< 1 शमुवेल 25 >
1 १ शमुवेल मरण पावला तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून त्याच्यासाठी शोक केला आणि त्यांनी त्यास रामा येथे त्याच्या घरात पुरले. दावीद उठून खाली पारान नावाच्या रानात गेला.
И умре Самуил, и собрашася весь Израиль, и плакашася его, и погребоша его в дому его во Армафеме. И воста Давид, и сниде в пустыню Маоню.
2 २ मावोनात एक पुरुष होता त्याची मालमत्ता कार्मेल येथे होती; तो पुरुष फार मोठा होता; त्याची तीन हजार मेंढरे व एक हजार बकरी होती; तो आपली मेंढरे कर्मेलात कातरीत होता.
И бе человек в Маоне и стада его на Кармиле, и человек велик зело: и сему овец три тысящы и коз тысяща: и бысть егда стрижаше стада своя на Кармиле:
3 ३ त्या पुरुषाचे नाव नाबाल व त्याच्या पत्नीचे नाव अबीगईल होते; त्याची पत्नी तर बुध्दीने चांगली व सुंदर रूपवती होती परंतु तो पुरूष कठोर व वाईट चालीचा होता; तो कालेबाच्या कुळातला होता.
имя же человеку Навал и имя жене его Авигеа: и жена его блага смыслом и добра взором зело, муж же ея человек жесток и лукав в начинаниих и человек зверонравен.
4 ४ नाबाल आपली मेंढरे कातरीत आहे, असे दावीदाने रानात ऐकले.
И услыша Давид в пустыни, яко стрижет Навал на Кармиле стада своя.
5 ५ मग दावीदाने दहा तरुणास पाठवले आणि दावीद त्या तरुणास म्हणाला, “कर्मेल येथे जा व नाबालाकडे जाऊन माझ्या नावाने त्यास सलाम करा.
И посла Давид десять отроков и рече отроком: взыдите на Кармил и идите к Навалу и вопросите его именем моим с миром,
6 ६ त्या सुखी जिवाला असे म्हणा, ‘तुला शांती असो. व तुझ्या घराला शांती असो आणि जे काही तुझे आहे त्या अवघ्याला शांती असो.
и рцыте сия: здрав ли еси ты и дом твой, и вся твоя здрава ли суть?
7 ७ तुझ्याकडे कातरणारे आहेत असे मी आता ऐकले. आताच तुझे मेंढपाळ आम्हाजवळ होते त्यांना आम्ही उपद्रव केला नाही आणि जितके दिवस ते कर्मेलात होते तितके दिवस त्यांचे काही हरवले नाही.
И ныне се, услышах, яко стригут тебе ныне пастуси твои, иже беша с нами в пустыни, и не возбранихом им, и не повелехом им ничесоже во вся дни, егда беша на Кармиле:
8 ८ तू आपल्या तरुणास विचार म्हणजे ते तुला सांगतील; तर या तरुणावर तुझी कृपादृष्टी व्हावी कारण आम्ही चांगल्या दिवशी आलो”
вопроси отроков твоих и возвестят ти: и да обрящут отроцы твои благодать пред очима твоима, яко в день благ приидохом: даждь убо ныне еже обрящет рука твоя отроком твоим и сыну твоему Давиду.
9 ९ मी तुला विनंती करतो जे काही तुझ्या हाताशी येईल ते तू तुझ्या दासांना व तुझा मुलगा दावीद याला दे. मग दावीदाचे तरुण येऊन या सर्व शब्दांप्रमाणे दावीदाच्या नावाने नाबालाशी बोलून शांत राहिले.
И приидоша отроцы Давидовы и глаголаша словеса сия к Навалу, по всем глаголом сим именем Давидовым.
10 १० तेव्हा नाबालाने त्याच्या चाकरांना उत्तर देऊन म्हटले, “दावीद कोण आहे? इशायाचा मुलगा कोण? जे आपआपल्या धन्याला सोडून पळतात असे पुष्कळ चाकर या दिवसात आहेत.
И возскочи Навал и отвеща отроком Давидовым и рече: кто Давид? И кто сын Иессеов? Днесь умножени суть раби отходяще кийждо от лица господина своего:
11 ११ माझी भाकर व माझे पाणी व माझ्या मारलेल्या पशूंचे मांस जे मी आपल्या मेंढरे कातरणाऱ्यांसाठी तयार केले ते घेऊन, ही जी माणसे कोठून आली आहेत हे माला माहित नाही अशांना मी द्यावे काय?”
и возму ли хлебы моя и вино мое и закланая моя, яже заклах стригущым моя овцы, и дам ли оная мужем, ихже не вем откуду суть?
12 १२ मग दावीदाचे तरुण आपल्या वाटेने परत गेले आणि माघारे येऊन त्यांनी हे सर्व शब्द त्यास जसेच्या तसे सांगितले.
И возвратишася отроцы Давидовы путем своим, и возвращшеся приидоша и возвестиша Давиду по глаголом сим.
13 १३ तेव्हा दावीद आपल्या मनुष्यांना म्हणाला, “तुम्ही आपापली तलवार कंबरेस बांधा.” मग प्रत्येकाने आपआपली तलवार कंबरेस बांधली दावीदानेही आपली तलवार कंबरेस बांधली आणि दावीदामागे सुमारे चारशे मनुष्ये वर गेली आणि दोनशे मनुष्ये सामानाजवळ राहिली.
И рече Давид мужем своим: препояшитеся кийждо оружием своим. И препоясашася оружием своим, и сам Давид препоясася мечем своим, и идоша вслед Давида, яко четыреста мужей, а двести их осташася у сосудов.
14 १४ नाबालाची पत्नी अबीगईल हिला चाकरातील एकाने सांगितले, “पाहा दावीदाने रानातून आमच्या धन्याला सलाम सांगायला दूत पाठवले. परंतु तो त्यांच्या अंगावर धावून गेला.
И Авигеи жене Навалове поведа един отрок, глаголя: се, присыла Давид послы от пустыни благословити господина нашего, он же отвратися от них:
15 १५ ती माणसे तर आम्हाशी फार चांगली वागली; त्यांनी आम्हास काही उपद्रव केला नाही; जितके दिवस आम्ही रानात त्यांच्याबरोबर राहिलो तितके दिवस आमची काही हानी झाली नाही.
мужие же блази (беша) нам зело, не возбраняху нам, ниже повелеваху нам что во вся дни, в няже бехом с ними:
16 १६ आम्ही त्याच्याजवळ मेंढरे राखीत होतो तितके दिवस ती आम्हांला रात्रदिवस तटबंदीसारखी होती.
и сущым нам на селе, аки стена беша окрест нас, и в нощи и во дни, по вся дни в няже бехом с ними пасуще стада:
17 १७ तर आता तू काय करणार हे समजून विचार कर कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घरावर वाईट येण्याचे ठरले आहे; कारण त्याच्याशी कोणाच्याने बोलवत नाही एवढा तो वाईट आहे.”
и ныне разумей и виждь ты, что сотвориши, яко совершися злоба на господина нашего и на дом его, и сей сын губитель, и не возможно глаголати к нему.
18 १८ अबीगईलेने घाई करून दोनशे भाकरी व द्राक्षरसाचे दोन बुधले व शिजवून तयार केलेली पाच मेंढरे व पाच मापे हुरडा व खिसमिसाचे शंभर घड व अंजिराच्या दोनशे ढेपा ही घेतली व गाढवावर लादली.
И потщася Авигеа, и взя двести хлебов и два сосуда вина и пять овец устроеных и пять мер муки чистыя и кошницу гроздия и двести вязаниц смоквей, и возложи на ослята,
19 १९ तिने आपल्या चाकरांना म्हटले, “माझ्यापुढे चला पाहा मी तुमच्यामागून येते.” परंतु तिने आपला पती नाबाल याला काही सांगितले नाही.
и рече ко отроком своим: поидите предо мною, и се, аз вслед вас иду. Мужу же своему не возвести.
20 २० मग असे झाले की, ती आपल्या गाढवावर बसून डोंगराच्या कडेने जात असता पाहा दावीद व त्याची माणसे समोरून येत होती आणि त्यांना ती भेटली.
И бысть, вседшей ей на ослицу и сходящей в подгорие, и се, Давид и мужие его идяху сопротиву ея, и срете их.
21 २१ दावीदाने म्हटले होते की, “रानात त्यांचे जे होते त्या सर्वांतले हरवले नाही असे मी त्यांचे राखले ते व्यर्थ गेले; माझ्याशी बऱ्याची त्याने वाईटाने परत फेड केली आहे.
И рече Давид: воистинну всуе вся навалова сохраних в пустыни, и ничесоже повелех взяти от всех яже его, и воздаде ми злая за благая:
22 २२ जे काही त्याचे आहे त्या सर्वातून एकही पुरूष जर मी सकाळ उजाडेपर्यंत राहू दिला, तर परमेश्वर दावीदाला तसे व त्यापेक्षा अधिक करो.”
сия да сотворит Бог Давиду и сия да приложит, аще до утра оставлю от всех Наваловых даже до мочащагося к стене.
23 २३ अबीगईलेने दावीदाला पाहिले तेव्हा ती लवकर गाढवा वरून उतरली आणि दावीदापुढे उपडे पडून तिने भूमीकडे नमन केले.
И увиде Авигеа Давида, и потщася и скочи со осляте, и паде пред Давидом на лице свое, и поклонися ему до земли,
24 २४ तिने त्याच्या पाया पडून म्हटले, “माझ्या प्रभू अन्याय माझ्याकडे माझ्याकडेच असावा आणि मी तुम्हास विनंती करते तुमच्या दासीला तुमच्या कानी काही बोलू द्या, आणि तुम्ही आपल्या दासीचे शब्द ऐका.
и паде на ноги его и рече: во мне, господине мой, неправда моя: да глаголет ныне раба твоя во ушы твои, и послушай словес рабы твоея:
25 २५ मी तुम्हास विनंती करते, माझ्या प्रभूने त्या वाईट मनुष्यास नाबालाला मारू नये, कारण जसे त्याचे नाव तसाच आहे, त्याचे नाव नाबाल (म्हणजे मूर्ख) असे आहे. आणि त्याच्याठायी मूर्खपणच आहे. परंतु माझ्या प्रभूची तरुण माणसे जी तुम्ही पाठवली त्यांना मी तुमच्या दासीने पाहिले नाही.
да не возложит ныне господин мой сердца своего на человека гибелнаго сего, яко по имени своему той есть: Навал имя ему, и безумие с ним: аз же раба твоя не видех отроков господина моего, ихже послал еси:
26 २६ तर आता माझ्या प्रभू परमेश्वर जिवंत आहे आणि तुझा जीव जिवंत आहे. रक्त पाडण्याच्या दोषापासून आणि आपल्या हाताने सूड घेण्यापासून परमेश्वराने तुम्हास आवरले आहे. तर आता जे तुमचे शत्रू व जे माझ्या प्रभूचे वाईट करायला पाहतात ते नाबालासारखे होवोत.
и ныне, господине мой, жив Господь и жива душа твоя, якоже возбрани тебе Господь еже не приити на кровь неповинну и спасти тебе руку твою: и ныне да будут якоже Навал врази твои и ищущии господину моему зла:
27 २७ आता ही जी भेट तुमच्या दासीने माझ्या प्रभूकडे आणली आहे ती माझ्या प्रभूच्यामागून चालणाऱ्या तरुण मनुष्यांना द्यावी.
и ныне возми благословение сие, еже принесе раба твоя господину моему, и даждь отроком предстоящым господину моему:
28 २८ मी तुम्हास विनंती करते, तुम्ही आपल्या दासीच्या अपराधाची क्षमा करा; कारण माझे प्रभू परमेश्वराच्या लढाया लढत आहेत, म्हणून परमेश्वर माझ्या प्रभूचे घर खरोखर स्थिर करील; आणि तुम्ही जिवंत आहात तो पर्यंत तुमच्याठाई दुष्टाई सापडणार नाही.
отими ныне неправду рабы твоея, яко творя сотворит Господь дом верен господину моему, яко на брани господина моего Господь споборет, и злоба не обрящется в тебе никогдаже:
29 २९ जरी मनुष्ये उठून तुमच्या पाठीस लागले व तुमचा जीव घ्यायला पाहत असले, तरी माझ्या प्रभूचा जीव परमेश्वर तुमचा देव याच्याजवळ जीवांच्या समुहात बांधलेला राहील, आणि जसे गोफणीच्या खळग्यातून फेकतात, तसे तुमच्या शत्रूंचे जीव तो गोफणीतून फेकून देईल.
и аще востанет человек гоняй тя и ищай души твоея, и будет душа господина моего привязана соузом жизни у Господа Бога, и душу врагов твоих поразиши пращею посреде пращи:
30 ३० असे होईल की, परमेश्वराने तुमच्यविषयी जे चांगले सांगितले आहे, ते सर्व तो माझ्या प्रभूचे करून तुम्हास इस्राएलाचा अधिपती नेमील.
и будет егда сотворит Господь господину моему вся, елика глаголаше благая о тебе, и повелит тебе Господь (быти) вождем во Израили,
31 ३१ तेव्हा माझ्या प्रभूने विनाकारण रक्त पाडले व सूड घेतला ह्याबद्दल तुम्हास खेद होणार नाही किंवा मनाचा संताप माझ्या प्रभूला होणार नाही. आणि परमेश्वर माझ्या प्रभूचे बरे करील तेव्हा तुम्ही आपल्या दासीचे स्मरण करा.”
и не будет тебе сие мерзость и соблазн сердцу господина моего, еже излияти кровь неповинную туне и спасти руку свою себе: и да благо сотворит Господь господину моему, и воспомянеши рабу твою, еже благосотворити ей.
32 ३२ तेव्हा दावीद अबीगईलेला म्हणाला, “परमेश्वर इस्राएलाचा देव ज्याने तुला आज मला भेटायला पाठवले तो धन्यवादित असो.
И рече Давид ко Авигеи: благословен Господь Бог Израилев, иже посла тя днесь на сретение ми,
33 ३३ तुझा बोध आशीर्वादित होवो; आज रक्त पाडण्याच्या दोषापासून आणि आपल्या हाताने सूड घेण्यापासून मला जिने आवरिले ती तू आशीर्वादित हो.
и благословен совет твой, и благословена ты удержавшая мя в день сей ити на пролитие крове, и спасти ми руку мою:
34 ३४ कारण तुझे वाईट मी करणार होतो ते ज्याने मला करू दिले नाही तो इस्राएलाचा देव परमेश्वर जिवंत आहे; जर तू मला भेटायला लवकर आली नसतीस तर खचित नाबालाचा एक पुरूष देखील सकाळ उजाडेपर्यंत जिवंत राहिला नसता.”
обаче жив Господь Бог Израилев, иже возбрани ми днесь зло сотворити тебе: зане аще бы не потщалася и не пришла еси на сретение мне, тогда рех: аще останется Навалу до утренняго света мочащийся к стене.
35 ३५ मग जे तिने दावीदासाठी आणले होते ते त्याने तिच्या हातातून घेतले व तिला म्हटले, “तू आपल्या घरी शांतीने जा, पाहा मी तुझी वाणी ऐकली आहे आणि तुला मान्य केले आहे.”
И прия Давид от руку ея вся, яже принесе ему, и рече ей: иди с миром в дом свой: виждь, послушах гласа твоего и приях лице твое.
36 ३६ मग अबीगईल नाबालाकडे आली आणि पाहा त्याने आपल्या घरी राजाच्या मेजवाणीसारखी मेजवाणी केली होती. तेव्हा नाबालाचे मन त्याच्या आत संतुष्ट होते कारण तो मद्य पिऊन फार मस्त झाला होता, म्हणून तिने पहाट उजाडेपर्यंत त्यास अधिक उणे काहीच सांगितले नाही.
И прииде Авигеа к Навалу: и се, у него пир в дому его, яко пир царев: и сердце навалово весело в нем, и той пиян до зела. И не возвести Авигеа Навалу глагола ни велика ни мала до света утренняго.
37 ३७ मग असे झाले की, सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर त्याच्या पत्नीने या गोष्टी त्यास सांगितल्या तेव्हा त्याचे मन त्याच्या आत मेल्यासारखे झाले व तो दगडासारखा झाला.
И бысть заутра, егда истрезвися Навал от вина, поведа ему жена его вся глаголы сия, и умре сердце его в нем, и той бысть яко камень.
38 ३८ नंतर असे झाले की, सुमारे दहा दिवसानंतर परमेश्वराने नाबालाला मारले व तो मेला.
И бысть яко десять дний, и порази Господь Навала, и умре.
39 ३९ नाबाल मेला असे दावीदाने ऐकले, तेव्हा तो म्हणाला, “ज्याने माझ्या अपमानाचा सूड नाबालावर उगवला आहे आणि ज्याने आपल्या सेवकाला वाईट करण्यापासून आवरून धरले तो परमेश्वर धन्यवादीत असो. परमेश्वराने नाबालाची दुष्टाई त्याच्याच मस्तकावर परत घातली आहे.” मग दावीदाने अबीगईलेकडे सेवकाला पाठवून तिला आपली पत्नी करण्याविषयीची गोष्ट काढली.
И услыша Давид и рече: благословен Господь, иже суди суд поношения моего от руки Навали, и раба Своего удержа от руки злых, и злобу Навалю обрати Господь на главу его. И посла Давид и глагола ко Авигеи пояти ю себе в жену.
40 ४० आणि दावीदाने चाकर कर्मेलास अबीगईलेकडे येऊन तिला म्हणाले, “दावीदाने तू त्याची पत्नी व्हावे म्हणून आम्हांला तूझ्याकडे पाठवले आहे.”
И приидоша отроцы Давидовы ко Авигеи в Кармил, и реша ей, глаголюще: Давид посла нас к тебе, да тя поймет себе в жену.
41 ४१ तेव्हा ती उठून भूमीकडे लवून नमली व म्हणाली, “पाहा तुमची दासी माझ्या प्रभूच्या चाकरांचे पाय धुवायला चाकरीण होण्यास तयार आहे.”
И воста и поклонися до земли лицем и рече: се, раба твоя в рабыню умывати ноги отроком твоим.
42 ४२ मग अबीगईल घाई करून उठली व गाढवावर बसून निघाली आणि तिच्या पाच सख्या तिच्या मागे गेल्या; आणि ती दावीदाच्या सेवकाच्या मागून गेली आणि त्याची पत्नी झाली.
И воста Авигеа, и вседе на осля, и пять девиц идяху вслед ея, и пойде вслед отроков Давидовых, и бысть ему в жену.
43 ४३ दावीदाने इज्रेलकरीण अहीनवामलाही पत्नी करून घेतले; त्या दोघीही त्याच्या स्त्रिया झाल्या.
И Ахинааму поят Давид от Иезраеля, и бесте ему обе жены.
44 ४४ शौलाने तर आपली मुलगी मीखल दावीदाची पत्नी गल्लीमातील लईशाचा मुलगा पालती याला दिली होती.
Саул же даде Мелхолу дщерь свою жену Давидову Фалтию сыну Амисову иже от Роммы.