< 1 शमुवेल 23 >
1 १ तेव्हा कोणी दावीदाला सांगितले की, पाहा पलिष्टी कईल्याशी लढतात व खळी लुटत आहेत.
Tedy powiedziano Dawidowi, mówiąc: Oto, Filistynowie dobywają Ceili, i plondrują gumna.
2 २ म्हणून दावीदाने परमेश्वरास विचारले, तो म्हणाला, “मी जाऊन त्या पलिष्ट्यांना मारून कईल्याचे रक्षण करू काय?” मग परमेश्वर दावीदाला म्हणाला, जा पलिष्टयांना मारून कईल्याचे रक्षण कर.
I radził się Dawid Pana, mówiąc: Mamli iść, a uderzyć na te Filistyny? I odpowiedział Pan Dawidowi: Idź, a porazisz Filistyny, i wybawisz Ceilę.
3 ३ तेव्हा दावीदाच्या मनुष्यांनी म्हटले, “पाहा आम्हास येथे यहूदात भय आहे; मग आम्ही कईल्यांकडे पलिष्टांच्या सैन्यावर चालून गेलो तर ते कितीतरी अधिक धोकादायक होईल!”
Tedy rzekli mężowie Dawidowi do niego: Oto my tu w Judzkiej ziemi boimy się, jakoż daleko więcej, jeźli pójdziemy do Ceili przeciw wojskom Filistyńskim.
4 ४ मग दावीदाने आणखी परमेश्वरास विचारले, आणि परमेश्वराने उत्तर देऊन म्हटले, “उठून खाली कईल्याकडे जा, कारण मी पलिष्ट्यांस तुझ्या हाती देईन.”
I pytał się jeszcze powtóre Dawid Pana. A odpowiedział mu Pan, mówiąc: Wstawszy idź do Ceili; bo ja dam Filistyny w ręce twoje.
5 ५ मग दावीद व त्याची माणसे कईला येथे जाऊन पलिष्ट्यांशी लढली आणि त्यांनी त्यांची गुरेढोरे नेली व त्यांचा मोठा वध केला; असे दावीदाने कईलकरास तारले.
Poszedł tedy Dawid i mężowie jego do Ceili, i walczył z Filistynami, i zabrał bydła ich, i poraził ich porażką wielką, i wybawił Dawid obywatele Ceili.
6 ६ त्यानंतर असे झाले की, अहीमलेखाचा मुलगा अब्याथार दावीदाकडे कईला येथे पळून गेला तेव्हा त्याने आपल्या हाती एफोद आणले.
I stało się, gdy uciekał Abijatar, syn Achimelecha, do Dawida do Ceili, że się dostał efod w rękę jego.
7 ७ दावीद कईल्याला गेला असे कोणी सांगितले; “तेव्हा शौल म्हणाला, परमेश्वराने तुला माझ्या हाती दिले आहे. कारण वेशीच्या व अडसराच्या नगरात शिरून तो कोंडला गेला आहेस.”
Potem powiedziano Saulowi, iż Dawid przyszedł do Ceili. Tedy rzekł Saul: Dał go Bóg w ręce moje; bo się zawarł, wszedłszy do miasta, w którem są bramy i zamki.
8 ८ मग कईल्याकडे उतरावे आणि दावीदाला व त्याच्या मनुष्यांना वेढा घालावा म्हणून शौलाने सर्व लोकांस लढाईला बोलावले.
A tak zebrał Saul wszystek lud, aby szedł na wojnę do Ceili, i obległ Dawida, i męże jego.
9 ९ आपल्याबद्दल शौल वाईट योजीत आहे, हे दावीदाला कळले म्हणून तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.”
Co gdy wzwiedział Dawid, iż Saul potajemnie przeciw niemu myślał wszystko złe, tedy rzekł do Abijatara kapłana: Włóż na się efod.
10 १० मग दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा इस्राएलाच्या देवा शौल माझ्यामुळे नगराचा नाश करायला कईल्यावर येऊ पाहत आहे असे तुझ्या सेवकाने खचित ऐकले आहे;
I rzekł Dawid: Panie, Boże Izraelski, za pewne słyszał sługa twój, że Saul chce przyjść do Ceili, aby miasto zburzył dla mnie;
11 ११ तर कईलकर मला शौलाच्या हाती देतील काय? तुझ्या सेवकाने ऐकल्याप्रमाणे शौल खाली येईल काय? हे परमेश्वरा इस्राएलाच्या देवा मी तुला विंनती करतो, हे तू आपल्या सेवकाला सांग.” परमेश्वर बोलला, “तो खाली येईल.”
Wydadząli mnie starsi miasta Ceili w ręce jego? przyjdzieli też Saul, jako słyszał sługa twój? Panie, Boże Izraelski, oznajmij proszę słudze twemu. I odpowiedział Pan: Przyjdzie.
12 १२ मग दावीद म्हणाला कईलकर मला व माझ्या मनुष्यांना शौलाच्या हाती देतील काय? परमेश्वर बोलला, ते तुला त्याच्या हाती देतील.
Nadto rzekł Dawid: Wydadząli starsi z Ceili mnie i męże moje w ręce Saulowe? I odpowiedział Pan: Wydadzą.
13 १३ मग दावीद व त्याची माणसे उठून कईल्यांतून निघून गेली; ती सुमारे सहाशे माणसे होती. त्यांना जेथे जायला मिळाले तेथे ती गेली; तेव्हा दावीद कईल्यातून पळाला असे शौलाला कोणी सांगितले आणि त्याने तिकडे जायचे सोडले.
Wstał tedy Dawid i mężowie jego około sześciu set mężów, i wyszli z Ceili, a uchodzili kędy mogli. A gdy oznajmiono Saulowi, że uszedł Dawid z Ceili, tedy zaniechał wyciągnienia.
14 १४ आणि दावीद रानातील गडामध्ये राहू लागला. तो जीफ रानात डोंगराळ प्रदेशात राहू लागला. शौल नित्य त्याचा शोध करीत गेला, परंतु परमेश्वराने त्यास त्याच्या हाती दिले नाही.
I mieszkał Dawid na puszczy w miejscach obronnych, a został na górze w puszczy Zyf. I szukał go Saul po wszystkie dni; lecz nie podał go Bóg w ręce jego.
15 १५ आपला जीव घ्यायला शौल निघाला आहे असे दावीदाने पाहिले आणि दावीद जीफ रानातील एका झाडीत होता;
A widząc Dawid, że wyszedł Saul, aby szukał duszę jego, został Dawid na puszczy Zyf w lesie.
16 १६ शौलाचा मुलगा योनाथान उठून झाडीत दावीदाकडे गेला आणि त्याने त्याचा हात परमेश्वराच्याठायी सबळ केला.
Wtedy wstał Jonatan, syn Saula, i szedł do Dawida do lasu, i posilił rękę jego w Bogu,
17 १७ तो त्यास म्हणाला, “भिऊ नको कारण माझा बाप शौल याच्या हाती तू लागणार नाहीस. तू तर इस्राएलावर राजा होशील आणि तुझ्याजवळ मीच पहिला तुझा सहाय्यक होईन हे माझा बाप शौलही जाणतो.”
Mówiąc do niego: Nie bój się, bo cię nie znajdzie ręka Saula, ojca mego; a ty będziesz królował nad Izraelem, ja zaś będę wtórym po tobie; wszak i Saul, ojciec mój, wie o tem.
18 १८ तेव्हा त्या दोघांनी परमेश्वराच्यासमोर करार केला. मग दावीद झाडीत राहिला व योनाथान आपल्या घरी गेला.
I uczynili obaj z sobą przymierze przed Panem; i został Dawid w lesie, ale Jonatan wrócił się do domu ojca swego.
19 १९ जीफी लोक शौलाकडे गिबा येथे येऊन म्हणाले, “यशीमोनाच्या दक्षिणेकडे हकीला डोंगरातील झाडीत गडामध्ये दावीद आम्हाजवळ लपून राहिला आहे की नाही?
Tedy przyszli Zyfejczycy do Saula do Gabaa, powiadając: Azaż Dawid nie kryje się u nas po miejscach obronnych w lesie na pagórku Hachila, który jest po prawej stronie Jesymona?
20 २० तर आता हे राजा, खाली येण्याच्या आपल्या सर्व मनोरथप्रमाणे खाली ये, म्हणजे त्यास राजाच्या हाती देणे हे आमचे काम असेल.”
Przetoż teraz według wszystkiej żądności duszy twojej, królu, zejdź co najrychlej, a my się postaramy, że go wydamy w ręce królewskie.
21 २१ तेव्हा शौल म्हणाला, “तुम्हास परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल कारण तुम्ही माझ्यावर दया केली आहे.
Tedy rzekł Saul: Błogosławieniście wy od Pana, żeście się mnie użalili.
22 २२ मी तुम्हास विनंती करतो तुम्ही जा आणखी मन लावून त्याचा माग काढा आणि तेथे त्यास कोणी पाहिले याची माहिती काढून पाहा कारण तो फार चतुराईने वागतो असे मला कळाले आहे.
Idźcież proszę, a starajcie się tem pilniej; wywiedzcie się, a wyszpiegujcie to miejsce jego, gdzie się obraca. Kto go tam widział? bo mi powiadano, że sobie bardzo chytrze postępuje.
23 २३ तर जेथे तो लपून राहतो त्या सर्व लपण्याच्या जागा पाहून त्यांची खात्री करून घ्या, मग खरे वर्तमान घेऊन माझ्याकडे परत या; त्यानंतर मी तुम्हाबरोबर जाईन आणि असे होईल की, तो त्या मुलुखात असला तर मी त्यास यहूदाच्या सर्व हजारांतून त्यास हुडकून काढीन.”
Wypatrzcież tedy, a obaczcie wszystkie te miejsca skryte, w których się ukrywa; potem wrócicie się do mnie z czem pewnem, i pójdę z wami; a będzieli w ziemi, tedy go będę szukał po wszystkich tysiącach Judzkich.
24 २४ मग ते उठले आणि शौलापुढे जीफाकडे गेले; परंतु दावीद व त्याची माणसे यशीमोनाच्या दक्षिणेकडे मावोनाच्या रानात अराबात होती.
Wstali tedy, i poszli do Zyf przed Saulem; ale Dawid i mężowie jego byli na puszczy Maon, w polach po prawej stronie Jesymon.
25 २५ शौल व त्याची माणसे त्याचा शोध करायला आली. हे कोणी दावीदाला सांगितले, म्हणून तो खडकावरून उतरून मावोनाच्या रानात राहिला हे ऐकून शौल मावोनाच्या रानात दावीदाच्या मागे लागला.
Bo gdy wyszedł Saul, i mężowie jego, szukać go, oznajmiono Dawidowi, który zstąpił z skały, i mieszkał na puszczy Maon. Co usłyszawszy Saul, gonił Dawida aż na puszczę Maon.
26 २६ शौल डोंगराच्या एका बाजूने चालला आणि दावीद व त्याची माणसे डोंगराच्या दुसऱ्या बाजूने चालली आणि दावीदाने शौलापासून पळायला घाई केली कारण शौल व त्याची माणसे, दावीदाला आणि त्याच्या मनुष्यांना धरायला घेरीत होती.
I szedł Saul po jednej stronie góry, a Dawid i mężowie jego po drugiej stronie góry. I spieszył się Dawid, aby mógł ujść przed Saulem; bo Saul i lud jego obtaczali Dawida i męże jego, aby je pojmali.
27 २७ परंतु एक निरोप्या शौलाकडे येऊन म्हणाला, लवकर ये कारण पलिष्ट्यांनी देशावर घाला घातला आहे.
Wtem poseł przybieżał do Saula, mówiąc: Pospiesz się, a pójdź; albowiem Filistynowie wtargnęli w ziemię.
28 २८ तेव्हा शौल दावीदाचा पाठलाग सोडून पलिष्ट्यांवर चाल करून गेला. याकरिता त्या जागेचे नाव सेला हम्मालकोथ म्हणजे निसटून जाण्याचा खडक असे पडले.
Przetoż wrócił się Saul od pogoni za Dawidem, a ciągnął przeciw Filistynom; dla tego nazwali miejsce ono Sela Hammalekot.
29 २९ मग दावीद तेथून वर जाऊन एन-गेदीच्या गडामध्ये राहिला.
A tak wyciągnął stamtąd Dawid, i mieszkał na miejscach obronnych Engaddy.