< 1 शमुवेल 13 >
1 १ शौल राज्य करू लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता; त्याने (दोन) वर्षे इस्राएलावर राज्य केल्यानंतर,
Saul was [thirty] years old when he began to reign; and, when he had reigned two years over Israel,
2 २ त्याने इस्राएलातून तीन हजार पुरुष निवडून घेतले; त्यातले दोन हजार त्याच्याबरोबर मिखमाशांत व बेथेलाच्या डोंगरात होते आणि योनाथानाबरोबर बन्यामिनाच्या गिब्यात एक हजार होते. बाकीच्या लोकांस त्याने त्यांच्या घराकडे पाठवले, प्रत्येकजण त्याच्या तंबूकडे गेला.
Saul chose him three thousand men out of Israel, of whom there were with Saul, two thousand in Michmash and in the hill-country of Bethel, and, a thousand, were with Jonathan, in Gibeah of Benjamin, —but, the rest of the people, he let go, every man to his own home.
3 ३ गिब्यात पलिष्ट्यांच्या सैन्यांना योनाथानाने पराजित केले आणि पलिष्ट्यांनी त्याविषयी ऐकले. तेव्हा शौलाने सर्व मुलखात शिंग वाजवून म्हटले, “इब्र्यांना ऐकू द्या.”
Then did Jonathan smite the garrison of Philistines that was in Geba, and the Philistines heard of it, —and, Saul, blew with a horn throughout all the land saying, Let the Hebrews hear!
4 ४ शौलाने पलिष्ट्यांच्या सैन्याला पराजित केले आणि पलिष्ट्यांना इस्राएलाचा तिरस्कार वाटू लागला, असे सर्व इस्राएलांनी ऐकले. त्यानंतर लोक शौलाजवळ गिलगालात एकत्र जमले.
And, all Israel, heard say—Saul hath smitten the garrison of the Philistines, Moreover, also, Israel have made themselves odious among the Philistines, —so the people were called together to follow Saul, to Gilgal.
5 ५ मग तीस हजार रथ व सहा हजार रथ चालवणारे, आणि समुद्राच्या वाळूसारखे असंख्य लोक घेऊन पलिष्टी इस्राएलाशी लढाई करायला जमले आणि त्यांनी मिखमाशात येऊन बेथ-आवेनाच्या पूर्वेस तळ दिला.
And, the Philistines, gathered themselves together to fight with Israel, thirty thousand chariots, and six thousand horsemen, a people also like the sand that is on the sea-shore for multitude, —and they came up, and encamped in Michmash, east of Beth-aven.
6 ६ आपण अडचणीत आलो आहो हे इस्राएलांनी पाहिले. कारण लोक निराश झाले होते, तेव्हा लोक गुहा, झुडपात, खडकात, विहीरीत, व खड्यात लपले.
So, the men of Israel, saw they were in a strait, for the people had been harassed, —and the people had hidden themselves in caves, and in thickets, and among cliffs, and in holes, and in pits.
7 ७ कित्येक इब्री यार्देनेच्या पलीकडे गाद व गिलाद या प्रांतात गेले. पण शौल गिलगालात तसाच राहिला आणि सर्व लोक त्याच्यामागे थरथर कापत गेले.
And, Hebrews, had passed over the Jordan, to the land of Gad, and Gilead, —but, Saul, was yet in Gilgal, and all the people, trembled after him.
8 ८ शमुवेलाने नेमलेल्या वेळेप्रमाणे तो सात दिवस थांबला परंतु शमुवेल गिलगालास आला नाही आणि लोक शौलापासून विखरून जाऊ लागले.
And he waited seven days, by the set time that Samuel had named, but Samuel came not to Gilgal, —and the people were scattered from him.
9 ९ तेव्हा शौलाने म्हटले, “होमार्पणे व शांत्यर्पणे इकडे माझ्यापाशी आणा.” मग त्याने होमार्पण अर्पिले.
Then said Saul, Bring near unto me, the ascending-sacrifice and the peace-offerings. And he offered up the ascending-sacrifice.
10 १० त्याने होमार्पण अर्पिण्याची समाप्ती केली तितक्यात पाहा शमुवेलाचे आगमन झाले. शौल त्यास भेटण्यास आणि अभिवादन करण्यास बाहेर गेला.
And it came to pass, as he had made an end of offering up the ascending-sacrifice, lo! Samuel, had come, —and Saul went out to meet him, that he might bless him.
11 ११ तेव्हा शमुवेल म्हणाला, “तू हे काय केले आहे?” शौलाने म्हटले, “कारण मी पाहिले की, लोक माझ्यापासून निघून जाऊ लागले, आणि नेमलेल्या दिवसाच्या आत तुम्ही आला नाही, आणि पलिष्टी मिखमाश येथे जमले आहेत,
Then said Samuel—What hast thou done? And Saul said—Because I saw that the people had been scattered from me, and, thou, hadst not come within the appointed days, and, the Philistines, had gathered themselves together to Michmash,
12 १२ म्हणून मी म्हणालो, पलिष्टी खाली गिलगालास माझ्याविरूद्ध येत आहेत आणि मी परमेश्वराची मर्जी अद्याप मिळवली नाही. म्हणून मी स्वत: च्या मजबुरीने भाग पडून होमार्पण अर्पिले.”
therefore I said—Now, will the Philistines come down against me, at Gilgal, but, the face of Yahweh, have I not appeased: So I forced myself, and offered up the ascending-sacrifice.
13 १३ नंतर शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मूर्खपणाचे कृत्य केले. परमेश्वर तुझा देव याने जी आज्ञा तुला आज्ञापिली ती तू मानली नाही. मानली असती तर आता परमेश्वराने इस्राएलावर तुझे राज्य निरंतर स्थापले असते.
And Samuel said unto Saul—Thou hast shewn thyself foolish, —thou hast not kept the commandment of Yahweh thy God, which he commanded thee, for, now, would Yahweh have established thy kingdom unto Israel until times age-abiding;
14 १४ परंतु आता तुझे राज्य चालू राहणार नाही. परमेश्वराने आपल्या मनासारखा मनुष्य शोधला आहे, आणि त्यास आपल्या लोकांचा राजा होण्यास नेमले आहे, कारण परमेश्वराने जे तुला आज्ञापिले ते तू पाळले नाही.”
Whereas, now, shall thy kingdom not be established, —Yahweh hath sought out for him a man after his own heart, and Yahweh hath commanded him to be leader over his people, because thou hast not kept that which Yahweh commanded thee.
15 १५ मग शमुवेल उठून गिलगालाहून बन्यामिनातील गिबा येथे गेला. त्यानंतर शौलाने आपणाजवळ जे लोक होते त्यांची गणना केली, ते सुमारे सहाशे होते.
And Samuel arose, and ascended from Gilgal unto Gibeah of Benjamin. And Saul numbered the people who were found with him, about six hundred men.
16 १६ शौल, त्याचा मुलगा योनाथान व त्याच्याबरोबरचे लोक बन्यामिनांतील गिब्यात राहिले. पण पलिष्ट्यांनी मिखमाशात छावणी केली.
Now, Saul, and Jonathan his son, and the people that were found with him, were abiding in Geba of Benjamin, —but, the Philistines, had encamped in Michmash.
17 १७ पलिष्ट्यांच्या छावणीतून छापा मारणारे तीन टोळ्या करून निघाले. एक टोळी आफ्राच्या वाटेने शुवालाच्या प्रांताकडे गेली
And the spoilers came forth out of the camp of the Philistines, in three companies, the first company, turned unto the way of Ophrah, unto the land of Shual;
18 १८ आणि दुसरी टोळी बेथ-होरोनाच्या वाटेने गेली आणि आणखी एक टोळी जो प्रांत सबोईम खोऱ्याकडला आहे त्याच्या वाटेने रानाकडे वळली.
and, the second company, turned unto the way of Beth-horon, —and, the third company, turned unto the way of the boundary that overlooketh the valley of Zeboim, towards the wilderness.
19 १९ तेव्हा इस्राएलाच्या सर्व देशात कोणी लोहार मिळेना, कारण पलिष्ट्यांनी म्हटले होते, कदाचित इब्री आपणासाठी तलवारी किंवा भाले करून घेतील.
Now, a smith, could not be found, throughout all the land of Israel—for the Philistines had said, Lest the Hebrews make sword or spear.
20 २० परंतु सर्व इस्राएली लोक, आपला नांगराचा फाळ, आपली कुदळ, आपली कुऱ्हाड, आणि विळ्यांना धार लावण्यासाठी खाली पलिष्ट्यांकडे जात.
So all Israel went down to the Philistines, —to sharpen every man his share, and his mattock, and his axe, and his sickle.
21 २१ नांगराचा फाळ आणि कुदळ यांना धार लावण्याचे शुल्क दोन तृतीयांश शेकेल आणि एकतृतीयांश कुऱ्हाडीला धार देण्यासाठी आणि पराणी सरळ करण्यासाठी.
Howbeit they had a file for the sickles, and the mattocks, and the three-pronged forks, and the axes, —and for setting the goads.
22 २२ आणि लढाईच्या दिवशी असे झाले की, जे लोक शौल व योनाथान यांच्याजवळ होते त्यांच्यातल्या कोणाच्याही हाती तलवार व भाला नव्हता. फक्त शौल व त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ ते होते.
Thus would it come to pass, in the day of battle, that there was found—neither sword nor spear, in the hand of any of the people, that were with Saul and Jonathan, but such were found belonging to Saul and to Jonathan his son.
23 २३ पलिष्ट्यांचे सैन्य निघून मिखमाशाच्या उताराकडे गेले.
Now the garrison of the Philistines had come out to the pass of Michmash.