< 1 शमुवेल 16 >

1 मग परमेश्वराने शमुवेलाला सांगितले की, “मी इस्राएलावर राज्य करण्यापासून शौलाला नाकारले आहे, तर तू किती काळ त्यासाठी शोक करशील? आपल्या शिंगात तेल भरून चल. इशाय बेथलहेमी याच्याकडे मी तुला पाठवितो. कारण मी त्याच्या एका मूलाला माझ्यासाठी राजा म्हणून निवडले आहे.”
Un Tas Kungs sacīja uz Samuēli: cik ilgi tu žēlojies par Saulu, kad Es to esmu atmetis, ka tam nebūs Israēlim būt par ķēniņu? Pildi savu ragu ar eļļu un noej; Es tevi sūtīšu pie Isajus, tā Bētlemieša, jo Es no viņa dēliem Sev esmu izredzējis ķēniņu.
2 तेव्हा शमुवेल म्हणाला, “मी कसा जाऊ? जर शौल ऐकेल तर तो मला जीवे मारील.” मग परमेश्वर म्हणाला, “एक कालवड आपल्याबरोबर घे आणि मी देवाकडे यज्ञ करण्यास आलो आहे असे म्हण.
Bet Samuēls sacīja: kā lai es eju? Jo Sauls to dzirdēs un mani nokaus. Tad Tas Kungs sacīja: ņem vienu teļu līdz un saki:
3 त्या यज्ञास इशायला बोलाव. नंतर काय करायचे ते मी तुला कळवीन, आणि जो मी तुला सांगेन त्यास माझ्यासाठी अभिषेक कर.”
Es esmu nācis Tam Kungam upurēt. Un aicini Isaju pie tā upura, tad Es tev darīšu zināmu, ko tev būs darīt, un tev būs Man to svaidīt, ko Es tev noteikšu.
4 तेव्हा परमेश्वराने जे सांगितले ते शमुवेलाने केले आणि मग बेथलेहेमास गेला. नगराचे वडीलजन भीत भीत त्यास भेटायास आले व त्यांनी त्यास विचारले, “तुम्ही शांतीनेच आला आहात ना?”
Un Samuēls darīja, ko Tas Kungs bija runājis, un nāca uz Bētlemi. Tad tās pilsētas vecaji drebēdami viņam gāja pretī un sacīja: vai tu nāci ar mieru?
5 त्याने म्हटले, “शांतीने; मी परमेश्वरास यज्ञ अर्पण करायास आलो आहे. मजबरोबर यज्ञास येण्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा.” त्याने इशाय व त्याचे पुत्र यांना शुद्ध केल्यावर त्यांना यज्ञास बोलाविले.
Un viņš sacīja: ar mieru; es esmu nācis Tam Kungam upurēt. Svētījaties un nāciet ar mani pie tā upura. Un viņš svētīja Isaju un viņa dēlus un tos aicināja pie tā upura.
6 ते आले तेव्हा असे झाले कि, त्याने अलियाबास पाहून स्वतःला म्हटले, “परमेश्वराचा अभिषिक्त निःसंशय हाच आहे.”
Un notikās, kad tie nāca, tad viņš uzlūkoja Elijabu un domāja: tiešām, šis ir Tā Kunga priekšā Viņa svaidītais.
7 परंतु परमेश्वराने शमुवेलाला म्हटले, “की त्याच्या स्वरूपाकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको कारण मी त्यास नाकारीले आहे. जसे मनुष्य पाहतो तसे परमेश्वर पाहत नाही. कारण की, मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो परंतु परमेश्वर हृदय पाहतो.”
Bet Tas Kungs sacīja uz Samuēli: “Neuzlūko viņa ģīmi nedz viņa lielo garumu, jo Es viņu esmu atmetis. Jo tas nav tā, kā cilvēki redz. Jo cilvēks redz, kas priekš acīm, bet Tas Kungs uzlūko sirdi.”
8 मग इशायाने अबीनादाबाला बोलाविले आणि त्यास शमुवेलापुढे चालविले. परंतु शामुवेलाने म्हटले, “यालाही परमेश्वराने निवडले नाही.”
Tad Isajus aicināja Abinadabu, un tam lika iet Samuēla priekšā; bet viņš sacīja: arī šo Tas Kungs nav izredzējis.
9 मग इशायने शम्मास पुढे चालविले. परंतु शमुवेलाने म्हटले. “ह्यालाही परमेश्वराने निवडले नाही.”
Tad Isajus Šamum lika nākt priekšā. Bet viņš sacīja: arī šo Tas Kungs nav izredzējis.
10 १० असे इशायाने आपल्या सात पुत्रांना शमुवेलापुढे चालविले. “परंतु शमुवेलाने इशायला म्हटले, यांपैकी कोणालाच परमेश्वराने निवडले नाही.”
Tā Isajus saviem septiņiem dēliem lika nākt Samuēla priekšā, bet Samuēls sacīja uz Isaju: Tas Kungs nevienu no šiem nav izredzējis.
11 ११ तेव्हा शमुवेलाने इशायला म्हटले, “तुझे सर्व पुत्र आले आहेत का?” मग तो म्हणाला, “आणखी एक धाकटा आहे, तो राहिला आहे. तो मेंढरे राखीत आहे.” तेव्हा शमुवेलाने त्यास म्हटले. “त्याला येथे बोलावून आण त्याच्या येण्यापूर्वी आम्ही जेवायला बसणार नाही.”
Un Samuēls sacīja uz Isaju: vai šie tie jaunekļi visi? Un viņš sacīja: Tas jaunākais vēl atliek, un redzi, viņš gana avis. Tad Samuēls sacīja uz Isaju: nosūti un atvedi viņu šurp; jo mēs neapsēdīsimies, kamēr viņš nebūs atnācis.
12 १२ मग त्याने त्यास बोलावून आणले तो तांबूस रंगाचा आणि सुंदर डोळ्यांचा होता आणि त्याचे रुप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, “उठून ह्याला अभिषेक कर; कारण हाच तो आहे.”
Tad viņš nosūtīja un to atveda. Un tas bija sarkaniem vaigiem, skaistām acīm un jauku ģīmi. Tad Tas Kungs sacīja: celies un svaidi to, jo tas ir tas.
13 १३ मग शमूवेलाने तेलाचे शींग घेऊन त्याच्या भावांच्यामध्ये त्यास अभिषेक केला. त्या दिवसापासून परमेश्वराचा आत्मा दावीदावर येऊन राहिला. त्यानंतर शमुवेल उठून रामा येथे गेला.
Tad Samuēls ņēma savu eļļas ragu un to svaidīja viņa brāļu vidū. Un Tā Kunga Gars nāca pār Dāvidu no šīs dienas un joprojām. Un Samuēls cēlās un nogāja uz Rāmatu.
14 १४ मग परमेश्वराच्या आत्म्याने शौलास सोडले आणि देवापासून एक दुष्ट आत्मा त्यास त्रास करू लागला.
Un Tā Kunga Gars atkāpās no Saula, un viņu biedināja ļauns gars no Tā Kunga.
15 १५ तेव्हा शौलाचे चाकर त्यास म्हणाले, “आता पाहा देवाकडून एक दुष्ट आत्मा तुम्हास त्रास देतो आहे.
Tad Saula kalpi uz to sacīja: redzi jel, ļauns gars no Dieva tevi biedina.
16 १६ आपण विणा वाजविणारा निपुण असा एक पुरुष शोधू. तशी आज्ञा आमच्या धन्याने आपल्यासमोर जे चाकर आहेत त्यास द्यावी. मग जेव्हा देवाकडून दुरात्मा तुम्हास त्रास देऊ लागेल, तेव्हा तो आपल्या हाताने ती वाजवील आणि तुम्हास बरे वाटेल.”
Lai saka mūsu kungs uz saviem kalpiem, kas tavā priekšā stāv, lai tie meklē kādu vīru, kas māk spēlēt uz koklēm, un kad tas ļaunais gars no Dieva pār tevi nāk, tad lai viņš ar savu roku spēlē, tad tev paliks labāki.
17 १७ मग शौलाने आपल्या चाकरास म्हटले, “जा, चांगला वाजविणारा पुरुष शोधून माझ्याकडे आणा.”
Tad Sauls sacīja uz saviem kalpiem: lūkojiet man jel pēc tāda vīra, kas labi māk spēlēt, un atvediet to pie manis.
18 १८ मग चाकरातून एका तरूणाने उत्तर दिले की, पाहा वाजविण्यात निपुण, पराक्रमी, लढाऊ पुरुष व उत्तम वक्ता व मनोहर रूपाचा व ज्याला परमेश्वर अनुकूल आहे असा पुरुष मी पहिला आहे, तो इशाय बेथलहेमी ह्याचा पुत्र आहे.
Tad viens no viņa sulaiņiem atbildēja un sacīja: raugi, es esmu redzējis vienu Isajus dēlu Bētlemē, tas māk labi spēlēt un ir spēcīgs varonis un karavīrs un gudrs vārdos un skaists no auguma, un Tas Kungs ir ar viņu.
19 १९ मग शौलाने इशायजवळ दूत पाठवून म्हटले की, “तुझा पुत्र दावीद जो मेंढरे राखीत असतो, त्यास मजपाशी पाठवावे.”
Tad Sauls sūtīja vēstnešus pie Isajus un tam sacīja: sūti pie manis savu dēlu Dāvidu, kas ir pie avīm.
20 २० तेव्हा इशायने भाकरीने लादलेले एक गाढव व द्राक्षरसाचा बुधला व एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद याच्या हाताने शौलाकडे पाठवले.
Tad Isajus ņēma ēzeli ar maizi un trauku vīna un vienu kazlēnu, un to sūtīja Saulam caur sava dēla Dāvida roku.
21 २१ दावीद शौलाजवळ येऊन त्यासमोर उभा राहिला, तेव्हा त्याची त्याच्यावर फार प्रीती बसली आणि तो त्याचा शस्त्र वाहक झाला.
Tā Dāvids nāca pie Saula un stāvēja viņa priekšā, un tas viņu ļoti iemīlēja, un viņš tam bija par bruņu nesēju.
22 २२ मग शौलाने इशायजवळ निरोप पाठवून सांगितले मी तुला विनंती करतो की, आता दावीदाला माझ्या जवळ राहू दे; कारण त्याच्यावर माझी कृपाद्दष्टी झाली आहे.
Un Sauls sūtīja pie Isajus un lika sacīt: lai jel Dāvids paliek pie manis, jo viņš ir žēlastību atradis manās acīs.
23 २३ मग जेव्हा केव्हा देवापासून दुष्ट आत्मा शौलावर येत असे, “तेव्हा दावीदाने विणा घेऊन आपल्या हाताने वाजवी. मग शौल शांत होऊन बरा होई, व तो दुष्ट आत्म्या त्यास सोडून जाई.”
Un notikās, kad gars no Dieva nāca pār Saulu, tad Dāvids ņēma kokles un spēlēja ar savu roku: tad Sauls atspirga un tam palika labāki, un tas ļaunais gars no viņa atstājās.

< 1 शमुवेल 16 >