< 1 शमुवेल 28 >
1 १ त्या दिवसात असे झाले की पलिष्ट्यांनी आपली सैन्ये इस्राएलाशी लढायला एकत्र केली. तेव्हा आखीश दावीदाला म्हणाला, “तुला आणि तुझ्या मनुष्यांना लढाईस माझ्याबरोबर यायचे हे तू खचित समज.”
I dei dagarne fylkte filistarane krigsherane sine til strid mot Israel. Og Akis sagde med David: «Det skal du vita for visst, at du og kararne dine lyt fara i herferd med meg!»
2 २ दावीदाने आखीशाला म्हटले, “तुझा दास काय करील हे तू खचित जाणशील.” तेव्हा आखीश दावीदाला म्हणाला, “याकरिता तुला मी आपल्या मस्तकाचा रक्षक असा कायमचा ठेवीन.”
David svara Akis: «Ja vel, då skal du ogso røyna kva tenaren din duger til!» Akis sagde med David: «Ja vel, so set eg deg til livvakt hjå meg alle dagar.»
3 ३ शमुवेल तर मेला होता व सर्व इस्राएलांनी त्याच्यासाठी शोक करून त्यास रामा येथे त्याच्या नगरात पुरले होते. भूते ज्यांच्या परीचयाची होती अशा जाणत्या लोकांस व जादूगिरांना शौलाने आपल्या प्रदेशातून हाकलून लावले होते.
Samuel var dåen. Heile Israel hadde gråte yver honom. Og dei hadde gravlagt honom heime i Rama. Og Saul hadde rudt ut or landet deim som mana fram draugar og spåvette.
4 ४ पलिष्ट्यांनी एकत्र जमून शूनेमात येऊन तळ दिला आणि शौलाने सर्व इस्राएलांस एकत्र जमवून गिलबोवा येथे तळ दिला.
Filistarane fylgte seg og lagde seg i læger attmed Sunem. Då fylkte ogso Saul heile Israel, og dei lægra seg ved Gilboa.
5 ५ शौलाने पलिष्ट्यांचे सैन्य पाहिले तेव्हा तो भ्याला व त्याचे मन फार घाबरे झाले.
Då Saul såg filistarlægret, vart han so rædd at hjarta hans skalv.
6 ६ शौलाने परमेश्वरास विचारले तेव्हा परमेश्वराने त्यास स्वप्नाकडून किंवा ऊरीमाकडून किंवा भविष्यवाद्यांकडून उत्तर दिले नाही.
Og Saul spurde Herren. Men Herren svara honom ikkje, antan gjenom draumar eller gjenom urim eller gjenom profetar.
7 ७ मग शौल आपल्या चाकरांना म्हणाला, भूत जिच्या परिचयाचे आहे अशा एखाद्या स्त्रीचा माझ्यासाठी शोध करा, “म्हणजे मी तिच्याकडे जाऊन तिच्याजवळ विचारीन.” तेव्हा त्याच्या चाकरांनी त्यास म्हटले, “पाहा भूत जिच्या परिचयाचे आहे अशी एक स्त्री एन-दोर येथे आहे.”
Då sagde Saul med tenarane sine: «Leita upp for meg ei som manar fram draugar, so gjeng eg åt henne og gjer spursmål til henne.» Tenarane svara: «I En-Dor er ei kona som manar fram draugar.»
8 ८ मग शौलाने वेष पालटून निराळी वस्त्रे अंगात घातली आणि तो आपणाबरोबर दोन माणसे घेऊन त्या स्त्रीकडे रात्री गेला आणि त्याने तिला म्हटले, “तुझ्या भूतविद्येने मी तुला सांगेन त्यास माझ्यासाठी वर आण.”
Saul gjorde seg ukjenneleg, tok på seg andre klæde, og gjekk avstad med tvo fylgjesveinar. Dei kom til kona nattars tid. Og han sagde: «Få ein draug til å spå meg! Mana fram åt meg den eg nemner for deg!»
9 ९ तेव्हा ती स्त्री त्यास म्हणाली, “पाहा शौलाने काय केले आहे, त्याने भूते ज्यांच्या परिचयाची आहेत अशा जाणत्यांना व जादूगिरांना देशातून कसे काढून टाकले आहे, हे तू जाणतोस तर मी मरावे असे करण्यासाठी तू कशाला माझ्या जिवाला पाश घालतोस?”
Kona svara: «Du veit då sjølv kva Saul hev gjort, at han hev rudt ut or landet deim som manar fram draugar og spåvette. Kvifor vil du då leggja ut snaror for meg, so eg må lata livet?»
10 १० तेव्हा शौलाने तिच्याशी शपथ वाहून म्हटले, “परमेश्वर जिवंत आहे, या गोष्टीवरून तुला काही शिक्षा होणार नाही.”
Saul svor ein eid til henne ved Herren og sagde: «So sant Herren liver: ingi skuld skal råka deg for denne saki!»
11 ११ मग त्या स्त्रीने म्हटले, “तुझ्यासाठी मी कोणाला वर आणू?” तेव्हा तो म्हणाला, “माझ्यासाठी शमुवेलाला वर आण.”
Kona spurde: «Kven vil du eg skal mana for deg?» Han svara: «Mana fram åt meg Samuel!»
12 १२ त्या स्त्रीने शमुवेलाला पाहिले तेव्हा ती मोठ्याने ओरडली. मग ती स्त्री शौलाला म्हणाली, “तू मला का फसवले, कारण तू शौल आहेस.”
Då kona fekk sjå Samuel, sette ho i eit høgt skrik. Og ho sagde med Saul: «Kvifor hev du svike meg? Du er Saul!»
13 १३ राजा तिला म्हणाला, “भिऊ नको. तू काय पाहतेस?” तेव्हा ती स्त्री शौलाला म्हणाली, “मी दैवत भूमीतून वर येताना पाहते.”
Kongen svara: «Ver hugheil! Kva er det du ser?» Kona sagde: «Eg ser ein gud koma upp or jordi.»
14 १४ मग तो तिला म्हणाला, “तो कोणत्या रूपाचा आहे?” तिने म्हटले, “म्हातारा मनुष्य झगा घातलेला असा आहे.” तेव्हा तो शमुवेल आहे असे शौल समजला आणि तो आपले तोंड भूमीकडे लववून नमला.
«Korleis ser han ut?» spurde han. Ho svara: «Det er ein gamall mann som kjem upp, sveipt i ei kåpa.» Då skyna Saul det var Samuel, og lutte andlitet mot jordi og bøygde seg for honom.
15 १५ मग शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मला वर आणून का त्रास दिला आहे?” तेव्हा शौलाने उत्तर केले, “मी फार संकटात पडलो आहे. कारण पलिष्टी माझ्याशी लढाई करीत आहेत. आणि परमेश्वर मला सोडून गेला आहे, आणि तो भविष्यवाद्यांकडून किंवा स्वप्नांकडून मला उत्तर देत नाही; मी काय करावे हे तुम्ही मला कळवावे म्हणून मी तुम्हास बोलावले आहे.”
Og Samuel spurde Saul: «Kvi uroar du meg og manar meg fram?» Saul svara: «Eg er i stor naud. Filistarane fører krig mot meg, og Gud hev vike frå meg og svarar meg ikkje, anten gjenom profetar eller gjenom draumar. Difor kalla eg på deg, so eg fær vita kva eg skal gjera.»
16 १६ तेव्हा शमुवेल म्हणाला, “परमेश्वर तुला सोडून गेला आहे व तुझा विरोधी झाला आहे; तर तू कशाला मला विचारतोस?”
Samuel svara: «Kvi spør du meg, når Herren hev vike frå deg og hev vorte uvenen din?
17 १७ जसे परमेश्वराने माझ्याकडून तुला सांगितले तसे त्याने तुझे केले आहे. परमेश्वराने तुझ्या हातातून राज्य काढून घेतले आहे, आणि तुझा शेजारी दावीद याला ते दिले आहे.
Herren hev no gjort med deg som han sagde gjenom min munn: Herren hev rive riket ut or di hand og gjeve det åt ein annan, åt David.
18 १८ कारण तू देवाची वाणी मानली नाही, आणि त्याचा तीव्र क्रोध अमालेकावर घातला नाही, म्हणून आज परमेश्वराने तुझे असे केले आहे.
Av di du ikkje lydde Herren og ikkje let den brennande harmen hans råka Amalek, difor hev Herren gjort dette mot deg no.
19 १९ परमेश्वर इस्राएलास तुझ्याबरोबर पलिष्ट्यांच्या हाती देईल. उद्या तू तुझ्या मुलांसमवेत माझ्याजवळ असशील. परमेश्वर इस्राएलाचे सैन्य पलिष्ट्यांच्या हाती देईल.
Herren vil gjeva både deg og Israel i filistarmagt. I morgon skal du og sønerne dine vera hjå meg. Og jamvel Israels-lægret vil Herren gjeva i filistarmagt.»
20 २० तेव्हा शमुवेलाच्या शब्दांमुळे शौल लागलाच भूमीवर उपडा पडला आणि फार भयभीय झाला, व त्याच्यात काही शक्ती राहिली नाही. कारण सर्व दिवस आणि सारी रात्र त्याने काही भाकर खाल्ली नव्हती.
Då datt Saul brått til jordi so lang han var; so forfærd vart han for ordi frå Samuel. Magtløysa tok honom; for han hadde ikkje smaka matbiten eit heilt døger.
21 २१ मग त्या स्त्रीने शौलाकडे येऊन तो फार घाबरला आहे असे पाहून त्यास म्हटले, “पाहा तुमच्या दासीने तुमची वाणी ऐकली आहे. आणि मी आपला जीव आपल्या मुठीत धरून तुम्ही माझ्याशी जे शब्द बोलला ते ऐकले आहेत.
Kona gjekk fram åt Saul. Og då ho såg kor reint forstøkt han var, sagde ho med honom: «Sjå terna di lydde deg, og eg våga livet og rette meg etter dei ordi du tala åt meg.
22 २२ तर आता मी तुम्हास विनंती करते, तुम्ही ही आपल्या दासीचा शब्द ऐका आणि मला तुमच्या पुढे भाकरीचा तुकडा ठेवू द्या; तो तुम्ही खा यासाठी की, तुम्ही वाटेने जाल तेव्हा तुम्हास शक्ती असावी.”
So lyd no du terna di, so vil eg setja fram litevetta mat åt deg, og du må eta, so du kann magtast att fyrr du fer din veg.»
23 २३ परंतु त्याने नाकारून म्हटले, “मी खाणार नाही.” मग त्याच्या चाकरांनी व त्या स्त्रीनेही त्यास आग्रह केला तेव्हा त्याने त्यांचा शब्द ऐकला व तो भूमीवरून उठून पलंगावर बसला.
Han vilde ikkje: «Eg vil ikkje eta», sagde han. Men då både tenarane og kona naubad honom, so let han seg segja, reis upp, og sette seg på sengi.
24 २४ त्या स्त्रीच्या घरात पुष्ट वासरू होते, ते तिने मोठ्या घाईने कापले; तिने पीठ घेतले व ते मळून त्याच्या बेखमीर भाकरी भाजल्या.
Kona hadde ein gjødkalv heime. Ho skunda seg, fekk slagta honom. So tok ho mjøl, knoda og baka søtebrød.
25 २५ मग तिने ते शौलापुढे व त्याच्या चाकरापुढे ठेवले आणि ते जेवले; मग ते उठले आणि त्याच रात्री निघून गेले.
So bar ho det fram for Saul og tenarane. Og då dei hadde ete, reis dei upp, og gjekk av stad same natti.