< 1 शमुवेल 15 >
1 १ शमुवेल शौलाला म्हणाला, “परमेश्वराने आपले लोक इस्राएल यांच्यावर तू राजा व्हावे म्हणून तुला अभिषिक्त करायला मला पाठवले तर आता तू परमेश्वराची वचने ऐक.
Potem Samuel powiedział do Saula: PAN zesłał mnie, abym cię namaścił na króla nad jego ludem, nad Izraelem. Teraz więc posłuchaj głosu słów PANA.
2 २ सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल मिसरातून वर येत असता अमालेकाने त्यास काय केले, म्हणजे तो वाटेवर त्याच्याविरुध्द कसा उभा राहिला हे मी पाहिले आहे.
Tak mówi PAN zastępów: Wspomniałem [na to], co Amalek uczynił Izraelowi, jak się na niego zasadził na drodze, gdy wychodził z Egiptu.
3 ३ आता तू जाऊन अमालेकाला मार आणि त्यांचे जे आहे त्या सर्वांचा नाश कर त्यांना सोडू नको तर पुरुष व स्त्रिया मुले व बालके व गाय-बैल, मेंढरे व उंट व गाढव यांना जिवे मार.”
Teraz idź, pobij Amaleka i zniszcz wszystko, co ma. Nie lituj się nad nimi, lecz zabijaj i mężczyzn, i kobiety, dzieci i niemowlęta, woły i owce, wielbłądy i osły.
4 ४ मग शौलाने लोकांस बोलावून तलाईमात त्यांची मोजणी केली; ते दोन लक्ष पायदळ होते व यहूदातील माणसे दहा हजार होती.
Saul zebrał więc lud i policzył go w Telaim: [było] dwieście tysięcy pieszych i dziesięć tysięcy mężczyzn z Judy.
5 ५ मग शौल अमालेकाच्या नगराजवळ जाऊन एका खोऱ्यात दबा धरून राहिला.
Potem Saul przybył do miasta Amaleka i urządził zasadzkę w dolinie.
6 ६ तेव्हा शौलाने केनी लोकांस म्हटले, “अमालेक्याबरोबर तुम्हास मारू नये म्हणून तुम्ही त्याच्यांमधून निघून जा; कारण इस्राएल लोक मिसरांतून आले तेव्हा तुम्ही त्यांच्याशी स्नेहाने वर्तला.” तेव्हा केनी अमालेक्यामधून निघून गेले.
I Saul powiedział do Kenitów: Idźcie, odstąpcie od Amalekitów i wyjdźcie spośród [nich], abym was nie wytracił wraz z nimi. Okazaliście bowiem życzliwość wszystkim synom Izraela, gdy wychodzili z Egiptu. I tak Kenici odstąpili od Amalekitów.
7 ७ मग शौलाने हवीला पासून मिसरासमोरील शूरापर्यंत अमालेक्यांना मार दिला.
Wtedy Saul pobił Amalekitów od Chawila aż do wejścia do Szur, leżącego naprzeciw Egiptu.
8 ८ त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत धरले आणि त्या सर्व लोकांस तलवारीच्या धारेखाली जिवे मारले.
Pochwycił żywcem Agaga, króla Amalekitów, a cały lud zgładził ostrzem miecza.
9 ९ तथापि शौलाने व लोकांनी अगागला जिवंत ठेवले; तसेच मेंढरे, बैल, पशु, कोकरे, असे जे काही चांगले धष्टपुष्ट ते राखून ठेवले त्यांचा अगदीच नाश केला नाही; परंतु जे टाकाऊ आणि निरूपयोगी होते त्या सर्वांचा त्यांनी संपूर्ण नाश केला.
Lecz Saul i lud oszczędzili Agaga i to, co najlepsze z owiec, wołów, tłustych zwierząt, baranów, oraz wszystko, co było dobre i nie chcieli tego zniszczyć. Zniszczyli zaś wszystko, co było nikczemne i nędzne.
10 १० तेव्हा परमेश्वराचे वचन शमुवेलाकडे आले, ते म्हणाले,
Wtedy doszło do Samuela słowo PANA:
11 ११ “मी शौलाला राजा केले याचे मला दु: ख होत आहे. कारण तो मला अनुसरण्याचे सोडून मागे वळला आहे आणि त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” मग शमुवेलाला राग आला आणि त्याने सारी रात्र परमेश्वराचा धावा केला.
Żałuję, że ustanowiłem Saula królem. Odwrócił się bowiem ode mnie i nie wypełnił mego słowa. I Samuel bardzo się rozgniewał, i wołał do PANA przez całą noc.
12 १२ शमुवेल शौलाला भेटण्यासाठी पहाटेस उठला. तेव्हा कोणी शमुवेलाला सांगितले की, शौल कर्मेलास आला होता आणि पाहा आपणासाठी स्मारक उभारून परतला व खाली गिलगालास गेला आहे.
A gdy Samuel wstał wcześnie rano, by spotkać się z Saulem, doniesiono Samuelowi: Saul przybył do Karmelu i tam właśnie postawił sobie pomnik, po czym zawrócił, poszedł i przybył do Gilgal.
13 १३ मग शमुवेल शौलाकडे आला, आणि शौल त्यास म्हणाला, “परमेश्वर तुम्हास आशीर्वादित करो! मी परमेश्वराची आज्ञा पूर्णपणे पाळली आहे.”
A gdy Samuel przyszedł do Saula, Saul mu powiedział: Błogosławiony jesteś przez PANA. Wypełniłem słowo PANA.
14 १४ तेव्हा शमुवेल म्हणाला, “तर मेंढरांचे ओरडणे माझ्या कानी पडते व गाय-बैलांचे हंबरणे मी ऐकतो ते काय आहे?”
Lecz Samuel powiedział: A co to za beczenie owiec w moich uszach i co to za ryk wołów, który słyszę?
15 १५ मग शौल म्हणाला, “लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली. कारण त्यांनी मेंढरे व गुरे यातील उत्तम ती परमेश्वर तुमचा देव याला यज्ञ अर्पण करण्यासाठी राखून ठेवली आहेत. पण आम्ही बाकीचा पूर्णपणे नाश केला.”
Saul odpowiedział: Przyprowadzili je od Amalekitów. Lud bowiem oszczędził to, co najlepsze z owiec i wołów, aby je ofiarować PANU, twemu Bogu. To zaś, co pozostało, wytępiliśmy.
16 १६ तेव्हा शमुवेलाने शौलाला म्हटले, “तू थांब, म्हणजे या गेल्या रात्री परमेश्वराने मला काय सांगितले.” ते मी तुला ऐकवतो. शौल त्यास म्हणाला, “बोला!”
Wtedy Samuel powiedział do Saula: Stój, a powiem ci, co PAN mówił do mnie tej nocy. Odpowiedział mu: Powiedz.
17 १७ मग शमुवेल म्हणाला, “तू आपल्या दृष्टीने लहान होतास तेव्हा तुला इस्राएलाच्या वंशांचा मुख्य करण्यात आले नाही काय? आणि परमेश्वराने तुला इस्राएलावर राजा केले”
Samuel rzekł: Czyż to nie wtedy, gdy byłeś mały w swoich oczach, stałeś się głową pokoleń Izraela i PAN namaścił cię na króla nad Izraelem?
18 १८ परमेश्वराने तुला तुझ्या मार्गावर पाठवून सांगितले की, जा त्या पापी अमालेक्यांचा नाश कर. ते नाहीसे होईपर्यंत त्यांच्याशी लढाई कर.
Potem PAN posłał cię w drogę i powiedział: Idź, wytrać tych grzeszników, Amalekitów, i walcz z nimi, aż ich wytępisz.
19 १९ तर मग तू परमेश्वराचे वचन का पाळले नाही? तू तर लुट पकडून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले?
Dlaczego więc nie posłuchałeś głosu PANA, lecz rzuciłeś się na łup i uczyniłeś to zło w oczach PANA?
20 २० तेव्हा शौल शमुवेलाला म्हणाला, “मी परमेश्वराचे वचन खरोखरच पाळले व ज्या मार्गावर परमेश्वराने मला पाठवले त्यामध्ये मी चाललो आणि अमालेक्यांचा नाश करून अमालेकाचा राजा अगाग याला मी घेऊन आलो आहे.
Wtedy Saul odpowiedział Samuelowi: Przecież posłuchałem głosu PANA. Poszedłem drogą, którą mnie posłał PAN, i przyprowadziłem Agaga, króla Amalekitów, a Amalekitów wytraciłem.
21 २१ परंतु ज्यांचा नाश करायचा होता अशी जी लुटीची मेंढरे व गुरे त्यातली उत्तम ती लोकांनी परमेश्वर तुझा देव याला गिलगालात यज्ञ करण्यासाठी ठेवून घेतली.”
Lud natomiast wziął z łupu owce i woły, najlepsze z tego, co miało być zniszczone, aby je ofiarować PANU, twemu Bogu, w Gilgal.
22 २२ शमुवेल म्हणाला, “परमेश्वरास आपले वचन पाळण्याने जितका आनंद होतो तितका आनंद होमार्पणांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा यज्ञापेक्षा आज्ञा पालन करणे आणि मेंढरांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे.
Samuel odpowiedział: Czy PAN ma takie [samo] upodobanie w całopaleniach i ofiarach jak w posłuszeństwie głosowi PANA? Oto posłuszeństwo jest lepsze niż ofiara, [lepiej jest] słuchać, niż [ofiarowywać] tłuszcz baranów.
23 २३ कारण बंडखोरी जादुगीरीच्या पापासारखी आहे आणि हट्ट हा दुष्टपणा, मूर्तीपूजा व घोर अन्याय, मूर्ती करणे यासारखा आहे. तू परमेश्वराचे वचन नाकारले यामुळे राजा म्हणून त्याने तुला नाकारले आहे.”
Bunt bowiem [jest jak] grzech czarów, a upór jest jak nieprawość i bałwochwalstwo. Ponieważ odrzuciłeś słowo PANA, on także odrzucił cię jako króla.
24 २४ मग शौल शमुवेलाला म्हणाला, “मी पाप केले आहे; कारण मी परमेश्वराची आज्ञा व तुझी वचने मोडली आहेत, ते यामुळे की, लोकांचे भय धरून मी त्यांचे ऐकले.
Wtedy Saul powiedział do Samuela: Zgrzeszyłem, ponieważ przekroczyłem rozkaz PANA i twoje słowa, gdyż bałem się ludu i posłuchałem jego głosu.
25 २५ तर मी तुला विनंती करतो, माझ्या पापीची क्षमा कर, आणि मी परमेश्वराची आराधना करावी म्हणून माझ्याबरोबर परत ये.”
Teraz jednak przebacz [mi], proszę, mój grzech i zawróć ze mną, abym oddał pokłon PANU.
26 २६ शमुवेल शौलाला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही; कारण तू देवाचे वचन धिक्कारले, आणि परमेश्वराने तुला इस्राएलावर राज्य करण्यापासून धिक्कारले आहे.”
Lecz Samuel odpowiedział Saulowi: Nie zawrócę z tobą, ponieważ odrzuciłeś słowo PANA, a PAN odrzucił ciebie, abyś nie był [już] królem nad Izraelem.
27 २७ शमुवेल जायला वळला तेव्हा शौलाने त्याच्या झग्याचा काठ धरला व तो फाटला.
A [gdy] Samuel odwrócił się, aby odejść, [Saul] chwycił skraj jego płaszcza i [ten] rozdarł się.
28 २८ तेव्हा शमुवेलाने त्यास म्हटले, “परमेश्वराने आज इस्राएलाचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन तुझा शेजारी जो तुझ्यापेक्षा बरा त्यास दिले आहे.
Wtedy Samuel powiedział mu: PAN oddarł ci dziś królestwo Izraela i dał je twemu bliźniemu, lepszemu od ciebie.
29 २९ तसेच, इस्राएलाचे सामर्थ्य तो आहे, तो खोटे बोलणार नाही किंवा त्याचे मन बदलणार नाही; कारण मन बदलणारा असा तो मनुष्य नाही.”
Ponadto Mocarz Izraela nie kłamie i nie będzie żałować, gdyż nie jest człowiekiem, aby miał żałować.
30 ३० तेव्हा शौल म्हणाला, “मी पाप केले आहे. तरी आता मी तुला विनंती करतो माझ्या लोकांच्या वडिलांसमोर व इस्राएलासमोर तू माझा सन्मान कर आणि परमेश्वर तुझा देव याचे भजन पूजन मी करावे म्हणून माझ्याबरोबर परत ये.”
A on odpowiedział: Zgrzeszyłem. Teraz jednak uszanuj mnie, proszę, wobec starszych mego ludu i wobec Izraela i zawróć ze mną, abym oddał pokłon PANU, twemu Bogu.
31 ३१ मग शमुवेल वळून शौलाच्या मागे आला आणि शौलाने परमेश्वराचे भजन पूजन केले.
Zawrócił więc Samuel i szedł za Saulem, a Saul oddał pokłon PANU.
32 ३२ मग शमुवेल म्हणाला, “अमालेक्याचा राजा अगाग याला माझ्याकडे आणा.” तेव्हा अगाग डौलाने त्याच्याकडे आला, आणि अगागाने म्हटले खचित मरणाचे कडूपण निघून गेले आहे.
Potem Samuel rzekł: Przyprowadźcie do mnie Agaga, króla Amalekitów. Agag podszedł do niego odważnie i powiedział: Na pewno ustąpiła gorycz śmierci.
33 ३३ तेव्हा शमुवेल म्हणाला, “जसे तुझ्या तलवारीने स्त्रियांना बालकांविरहित केले आहे, तशी बायकांमध्ये तुझी आई बालकाविरहित होईल.” मग शमुवेलाने गिलगालात परमेश्वराच्या समोर अगागाचे तुकडे तुकडे केले.
Lecz Samuel powiedział: Jak twój miecz pozbawiał kobiety ich dzieci, tak wśród kobiet twoja matka będzie pozbawiona dzieci. I Samuel posiekał Agaga na kawałki przed PANEM w Gilgal.
34 ३४ त्यानंतर शमुवेल रामा येथे गेला आणि शौल आपल्या घरी शौलाच्या गिब्यास गेला.
Potem Samuel udał się do Rama, a Saul poszedł do swego domu w Gibea Saulowym.
35 ३५ शमुवेल आपल्या मरणाच्या दिवसापर्यंत शौलाला भेटायला आणखी गेला नाही; तरी शमुवेलाने शौलासाठी शोक केला; आपण शौलाला इस्राएलांवर राजा केले म्हणून परमेश्वर अनुतापला.
I Samuel nie zobaczył już Saula aż do dnia swojej śmierci. Bolał jednak Samuel nad Saulem, a PAN żałował, że uczynił Saula królem nad Izraelem.