< 1 शमुवेल 24 >

1 असे झाले, शौल पलिष्ट्यांचा पाठलाग सोडून माघारी आल्यावर त्यास कोणी सांगितले की, दावीद एन-गेदीच्या रानात आहे.
وَلَمَّا رَجَعَ شَاوُلُ مِنْ وَرَاءِ ٱلْفِلِسْطِينِيِّينَ أَخْبَرُوهُ قَائِلِينَ: «هُوَذَا دَاوُدُ فِي بَرِّيَّةِ عَيْنِ جَدْيٍ».١
2 तेव्हा शौल सर्व इस्राएलातून निवडलेल्या तीन हजार मनुष्यांस घेऊन रानबकऱ्याच्या खडकावर दावीदाचा व त्याच्या मनुष्यांचा शोध करायला गेला.
فَأَخَذَ شَاوُلُ ثَلَاثَةَ آلَافِ رَجُلٍ مُنْتَخَبِينَ مِنْ جَمِيعِ إِسْرَائِيلَ وَذَهَبَ يَطْلُبُ دَاوُدَ وَرِجَالَهُ عَلَى صُخُورِ ٱلْوُعُولِ.٢
3 आणि तो मेंढवाड्याजवळ रस्त्यावर आला तेथे एक गुहा होती तिच्यात शौल शौचास गेला आणि दावीद व त्याची माणसे त्या गुहेच्या अगदी आतल्या भागात बसली होती.
وَجَاءَ إِلَى صِيَرِ ٱلْغَنَمِ ٱلَّتِي فِي ٱلطَّرِيقِ. وَكَانَ هُنَاكَ كَهْفٌ فَدَخَلَ شَاوُلُ لِكَيْ يُغَطِّيَ رِجْلَيْهِ، وَدَاوُدُ وَرِجَالُهُ كَانُوا جُلُوسًا فِي مَغَابِنِ ٱلْكَهْفِ.٣
4 तेव्हा दावीदाच्या मनुष्यांनी त्यास म्हटले, “परमेश्वराने तुला सांगितले की, पाहा मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन आणि तुला जसे बरे दिसेल तसे तू त्याचे करशील; तो हाच दिवस आहे पाहा.” मग दावीदाने उठून शौलाच्या वस्त्राचा काठ हळूच कापून घेतला.
فَقَالَ رِجَالُ دَاوُدَ لَهُ: «هُوَذَا ٱلْيَوْمُ ٱلَّذِي قَالَ لَكَ عَنْهُ ٱلرَّبُّ: هَأَنَذَا أَدْفَعُ عَدُوَّكَ لِيَدِكَ فَتَفْعَلُ بِهِ مَا يَحْسُنُ فِي عَيْنَيْكَ». فَقَامَ دَاوُدُ وَقَطَعَ طَرَفَ جُبَّةِ شَاوُلَ سِرًّا.٤
5 त्यानंतर असे झाले की, दावीदाचे मन त्यास टोचू लागले. कारण त्याने शौलाचे वस्त्र कापून घेतले होते.
وَكَانَ بَعْدَ ذَلِكَ أَنَّ قَلْبَ دَاوُدَ ضَرَبَهُ عَلَى قَطْعِهِ طَرَفَ جُبَّةِ شَاوُلَ،٥
6 आणि त्याने आपल्या मनुष्यांस म्हटले, “मी आपल्या धन्यावर परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्वराने माझ्याकडून घडू देऊ नये, कारण तो देवाचा अभिषिक्त आहे.”
فَقَالَ لِرِجَالِهِ: «حَاشَا لِي مِنْ قِبَلِ ٱلرَّبِّ أَنْ أَعْمَلَ هَذَا ٱلْأَمْرَ بِسَيِّدِي، بِمَسِيحِ ٱلرَّبِّ، فَأَمُدَّ يَدِي إِلَيْهِ، لِأَنَّهُ مَسِيحُ ٱلرَّبِّ هُوَ».٦
7 असे बोलून दावीदाने आपल्या मनुष्यांना धमकावले आणि त्यांना शौलावर हल्ला करण्याची परवानगी दिली नाही. मग शौल उठून गुहेतून निघून वाटेने चालला.
فَوَبَّخَ دَاوُدُ رِجَالَهُ بِٱلْكَلَامِ، وَلَمْ يَدَعْهُمْ يَقُومُونَ عَلَى شَاوُلَ. وَأَمَّا شَاوُلُ فَقَامَ مِنَ ٱلْكَهْفِ وَذَهَبَ فِي طَرِيقِهِ.٧
8 नतर दावीदही उठून गुहेतून निघाला आणि शौलाच्या पाठीमागून हाक मारून बोलला, “हे माझ्या प्रभू, राजा.” तेव्हा शौलाने आपल्यामागे वळून पाहिले आणि दावीद आपले तोंड भूमीस लावून नमला
ثُمَّ قَامَ دَاوُدُ بَعْدَ ذَلِكَ وَخَرَجَ مِنَ ٱلْكَهْفِ وَنَادَى وَرَاءَ شَاوُلَ قَائِلًا: «يَا سَيِّدِي ٱلْمَلِكُ». وَلَمَّا ٱلْتَفَتَ شَاوُلُ إِلَى وَرَائِهِ، خَرَّ دَاوُدُ عَلَى وَجْهِهِ إِلَى ٱلْأَرْضِ وَسَجَدَ.٨
9 मग दावीदाने शौलाला म्हटले, “पाहा दावीद तुझे वाईट करायला पाहतो असे लोकांचे बोलणे ते तुम्ही कशाला ऐकता?
وَقَالَ دَاوُدُ لِشَاوُلَ: «لِمَاذَا تَسْمَعُ كَلَامَ ٱلنَّاسِ ٱلْقَائِلِينَ: هُوَذَا دَاوُدُ يَطْلُبُ أَذِيَّتَكَ؟٩
10 १० पाहा आज तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले की, परमेश्वराने गुहेत आज तुम्हास माझ्या हाती दिले होते. तुम्हास जिवे मारावे असे कोणी मला सांगितले. पण मी तुम्हास सोडून दिले; मी बोललो की, मी आपला हात माझ्या प्रभूवर टाकणार नाही कारण तो देवाचा अभिषिक्त आहे.
هُوَذَا قَدْ رَأَتْ عَيْنَاكَ ٱلْيَوْمَ هَذَا كَيْفَ دَفَعَكَ ٱلرَّبُّ ٱليَومَ لِيَدِي فِي ٱلْكَهْفِ، وَقِيلَ لِي أَنْ أَقْتُلَكَ، وَلَكِنَّنِي أَشْفَقْتُ عَلَيْكَ وَقُلْتُ: لَا أَمُدُّ يَدِي إِلَى سَيِّدِي، لِأَنَّهُ مَسِيحُ ٱلرَّبِّ هُوَ.١٠
11 ११ आणखी माझ्या बापा, पाहा माझ्या हातात तुमच्या वस्त्राचा काठ आहे तो पाहा. कारण मी तुमच्या वस्त्राचा काठ कापला आणि तुम्हास जिवे मारले नाही. यावरुन माझ्या ठायी दुष्टाई किंवा फितूरी नाही आणि जरी तुम्ही माझा जीव घ्यायला पहाता, तरी मी तुमच्याविरुध्द पाप केले नाही, याची खात्री करून पाहा.
فَٱنْظُرْ يَا أَبِي، ٱنْظُرْ أَيْضًا طَرَفَ جُبَّتِكَ بِيَدِي. فَمِنْ قَطْعِي طَرَفَ جُبَّتِكَ وَعَدَمِ قَتْلِي إِيَّاكَ ٱعْلَمْ وَٱنْظُرْ أَنَّهُ لَيْسَ فِي يَدِي شَرٌّ وَلَا جُرْمٌ، وَلَمْ أُخْطِئْ إِلَيْكَ، وَأَنْتَ تَصِيدُ نَفْسِي لِتَأْخُذَهَا.١١
12 १२ माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये परमेश्वर न्याय करो; माझा सूड परमेश्वर तुमच्यावर उगवो. परंतु माझा हात तुमच्यावर पडणार नाही.
يَقْضِي ٱلرَّبُّ بَيْنِي وَبَيْنَكَ وَيَنْتَقِمُ لِي ٱلرَّبُّ مِنْكَ، وَلَكِنْ يَدِي لَا تَكُونُ عَلَيْكَ.١٢
13 १३ दुष्टापासून दुष्टाई निघते अशी पुरातन लोकांची म्हण आहे. परंतु माझा हात तुमच्यावर पडणार नाही.
كَمَا يَقُولُ مَثَلُ ٱلْقُدَمَاءِ: مِنَ ٱلْأَشْرَارِ يَخْرُجُ شَرٌّ. وَلَكِنْ يَدِي لَا تَكُونُ عَلَيْكَ.١٣
14 १४ इस्राएलाचा राजा कोणाचा पाठलाग करण्यास निघाला आहे? कोणाच्या पाठीस आपण लागला आहात? एका मरण पावलेल्या कुत्र्याच्या! एका पिसवेच्या!
وَرَاءَ مَنْ خَرَجَ مَلِكُ إِسْرَائِيلَ؟ وَرَاءَ مَنْ أَنْتَ مُطَارِدٌ؟ وَرَاءَ كَلْبٍ مَيْتٍ! وَرَاءَ بُرْغُوثٍ وَاحِدٍ!١٤
15 १५ यास्तव परमेश्वर न्यायाधीश होऊन माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये न्याय करो. हे पाहून तो माझा वाद करो आणि तुमच्या हातून मला सोडवो.”
فَيَكُونُ ٱلرَّبُّ ٱلدَّيَّانَ وَيَقْضِي بَيْنِي وَبَيْنَكَ، وَيَرَى وَيُحَاكِمُ مُحَاكَمَتِي، وَيُنْقِذُنِي مِنْ يَدِكَ».١٥
16 १६ असे झाले की, दावीदाने शौलाशी हे शब्द बोलणे संपवल्यावर, शौल म्हणाला, “माझ्या मुला दावीदा ही तुझी वाणी आहे काय?” मग शौल गळा काढून रडला
فَلَمَّا فَرَغَ دَاوُدُ مِنَ ٱلتَّكَلُّمِ بِهَذَا ٱلْكَلَامِ إِلَى شَاوُلَ، قَالَ شَاوُلُ: «أَهَذَا صَوْتُكَ يَا ٱبْنِي دَاوُدُ؟» وَرَفَعَ شَاوُلُ صَوْتَهُ وَبَكَى.١٦
17 १७ आणि तो दावीदाला म्हणाला, “माझ्यापेक्षा तू अधिक न्यायी आहेस, कारण तू माझे बरे केले आहेस. परंतु मी तुझे वाईट केले आहे.
ثُمَّ قَالَ لِدَاوُدَ: «أَنْتَ أَبَرُّ مِنِّي، لِأَنَّكَ جَازَيْتَنِي خَيْرًا وَأَنَا جَازَيْتُكَ شَرًّا.١٧
18 १८ तू माझ्याशी चांगले वर्तन करतोस हे तू आज उघड केले आहे. कारण परमेश्वराने मला तुझ्या हाती दिले होते तेव्हा तू मला जिवे मारले नाही.
وَقَدْ أَظْهَرْتَ ٱلْيَوْمَ أَنَّكَ عَمِلْتَ بِي خَيْرًا، لِأَنَّ ٱلرَّبَّ قَدْ دَفَعَنِي بِيَدِكَ وَلَمْ تَقْتُلْنِي.١٨
19 १९ कोणा मनुष्यास त्याचा वैरी सापडला तर तो त्यास चांगल्या रीतीने वाटेस लावील काय? तर तू आज जे माझे बरे केले त्याबद्दल परमेश्वर तुला उत्तम प्रतिफळ देवो.
فَإِذَا وَجَدَ رَجُلٌ عَدُوَّهُ، فَهَلْ يُطْلِقُهُ فِي طَرِيقِ خَيْرٍ؟ فَٱلرَّبُّ يُجَازِيكَ خَيْرًا عَمَّا فَعَلْتَهُ لِي ٱلْيَوْمَ هَذَا.١٩
20 २० आता पाहा मी जाणतो की, तू खचित राजा होशील आणि इस्राएलाचे राज्य तुझ्या हाती स्थापित होईल.
وَٱلْآنَ فَإِنِّي عَلِمْتُ أَنَّكَ تَكُونُ مَلِكًا وَتَثْبُتُ بِيَدِكَ مَمْلَكَةُ إِسْرَائِيلَ.٢٠
21 २१ म्हणून आता तू माझ्याशी परमेश्वराची शपथ वाहा की, तू माझ्या मागे माझे संतान नाहीसे करणार नाहीस आणि माझ्या वडिलाच्या कुळातून माझे नाव नष्ट करून टाकणार नाहीस.”
فَٱحْلِفْ لِي ٱلْآنَ بِٱلرَّبِّ إِنَّكَ لَا تَقْطَعُ نَسْلِي مِنْ بَعْدِي، وَلَا تُبِيدُ ٱسْمِي مِنْ بَيْتِ أَبِي».٢١
22 २२ तेव्हा दावीदाने शौलाशी शपथ वाहिली. मग शौल घरी गेला आणि दावीद व त्याची माणसे गडावर चढून गेली.
فَحَلَفَ دَاوُدُ لِشَاوُلَ. ثُمَّ ذَهَبَ شَاوُلُ إِلَى بَيْتِهِ، وَأَمَّا دَاوُدُ وَرِجَالُهُ فَصَعِدُوا إِلَى ٱلْحِصْنِ.٢٢

< 1 शमुवेल 24 >