< १पेत्र. 3 >

1 आणि तुम्ही विवाहित स्त्रियांनो, आपल्या पतीच्या अधीन रहा; म्हणजे कोणी वचनाला अमान्य असेल, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचनांवाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे कारण ते तुमचे शुद्ध, आदराचे आचरण पाहतील.
Wives, be subject to your own husbands in like manner, that even if some are disobedient to the word, they may be won through the behavior of the wives without the word,
2
having beheld your pure behavior in fear,
3 तुमची शोभा ही केस गुंफणे, सोन्याची दागिने घालणे आणि उंची वस्त्रे वापरणे ह्यांची बाहेरची शोभा असू नये;
whose adorning—let it not be that which is outward, of braiding of hair, and of putting around of things of gold, or of putting on of garments,
4 पण अंतःकरणात गुप्त राहणार्‍या मानवी स्वभावात, म्हणजे देवाच्या दृष्टीने बहुमोल असलेल्या, सौम्य आणि शांत आत्म्याच्या अविनाशी भूषणात ती असावी.
but—the hidden man of the heart, by the incorruptible [thing] of the meek and quiet spirit, which is of great value before God,
5 कारण देवावर आशा ठेवणार्‍या, प्राचीन काळच्या, पवित्र स्त्रियांनीही अशाप्रकारे आपल्या पतीच्या अधीन राहून स्वतःला शोभवत असत.
for thus once also the holy women who hoped on God were adorning themselves, being subject to their own husbands,
6 उदाहरणार्थ, सारेनेही अब्राहामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञा पाळल्या. तुम्ही चांगले करीत असाल आणि कोणत्याही भयाला भीत नसाल तर तुम्ही तिच्या मुली झाला आहात.
as Sarah was obedient to Abraham, calling him “lord,” of whom you became daughters, doing good, and not fearing any terror.
7 पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीला अधिक नाजूक पात्राप्रमाणे, आपल्या ज्ञानानुसार, मान द्या आणि जीवनाच्या कृपेचे जोडीचे वारीस म्हणून एकत्र रहा, म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येवू नये.
Husbands, in like manner, dwelling with [them], according to knowledge, as to a weaker vessel—to the wife—imparting honor, as also being heirs together of the grace of life, that your prayers are not hindered.
8 शेवटी सर्वजण एकमनाचे व्हा आणि एकभावाचे होऊन बंधुप्रेम बाळगणारे, कनवाळू व प्रेमळ मनाचे व्हा.
And finally, be all of one mind, having fellow-feeling, loving as brothers, compassionate, courteous,
9 तर वाईटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा, अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; म्हणजे तुम्हास आशीर्वाद हे वतन मिळावे.
not giving back evil for evil, or reviling for reviling, but on the contrary, blessing, having known that you were called to this, that you may inherit a blessing;
10 १० कारण, “जो जीविताची आवड धरतो व चांगले दिवस बघावेत अशी इच्छा करतो त्याने वाईटापासून आपली जीभ कपटी भाषणापासून, आपले ओठ आवरावेत
for “he who is willing to love life, and to see good days, let him guard his tongue from evil, and his lips—not to speak guile;
11 ११ त्याने वाईट सोडून चांगले करावे, शांतीचा शोध करून तिला अनुसरावे.
let him turn aside from evil, and do good, let him seek peace and pursue it;
12 १२ कारण परमेश्वराचे डोळे नीतिमानांवर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात पण वाईट करणार्‍यावर परमेश्वराची करडी नजर असते.”
because the eyes of the LORD [are] on the righteous, and His ears—to their supplication, but the face of the LORD [is] against those doing evil”;
13 १३ आणि तुम्ही जर चांगल्याविषयी आवेशी झाला, तर कोण तुमचे वाईट करील?
and who [is] he who will be doing you evil, if you may become imitators of Him who is good?
14 १४ पण, नीतिमत्त्वाकरता तुम्ही सोसले तर तुम्ही धन्य! त्यांच्या भयाने भिऊ नका किंवा अस्वस्थ होऊ नका.
But if you also should suffer because of righteousness, [you are] blessed! And do not be afraid of their fear, nor be troubled,
15 १५ पण ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना व तुमच्या आशेचे कारण विचारणार्‍या प्रत्येक मनुष्यास सौम्यतेने व आदराने प्रत्युत्तर देण्यास तुम्ही नेहमी तयार असा.
but sanctify the LORD God in your hearts. And always [be] ready for defense to everyone who is asking of you an account concerning the hope that [is] in you, with meekness and fear,
16 १६ आणि चांगला विवेक ठेवा; म्हणजे, तुमच्याविषयी वाईट बोलत असता, ख्रिस्तातील तुमच्या चांगल्या आचरणावर खोटे आरोप करणार्‍यांना लाज वाटावी.
having a good conscience, so that whenever they speak against you as evildoers, they may be ashamed—[those] who are maligning your good behavior in Christ;
17 १७ कारण चांगले केल्याबद्दल तुम्ही सोसावे हे जर देवाला बरे वाटते, तर वाईट केल्याबद्दल सोसण्यापेक्षा ते अधिक बरे.
for if the will of God wills it, [it is] better to suffer doing good, than doing evil;
18 १८ कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मरण पावला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला.
also because Christ suffered once for sin—righteous for unrighteous—that He might lead us to God, indeed having been put to death in the flesh, but having been made alive in the Spirit,
19 १९ आणि तो त्याद्वारे गेला व त्याने तुरूंगातल्या आत्म्यांना घोषणा केली.
by which, having gone, He also preached to the spirits in prison,
20 २० नोहाच्या दिवसात, तारू तयार होतेवेळी, देवाची सहनशीलता प्रतीक्षा करीत असता, पूर्वी ज्यांनी अवमान केला ते हे होते. त्या तारवात केवळ थोडे, म्हणजे आठ जीव, पाण्याकडून तारले गेले.
who sometime [ago] disobeyed when once the long-suffering of God waited, in [the] days of Noah—an ark being prepared—in which few, that is, eight souls, were saved through water,
21 २१ आतासुद्धा, त्याचे प्रतिरूप असा बाप्तिस्मा; देहाचा मळ काढून नाही, पण चांगल्या विवेकाने देवाला दिलेले वचन म्हणून, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडून आपल्याला तारतो.
also an antitype to immersion which now saves you—not a putting away of the filth of flesh, but the question of a good conscience in regard to God, through the resurrection of Jesus Christ,
22 २२ तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश त्याच्या अधीन आहेत.
who is at the right hand of God, having gone on to Heaven—messengers, and authorities, and powers, having been subjected to Him.

< १पेत्र. 3 >

A Dove is Sent Forth from the Ark
A Dove is Sent Forth from the Ark