< 1 शमुवेल 10 >
1 १ तेव्हा शमुवेलाने तेलाची कुपी घेतली, शौलाच्या डोक्यावर ओतली, आणि त्याचे चुंबन घेऊन म्हटले, “परमेश्वराने तुला आपल्या वतनावर राजा होण्यास अभिषेक केला म्हणून हे झाले की नाही?
Tedy Samuel wziął bańkę oliwy, i wylał na głowę jego, a pocałowawszy go, rzekł: Izali cię nie pomazał Pan nad dziedzictwem swojem za wodza?
2 २ आज तू माझ्यापासून गेल्यावर राहेलीच्या कबरेजवळ बन्यामिनाच्या प्रांतात सेल्सह येथे तुला दोन माणसे भेटतील ती तुला म्हणतील की, ज्या गाढवांचा शोध करायला तू गेला होतास ती सांपडली आहेत. पाहा तुझा बाप गाढवांची काळजी सोडून, तुझी चिंता करीत आहे, तो म्हणतो, मी आपल्या मुलासाठी काय करू?”
Gdy dziś odejdziesz ode mnie, znajdziesz dwóch mężów u grobu Racheli, na granicach Benjamin w Selsa, którzyć powiedzą: Nalazły się oślice, którycheś chodził szukać, a oto zaniechawszy ojciec twój starania o oślicach, frasuje się o was, mówiąc; Cóż mam czynić z strony syna mego?
3 ३ मग तेथून तू पुढे जाऊन, ताबोराच्या एलोनाजवळ पोहचशील. तेव्हा तेथे तीन करडू नेणारा एक व तीन भाकरी नेणारा एक व द्राक्षरसाची बुधली नेणारा एक अशी तीन माणसे देवाकडे बेथेलला जात असलेली तुला भेटतील.
Potem odszedłszy stamtąd dalej przyjdziesz aż na pole Tabor; i spotkają cię tam trzej mężowie idący do Boga, do domu Bożego, jeden niesie troje koźląt, a drugi niesie trzy bochny chleba, a trzeci niesie łagiew wina;
4 ४ आणि ती तुला अभिवादन करून तुला दोन भाकरी देतील त्या तू त्यांच्या हातातून घेशील.
I pozdrowią cię w pokoju, i dadząć dwa chleby, które weźmiesz z ręk ich.
5 ५ त्यानंतर परमेश्वराच्या टेकडीला म्हणजे जेथे पलिष्ट्यांची चौकी आहे तेथे जाशील. आणि तू तेथे नगरास पोहचल्यावर भविष्यवाद्यांचा गट आणि त्यांच्यापुढे सतार, झांज, बासरी व वीणा वाजवणारे उंचस्थानावरून उतरत असता तू त्यांना भेटशील; ते भविष्यवाणी करीत असतील.
Potem przyjdziesz na pagórek Boży, kędy jest straż Filistyńska; a gdy tam wnijdziesz do miasta, spotkasz się z gromadą proroków zstępujących z góry, a przed nimi będzie harfa, i bęben, i piszczałka, i lutnia, a oni będą prorokowali.
6 ६ परमेश्वराचा आत्मा जोराने तुझ्यावर येईल आणि त्यांच्याबरोबर तू भविष्यवाणी करशील, आणि तू बदलून निराळा पुरुष होशील.
I zstąpi na cię Duch Pański, i będziesz z nimi prorokował, a odmienisz się w inszego męża.
7 ७ आता, जेव्हा ही सर्व चिन्हे तुला प्राप्त होतील, तेव्हा असे होवो की, तुला प्रसंग मिळेल तसे तू कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.
A gdy przyjdą te znaki na cię, czyń cokolwiek znajdzie ręka twoja: bo Bóg jest z tobą.
8 ८ तेव्हा तू माझ्या अगोदर खाली गिलगालास जा. पाहा होमार्पणे अर्पण करायला व शांत्यर्पणाचे यज्ञ करायला मी खाली तुझ्याकडे येईन. मी तुझ्याकडे येऊन जे तुला करायचे आहे ते तुला कळवीन तोपर्यंत सात दिवस तू माझी वाट पाहा.
Potem pójdziesz przedemną do Galgal, a oto, ja przyjdę do ciebie dla sprawowania ofiar całopalnych, i dla ofiarowania ofiar spokojnych; przez siedm dni będziesz czekał, aż przyjdę do ciebie i ukażęć, co będziesz miał czynić.
9 ९ आणि असे झाले की, शमुवेलापासून जायला त्याने आपली पाठ फिरवल्यावर, परमेश्वराने त्यास दुसरे मन दिले. आणि ती सर्व चिन्हे त्याच दिवशी त्यास प्राप्त झाली.
I stało się, gdy się obrócił, aby odszedł od Samuela, odmienił Bóg serce jego w insze; i spełniły się wszystkie one znaki dnia onego.
10 १० जेव्हा ते डोंगराजवळ आले, तेव्हा पाहा भविष्यवाद्यांचा गट त्यास भेटला आणि देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला व त्याच्यामध्ये तो भविष्यवाणी करू लागला.
I przyszli tam na pagórek, a oto, gromada proroków spotkała się z nim, i odpoczął na nim Duch Boży, i prorokował w pośrodku nich.
11 ११ तेव्हा असे झाले की, ज्यांना पूर्वी त्याची ओळख होती, त्या सर्वांनी पाहिले की तो भविष्यवक्त्यांबरोबर भविष्यवाणी करत आहे, ते लोक एकमेकांना म्हणू लागले की, “कीशाच्या मुलाला हे काय झाले? शौल भविष्यवक्त्यांपैकी एक आहे काय?”
Stało się tedy, że wszyscy, którzy go przedtem znali, ujrzeli, a oto, z prorokami prorokował; i mówili wszyscy jeden do drugiego: Cóż się stało synowi Cysowemu? Izali też Saul między prorokami?
12 १२ तेव्हा त्या ठिकाणाचा कोणी एक उत्तर देऊन बोलला, “त्यांचा बाप कोण आहे?” यावरुन, अशी म्हण पडली की, शौलही भविष्यवाद्यांमध्ये आहे काय?
I odpowiedział mąż niektóry stamtąd, i rzekł: I któż jest ojcem ich? przetoż weszło to w przypowieść: Izali i Saul między prorokami?
13 १३ भविष्यवाणी करणे समाप्त केल्यावर तो उंचस्थानाकडे आला.
I przestał prorokować, a przyszedł na górę.
14 १४ नंतर, शौलाचा काका त्यास व त्याच्या चाकराला म्हणाला, “तुम्ही कोठे गेला होता?” तो बोलला, “आम्ही गाढवांचा शोध करीत गेलो; ती नाहीत असे पाहून, आम्ही शमुवेलाकडे गेलो.”
Potem rzekł stryj Saula do niego, i do sługi jego: Gdzieżeście chodzili? I odpowiedział: Szukać oślic; a widząc, żeśmy ich nie mogli znaleść, poszliśmy do Samuela.
15 १५ मग शौलाचा काका म्हणाला, “मी तुला विनंती करतो शमुवेल तुम्हाशी काय बोलला ते मला सांग.”
I rzekł stryj Saula: Powiedz mi proszę, co wam powiedział Samuel.
16 १६ तेव्हा शौल आपल्या काकाला म्हणाला, “गाढवे सापडली असे त्याने आम्हास उघड सांगितले.” परंतु राज्याविषयीची जी गोष्ट शमुवेल बोलला ती त्याने त्यास सांगितली नाही.
I odpowiedział Saul stryjowi swemu: Oznajmił nam za pewne, iż znaleziono oślice; ale o sprawie królestwa, o którem mu Samuel powiedział, nie oznajmił mu.
17 १७ मग शमुवेलाने लोकांस मिस्पा येथे परमेश्वराजवळ बोलावले.
Potem zwołał Samuel ludu do Pana do Masfa,
18 १८ तेव्हा तो इस्राएलाच्या संतानाना म्हणाला, “परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो, मी मिसरातून इस्राएलास वर आणले, आणि मिसऱ्यांच्या हातातून व तुम्हास पीडणारी जी राज्ये त्या सर्वांच्या हातातून तुम्हास सोडवले.
I rzekł do synów Izraelskich: Tak mówi Pan, Bóg Izraelski: Jam wywiódł Izraela z Egiptu, i wybawiłem was z rąk Egipczanów, i z rąk wszystkich królestw, które was trapiły;
19 १९ परंतु तुमचा परमेश्वर, जो स्वत: तुमच्या सर्व शत्रूपासून व तुमच्या संकटातून तुम्हास सोडवतो त्यास तुम्ही आज नाकारले; आणि आम्हांवर राजा नेमून ठेव, असे त्यास म्हटले. तर आता आपल्या वंशाप्रमाणे व आपल्या हजारांप्रमाणे परमेश्वराच्या समोर उभे राहा.”
Aleście wy dziś odrzucili Boga waszego, który was sam wybawia od wszystkiego złego waszego, i od ucisków waszych, i rzekliście mu: Postanów króla nad nami. Przetoż teraz stańcie przed Panem według pokoleń waszych, i wedle tysiąców waszych.
20 २० शमुवेलाने इस्राएलाचे सर्व वंश जवळ आणले, तेव्हा बन्यामिनाचा वंश निवडून घेण्यात आला.
A gdy kazał przystąpić Samuel wszystkim pokoleniom Izraelskim, padł los na pokolenie Benjaminowe.
21 २१ मग त्याने बन्यामिनाचा वंश त्यातील घराण्याप्रमाणे जवळ आणला; आणि मात्रीचे घराणे आणि कीशाचा मुलगा शौल निवडून घेण्यात आला. पण जेव्हा त्यांनी त्याचा शोध केला तेव्हा तो सापडला नाही.
Potem kazał przystąpić pokoleniu Benjaminowemu według domów jego, i padł los na dom Metry, a trafił na Saula, syna Cysowego; i szukano go, ale go nie znaleziono.
22 २२ मग त्यांनी परमेश्वरास आणखी विचारले की, “तो पुरुष इकडे फिरून येईल काय?” तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, “पाहा तो सामानामध्ये लपला आहे.”
Przetoż pytali się znowu Pana: Przyjdzieli jeszcze sam ten mąż? I odpowiedział Pan: Oto się skrył między sprzętem.
23 २३ मग त्यांनी धावत जाऊन त्यास तेथून आणले. तो लोकांमध्ये उभा राहिला तेव्हा सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता.
Tedy poszedłszy wzięli go stamtąd. I stanął w pośród ludu, i był głową wyższy nad wszystek lud.
24 २४ तेव्हा शमुवेल सर्व लोकांस म्हणाला, “ज्याला परमेश्वराने निवडले त्यास तुम्ही पाहता काय? त्याच्यासारखा सर्व लोकात कोणी नाही!” सर्व लोक ओरडून म्हणाले, “राजा दीर्घायुषी होवो!”
I rzekł Samuel do wszystkiego ludu: Widzicież, kogo to Pan obrał, że mu niemasz równego między wszystkim ludem? przetoż zakrzyknął wszystek lud, mówiąc: Niech żyje król!
25 २५ तेव्हा शमुवेलाने राजाच्या कारभाराचे नियम आणि कायदे लोकांस सांगितले, आणि ते एका पुस्तकात लिहून परमेश्वराच्या समोर ठेवले. मग शमुवेलाने सर्व लोकांस आपापल्या घरी पाठवून दिले.
Tedy powiedział Samuel ludowi prawo królewskie, i spisał je na księgach, które położył przed Panem. Potem rozpuścił Samuel wszystek lud, każdego do domu swego.
26 २६ शौलही आपल्या घरी गिबा येथे गेला, आणि ज्यांच्या मनाला परमेश्वराने स्पर्श केला, अशी काही बलवान माणसे त्यांच्याबरोबर गेली.
Także i Saul szedł do domu swego do Gabaa, i szły za nim wojska, których Bóg serca dotknął.
27 २७ परंतु काही कुचकामी माणसे होती ती म्हणाली, “हा पुरुष आम्हास कसा काय सोडवील?” त्यांनी त्याचा अनादर केला व त्यास काही भेट आणली नाही. पण शौल शांत राहिला.
Lecz ludzie niepobożni rzekli: Cóż, tenże nas wybawi? I wzgardzili nim, ani mu przynieśli darów; ale on czynił, jakoby nie słyszał.