< 1 शमुवेल 21 >

1 दावीद नोब शहरात अहीमलेख याजकाजवळ आला आणि अहीमलेख कापत कापत दावीदाला भेटायला आला व त्यास म्हणाला, “तू एकटा का आलास आणि तुझ्याबरोबर कोणी का नाही?”
و داود به نوب نزد اخیملک کاهن رفت، و اخیملک لرزان شده، به استقبال داودآمده، گفت: «چرا تنها آمدی و کسی با تونیست؟»۱
2 तेव्हा दावीद अहीमलेख याजकाला म्हणाला, “राजाने मला काही काम करायला आज्ञापिले आहे आणि त्याने असे म्हटले की, ज्या कामाविषयी मी तुला पाठवतो व जे मी तुला आज्ञापिले आहे ते कोणाला समजू देऊ नको; तरुणांनी अमक्या अमक्या ठिकाणी असावे म्हणून मी त्यांना नेमले आहे.
داود به اخیملک کاهن گفت: «پادشاه مرا به‌کاری مامور فرمود و مرا گفت: از این کاری که تو را می‌فرستم و از آنچه به تو امر فرمودم کسی اطلاع نیابد، و خادمان را به فلان و فلان جا تعیین نمودم.۲
3 तर आता तुझ्या हातात काय आहे? पाच भाकरी किंवा जे काही असेल ते मला माझ्या हाती दे.”
پس الان چه در دست داری، پنج قرص نان یا هر‌چه حاضر است به من بده.»۳
4 तेव्हा याजकाने दावीदाला उत्तर देऊन म्हटले, “माझ्याजवळ काही सामान्य भाकर नाही तर पवित्र भाकर आहे; जर तरुणांनी आपणांस स्त्रीयांपासून दूर राखले असेल तर ती घ्यावी.”
کاهن در جواب داود گفت: «هیچ نان عام دردست من نیست، لیکن نان مقدس هست اگرخصوص خادمان، خویشتن را از زنان بازداشته باشند.»۴
5 दावीदाने याजकाला उत्तर देऊन म्हटले, “खचित हे तीन दिवस झाले मी निघालो तेव्हापासून स्त्रिया आम्हापासून दूर आहेत, त्या तरुणांची पात्रे पवित्रच आहेत; हा प्रवास जरी सर्वसामान्य होता तरी, आज त्यांची शरीरे किती अधिक प्रमाणात पवित्र असतील.”
داود در جواب کاهن گفت: «به درستی که در این سه روز زنان از ما دور بوده‌اند و چون بیرون آمدم ظروف جوانان مقدس بود، و آن بطوری عام است خصوص چونکه امروز دیگری در ظرف مقدس شده است.»۵
6 मग याजकाने त्यास पवित्र भाकर दिली. कारण ताजी ऊन भाकर ठेवावी म्हणून जी समक्षतेची भाकर परमेश्वराच्या समोरून त्या दिवशी काढलेली होती, तिच्यावाचून दुसरी भाकर तेथे नव्हती.
پس کاهن، نان مقدس را به او داد زیرا که در آنجا نانی نبود غیر ازنان تقدمه که از حضور خداوند برداشته شده بود، تا در روز برداشتنش نان گرم بگذارند.۶
7 त्या दिवशी शौलाच्या चाकरातील एक पुरुष तेथे परमेश्वराच्या पुढे थांबवलेला असा होता; त्याचे नाव दवेग; तो अदोमी होता; तो शौलाच्या गुराख्यांचा मुख्य होता.
و در آن روز یکی از خادمان شاول که مسمی به دوآغ ادومی بود، به حضور خداوند اعتکاف داشت، و بزرگترین شبانان شاول بود.۷
8 दावीद अहीमलेखाला म्हणाला, “येथे तुझ्याजवळ भाला किंवा तलवार नाही काय? राजाचे काम निकडीचे आहे म्हणून मी आपल्या हाती आपली तलवार किंवा आपली शस्त्रे घेतली नाहीत.”
و داود به اخیملک گفت: «آیا اینجا دردستت نیزه یا شمشیر نیست زیرا که شمشیر وسلاح خویش را با خود نیاورده‌ام چونکه کارپادشاه به تعجیل بود.»۸
9 तेव्हा याजक म्हणाला, “गल्याथ पलिष्टी ज्याला तू एलाच्या खोऱ्यात जिवे मारले त्याची तलवार पाहा ती एफोदाच्या मागे वस्त्रात गुंडाळलेली आहे. ती तू घेणार तर घे कारण तिच्यावाचून दुसरी येथे नाही.” दावीद म्हणाला, “तिच्यासारखी दुसरी नाही ती मला दे.”
کاهن گفت: «اینک شمشیر جلیات فلسطینی که در دره ایلاه کشتی، در پشت ایفود به‌جامه ملفوف است. اگرمی خواهی آن را بگیری بگیر، زیرا غیر از آن دراینجا نیست.» داود گفت: «مثل آن، دیگری نیست. آن را به من بده.»۹
10 १० त्या दिवशी दावीद उठला व शौलाच्या भीतीमुळे पळून गथाचा राजा आखीश याच्याकडे गेला.
پس داود آن روز برخاسته، از حضورشاول فرار کرده، نزد اخیش، ملک جت آمد.۱۰
11 ११ तेव्हा आखीशाचे दास त्यास म्हणाले, “हा दावीद देशाचा राजा आहे की नाही: शौलाने हजार व दावीदाने दहा हजार मारले आहेत; असे ते त्याच्याविषयी एकमेकांना गाऊन म्हणत नाचत होते की नाही?”
و خادمان اخیش او را گفتند: «آیا این داود، پادشاه زمین نیست؟ و آیا در باره او رقص‌کنان سرودخوانده، نگفتند که شاول هزاران خود را و داود ده هزاران خود را کشت؟»۱۱
12 १२ दावीद हे शब्द आपल्या मनात ठेवून गथाचा राजा आखीश याच्यापुढे पार भ्याला.
و داود این سخنان رادر دل خود جا داده، از اخیش، ملک جت بسیاربترسید.۱۲
13 १३ मग त्याच्यापुढे त्याने आपली वर्तणूक पालटून त्यांच्यासमोर वेड घेतले आणि तो कवाडाच्या फळ्यांवर रेघा मारू लागला व आपली लाळ आपल्या दाढीवर गाळू लागला.
و در نظر ایشان رفتار خود راتغییرداده، به حضور ایشان خویشتن را دیوانه نمود، وبر لنگه های در خط می‌کشید و آب دهنش را برریش خود می‌ریخت.۱۳
14 १४ तेव्हा आखीश आपल्या दासांना म्हणाला, “पाहा हा वेडा आहे हे तुम्हास दिसते तर कशासाठी तुम्ही त्यास माझ्याकडे आणले आहे?
و اخیش به خادمان خود گفت: «اینک این شخص را می‌بینید که دیوانه است، او را چرا نزد من آوردید؟۱۴
15 १५ माझ्याकडे वेडीमाणसे कमी आहेत म्हणून तुम्ही याला माझ्याकडे वेडेपण करायला आणले? याने माझ्या घरात यावे काय?”
آیامحتاج به دیوانگان هستم که این شخص راآوردید تا نزد من دیوانگی کند؟ و آیا این شخص داخل خانه من بشود؟»۱۵

< 1 शमुवेल 21 >