< 1 शमुवेल 18 >
1 १ तेव्हा असे झाले की, दावीदाने शौलाशी बोलणे समाप्त केले असता, योनाथानाचा जीव दावीदाच्या जिवाशी जडला होता आणि योनाथान आपल्या जिवा सारखी त्याच्यावर प्रीती करू लागला होता.
Et lorsqu'il eut achevé son entretien avec Saül, l'âme de Jonathan s'unit à l'âme de David, et Jonathan l'aima comme son âme.
2 २ त्या दिवशी शौलाने त्यास ठेवून घेतले आणि त्यास त्याच्या वडिलाच्या घरास माघारी जाऊ दिले नाही.
Et en ce même jour Saül l'attacha à sa personne et ne lui permit pas de retourner dans la maison de son père.
3 ३ मग योनाथानाने दावीदाशी मैत्रीचा करार केला कारण तो आपल्या जिवासारखी त्याजवर प्रीती करीत होता.
Et Jonathan se lia avec David par un pacte, car il l'aimait comme son âme.
4 ४ योनाथानाने आपल्या अंगातील जो झगा होता तो काढून दावीदाला दिला आणि आपले अंग वस्त्रे आणि आपली तलवार व आपले धनुष्य व आपला कमरबंद ही त्यास दिला.
Et Jonathan ôta le manteau qu'il portait et le donna à David avec son équipement jusqu'à son épée, son arc et sa ceinture.
5 ५ तेव्हा शौल दावीदाला जेथे जेथे पाठवी तेथे तेथे तो चतुराईने वागत असे. शौलाने त्यास लढाईच्या मनुष्यांवर नेमिले आणि तो शौलाच्या चाकराच्या दृष्टीतही तो मान्य झाला.
Et David allait en course et réussissait partout ou Saul l'envoyait, et Saül le préposait sur les gens de guerre et il était bien vu de tout le peuple et de même des serviteurs de Saül.
6 ६ मग असे झाले की, ते त्या पलिष्ट्याला मारून माघारी आले, तेव्हा स्त्रिया इस्राएलच्या सर्व नगरातून गात व नाचत, डफ व झांज वाजवीत शौल राजाची भेट घ्यावयास निघाल्या.
Et comme ils faisaient leur entrée lors du retour de David après sa victoire sur le Philistin, les femmes sortirent de toutes les villes d'Israël pour chanter et former des chœurs au-devant du Roi Saül avec des tambourins et des triangles, et dans l'allégresse.
7 ७ त्या स्त्रिया नाचत असता एकमेकीस उत्तर देऊन असे गात होत्या की, “शौलाने हजारास मारले आणि दावीदाने दहा हजारास मारले.”
Et les femmes dansant chantaient tour à tour et disaient: Saül a abattu ses mille et David ses dix mille.
8 ८ तेव्हा शौलला फार राग आला, आणि त्या गाण्याने त्यास वाईट वाटून त्याने म्हटले, “त्यांनी दावीदाला दहा हजारचे यश दिले आणि मला मात्र हजाराचे यश दिले. राज्याशिवाय त्यास आणखी काय अधिक मिळवायचे राहिले?”
Et Saül en fut très irrité et mécontent de ce discours, et il dit: A David elles en donne dix mille, et à moi elles donnent les mille, il ne lui manque plus que la royauté.
9 ९ त्या दिवसापासून पुढे शौल दावीदाकडे संशयाने पाहू लागला.
A partir de ce jour et dorénavant Saül regarda David de mauvais œil.
10 १० मग दुसऱ्या दिवशी असे झाले; देवापासून दुष्ट आत्मा शौलावर जोराने आला तेव्हा तो घरात बडबडत होता. म्हणून दावीद रोजच्याप्रमाणे आपल्या हाताने वाद्य वाजवीत होता. शौलाच्या हाती त्याचा भाला होता.
Et dès le lendemain Dieu fit sentir à Saül les atteintes d'un esprit sinistre; et il se démenait dans sa maison; cependant ce jour-là comme les autres jours David de sa main jouait du luth, et Saül avait la pique en main.
11 ११ तेव्हा शौलाने भाला मारण्यासाठी उगारला कारण त्याने म्हटले, “मी दावीदाला मारून भिंतीशी खिळीन.” परंतु दावीद त्याच्या समोरून दोनदा निसटून गेला.
Et Saül brandissant sa pique dit: Je veux percer David et la paroi; mais David se mit deux fois hors de sa portée.
12 १२ मग शौल दावीदाचे भय धरू लागला, कारण परमेश्वर शौलाला सोडून दावीदाच्या बरोबर होता.
Et Saül avait peur de David, car l'Éternel était avec lui et s'était éloigné de Saül.
13 १३ शौलाने त्यास आपल्यापासून दूर करून त्यास आपल्या हजारांचा सरदार करून ठेवले. दावीद लोकांच्या देखत आत बाहेर जात येत असे.
Et Saül l'éloigna de lui et il l'établit chef de mille hommes; et il allait en course, et rentrait à la tête du peuple.
14 १४ दावीदाची त्याच्या सर्व मार्गात भरभराट झाली, कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता.
Et David réussissait dans toutes ses expéditions, et l'Éternel était avec lui.
15 १५ जेव्हा शौलाने बघितले त्याची भरभराट झाली आहे, तेव्हा त्यास त्याचा धाक बसला.
Et Saül à la vue de ses grands succès avait peur de lui;
16 १६ परंतु सर्व इस्राएली आणि यहूदी दावीदावर प्रीती करीत होते, कारण की तो त्यांच्यादेखत आत बाहेर जात येत असे.
mais tout Israël et Juda aimaient David parce qu'il sortait et rentrait à leur tête.
17 १७ मग शौलाने दावीदाले म्हटले, “पाहा मी आपली वडील कन्या मेरब ही तुला पत्नी करून देईन. माझ्यासाठी तू केवळ शूर हो, आणि परमेश्वरासाठी लढाया कर.” कारण शौल म्हणाला, माझा हात त्याजवर न पडो, पण पलिष्टंयाचा हात त्याजवर पडो.
Et Saül dit à David: Voici, je veux te donner pour femme Merab, ma fille aînée; seulement que j'aie en toi un brave soldat, et soutiens les guerres de l'Éternel. Or Saül se disait: Il faut qu'il sente, non pas ma main, mais celle des Philistins.
18 १८ तेव्हा दावीदाने शौलाला म्हटले, “मी राजाचा जावई व्हावे असा मी कोण आहे? माझा जीव काय? आणि इस्राएलामध्ये माझ्या बापाचे कुळ काय?”
Et David dit à Saül: Qui suis-je et quelle existence ai-je et qu'est la famille de mon père en Israël, pour devenir le gendre du Roi?
19 १९ परंतु असे झाले की, ज्या वेळेस शौलाची कन्या मेरब दावीदाला द्यायची होती तेव्हा ती अद्रीएल महोलाथी याला पत्नी करून देण्यात आली.
Mais au moment où Merab, fille de Saül, devait être donnée à David, elle fut mariée à Adriel de Mehola.
20 २० तेव्हा शौलाची कन्या मीखल ही दावीदावर प्रीती करीत असे, आणि हे शौलाला सांगितले असता त्यास बरे वाटले.
Cependant Michal, fille de Saül, aimait David, et l'on en informa Saül, à qui la chose agréa.
21 २१ तेव्हा शौलाने म्हटले, “मी ती त्यास देईन आणि ती त्यास पाशरुप होईल आणि पलिष्ट्यांचा हात त्याजवर पडेल. मग शौलाने दावीदाला दुसऱ्यांदा म्हटले की, तू माझा जावई होशील.”
Et Saül dit je veux la lui donner pour qu'elle lui soit un piège et pour le mettre sous la main des Philistins. Et Saül dit à David pour la seconde fois: Tu deviendras mon gendre aujourd'hui.
22 २२ शौलाने आपल्या चाकरास आज्ञा केली की, “तुम्ही दावीदाला गुप्तपणे बोलून म्हणा, की पाहा राजा तुजवर संतुष्ट आहे आणि त्याचे अवघे चाकर तुजवर प्रीती करतात. तर आता राजाचा जावई हो.”
Et Saül donna cet ordre à ses serviteurs: Parlez secrètement à David en ces termes: Voici, le Roi a de l'affection pour toi, et tous ses serviteurs t'aiment; ainsi, deviens gendre du Roi.
23 २३ शौलाच्या चाकरांनी हे शब्द दावीदाला सांगितले. तेव्हा दावीदाने म्हटले की, “राजाचा जावई होणे ही तुमच्या हिशोबात हलकी गोष्ट आहे की काय?” मी तर दीन व तुच्छ असा मनुष्य आहे.
Et les serviteurs de Saül répétèrent ces paroles aux oreilles de David. Et David dit: Est-ce peu de chose à vos yeux que de devenir le gendre du Roi, moi, homme pauvre et sans considération?
24 २४ मग असे जे दावीदाने म्हटले ते शौलाच्या चाकरांनी त्यास सांगितले.
Et les serviteurs de Saül firent rapport et dirent: C'est en ces termes que David a parlé.
25 २५ तेव्हा शौलाने म्हटले, “तुम्ही दावीदास असे म्हणा, राजाच्या शत्रूंचा सूड उगवावा म्हणून पलिष्ट्यांच्या शंभर अग्रत्वचा याशिवाय काही हुंडा राजा मागत नाही.” परंतु दावीदाला पलिष्ट्यांच्या हाताकडून मारावे असे शौलाने इच्छिले होते.
Et Saül dit: Parlez ainsi à David: Le Roi ne veut pas de dot, mais cent prépuces des Philistins pour tirer vengeance des ennemis du Roi. Or la pensée de Saül était de faire périr David par la main des Philistins.
26 २६ मग त्याच्या चाकरांनी हे शब्द दावीदाला सांगितले, तेव्हा राजाचा जावई होणे हे दावीदाले बरे वाटले.
Et ses serviteurs transmirent à David ces paroles, et David agréa le projet de devenir gendre du Roi.
27 २७ नेमलेला वेळ अद्याप समाप्त झालेला नव्हता; तेव्हाच दावीदाने उठून आपल्या मनुष्यांसह जाऊन दोनशे पलिष्ट्यांस जिवे मारले आणि त्यांच्या अग्रत्वचा आणून आपण राजाचा जावई होण्यासाठी राजाजवळ त्या मोजून दिल्या; तेव्हा शौलाने आपली कन्या मीखल त्यास पत्नी करून दिली.
Et le temps n'étant pas encore accompli, David se mit en mouvement, et marcha avec son monde et abattit parmi les Philistins deux cents hommes et il apporta leurs prépuces dont le nombre complet fut présenté au Roi, pour qu'il pût être son gendre; et Saül lui donna sa fille Michal en mariage.
28 २८ मग हे पाहून शौलाला कळले की, परमेश्वर दावीदाच्या बरोबर आहे आणि शौलाची कन्या मीखल हीने त्याजवर प्रीती केली.
Et Saül comprit que l'Éternel était avec David; et Michal, fille de Saül, l'aimait.
29 २९ तेव्हा शौल दावीदाला अधिक भ्याला आणि शौल दावीदाचा कायमचा वैरी झाला.
Et la crainte que Saül avait de David, ne fit que s'accroître, et Saül devint pour toujours hostile à David.
30 ३० नंतर पलिष्ट्यांचे सरदार लढायास बाहेर आले आणि असे झाले की ते आले असता दावीद शौलाच्या सर्व चाकरापेक्षा चतुराईने वर्तला आणि त्याचे नाव प्रसिद्ध झाले.
Et lorsque les princes des Philistins se mettaient en campagne, à chacune de leurs campagnes David avait plus de succès que tous les serviteurs de Saül, et son nom était fort considéré.