< 1 शमुवेल 11 >

1 मग नाहाश अम्मोनी याने जाऊन याबेश-गिलादास वेढा घातला. तेव्हा याबेशांतल्या सर्व मनुष्यांनी नाहाशाला म्हटले, “आम्हाशी करार कर म्हणजे आम्ही तुझी सेवा करू.”
Tad Naās, tas Amonietis, cēlās un apmeta lēģeri pret Jabesu Gileādā, un visi Jabesas vīri sacīja uz Naāsu: deri derību ar mums, tad mēs tev gribam kalpot.
2 तेव्हा नाहाश अम्मोनी त्यांना म्हणाला, “मी तुम्हाशी अशा अटीवर करार करीन की, मी तुम्हातील प्रत्येकाचा उजवा डोळा फोडून सर्व इस्राएलाची मानहानी करीन.”
Tad Naās, tas Amonietis, uz tiem sacīja: tā es ar jums gribu derēt derību, ka es jums visiem labo aci izduru un ka es visu Israēli tā lieku kaunā.
3 तेव्हा याबेशच्या वडिल जनांनी त्यास म्हटले, “आम्हांला सात दिवसाचा अवकाश दे, म्हणजे इस्राएलाच्या सर्व प्रातांत आम्ही दूत पाठवू. मग जर आम्हास सोडवायला कोणी येत नसला, तर आम्ही बाहेर तुझ्याकडे येऊ.”
Tad Jabesas vecaji uz viņu sacīja: dod mums septiņas dienas vaļu, ka mēs vēstnešus sūtam pa visām Israēla robežām; ja tad nav, kas mūs izpestī, tad mēs pie tevis gribam iziet.
4 आणि त्या दूतांनी शौलाच्या गिब्याकडे येऊन या गोष्टी लोकांच्या कानावर घातल्या; तेव्हा सर्व लोक मोठ्याने आवाज काढून रडू लागले.
Kad nu tie vēstneši nāca uz Ģibeju, Saula pilsētu, un šos vārdus runāja priekš ļaužu ausīm, tad visi ļaudis pacēla savu balsi un raudāja.
5 आणि पाहा शौल शेतातून गाईबैलांच्या मागून चालत येत होता. शौल म्हणाला, “लोकांस काय झाले? म्हणून ते रडत आहेत?” तेव्हा त्यांनी त्यास याबेशातील माणसे काय म्हणाली ते सांगितले.
Un redzi, Sauls ar vēršiem nāca no lauka. Un Sauls sacīja: kas tiem ļaudīm kait, ka tie raud? Tad tie viņam stāstīja Jabesas vīru vārdus.
6 तेव्हा शौलाने या गोष्टी ऐकल्यावर देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला आणि त्याचा राग फारच भडकला.
Un Dieva Gars nāca pār Saulu, kad tas šos vārdus dzirdēja, un viņa dusmas ļoti iedegās.
7 मग बैलांची जोडी घेऊन त्याने त्यांचे तुकडे तुकडे केले आणि दूतांच्या हातून ते इस्राएलाच्या सर्व प्रांतात पाठवून सांगितले की, “जो कोणी शौलामागे व शमुवेलाच्यामागे येत नाही त्याच्या बैलांना असे करण्यात येईल.” तेव्हा परमेश्वराचे भय लोकांवर पडले व ते एक मनाचे होऊन एकत्र होऊन निघाले.
Un viņš ņēma jūgu vēršu un tos sakapāja gabalos un tos sūtīja pa visām Israēla robežām caur vēstnešu rokām, sacīdams: kas neizies Saulam pakaļ un Samuēlim pakaļ, tā vēršiem tāpat darīs. Tad Tā Kunga bijāšana krita uz tiem ļaudīm, un tie izgāja kā viens vienīgs vīrs.
8 मग जेव्हा त्याने बेजेकात त्यांची नोंद केली, तेव्हा इस्राएलाचे लोक तीन लाख होते, आणि यहूदाचे लोक तीस हजार होते.
Un viņš tos skaitīja Bazekā, un Israēla bērnu bija trīssimt tūkstoši un Jūda vīru bija trīsdesmit tūkstoši.
9 तेव्हा जे दूत आले होते त्यांना त्यांनी म्हटले, “याबेश-गिलादाच्या मनुष्यांना असे सांगा की, उद्या सूर्य तापेल तेव्हा तुमची सुटका होईल.” मग दूतांनी जाऊन याबेशाच्या मनुष्यांना तसे सांगितले; तेव्हा ते आनंदीत झाले.
Tad tie sacīja uz tiem vēstnešiem, kas bija nākuši: tā sakāt Jabesas vīriem Gileādā: rītu jums būs glābšana, kad saule spiež. Kad nu tie vēstneši nāca un Jabesas vīriem to stāstīja, tad tie priecājās.
10 १० मग याबेशांतील माणसे नाहाशाला म्हणाली, “उद्या आम्ही बाहेर तुम्हाकडे येऊ तेव्हा तुम्हास बरे दिसेल तसे आमचे करा.”
Un Jabesas vīri sacīja: rīt mēs pie jums iesim ārā, lai jūs mums dariet, tā kā jums patīk.
11 ११ मग सकाळी असे झाले की शौलाने लोकांच्या तीन टोळ्या केल्या आणि त्यांनी पहाटेच्या प्रहरी छावणीमध्ये येऊन दिवस तापे पर्यंत अम्मोन्यांवर हल्ला केला आणि त्यांचा पराभव केला. आणि असे झाले की, जे उरले त्यातले दोन देखील एकत्र एका ठिकाणी राहिले नाहीत, जे वाचले त्यांची पांगापांग झाली.
Un otrā rītā Sauls tos ļaudis dalīja trijos pulkos, un tie uzbruka lēģerim gaismai austot un kāva Amoniešus, kamēr diena iekarsa; bet tie, kas atlika, tā tapa izklīdināti, ka viņu starpā ne divi nepalika kopā.
12 १२ मग लोक शमुवेलाला म्हणाले, “शौल आम्हावर राज्य करील काय? असे जे बोलले ते कोण आहेत? ती माणसे काढून दे, म्हणजे आम्ही त्याना जिवे मारू.”
Tad tie ļaudis sacīja uz Samuēli: kas tie tādi, kas sacīja: vai lai Sauls pār mums valda? Dodiet šurp tos vīrus, lai tos nokaujam.
13 १३ तेव्हा शौल बोलला, “आज कोणाही मनुष्यास जिवे मारायचे नाही कारण आज परमेश्वराने इस्राएलास सोडवले आहे.”
Bet Sauls sacīja: šai dienā nevienam nebūs tapt nokautam, jo Tas Kungs šodien pestīšanu ir devis iekš Israēla.
14 १४ तेव्हा शमुवेलाने लोकांस म्हटले, “चला आपण गिलगालास जाऊन तेथे नव्याने राज्य स्थापन करू.”
Un Samuēls sacīja uz tiem ļaudīm: nāciet, iesim uz Gilgalu un atjaunosim tur ķēniņa valstību.
15 १५ मग सर्व लोक गिलगालास गेले आणि गिलगालात त्यांनी परमेश्वराच्यासमोर शौलाला राजा केले आणि तेथे परमेश्वराच्यासमोर त्यांनी शांत्यर्पणांचे यज्ञ अर्पण केले; तेव्हा तेथे शौल व इस्राएलाची सर्व माणसे यांना फार आनंद झाला.
Un visi ļaudis gāja uz Gilgalu un cēla tur Saulu par ķēniņu Tā Kunga priekšā Gilgalā, un upurēja tur pateicības upurus Tā Kunga priekšā. Un Sauls tur ļoti priecājās ar visiem Israēla vīriem.

< 1 शमुवेल 11 >