< १पेत्र. 2 >
1 १ म्हणून तुम्ही सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे दूर ठेवून,
Putting away, therefore, all vice and all deceit and hypocrisy and envyings and all detractions,
2 २ परमेश्वर कृपाळू आहे, असा तुम्ही अनुभव घेतला आहे तर तुम्ही त्याद्वारे तारणासाठी तुमची वाढ व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे आध्यात्मिक निऱ्या दुधाची इच्छा धरा.
As new-born babes, for the pure milk that is for the mind, eagerly crave, that, thereby, ye may grow unto salvation: —
If ye have tasted for yourselves that, gracious, is the Lord, —
4 ४ मनुष्यांनी नाकारलेल्या पण देवाने निवडलेल्या मोलवान अशा जिवंत दगडाकडे तुम्ही येत असता,
Unto whom coming near, as unto a living stone—by men, indeed, rejected, but, with God, chosen, held in honour,
5 ५ तुम्हीही जिवंत दगडांप्रमाणे, आत्मिक भवन असे, रचले जात आहात देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ, येशू ख्रिस्ताद्वारे, अर्पण करण्यासाठी एक पवित्र याजकगण असे उभारले जात आहात.
Yourselves also, as living stones, are being built up a spiritual house, for a holy priesthood, to offer spiritual sacrifices, well-pleasing unto God through Jesus Christ;
6 ६ म्हणून शास्त्रलेखातही असे आहे की, “पाहा, मी एक निवडलेला व मोलवान असलेला, कोनशिला सियोनात ठेवतो आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो फजीत होणार नाही.”
Inasmuch as it is contained in scripture—Lo! I lay in Zion an outmost corner stone, chosen, held in honour, and, he that resteth faith thereupon, shall not be put to shame.
7 ७ म्हणून विश्वास ठेवणार्या तुम्हास तो मोलवान आहे; पण, जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना ‘बांधणार्यांनी जो दगड नाकारला तोच कोपर्याचा मुख्य कोनशिला झाला आहे.’
Unto you, then, is the honour—[unto you] who believe; but, unto such as disbelieve, The stone which the builders rejected, —The same, hath become head of the corner,
8 ८ असा देखील शास्त्रलेख आहे, “अडखळण्याचा दगड व अडथळ्याचा खडक झाला आहे.” ते वचन मानीत नसल्यामुळे अडखळतात आणि त्यासाठीच ते नेमलेले होते.
And a stone to strike against, and a rock to stumble over: Who stumble because, unto the word, they do not yield, —unto which also they have been appointed;
9 ९ पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा; ह्यासाठी की, तुम्हास ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.
But, ye, are a chosen race, a royal priesthood, a holy nation, a people for a peculiar treasure, that, the excellences, ye may tell forth, of him who, out of darkness, hath called you into his marvellous light: —
10 १० ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता पण आता देवाचे लोक आहात; तुमच्यावर दया केली नव्हती पण आता दया केली गेली आहे.
Who, at one time, were a No-people, but, now, are a people of God, —who had not been enjoying mercy, but, now, have received mercy.
11 ११ माझ्या प्रियांनो, तुम्ही उपरी व प्रवासी असल्यामुळे मी तुम्हास विनंती करतो की, आत्म्याबरोबर लढाई करणार्या दैहिक वासनांपासून दूर रहा.
Beloved! I exhort you, as sojourners and pilgrims, to abstain from fleshly covetings, such as take the field against the soul;
12 १२ परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, म्हणजे तुम्हास दुराचरणी मानून, ते जरी तुमच्याविषयी वाईट बोलतात, तरी तुमची जी चांगली कामे त्यांना दिसतील, त्यावरून त्याच्या भेटीच्या दिवशी त्यांनी देवाचे गौरव करावे.
Having, your behaviour among the nations, honourable, —in order that, wherein they speak against you as evil-doers, they may, owing to the honourable works they are permitted to behold, glorify God in the day of visitation.
13 १३ प्रत्येक प्रकारच्या मानवी व्यवस्थेला, प्रभूकरता, आज्ञाधारक रहा. राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन राहा.
Submit yourselves unto every human creation, for the Lord’s sake, —whether unto a king, as one that protecteth,
14 १४ जे अधिकारी असतील त्यांना आज्ञांकित रहा; कारण वाईट करणार्यांना शिक्षा करण्यास व चांगले करणार्यांची प्रशंसा करण्यास ते पाठवलेले आहेत.
Or unto governors, as, through him, sent—for vengeance on evil-doers, but praise to such as do good;
15 १५ कारण देवाची इच्छा आहे की, तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध मनुष्यांच्या अज्ञानाला गप्प करावे.
Because, so, is the will of God, —by doing good, to be putting to silence, the ignorance of heedless men:
16 १६ तुम्ही स्वतंत्र आहात, परंतु वाईट प्रवृतीवर पांघरूण घालण्यास स्वातंत्र्याचा उपयोग न करता, देवाचे दास म्हणून जगावे
As free, yet, not as a cloak of vice, holding your freedom, but, as God’s servants.
17 १७ सर्वांना मान द्या; बंधुवर्गावर प्रीती करा; देवाचे भय धरा; राजाला मान द्या.
Unto all men, give honour, unto the brotherhood, shew love, unto God, give reverence, the king, hold in honour.
18 १८ घरच्या नोकरांनो, तुम्ही पूर्ण आदराने आपल्या स्वामीच्या आज्ञेत रहा. जे चांगले आणि सहनशील असतील त्यांनाच नव्हे, पण कठोर असतील त्यांनादेखील आज्ञेत रहा
Ye domestics, submitting yourselves, in all reverence, unto your masters, —not only unto the good and considerate, but also unto the perverse;
19 १९ कारण, जर कोणी देवाविषयी विवेक बाळगून, अन्याय सोसून, दुःख सहन करीत असेल, तर ते स्तुत्य आहे;
For, this, is thankworthy, —If, for the sake of conscience towards God, one beareth griefs, suffering wrongfully, —
20 २० पण तुम्ही पाप करता तेव्हा तुम्हास ठोसे दिले गेले आणि तुम्ही ते सहन केलेत तर त्यामध्ये काय मोठेपणा आहे? पण चांगले करून सोसावे लागते तेव्हा तुम्ही ते सहन केले, तर ते देवाला आवडणारे आहे.
For what sort of honour is it—if, committing sin, and being buffeted, ye endure it? But, if, doing good, and suffering, ye endure it, this, is thankworthy with God.
21 २१ कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख सोसले आहे; आणि तुम्ही त्याच्या पावलांवरून मागोमाग जावे म्हणून त्याने तुमच्यासाठी कित्ता ठेवला आहे.
For, hereunto, have ye been called; because, Christ also, suffered in your behalf, unto you, leaving behind a pattern, that ye might follow in his steps:
22 २२ त्याने पाप केले नाही व त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही.
Who did not, a sin, commit, neither was deceit found in his mouth, —
23 २३ त्याची हेटाळणी होत असता त्याने फिरून हेटाळले नाही, आणि सोशीत असता त्याने धमकावले नाही; पण देव जो नीतीने न्याय करतो त्याच्या हातात त्याने स्वतःस सोपवले.
Who, being reviled, was not reviling again, suffering, he was not threatening, but was making surrender unto him that judgeth righteously, —
24 २४ त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून वधस्तंभावर नेली, ह्यासाठी की, आपण पापाला मरून नीतिमत्त्वाला जिवंत रहावे; त्यास बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात.
Who, our sins, himself, bare up, in his body, unto the tree, in order that we, from our sins getting away, in righteousness, might live, —by whose stripes, ye have been healed;
25 २५ कारण तुम्ही मेंढरांसारखे बहकत होता; पण जो तुमच्या जीवांचा मेंढपाळ व रक्षक आहे, त्याच्याकडे आता परत आला आहात.
For ye were as sheep going astray, but have now turned back unto the shepherd and overseer of your souls.