< १पेत्र. 4 >
1 १ म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले आणि तुम्हीही त्याच्या वृत्तीची शस्त्रसामग्री परिधान करा कारण ज्याने देहात सोसले आहे तो पापापासून दूर झाला आहे.
Христу убо пострадавшу за ны плотию, и вы в ту же мысль вооружитеся: зане пострадавый плотию, преста от греха,
2 २ म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे.
во еже не ктому человеческим похотем, но воли Божией прочее во плоти жити время.
3 ३ कारण परराष्ट्रीयांच्या इच्छेप्रमाणे करण्यास गेलेला काळ पुरे झाला. तेव्हा तुम्ही कामातुरपणात, वासनांत, दारूबाजीत, दंगलीत, तसेच बदफैली व अमंगळ मूर्तीपूजेत आपल्या मार्गाने गेलात.
Довлеет бо вам мимошедшее время жития, волю языческую творившым, хождшым в нечистотах, в похотех, в мужеложстве, в скотоложстве, в помыслех, в пиянстве, в козлогласованиих, в лихоимании и богомерзких идолослужениих:
4 ४ अशा बेतालपणाच्या स्वैराचरणात आता तुम्ही त्यांच्याबरोबर घुसत नाही, ह्याचे त्यांना नवल वाटून ते तुमची निंदा करतात.
о немже дивятся, не сходящымся вам в тоже блуда разлияние, хуляще:
5 ५ तरीही, देव जो जिवंतांचा व मृतांचा न्याय करण्यास तयार आहे त्यास ते आपला हिशोब देतील.
иже воздадят слово готову Сущему судити живым и мертвым.
6 ६ कारण, याकरिता, मृतांनादेखील शुभवर्तमान सांगण्यात आले होते; म्हणजे जरी मनुष्यांप्रमाणे त्यांचा देहात न्याय झाला तरी त्यांनी देवाप्रमाणे आत्म्यात जिवंत रहावे.
На се бо и мертвым благовестися, да суд убо приимут по человеку плотию, поживут же по Бозе духом.
7 ७ पण सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे म्हणून समंजस मनाचे व्हा आणि प्रार्थनेसाठी सावध रहा;
Всем же кончина приближися. Уцеломудритеся убо и трезвитеся в молитвах.
8 ८ आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की आपल्यात वाढती प्रीती ठेवा, कारण प्रीतीने पापांची रास झाकली जाते.
Прежде же всех друг ко другу любовь прилежну имейте, зане любовь покрывает множество грехов.
9 ९ काही कुरकुर न करता तुम्ही सर्वजण एकमेकांचा पाहुणचार करणारे व्हा.
Страннолюбцы друг ко другу, без роптании.
10 १० तुम्ही देवाच्या बहुविध कृपेचे चांगले कारभारी या नात्याने, प्रत्येकास मिळालेल्या कृपादानाने एकमेकांची सेवा करा.
Кийждо якоже прият дарование, между себе сим служаще, яко добрии строителие различныя благодати Божия.
11 ११ जो भाषण करतो त्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे व जो सेवा करतो त्याने आपण आपली सेवा देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. म्हणजे, येशू ख्रिस्ताद्वारे, सर्व गोष्टींत देवाचे गौरव करावे, त्यास गौरव व पराक्रम ही युगानुयुग असोत. आमेन. (aiōn )
Аще кто глаголет, яко словеса Божия: аще кто служит, яко от крепости, юже подает Бог: да о всем славится Бог Иисус Христом, Емуже есть слава и держава во веки веков. Аминь. (aiōn )
12 १२ प्रियांनो, तुमच्या परीक्षेसाठी, तुमची अग्निपरीक्षा होण्यात तुम्हास काही अपूर्व झाले, असे वाटून त्याचे नवल मानू नका.
Возлюбленнии, не дивитеся еже в вас раждежению ко искушению вам бываему, яко чужду вам случающуся:
13 १३ उलट तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखात भागीदार होत आहात म्हणून आनंद करा. म्हणजे त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हाही फार मोठ्या आनंदाने तुम्ही उल्लासित व्हावे.
но понеже приобщаетеся Христовым страстем, радуйтеся, яко да и в явление славы Его возрадуетеся веселящеся.
14 १४ ख्रिस्ताच्या नावाकरता तुमची निंदा होत असेल तर तुम्ही धन्य! आहात कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे.
Аще укоряеми бываете о имени Христове, блажени есте яко Славы и Божий Дух на вас почивает: онеми убо хулится, а вами прославляется.
15 १५ पण तुमच्यातील कोणी खुनी किंवा चोर म्हणून, वाईट करणारा किंवा दुसर्याच्या कामात लुडबुड करणारा म्हणून कोणी दुःख भोगू नये.
Да не кто убо от вас постраждет яко убийца, или яко тать, или яко злодей, или яко чуждопосетитель:
16 १६ ख्रिस्ती म्हणून जर कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्यास लाज वाटू नये; त्या नावामुळे देवाचे गौरव करावे.
аще ли же яко Христианин, да не стыдится, да прославляет же Бога в части сей.
17 १७ कारण देवाच्या घराण्यापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आता आली आहे आणि तो जर प्रथम आपल्यापासून झाला, तर जे देवाचे शुभवर्तमान मानीत नाहीत त्यांचा शेवट काय होईल?
Яко время начати суд от дому Божия: аще же прежде от вас, кая кончина противящымся Божию Евангелию?
18 १८ नीतिमान जर कष्टाने तर जो भक्तिहीन व पापी ह्याला ठिकाण कोठे मिळेल?
И аще праведник едва спасется, нечестивый и грешный где явится?
19 १९ म्हणून जे देवाच्या इच्छेप्रमाणे सोसतात त्यांनी चांगले करीत राहून, जो विश्वासू निर्माणकर्ता आहे त्याच्याहाती आपले जीव सोपवावेत.
Темже и страждущии по воли Божией, яко верну Зиждителю да предадят душы своя во благотворении.