक मारली, तेव्हा तो म्हणाला, “मी येथे आहे.”
Sai Ubangiji ya kira Sama’ila. Sama’ila ya amsa ya ce, “Ga ni.”
5 ५ मग शमुवेल एलीकडे धावत जाऊन म्हणाला, “मी येथे आहे, कारण तुम्ही मला हाक मारलीत.” आणि एलीने म्हटले, “मी बोलावले नाही परत जाऊन झोप.” म्हणून शमुवेल परत जाऊन झोपला.
Sai ya ruga wajen Eli ya ce, “Ga ni, gama ka kira ni.” Eli ya ce, “Ɗana ban kira ba, je ka kwanta”. Saboda haka ya tafi ya kwanta.
6 ६ पुन्हा परमेश्वराने, “शमुवेला,” अशी हाक मारली. तेव्हा शमुवेल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, “मी येथे आहे, कारण तुम्ही मला हाक मारलीत.” एलीने उत्तर दिले, “माझ्या मुला मी तुला बोलावले नाही; परत जाऊन झोप.”
Ubangiji ya sāke kiransa ya ce, “Sama’ila!” Sama’ila ya tashi kuma ya je wurin Eli ya ce, “Ga ni, gama ka kira ni.” Amma Eli ya ce, “Ban kira ka ba, ɗana koma ka kwanta.”
7 ७ शमुवेलाला तर अजून परमेश्वराचा काही अनुभव आला नव्हता, आणि परमेश्वराचा संदेश अजून त्यास प्रगट झालेला नव्हता.
Sama’ila dai bai riga ya san Ubangiji ba tukuna. Ba a kuma taɓa bayyana maganar Ubangiji a gare shi ba tukuna ba.
8 ८ मग परमेश्वराने शमुवेलाला पुन्हा तिसऱ्याने हाक मारली. तेव्हा तो पुन्हा उठून एलीकडे जाऊन म्हणाला, “मी येथे आहे, कारण तुम्ही मला हाक मारलीत.” तेव्हा एलीला समजले की, परमेश्वराने मुलाला हाक मारली आहे.
Ubangiji ya kira Sama’ila sau na uku, Sama’ila kuma ya tashi ya tafi wurin Eli, “Ga ni, gama ka kira ni.” Sai Eli ya gane cewa Ubangiji ne ke kira yaron.
9 ९ मग एली शमुवेलाला म्हणाला, “तू जाऊन पुन्हा झोप; आणि जर त्याने तुला पुन्हा हाक मारली, तर असे म्हण, हे परमेश्वरा बोल कारण तुझा दास ऐकत आहे.” मग शमुवेल परत जाऊन आपल्या जागी झोपला.
Saboda haka, Eli ya gaya wa Sama’ila cewa, “Je ka kwanta, in kuma ya kira ka, ka ce masa, ‘Ya Ubangiji ka yi magana gama bawanka yana saurara.’” Sama’ila ya koma ya kwanta a wurin kwanciyarsa.
10 १० आणि परमेश्वर आला आणि उभा राहिला; त्याने पहिल्या वेळेप्रमाणे, “शमुवेला शमुवेला,” अशी हाक मारली. तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोल तुझा दास ऐकत आहे.”
Ubangiji kuma ya zo ya tsaya a wurin, yana kira ya ce, “Sama’ila, Sama’ila!” Kamar yadda ya kira a lokutan baya. Sai Sama’ila ya ce, “Yi magana gama bawanka yana saurara.”
11 ११ परमेश्वर शमुवेलास म्हणाला, “पाहा इस्राएलात मी अशी एक गोष्ट करणार आहे की, जो कोणी ती ऐकेल त्या प्रत्येकाचे कान भणभणतील.
Ubangiji ya ce wa Sama’ila, “Duba ina dab da yin wani abu a Isra’ila da zai sa kunne kowa da yake ji, yă ji tsoro.
12 १२ एलीच्या घराण्याविषयी जे मी सांगितले, ते मी सर्व आरंभापासून शेवटपर्यंत मी त्याच्या विरूद्ध पूर्ण करीन.
A ranar zan cika dukan maganar da na yi game da Eli da iyalinsa, daga farko har ƙarshe.
13 १३ कारण मी त्यास सांगितले की जो अन्याय त्यास माहित आहे, त्यामुळे मी त्याच्या घराण्याला निरंतर न्यायदंड करीन कारण त्याच्या मुलांनी आपणावर शाप आणला तरी त्याने त्यांना आवरले नाही.
Gama na gaya masa zan hukunta gidansa har abada saboda zunubin da yake sane da shi;’ya’yansa sun wulaƙantar da kansu, shi kuma bai tsawata musu ba.
14 १४ यामुळे एलीच्या घराण्याविषयी मी अशी शपथ केली आहे की यज्ञ व अर्पण यांकडून एलीच्या घराण्याचा अन्याय कधीही दूर होणार नाही.”
Saboda haka na rantse a kan gidan Eli, ‘Ba za a taɓa shafe laifin gidan Eli da hadaya ko baiko ba.’”
15 १५ नंतर शमुवेल सकाळपर्यंत झोपला; मग त्याने परमेश्वराच्या मंदिराची दारे उघडली. पण शमुवेल एलीला हा दृष्टांत सांगाण्यास घाबरत होता.
Sama’ila kuwa ya kwanta har safe, sa’an nan ya buɗe ƙofofin gidan Ubangiji. Ya ji tsoro yă gaya wa Eli wahayin,
16 १६ मग एलीने शमुवेलाला हाक मारून म्हटले, “माझ्या मुला शमुवेला.” तेव्हा शमुवेल म्हणाला, “हा मी येथे आहे.”
amma Eli ya kira shi ya ce, “Sama’ila, ɗana.” Sama’ila ya ce, “Ga ni.”
17 १७ मग त्याने म्हटले, “तो तुझ्याशी काय बोलला? मी तुला विनंती करतो ते माझ्यापासून लपवून ठेवू नको. जे काही त्याने तुला सांगितले त्यातले काही जर तू माझ्यापासून लपवून ठेवशील तर परमेश्वर तुझे तसे व त्यापेक्षा अधिकही करो.”
Eli ya ce, mene ne ya ce maka? Kada ka ɓoye mini. Allah ya yi da kai har ma fiye in ka ɓoye mini kome da ya ce maka.
18 १८ तेव्हा शमुवेलाने सर्वकाही त्यास सांगितले; त्याच्यापासून काही लपवून ठेवले नाही. मग एली म्हणाला, तो “परमेश्वरच आहे. त्यास बरे वाटेल ते तो करो.”
Don haka sai Sama’ila ya gaya masa kome bai ɓoye masa kome ba. Sa’an nan Eli ya ce, “Shi ne Ubangiji bari yă yi abin da ya yi kyau a gare shi.”
19 १९ आणि शमुवेल वाढत गेला आणि परमेश्वर त्याच्या बरोबर होता आणि त्याने त्याचा एकही भविष्यविषयक शब्द सत्यात अपयशी होऊ दिला नाही.
Ubangiji kuwa yana tare da Sama’ila har girmansa bai kuma bar ko ɗaya daga maganarsa ta kāsa cika ba.
20 २० शमुवेल परमेश्वराचा नियुक्त केलेला भविष्यवादी आहे असे दानापासून बैर-शेबापर्यंत सर्व इस्राएलांना समजले.
Dukan Isra’ila daga Dan har Beyersheba suka shaida amincin Sama’ila annabi ne na Ubangiji.
21 २१ शिलोत परमेश्वराने पुन; दर्शन दिले, कारण त्याने शिलो येथे वचनाद्वारे स्वतःला शमुवेलाला प्रगट केले.
Ubangiji kuwa ya dinga bayyana a Shilo, a nan ya bayyana kansa ga Sama’ila ta wurin maganarsa.